आनंदकंद
(गागाल गाल गागा, गागाल गाल गागा)
२२१ २१ २२ २२१ २१ २२
नाही
ताईत मी कुणाच्या नाही गळ्यातलाही
दाणा सुपातला वा नाही खळ्यातलाही
जो लाळ घोटताना झुरतो क्षणाक्षणाला
भटका उनाड कुत्रा नाही मळ्यातलाही
ज्याचे नशीब खोटे थाळी सजावयाला
मासा नदीतला वा नाही तळ्यातलाही
चोथा जसा अडकतो पाण्यात वाहणार्या
पाटात तुंबला वा नाही नळ्यातलाही
कोंडून श्वास मरते जगण्यातली आसक्ती
भुंगा फुलातला वा नाही कळ्यांतलाही
आझाद चाँद आहे अंधार कापणारा
बेवारशी दुरावा नाही लळ्यातलाही
_______ ©चाँद परछाई
या आठवड्यात आपल्याला , स्वर काफिया चा वापर करून 'कालगंगा' या वृत्ता मध्ये (गालगागा,गालगागा,गालगागा,गालगा) ,यती आठव्या अक्षरानंतर, असा वापर करून एक *मतला*(गझल च्या पहिला शेर (चरण,द्विपदी) व एक पुढचा शेर लिहावयाचा आहे. या दुसर्या नंबरच्या शेर च्या दुसर्या ओळीमध्ये ,शेवटी स्वर काफिया व अलामत (स्वरचिन्ह) ,तसेच रदीफ चा शब्द मतल्यात लिहिल्या प्रमाणेच असावा. खाली एक ऊदाहरण देतो, म्हणजे स्पष्टता येईल. प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर
खाली ऊदाहरण देत आहे. या फाॅरमॅट मध्ये लिहून, तपासून ग्रुपवर दाद मिळवण्यासाठीच टाका.हे चुकले का?,मार्गदर्शन करा, बरोबर आहे का? चेक करा ई. कोणत्याही काॅमेंट टाकण्याची आवश्यकता नाही. आता, एक मतला एक शेर लिहावा.तिन तिनदा तपासा, व 'दाद' मिळवण्यासाठीच ग्रुपवर टाका.आता तुम्ही सर्वजण खूप मोठे गझलकार/गझलकारा झाला आहात याची खात्री असू द्या.तुम्ही ,तुमच्या आत दडलेला 'हिरा' बाहेर काढाच, आता संकोच सोडाच, ही विनंती. हार्दिक शुभेच्छा! प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर
एक मतला,एक शेर
वृत्त - कालगंगा
लगावली -गालगागा , गालगागा , गालगागा , गालगा
वज़न - 2122 ,2122,2122,212
स्वर कवाफी -मागणे,साकडे,आडवे.
(समान स्वर -ए)
अलामत -अ
रदीफ-हे घालतो
मी तुझ्या दारात आता, मागणे हे घालतो
बंद डोळ्यांनी असा मी,साकडे हे घालतो ।
दूर गेले शब्द माझे,गझल नाही रंगली
काफियाला सूर येण्या, आडवे हे घालतो ।
रे.भ.भारस्वाडकर
दि.15-12-2022
वेळ-14-05
(समान स्वर अंतिम अक्षरे -'णे','डे','वे' -यांचा लांब ऊच्चार करा 'ए' येते)
अलामत-'ग','क','ड' मधे'अ' ची अलामत येते)
यती 8 व्या अक्षरानंतर येतो.
या आठवड्यात आपल्याला , स्वर काफिया चा वापर करून 'कालगंगा' या वृत्ता मध्ये (गालगागा,गालगागा,गालगागा,गालगा) ,यती आठव्या अक्षरानंतर, असा वापर करून एक *मतला*(गझल च्या पहिला शेर (चरण,द्विपदी) व एक पुढचा शेर लिहावयाचा आहे. या दुसर्या नंबरच्या शेर च्या दुसर्या ओळीमध्ये ,शेवटी स्वर काफिया व अलामत (स्वरचिन्ह) ,तसेच रदीफ चा शब्द मतल्यात लिहिल्या प्रमाणेच असावा. खाली एक ऊदाहरण देतो, म्हणजे स्पष्टता येईल. प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर
एक मतला,एक शेर
वृत्त - कालगंगा
लगावली -गालगागा , गालगागा , गालगागा , गालगा
वज़न - 2122 ,2122,2122,212
स्वर कवाफी -मागणे,साकडे,आडवे.
