Tuesday, 27 September 2022
नवे वृध्दाश्रम....नवी यातनाकेंद्रे
मित्रांनो बोलते किंवा लिहिते व्हा
Wednesday, 21 September 2022
हळदी-कुंकवाची पावलं रक्ताळण्या आधी...
बहुमूल्य विचार
Tuesday, 20 September 2022
Waiter Moon यांच्या इंग्रजी कवितेचा मराठी भावानुवाद
Monday, 19 September 2022
अनुल्लेख
Saturday, 17 September 2022
कोकिळा आणि कोकीळ
वसंत ऋतुच्या आगमनापासून ऐकू येणारा 'कुहूऽऽऽ कुहूऽऽऽ' आवाज पुढे ऑगस्ट-सप्टेंबरच्या अखेरीस ग्रीष्मातही तसाच आवाज ऐकू येतो. कुहू अशी साद ऐकू आली की 'कोकिळेला कंठ फुटला म्हणायचा' असे बऱ्याच जणांच्या तोंडून सहज उद्गार निघतात.
मात्र कोकिळा ही मादी असून ती कधीच सुंदर आणि गोड गात नाही किंवा ‘कुहूकुहू’ आवाज करीत नाही. मादीचा आवाज क्विक-क्विक-क्विक असा असतो. बऱ्याच जणांना माहीत नसते की पंचमातील साद कोकिळेची नसून कोकीळ या नर पक्ष्याची आहे. असे बघण्यात आले आहे की चिमण्या व इतर पक्षी पहाटे जशी चिवचिवाट करतात किंवा एकसुरात विशिष्ठ आवाज करत एकमेकांशी संवाद सादत असतात तसे कोकीळ पक्षी समूहाने करीत नाहीत, तसेच इतर पक्ष्यांच्या मनानी कोकीळ पक्षाचा आवाज खूपच मोठा असतो साधारण अर्ध्याहून अधिक क्षेत्रफळ व्यापले जाते. आपल्याला काही सांगायचे असेल तर त्यासाठी स्पीकर लागतो. कोकीळ नर पक्षाच्या आवाजाचा चढ उतार राग, प्रेम, आणि बऱ्याच गोष्टी सांगून जाते. ‘या मधुर आवाजाने अनेक कवी व लेखकांच्या साहित्यात कोकिळेने महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. पण बिचारा कोकीळ 'कुहू कुहू' असे वारंवार ओरडत राहून त्याचा गळा सुजला तरी त्याच्याकडे कुणाचे लक्षच नसते ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
परमेश्वराने जीवांची निर्मिती करताना प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत तसेच वनस्पती, पक्षी आणि प्राणीमात्रात काहीना काही वैशिठ्ये मुद्दामुनच ठेवली आहेत जसे आवाज, आकार, रंग, दिसणे आणि त्यापाठी काहीतरी कारण असलेच पाहिजे. असो.
विविध पक्षांची किलबिल पहाटेच्या शांतवेळी सगळ्यांनी ऐकली असेल. आपण जंगलात भटकंतीला गेलो असता, किंवा परसदारी आपण नेहमी विविध तऱ्हेच्या पक्षांनी काढलेल्या वेगवेगळ्या आवाजाने त्यांच्या मित्र मैत्रिणींना घातलेल्या सादेने, कधी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून शत्रू पासून सावध करण्यासाठी काढलेल्या विविध आवाजाने मन अचंबित होते आणि हे बघण्यात आणि ऐकण्यात खूप मजा वाटे !
कोकीळा पक्षी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतो आणि ती उबविण्याची जबाबदारी सोपवितो. कावळा त्याच्या घरट्याकडे कोणासही फिरकू देत नाही. तो त्याच्या घरट्याचे जीवापाड रक्षण करीत असतो. कावळा आणि कोकीळा या दोन पक्षात मोठे वैर आहे. कोकीळ पक्षी कधीच घरटी बांधत नाहीत ते कावळ्याच्या घरात अंडी घालतात आणि ती उबविण्याची जबाबदारीही कावळ्याकडे सोपवितात. अंडी दुसर्याच्या घरट्यात घालणे, ती न उबवणे, पिल्ले झाली कि त्यांना चारा पाणी न देणारा हा पक्षी जो फक्त अंडी घालतो आणि पिल्लांच्या पालन पोषणाची संपूर्ण जबादारी कावळ्यावर सोपवतो. वसंत ॠतूत कुहू कुहू गाणारा हा पक्षी आंबा, आणि बाभळीच्या दाट झाडीत जास्त प्रमाणात आढळतो.
