Sunday, 19 February 2017

निवडणूक कार्यभार

 *निवडणुकीला जाण्यापूर्वी(पिशवी भरताना) तयारी*
1⃣निवडणुकीसाठी नेण्याची पिशवी आजच काढून ठेवावी..
2⃣आपल्या आरोग्याशी संबंधित       *औषधे*(किमान 3-4दिवस पुरू शकणारी)पिशवीत टाकावी...मधुमेह/रक्तदाब/ह्रदयविकार/मूतखडा/पित्त/दमा/वात/मेंदूविकार/मूळव्याध इ.
3⃣याशिवाय सर्दी,ताप,खोकला,डोकेदुखी,अंगदुखी(Febrex plus),,
डोकेदुखी,अंगदुखी/(कोणत्याही दुखण्यासाठी आपत्कालीन)(paracetamol),,,
पित्त(zinetac),,,
उलटी(vomikind),,  संडास(metrozol/tinidazol),,अँलर्जी/ अंगखाज(Avil),,पोटदुखी(cyclopam),,,वायू/पचनतक्रार(हाजमोला पुड्या5),,,क्षारसंजीवनी पुडी1,,पाणीशुद्धीकरण औषध(जीवनड्राँप),,डेटाँल,जखमपट्टी,झंडुबाम/मुव्ह मलम,खाजपावडर,,इ...
4⃣अंथरुणपांघरुण,टाँवेल,अंतर्वस्त्रे,कपडे-1संच,हातरुमाल,दस्ती,(मफलर/टोपी,स्वेटर),साबण(अंग/कपडे),दंतमंजन,ब्रश,कंगवा,आरसा,पावडर,मुखकांती मलम,इ.
5⃣ *डास अगरबत्ती,,बँटरी*,मोबाईल व चार्जर,सुई,दोरा,कोरे कागद10,पेन(लाल,निळी),पेन्सिल,रबर,लिफाफे7-8,,मेणबत्ती,काडेपेटी,लाख,स्टेपलर/टाचण्या,,चिकटपट्टी,खडू,फेविकाँलट्यूब,घड्याळ,कँलक्युलेटर,ड्राइंगसीट1,स्केचपेन2,,मेणकापडी पिशव्या3-4,इ.
6⃣ *खाण्याच्या वस्तू*=बिस्किटपुडे3,उपवासी चिवडा3,चिक्की5,मूगदाळ3,चिवडा3, *दशम्या*,इ.
7⃣रेडिओ,एफएम,स्पीकर,पुस्तके/कादंबरी,मेमरीकार्ड,पाँवरबँक,
8⃣फोटो,ओळखपत्र,आँर्डर,इडीसी,,सर्व सहकारी कर्मचा-यांचे मोबाईल क्र., *संपर्क क्र.=तहसीलदार,झोनल,पोलिस स्टेशन*,पीआरओ पुस्तिका,
9⃣काही कागदपत्रांचे झेराँक्स काढून घेणे,सरकारी गाडीनेच प्रवास करणे,,महत्वाचे द्यावे लागणारे अहवाल जास्त झेराँक्स प्रती तालुक्याहूनच काढून घेणे.
सर्वांना निवडणुकीच्या शुभेच्छा!
*काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी!*
...सकारात्मक बनावे..सर्व चांगले होईल...आतापर्यंत एकाही निवडणुकीत आपले वाईट झालेले नाही..तेव्हा बिनधास्त रहावे...पूर्ण तयारीनिशी जबाबदारीने व एकजुटीने निवडणुकीला सामोरे जावे...
*आपण निवडणुक कामात यशस्वी होणारच आहोत.*

Sunday, 12 February 2017

शुद्धलेखनाचे अठरा नियम

शुद्धलेखनाचे अठरा नियम

अनुस्वारासंबंधीचे नियम
नियम १: स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
उदा- आंबा, चिंच, तंटा, गंगा, निबंध, आनंद

नियम २: य,व,र,ल,श,ष,स, ह, क्ष,ज्ञ यांच्यापूर्वी येणा-या अनुस्वारांबद्दल संस्कृतप्रमाणे शीर्षबिंदू द्यावा.
उदा-संयम, संवाद, संरक्षण, संलग्न, वंशज, दंश, संसार, कंस, सिंह, संक्षिप्त, संज्ञा.