(समान स्वर -ए)
अलामत -अ
रदीफ-हे घालतो
मी तुझ्या दारात आता, मागणे हे घालतो
बंद डोळ्यांनी असा मी,साकडे हे घालतो ।
दूर गेले शब्द माझे,गझल नाही रंगली
काफियाला सूर येण्या, आडवे हे घालतो ।
रे.भ.भारस्वाडकर
दि.15-12-2022
वेळ-14-05
(समान स्वर अंतिम अक्षरे -'णे','डे','वे' -यांचा लांब ऊच्चार करा 'ए' येते)
अलामत-'ग','क','ड' मधे'अ' ची अलामत येते)
यती 8 व्या अक्षरानंतर येतो.
हे सर्वांसाठी आहे.न वाचता, न समजून घेता ,एवढी प्रसिद्धिची काय घाई झाली ? वाचा,चिंतन करा,मनन करा , वेळ घ्या, एक आठवडा आहे. "उरकून टाकुया" हा अॅप्रोच नका ठेऊ. लक्षात घ्या, शाबासकी तेंव्हाच मिळते, जेंव्हा मतला व शेर बलवान असतात. हे बलवान होण्यासाठी टाॅनिक आहे माझे लेख क्र.10 ते 16(गझलेचे आंतरघटक -5).ते काल मी थोडक्यात बोललो आहे.मला नेमके काय अपेक्षित आहे ते मुद्देसूद मांडतो. 1) पहिल्या ओळीत दावा(प्रस्तुती,विधान,Statement) , 2) दुसर्या ओळीमध्ये दलील (खुलासा). अर्थात, हा खुलासा ,अनपेक्षित कलाटणी देणारा,धक्कातंत्र, विरोधाभास, विसंगती,चमत्कृती ई.), 3) वृत्त- कालगंगा, 4) स्वर काफिया वापरायचा (समान स्वर ) 5) अलामत (शेवटच्या समान स्वर अक्षराच्या, अगोदरच्या अक्षराचे स्वरचिन्ह (अलामत) सारखे असलेच पाहिजे. (शिकत असताना अपवादाचे कायदे शक्य तो वाअरू नयेत).6) रदीफ चा शब्द/शब्दे जशाची तसे ठेवावेत, त्यात कोणताही बदल करू नये.(ऊदा.- 'होता' , असा रदीफ घेतला ,तर तोच'होता' हाशब्द ,मतल्याच्या दोन्ही ओळीत व शेर च्या दुसर्या ओळीत तसाच रिपिट झाला पाहिजे. रदीफ ची अक्षरे बदलायची नाहीत.) गझलेत स्वताहाला झोकून द्या, बरोबर जमणार. प्राडाॅ.रे.भ.भारस्वाडकर
सरजी, आपण पंधरा दिवस सलग या सर्वांना, शब्द काफियाचा सराव करून घेतलेला आहे.ही गझल शिकण्याची कार्यशाळा (Workshop) आहे.जास्तिजास्त अजून एक महिना किंवा फार झाले तर दिड महिना (म्हणजे एकूण दोन महिने शिकवणे चालू असेल. या नंतर संपूर्ण पाच शेर असलेल्या सशक्त ,बलवान गझला ही सर्व मंडळी ग्रुपवर पुढे कायम टाकत राहातील, फार तर फार आपण त्यात परिष्करण (आपलाच शब्द वापरला) करायचे आहे.त्यात, सर्व गुरू लोकांनी आपल्या नवीन गझला लिहून निकोप स्पर्धा लावायची की ,माझ्या गझलेपेक्षा अधीक सशक्त गझल कोण लिहिणार. यातून ऊत्तम गझलकार/गझलकारा मराठी भाषेस मिळतील, असे मला वाटते. त्यामुळे, स्वर काफिया, मात्रा वृत्ते, ऊर्दूतील 16 बहरे(वृत्त) ,गझल सादरीकरण, जगातल्या ऊत्तमोत्तम गझला व त्यांचे रसग्रहण, त्यातली नजाकत, श्रेष्ठ गझलकारांची माहिती, श्रेष्ठ गझल गायकांनी गाईलेल्या सर्वात सुंदर गझला(माझ्याकडे यांचे कलेक्शन आहे.