कोकीळ मादी बहुदा कावळयाचं घरटं अंडी घालण्यासाठी शोधत असते. कोकीळ नर व मादी ऐतोबा आहेत. बहुतेक सर्व पक्षी आपल्या कुवतीनुसार सुबक वा ओबडधोबड घरटं तयार करतात. पण कोकीळ नर मादींना 'असावे घरकुल आपले छान' ही कवी कल्पना वाटत असावी. मूर्ख लोक घरं बांधतात यावर त्यांचा विश्वास असतो. घरटं बांधलं नाही तरी यथाकाल अंडी देण्याची वेळ येते मग कावळीच्या नकळत तिथे कोकीळ मादी अंडी घालते. कावळी मादी ती अंडी उबवते. बाहेर आलेल्या पिलांना भरवते. ही पिले उडून जाईपर्यंत तिला त्याचा थांगच लागत नाही. तसे बघता पक्षात धूर्त आणि चतुर ‘कावळा’ पक्षी असावा पण येथे अपवाद आढळतो.
नर कोकीळ कावळयासारखाच काळा कुळकुळीत पण जरा सडपातळ आणि डौलदार दिसतो. महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे त्याचा लाल डोळा. जसा माणिक लाल रंगाचा असतो तसा त्याचा भास होतो. मादी कोकीळ हा वेगळाच पक्षी आहे इतपत वेगळी वाटते. नर नखशिखांत काळा, मादी मात्र फिकट राखी रंगावर त्याच गडद रंगानं खडी काढावी अशी. नराची नजर गरीब तर तिची कावेबाज. तिच्या अप्पलपोटया स्वभावाचे दर्शन बऱ्याच जणांना अनेकदा घडले असेल.
दर १८ वर्षांनी 'कोकीळा व्रताचा' महिना येतो त्यावेळी कोकीळेचे दर्शन झाल्याशिवाय किंवा आवाज ऐकल्याशिवाय भाविक महिला अन्नग्रहण करीत नाहीत. त्यावेळी अनेक कोकिळ नरांना लोकांकडून बंदीवास धडवला जातो याकडे पक्षी मित्रांनी काळजी घ्यावयास पाहिजे.
हिवाळ्याची सुरूवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यागत वाटतो. कोकिळ पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार श्रीलंका येथेही याचे वास्तव्य आहे. कोकिळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. कोकिळ पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो. कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे यांचे आवडते खाद्य आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कोकीळ पक्ष्याचा कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो. हा आवाज. हिवाळ्याची सुरुवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यासारखा वाटतो.हा नरपक्ष्याचा आवाज असतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. हा पक्षी आपले एकुलते एक अंडे कावळ्याच्या किंवा डोमकावळ्याच्या घरट्यांत घालतात.
वर्णन
साधारणपणे कावळ्याएवढा (१७ इंच) आकारमानाचा हा पक्षी असून शेपटी लांब असते. नराचा मुख्य रंग काळा, डोळे गडद लाल रंगाचे चोच फिकट पोपटी रंगाची असून मादीचा मुख्य रंग गडद तपकिरी व त्यावर पांढरे-बदामी ठिपके-पट्टे असतात. याच्या किमान तीन उपजाती आहेत
आढळ
कोकीळ पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका येथेही याचे वास्तव्य आहे. कोकीळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.
वसतिस्थान
कोकीळ पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा (Arboreal) असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो.
अन्न
कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध पक्ष्याची अंडी हे यांचे खाद्य आहे. म्हणजेच हे पक्षी मांसाहार व शाकाहारही पाळतात.
वीणीचा हंगाम
मार्च ते ऑगस्ट हा काळ कोकीळ पक्ष्यांचा विणीचा काळ असून हे पक्षी आपले घरटे बांधत नाहीत, तसेच ते आपल्या पिलांची देखभालही करत नाहीत. मादी (कोकिळा) फिकट हिरव्या-राखाडी रंगाची त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असलेले अंडे तिला दिसेल अशा कोणत्याही इतर पक्ष्याच्या घरट्यात सोडून जाते.
आपल्या घरट्यात सोडून दिलेली अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे त्या घरट्यात राहणारे माता-पिता करतात.त्यांची स्वतःची पिले अंड्यातून बाहेर येण्याआधी बहुधा कोकिळेची पिले बाहेर आलेली असतात. त्यांची वाढही इतर पक्ष्यांच्या पिलांच्या मानाने वेगाने होते.
Sunday, 11 September 2022
कफन को
. *कफन को...*
तो गेल्याची बातमी
ग्रुपवर फिरत आली
आणि
"असा अचानक
काय झालं होतं
कालच भेटलो होतो
खरं वाटत नाही
खूप चांगला मित्र होता"
अशा असंख्य प्रतिक्रिया उमटल्या
शोकमग्न सहचारिणी
समजूनही सांगू शकली नाही
त्याचा देह गुरफटला होता अपुऱ्या कफनात
तेराव्याला गोडधोड खाऊन
त्याच्या आठवणीही
अनंतात विलीन झाल्या
सर्वांच्याच होतात
मात्र तरीही
*_'खिसा नसतो कफनाला'_*
हे आम्हाला केव्हा कळणार?
*©रमेश*