नियम ३: नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर विभक्तिप्रत्यय लावताना व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदा- लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे, देशांत, त्यांना, त्यांच्यामुळे.

उपनियम ३: आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.
उदा- राज्यपालांचे, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.

नियम ४: वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पनीने सिद्ध होणारे व न होणारे अनुस्वार देऊ नयेत.
उदा- गांव, नांव, घरें यावर अनुस्वार देऊ नयेत.
    गाव, नाव, घरे असे लिहावे.

र्‍हस्व दीर्घ संबंधी नियम
(ज्याचा उच्चार चटकन,कमी वेळेत होतो.तेथे र्‍हस्व उच्चार करावा.)
नियम ५: तत्सम (संस्कृत) र्‍हस्व इकारान्त आणि उ-कारान्त शब्द प्रथमेत दीर्घान्त लिहावेत.
उदा- कवी, वायू, मृत्यू, शक्ती, भक्ती, उक्ती, गती, मती, शत्रू, बुद्धी,गती

उपनियम ५ एक अक्षरी शब्द दीर्घ लिहावेत.
उदा- मी, ती, ही, जी, की, तू, जू,
अपवाद- आणि , नि, कदापि, परंतु, तथापि, यथामति ही र्‍हस्व लिहावीत.

उपनियम ५- परंतु सामासिक शब्दांमध्ये तत्सम र्‍हस्व इ-कारान्त शब्द व उ-कारान्त शब्द प्रथमपदी आल्यास र्‍हस्व लिहावेत.
उदा- कवी- ‍कविराज,राजकवी, भक्ती- भक्तिभाव, मृत्यू-मृत्युंजय, मती-मतिमंद, गती-गतिमान.

नियम : मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यातील उपान्त्य इ-कार किंवा उ-कार र्‍हस्व लिहावेत.
उदा- किती, चिनी, विटी, सुरु , गुरु, पुढी, गुढी,‍ अतिथी
अपवाद- नीती, रीती, भीती, प्रीती, सुनीता, सुनील,

उपनियम ६: रफारापूर्वी येणारे  इकार व उकार दीर्घ लिहावेत.
उदा- कीर्ती, मूर्ती, तीर्थ, स्फूर्ती, मूर्ती.

नियम : अ-कारान्त शब्दांचे उपान्त्य इ-कार व उ-कार दीर्घ लिहावेत.
उदा- गरीब, चाळीस, वकील, माहीत, जमीन, फूल, चूल, भूल, मूळ, चाहूल, सून, वसूल, लसून, गुण,  ऊस, बहीण,खीर,तूप,गीत,शूर,शून्य,
अपवाद: मंदिर, विष, विश्व, प्रिय, अधिक, विपुल, नाजुक, चतुर, अरुण, तरुण, अखिल, सुख, शुभ, रुंद, अतुल,मित्र, पुण्य.

उपनियम ७: तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास ती अक्षरे सामान्यत: र्‍हस्व लिहावेत.
उदा: चिंच, लिंबू, तुरुंग, लिंग, बिंदू, अरविंद,‍ छि:, थु:, दु:ख, नि:शस्त्र

नियम : उपान्त्य दीर्घ ई-ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य इकार,उकार अभयवचनी सामान्य रुपांच्या वेळी र्‍हस्व लिहावेत.
उदा: गरीब- गरिबाचे, सून-सुनेचे, वडील- वडिलांचे, वकील-वकिलासाठी, जमीन- जमिनीपासून, फूल- फुलांना,मूल-मुलांसाठी,

अपवाद: शरीर-शरीराचे, गीता-गीतेत, सूत्र-सूत्रात, पूजा- पूजेकरिता, परीक्षा- परीक्षक, वधू परीक्षा.
किरकोळ नियम:
नियम : ‘पूर’ हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना यातील ‘पू’  दीर्घ लिहावा
उदा: कोल्हापूर, नागपूर,सोलापूर 

नियम १०: कोणता, एखादा, असे शब्द लिहावेत. कोणचा, एकादा, असे शब्द लिहू नयेत.

नियम ११: हळूहळू,‍ चिरीमिरी,मुळूमुळू यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरे व चौथे अक्षरे दीर्घान्त लिहावीत.