आपणाकडे व ईतरांकडेही कलेक्शन असेल, ते या ग्रुप वर टाकायचे आहे. या सर्व अॅक्टिव्हिचा ऊद्देश एकच आहे की, या समुहातून गझल ची 'जाण' असलेली अभिरूची संपन्न , एक तरूण पिढी घडेल.आपल्या सारख्या अभ्यासू व जाणकार व्यक्तिंची खूप गरज आहे. अशी आजून गझल तज्ञ मंडळिंना या ग्रुप मध्ये सन्मानाने आमंत्रित करावे ,अशी मी आपणास विनंती करतो.आपले गझल सादरी करणावरील मार्गदर्शन(सोदाहरण) आपण पुढील बुधवारी रात्री 9-30 ते 10-00 यावेळेत करावे ही नम्र विनंती. प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर.
*गझलेचे ५ प्रमुख अंतरघटक आहेत.*
*१.अंदाज-ए-बया:*
गझलकाराची गझल सांगायची किंवा अभिव्यक्त करण्याची खुबी.म्हणजेच त्याची स्वतःची अशी एक ठराविक style.विषय कोणताही असो,शैली त्याची स्वतःची असते. एखाद्याची शैली ही आत्ममग्न असू शकते किंवा एखाद्याची शैली सामाजिक भान असणारी असू शकते.
*२. हुस्न-ए-खयाल:*
हुस्न म्हणजे सौंदर्य आणि खयाल म्हणजे विचार. विचारांमधील सौंदर्य.
कवी गझल लिहीत असतांना आपल्या कल्पनाविलासने सुंदर विचार मांडतो.
साय मी खातो मराठीच्या दुधाची,
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला?
सुरेश भट
झिलमिलातें है किश्तियों में दिये।
पूल खडे सो रहें हैं पानी में।
बशीर बद्र
*३. मौसिकी*
गेयता हवी. संगीतमयता हवी. लय हवी. Rhythmicality हवी.
आपण गझल लिहिताना कठोर व्यंजनाचा वापर शक्यतो टाळला पाहिजे. चार व्यंजने आहेत ती *शक्यतो* टाळलेली बरी.
*ट,ठ,ड, ढ* ही चारही कठीण व्यंजने आहेत.
मौसिकी गझल हिंदीमध्ये फार पुढे आली याचं श्रेय मालिका ए गझल मौसिका *बेगम अख्तर* यांना जातं.त्यांच्यानंतर नाव येतं ते *मुबारक बेगम* यांचं.
*४. तसव्वूफ, मारीफत*
उर्दुमध्ये त्यांच्या देवाची केलेली आळवणी.
सुफी गझल, नात, आखरी कलाम असे अनेक प्रकार आहेत.
आध्यात्मिक ज्ञानाची झालर, शरणागत भाव.
खिला दे फूल मेरे बाग में पैगंबरो जैसा
रकम हो जिसके पेशानी पे इक आयत जैसा
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले
माझे धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले
:सुरेश भट
गझल मध्ये अध्यात्मिकतेची झालर अपेक्षित आहे. पूर्ण गझल अध्यात्मिक नसते.
*५. नुदरत*
नावीन्य, नावेपणा.
एखाद्या कवीचा एखादा शब्द आपल्याला नाहीत नसतो.
मला सुचलेली एखादी कल्पना किती नवीनपणे मी मांडू शकतो,म्हणजे नुदरत.
एखादी कल्पना वेगळ्या पध्दतीने अधिक प्रभावीपणे मांडणे म्हणजे नुदरत.
