Sunday, 20 January 2019

कविता : तिच्या कविता

.         *तिच्या कविता*

वस्तीला होत्या तिच्या कविता काही
गहिवरलो वाचून, भिजली माझी बाही

शब्दांचे रचुनी इमले कविता केल्या
तरी अलगद छेडून हृदयाला त्या गेल्या

साचले दु:ख मौनात अक्षरे सारी
विरहाची गाणी गाऊन थिजली स्वारी

ठेवून मनावर गतजन्माचे ओझे
ते तिचे तसेही अंतर ओले माझे

भळभळत्या जखमा उरी देऊनी गेल्या
पुसल्या तरी थोड्या अजून पापण्या ओल्या

             © *रमेश*

कविता : नववर्ष

*💜न💜वे💜व💜र्ष💜*
नकोच चिंता आयुष्याची
आणि काळजी भविष्याची
सुखदुःखाचे येणे जाणे
चालत राहील सदा-कदा

मित्र, सोबती तुम्हासारखे
असता मजला काय हवे
या स्नेहातून घडते आहे
जीवन माझे रोज नवे

मैत्र राहू दे असेच कायम
हृदयातून ओलावा आणि
आनंदाची अन् सौख्याची
मिळून गाऊ जीवनगाणी

© *चंद्रकांत निकाडे*
💜💜💜💜💜💜💜,,Xđ