नियम १२: ‘पूर’ ए-कारान्त नामांचे सामान्यरुप या-कारान्त करावे.
उदा- फडके- फडक्यांना, करणे- करण्यांसाठी

नियम १३: लेखनात पात्राच्या किंवा वक्त्यांच्या तोंडी बोलण्याची भाषा वापरावी लागते.त्यावेळी ‍तिचे स्वरुप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे, अन्य व प्रसंगी तसे लिहू नये.
उदा- ‍तिचं बोलणं आवडलं.

नियम १४: कोणत्याही अंत्याक्षराचा पाय मोडू नये.
उदा:विदवान, भगवान,
अपवाद- अन्

नियम १५: केशवसूत पूर्वकालीन पद्य व विष्णू शास्त्री चिपूळणकर पूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरुन छापावे.

नियम १६: ‘राहणे, पाहणे, वाहणे, अशी रुपे वापरावीत.रहाणे,पहाणे, वहाणे, अशी रुपे वापरु नयेत.आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र राहा,पाहा, वाहा,याबरोबरच रहा, पहा, वहा, अशी रुपे वापरण्यास हरकत नाही.

नियम १७: ‘ही’ हे अव्यय तसेच ‘आदी’ व ‘ इत्यादी’ ही विशेषणे दीर्घान्तच ‍लिहावीत.


नियम १८: ‘पदयात वृत्ताचे बंधन पाळताना  र्‍हस्व दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढयापुरते स्वातंत्रय असावे. 

Friday, 10 February 2017


दहावीच्या विद्यार्थी साठी

10 वी भूगोल टेस्ट नं.एक
testmoz.com/1060471
पासवर्ड 1234



10 वी भूगोल टेस्ट नं.दोन
testmoz.com/1062375
पासवर्ड 1234

10 वी भूगोल टेस्ट नं. तीन
testmoz.com/1064839
पासवर्ड 1234

10 वी भूगोल टेस्ट नं. चार
testmoz.com/1071845
पासवर्ड 1234


नेट चालू केल्यावर
वरील  कोणत्याही  लिंक वर टच करा
आपले नाव नोंदवून login व्हा
टेस्ट सोडवा सबमीट करा
निकाल मिळेल.
चुका झाल्यास पुन्हा सोडवा
दुसर्‍यांदा सोडवताना आपले नावासमोर 2 अंक लिहा

Tuesday, 7 February 2017

स्मशान सहल


स्मशान सहल
अमावस्थाची काळीकुट रात्र, अंधारलेल्या स्मशानभूमीत धडधडणारी चिता आणि ‍तिच्या सान्निध्यात भुताची प्रतिक्षा करणारे शालेय विदयार्थी,मध्यरात्री पर्यंत भुताची वाट पाहिली, परंतु भुत काही आलेच नाही.पेटलेली चिता शांत झाली.त्याचबरोबर भुताची भीतीही निघुन गेली आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीची स्मशान सहल यशस्वी झाली.मुलांच्या मनातून अंधश्रदधा अंधार भुत प्रेत याची भीती घालवणे या उददेशाने हा अनोखा उपक्रम पोहाळे तर्फ आळते येथील स्मशान भूमीत राविण्यात आला.
    कोल्हापूर येथील शिवाजी मराठा हायस्कूल व नवनाथ हायस्कूल पोहाळे येथील विदयार्थी या सहलीत सहभागी झालेत.यामध्ये मुलीचा सहभाग सहभाग जास्त होता. चिल्लर पार्टीचे निमंत्रक व शिवाजी मराठा हायस्कूलचे ‍ शिक्षक मिलिंद यादव व पन्हाळा तालुका अंनिसचे अध्यक्ष व नवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत निकाडे यांनी या सहलीचे आयोजन केले.जगात कुठेही भुत नसते.भुताचे भास होतात.काही वेळेला इतरांचे लक्ष्य आपल्याकडे केंद्रित करुन घेण्यासाठी भूत लागल्याचा देखावा निर्माण केला जातो.तर कधी कधी मानसि आजारामुळेच संतुलन बिघडतेYतेव्हा भुताने झपाटले आहे असे वाटते. अशा वेळी बुवा- बाबांकडे न जाता उपचार केले जावेत असा संदेश या स्मशान सहलीच्या माध्यातून देण्यात आला.
अंनिसचे राज्य युवा कार्यवाह कृष्णात कोरे यांनी प्रयोग सादर करुन चमत्कारा मागील विज्ञान सांगितले. सर्पमित्र दिनकर चौगले यांनी भूत-प्रेत-आत्मा –सर्पज्ञानातील अनुभव कथन चितेसमोरच केले.मिलिद यादव यांनी आकाश निरीक्षणाबाबत माहिती व स्मशान सहलीचा हेतू सांगितला. भुताची भीती का वाटते,भूत भेटल्याच्या  अफवा कशा पसरतात अशा अनेक शंकाचे निरसन चंद्रकांत निकाडे यांनी केले. रात्री दिड वाजेपर्यंत ही स्मशान सहल विदयार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली व मनातली काल्पनिक भुता विषयीची भीती समूह नष्ट झाल्याचे सांगितले.या वेळी पन्हाळा तालुका अंनिस उपाध्यक्ष प्रकाश ठाणेकर,भीवाजी काटकर यांच्यासह  अंनिस कार्यकते.
उपस्थित होते.