देवदूता तुझा पगार किती
का मला सांग नोकरी नाही
:सुरेश भट.
राहिला केर काढायचा,
काळजाचे किती कोपरे
:सुरेश भट.
या पाच गोष्टी आपल्या गझलेत असतील तर आपली गझल सर्वश्रेष्ठ व्हायला वेळ लागणार नाही.
संक्षिप्त मुद्दे,
वेबिनार २ ऑगस्ट,२०२०.
गझलकार रे भ भारस्वाडकर.
[16/12/2022, 10:00 pm] +91 94034 31406: गझल संबंधी माहिती-(संकलित)-भाग-1 (कंसात दिलेले शब्द मूळ अरबी भाषेतिल आहेत.) 1) गझल शेवट पर्यंत एकाच वृत्तात(बहर) असली पाहिजे. 2) वृत्त (बहर) , यमक (काफिया) , अंत्य यमक (रदीफ) हे गझलेचे तीन प्रमुख घटक आहेत. 3) अंत्य यमक (रदीफ) कायम असते,त्यात बदल होत नाही.यमक (काफिया) चे वजन(Form) कायम असतो, पण तसेच वजन असलेले शब्द बदलतात. 4) यमक जर अनुनासिक असेल तर, गझल मधील सर्व यमके ( काफिये किंवा कवाफी), तशिच असली पाहिजेत. ऊदाहरणार्थ- संसार हे यमक असेल तर, प्रत्येक शेर च्या दुसर्या ओळित, अंगार, गंधार ,शृंगार अशिच अनुनासिक यमके असावी. 5) प्रत्येक गझलेत ,दोन-दोन ओळिंचे, कमित कमी पाच शेर असले पाहिजेत. पाच पेक्षा जास्त शेर असल्यास चालते. 6) गझल मध्ये चुकूनही भरतीचे अनावश्यक शब्द येणे अपेक्षित नाही.
-प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर
[16/12/2022, 10:00 pm] +91 94034 31406: भाग-2
1) लगावली म्हणजे काय ?
र्हस्व अक्षरे "लघू"असतात, ज्यांना U या चिन्हाने दर्शवितात.
दीर्घ अक्षरे "गुरू" असतात,ज्यांना — या चिन्हाने दर्शवितात.
आता आपण याचे ऊदाहरण पाहू.
आताच वेदनेला , आले फुलून तारे.
घरट्यात मेनकेला , घाले उठून वारे ।
——U , —U —— , ——U, —U—— .
हे गझलेचे अतिशय लोकप्रिय वृत्त आहे.
आपल्याला "प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाऊ तूज आता मी कोणत्या उपायी" याची चाल माहित आहे,तसेच जुने हिंदी गाणे " ऐ दील मूझे बतादे, मेरा कसूर क्या है ।" याचिही चाल माहित असेल.वृत्त एकच असेल तर ईकडची चाल तिकडे अन् तिकडची ईकडे करून बघा.
आता, आज याच वृत्तात चाल गुणगुणत, गझलचा पहिला शेर, ज्याला"मतला" असे म्हणतात, तो लिहा.
पुढिल शेर मध्ये(शेर म्हणजे गझलेच्या दोन ओळी), पहिल्या ओळित रदीफ काफियाचे बंधन नाही,मात्र वृत्ताचे बंधन आहे.दुसर्या ओळित मात्र रदीफ-काफियाचे बंधन पाळायचे आहे. जसे की,
बोलावयास आता , उरलेच ना कुणीही
दारास बंद केले , आले कुठून सारे ।
एक गोष्ट सांगायची आहे, ती अशी की, एका गुरू(—) अक्षरासाठी, दोन लघू (UU),अक्षरे लिहिली तर, अपवाद म्हणून चालतात.
जसे की, ——U च्या ठिकाणी वरिल ओळित, "उरलेच" (UU—U)असा शब्द आला आहे.
आज या वृत्तात गझलचा कमितकमी मतला(पहिल्या दोन ओळिंचा शेर) लिहून या ग्रुप मधे टाकावा ही विनंती. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पाच शेर लिहावेत.