आजचा विचार


कविता माझी

मला वाटते ते मी लिहितो
सदा सोबती कविता माझी
नाद बाद हा कुणी म्हणाले
फिकीर नसे मज कविता माझी
नावे ठेवा अथवा ठेचा
प्राणप्रिय पण कविता माझी
नसेल कोणी पुढे नि मागे
तरी ऊराशी  कविता माझी
कळले जग हे तिच्या संगती
घमघम अत्तर  कविता माझी
अखेर राहील सोबत माझ्या
न विसरता कविता माझी

रस्त्यात एखादं गोंडस पोरगं भेटलं                                  आणि त्याच्या सदरर्‍याची बटनं                             असतील झाली खाली-वर तर                                                नका नावं ठेवू त्याला                                                        हसू तर मुळीच नका                                                             क्षणभर थांबा, बटनं सरळ लावा                                               आणि एक......                                                                     गोड पापा घ्या                                                               थोडं हसेल                                                                 थँक्यू म्हणेल                                                                         तेव्हा तर फारच सुरेख दिसेल.                                       Waiter Moon,

Pohalapur=
Pohale + Panhala  + Kolhapur

सुंदर मराठी,संपन्न मराठी






खरंच शिकायला वय नसतं

खरंच शिकायला वय नसतं

 भ्रमणध्वनी आला.काळाची गरज होती. संच घेतला.किमान आलेला फोन घेण्याचं धाडस झालं.हळूहळू फोन,मेसेज,एमएमएस ,कॅमेरा,ब्लू टूथ, नेट, फेसबुक (चेहरे पुस्तक), इ मेल, सगळं अंगवळणी पडलं. दळणवळण जलद व्हायला लागलं.पत्रलेखन बंद झालं म्हणून दु:ख वाटून न घेता नव्याला स्वीकारलं.
  काल हरिश्चंद्र साळोखे या विद्यार्थ्याचा हैद्राबादहून मेल आला.'सर मी आपल्या सर्व पोस्ट वाचतो.पण ही साधनं तोकडी वाटतात.तुम्ही  Blog सुरू करा.
झालं आता हे ब्लाॅग प्रकरण काय असतं ते समजून घेऊन चालू करण्याचं चॅलेंज. आला दुसरा विद्यार्थी मदतीला. संजय कळके , सुसंस्कार हायस्कूल,भोसलेवाडी इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.फार जिज्ञासू आणि धडपडी.
 काल दुपारी दोन गोष्टी घेतल्या शिकून. ब्लाॅग बनवणं (Bloger) आणि मुलांसाठी ऑनलाईन टेस्ट(Testmoz.com) बनविणं.
आता पुरतं कळलं. शिकायला वयाचं बंधन नसतं आणि जो ज्ञानी तो गुरु. लहानथोर भेद टाकून, मी शहाणा हा अहंकार सोडून नवीन शिकलं पाहिजे. प्रवाहाबरोबर वाहात  गेलं पाहिजे.
याचे आणखी दोन फायदे .ज्याला आपण पाठवलेले आवडत असेल तो पाहील, आवडत नाही किंवा वाचा/पाहायची इच्छा नाही त्यांना पोस्ट काढून टाकायचीही तसदी नाही. शिवाय इमेज किंवा व्हाईस क्लीप डाऊनलोड व्हायची फार वाट बघत बसायची गरज नाही. वेळ तर वाचेलच. पण डाटा आणि फोन रुसणं (Hang होणंही) टळेल.
तर मग आजपासून जे काही सांगायचंयं ते
http://www.chandu64.blogspot.in 
या ब्लाॅगवर. धन्यवाद !
व्हाटस्अपला रामराम !