गझलेतला प्रत्येक शेर हा स्वतंत्र असतो,पण पाच शेर मध्ये एक अंतरिक धागा असतो.
रोज एक शेर लिहा. मी तपासूनदेण्यासाठी ग्रुप वर टाका. लक्षात घ्या, कोणिही perfect नसतो.pratice makes man perfect.
जसे,विहीर खांदताना ,लगेच एक फुटावर पाणी लागत नाही, पण एकदा का ते लागले की मग कधीच आटत नाही.विद्येची देवता सरस्वती माता, आपली काव्य प्रतिभा ऊन्नती कडे नेऊ दे,एक ऊत्तम गझल आपल्या प्रतिभेतून निर्माण होऊ दे, अशीपरमेश्वराकडे प्रार्थना करतो.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर,औरंगाबाद,मो.9730093331
[16/12/2022, 10:01 pm] +91 94034 31406: भाग-3 काफिया
1) यमक (काफिया) ची निर्दोष निवड करण्यात,हमवजन-हमस्वर प्रासांची निवड करावी. 2)यमक (काफिया) ची निवड करताना अधिक लक्ष "स्वरांच्या समानतेवर " दिले पाहिजे.
जसे, गळाया,जळाया,कळाया,छळाया,वळाया,दळाया,फळाया ,असे हमवजन-हमस्वर प्रास निवडावेत.
जर आपण, मिळाया,जुळाया,झुराया,चोळाया असे प्रयोग करू नयेत, ते चुकिचे ठरेल.
याचप्रमाणे,"कास" या प्रास च्या जोडीला "प्रकाश", "आकाश", "विनाश" असे शब्द प्रास म्हणून निवडता येणार नाही. कारण "कास"मधील 'स" आणि "प्रकाश" मधील 'श', यांच्या ध्वनीत एकरूपता नाही.गझल लिहिताना अशा चुका करू नयेत.
3) गझलचा आणि संगीताचा खुप जवळचा संबंध असल्याने , यमक व अंत्य यमक (काफिया-रदीफ) च्या शब्दांमधे,कठोर शब्दांचा "वापर करू नये. जसे की , ट,ठ,ड,ढ,ण.
4) गझलेतिल शेर म्हणजे, "हेतुपूर्वक लिहिलेली समाप (हमवजन) प्रासयुक्त विचार-वाणी.
"माप" (वजन) म्हणजे लघु-गुरू अक्षरांच्या क्रमाप्रमाणे दोन शब्दातील साम्य.
वजनात बसणार्या सर्व शब्दांना 'हमवजन' असे म्हणतात.
ऊदाहरणार्थ : 'सवारी' या शब्दाचे वजन "लगागा" आहे.या सवारी शब्दाचे हमवजन शब्द नवाबी,रिकामा,तरीही,असाही,करावे,धरावे , हे आहेत.
शेर लिहिण्यासाठीनिवडलेल्या वजनानुसार,शब्दांचे संयोजन केले पाहिजे असा अर्थ "समाप" ( हमवजन) शब्द सूचित करतो.
5) शेवटी, शेरात जे सांगायचे आहे,तो आशय निश्चित पणे,वाचक/श्रोते यांच्या र्हदयाला स्पर्शून गेला पाहिजे. नुस्ता शब्दांचा सांगाडा नसावा.
प्रत्येक "शेर" ला हमखास दाद मिळालिच पाहिजे, ईतके त्या शेर मधे प्रभावी विचार असले पाहिजेत.
संकलक:डाॅ.रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद,मो.9730093331
[16/12/2022, 10:01 pm] +91 94034 31406: भाग क्र.4
गझल लिहिताना उभयान्वयी अव्ययांची विपुलता नसावी.शक्य तो कमी असावेत.
आता आपण उभयान्वयी अव्यय म्हणजे काय हे पाहू." " दोन किंवा अधिक शब्द , दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. "
ऊदाहरणार्थ: अथवा , आणि , व , आणखी , शिवाय , अन् , न् , कि , किंवा , वा , नाहीतर , का , आगर ,पण , बाकी , तरी , परी , किंतू , परंतू , कारण , म्हणून , जर , जरी , तरी , तर , की ,मात्र , म्हणजे ई.
काही वाक्ये पाहू.यावाक्यातिल उभयान्वयी अव्यय सहज ओळखता येतिल.
1) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.
2 ) देह जावो अथवा राहो.
3 ) मरावे परी किर्तीरूपे उरावे.
4 ) शेतकर्याने शेती नांगरली पण पाऊस पडला नाही.
5 ) जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल.
उभयान्वयी अव्यय कमी वापरायचे असल्यास ,म्हणजे भरतीचे अनावश्यक शब्द यावयास नको असल्यास, त्याकरिता योग्य मात्रेचा , योग्य तोलामोलाचा शब्द योजावयाची कुवत आणि शब्दसाठा असणे किंवा वाढवणे आवश्यक आहे. या बाबत माझा वयक्तिक अनुभव सांगतो. मी नेहमी शब्दकोडे सोडवतो.माझा तो आवडता छंद आहे.यामुळे शब्दसाठा वाढवण्यास मदत होते व पर्यायी शब्द शोधण्यासाठी मेंदुला चांगली चालना मिळते.असो.
दुसरा पर्याय असा की, गझल, लहान वृत्तात लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.म्हणजेगझलमध्ये सुरवातीपासून ते शेवटपर्यंत , " अन् , हा , ही ,हे , तो , ती , च , " असे भरतीचे शब्द येण्यास वाव राहणार नाही.
शेवटी , गझलमध्ये भरतीचे अनावश्यक शब्दच काय पण " शेर " सुध्दा यायला नकोत.
आता याच्या ऊलट जे मूळ शब्द आहेत त्यांची मोडतोड करून वजनात बसवण्याची कसरत करू नये.
अशा चुका होतात. माझ्याही बाबतित घडतात.पण माझा मित्र, सेलूचा गौतम सुर्यवंशी लगेच मला व्हाॅट्सअॅपवर कळवतो, मी दुरूस्त करतो.
नविन लिहिलेली गझल कोणाकडून तपासून घेण्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही व कोणाला वाटुही नये.
ऊद्या, गझलेतील क्रियापद आणि गझलेची स्मरणियता याबद्दलची संकलित ऊपयुक्त अशी माहिती, ऊदाहरणासह देतो.
या शिवाय जे संगिताचे जाणकार किंवा कानसेन आहेत, त्यांनिही गझलेतील " लयमाधुर्य " व सादरीकरण,श्रोत्यांचा प्रतिसाद ,याबाबत मार्गदर्शन/अनुभवकथन/ किस्से/ आठवणी शेअर कराव्यात ही नम्र विनंती.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर,औरंगाबाद, मो.9730093331
[16/12/2022, 10:01 pm] +91 94034 31406: भाग क्र.5 (संकलन)
क्रियापद
वाक्याचा अर्थ पूर्ण करणार्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
गझलच्या शेर मधे क्रियापद असतेच, ज्या मुळे अर्थ पुर्ण होतो.
क्रियापपदातील मूळ शब्दाला धातू असे म्हणतात.या धातू असलेल्या शब्दाच्या शेवटी जे अक्षर लावले जाते त्यास प्रत्यय असे म्हणतात.
म्हणजे धातूला प्रत्यय लावल्यानंतर क्रियापद बनते.
ऊदाहरणार्थ :
खेळ हा धातू ,"तो "हा प्रत्यय तर क्रियापद काय होईल ?
खेळतो हे क्रियापद होईल.
आता फक्त धातू बदलू, व प्रत्यय "तो " हे कायम ठेऊ.
मी काही क्रियापद लिहितो, तुम्ही धातू ओळखा.
बसतो , चालवितो , खातो , जातो , पडतो , रडवितो.
म्हणजे, धातू + प्रत्यय= क्रियापद.
आता खालिल वाक्यातिल क्रियापद ओळखा.
"आई रोज देवाला जाऊन येते."