Sunday, 5 February 2017


खनिजद्रव्य व त्याचे उपयोग




खनिजद्रव्य व त्याचे उपयोग :
शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते. आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.
खनिज - फॉस्फरस  -
उपयोग - हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी ए.टी.पीची निर्मितीकरण्याकरिता
 
अभावी होणारे परिणाम - हाडे ठिसुळ होतातचयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात
 
स्त्रोत - अन्नधान्येदुग्धजन्यपदार्थ मेथीहिरव्या पालेभाज्या
खनिज - पोटॅशियम-
उपयोग - चेतापेशीच्या पोषणाकरिता
 
अभावी होणारे परिणाम - चेतापेशीवर परिणाम होतो
 
स्त्रोत - सुकी फळे
खनिज - कॅल्शियम-
उपयोग - हाडेदातरक्तमज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता
 
अभावी होणारे परिणाम - हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.
 
स्त्रोत - तीळ व पालेभाज्या
खनिज - लोह-
उपयोग - रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिताऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.
 
अभावी होणारे परिणाम - लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  
 
स्त्रोत - हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी
खनिज - तांबे-
उपयोग - हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे
 
अभावी होणारे परिणाम - तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.
 
स्त्रोत - पालेभाज्या
खनिज - सल्फर-
उपयोग - प्रथिनांची निर्मिती करणे अस्थी व नखे यांचे आरोग्य
 
अभावी होणारे परिणाम - केसहाडे कमकूवत होतात
खनिज - फ्लोरिन-
उपयोग - दातांचे रक्षण करण्याकरिता,
 
अभावी होणारे परिणाम - याच्या अभावी दंतक्षय होतो.
खनिज - सोडीयम-
उपयोग - रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो.
 
अभावी होणारे परिणाम -  रक्तदाबावर परिणाम होतो.  
खनिज - आयोडीन  -
उपयोग - थायराईड ग्रथीच्या पोषणाकरिता
 
अभावी होणारे परिणाम - गलगंड नावाचा आजार होतो.

अन्नपचन प्रक्रिया :
सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.
 
अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात. या स्त्रावामध्ये विकरेआम्लउत्प्रेरकयांचा समावेश होते. या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.
 
खलेल्ले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो.
 
अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.
 
1. 
अंग पदार्थ - मुख व गुहा
स्त्राव - लाळ  
 
विकर - टायलिन
 
माध्यम - अल्पांशाने
 
मूळ अन्न पदार्थ - पिष्टमय पदार्थ  
 
क्रिया आणि अंतिम - शर्करा (माल्टोज)
2. अंग पदार्थ - जठर
स्त्राव - हायड्रोक्लोरिक
 
माध्यम - आम्लअॅसिड  
 
मूळ अन्न पदार्थ - प्रथिने  
 
क्रिया आणि अंतिम - जंतुनाशक
3. अंग पदार्थ - जठररस  
स्त्राव - पेप्सीन,रेनीन
 
माध्यम - आम्ल
 
मूळ अन्न पदार्थ - प्रथिनेदूध
 
क्रिया आणि अंतिम - सरल प्रथिने (पेप्टोन)व्हे मध्ये रूपांतर 
4. अंग पदार्थ - लहान आतडे
स्त्राव - पित्तरस
 
माध्यम - अल्कली
 
मूळ अन्न पदार्थ - प्रथिने व मेद
 
क्रिया आणि अंतिम - मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे
5. अंग पदार्थ - स्वादुपिंडरस  
विकर - ट्रिप्सीनअमायलेझलायपेझ
 
माध्यम - अल्कलीअल्कली
 
मूळ अन्न पदार्थ - प्रथिने(पेप्टोन)पिष्टमय पदार्थमेद
 
क्रिया आणि अंतिम - अमिनोआम्लशर्करा व ग्लुकोजमेदाम्ल व ग्लिसरॉल
6. अंग पदार्थ - आंत्ररस

विकर - इरेप्सीनइनव्हरटेझलायपेझ
 
माध्यम - अल्कली
 
मूळ अन्न पदार्थ - प्रथिनेशर्करामेद  
 
क्रिया आणि अंतिम - अमिनोआम्लग्लुकोजफ्रूटोज व माल्तैझमेदाम्ल व ग्लिसरॉल