वरिल वाक्यामध्ये दोन क्रिया घडतात.एक क्रिया जाण्याची व दुसरी येण्याची.यात, "जाऊन" या क्रियावाचक शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही."येते" या क्रियावाचक शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.
वाक्याचा अर्थ पुर्ण करणार्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात, हे आपण अगोदर समजून घेतले आहेच.म्हणून "येते" हे वरिल वाक्यातिल क्रियापद आहे. डाॅ.रे.भ.भारस्वाडकर
[16/12/2022, 10:01 pm] +91 94034 31406: भाग क्र.6 (संकलन)
आज आपण मराठी गझल आणि ईतर भाषांमधिल गझल(जसे की हिंदी,ऊर्दू,अरबी,फारसी) यांच्यातिल भाषेचा बाज (लहेजा) व फरक समजून घेणार आहोत.
ईतर भाषांमध्ये ज्या छंदामध्ये ,अंत्ययमक ची लगावली(गण), "गाल गाल" अशी शेवटी येत असेल, तर अशा छंदात, मराठीतून गझल लिहिण्याचा प्रयत्न टाळावा.कारण शेवटी हलन्त लघु येत आहे.मराठी गझलमध्ये तशी परंपरा नाही.परंपरे प्रमाणे, मराठी गझल मधील अंत्य यमक (रदीफ) कधीही हलन्त सापडणार नाही.
म्हणजे,थोडक्यात काय तर,मराठी भाषेत गझल लिहिताना,अंत्य यमकातील शेवटचे अक्षर कधीही लघू(र्हस्व) असू नये.
मात्र ईतर भाषेत अंत्य यमकातील शेवटचे अक्षर लघु चालते.या साठी ,एक ऊदाहरण देतो-
अजीब दास्ताँ है ये कहाँ शुरू कहाँ खतम
ये मंज़िले है कौनसी न वो समझ सके न हम ।
या मध्ये, "खतम " आणि "हम" हे हलन्त अंत्य यमक आले आहेत, ते हिंदी,ऊर्दू भाषेत चालते.
परंतू, मराठी गझल मध्ये, असे अंत्य यमकाच्या शेवटचे अक्षर लघु(र्हस्व) चालत नाही.ते गुरू(दीर्घ)च असावे लागते.
गझल ही गाण्याच्या दृष्टीने परिणामकारक असते,याची संपूर्ण जाणीव कविला असावी, म्हणून हा उपदव्याप.
हा झाला लयमाधुर्य/गेयता बाबत पहिला मुद्दा.
2) आता दुसरा मुद्दा, असा की , दोन ओळींच्या शेर च्या माध्यमातून संवाद साधण्याची कला गझल मध्ये छान करता येते.हा संवाद (डायलाॅग),कधी प्रियेसी बरोबर,कधी परमेश्वराशी चालु असतो,तर कधी अजून कुणाशी असतो.
ऊदाहरणार्थ -
जान लेनी थी ले लिये होते
मुस्कुराने की क्या ज़रूरत थी ।
एवढे तरी करून जा
हा वसंत आवरून जा
- सुरेश भट
3) दोन ओळींमधला विरोधाभास, हे गझलचे खास वैशिष्ट आहे.शेरच्या पहिल्या ओळीतले विधान अगदी सोपे आणि सरळ असते मात्र लगेच दुसर्या ओळीत कवी असे काही लिहून जातो की वाचक, हा विरोधाभास,किंवा कवी असे काही विपरित लिहून जातो की , वाचक किंवा श्रोता एकदम ऊसळून दाद देतो. हेच गझलचे वैशिष्ट्य, नविन गझल लिहिणार्यांनी पक्के लक्षात ठेऊन गझलचे शेर लिहावेत,अशी माझी आग्रहाची,कळकळिची विनंती आहे.
ऊदाहरण -
हमसे पुछो मिज़ाज बारिश का
हम जो कच्चे मकान वाले है ।
।
ऊत्तरे जेव्हा दिली नाही कुणी...
प्रश्न प्रेतांना विचारू लागलो !
सुरेश भट
4) गझल चे वैशिष्ट म्हणजे,थोडक्यात खूप सांगण्याची करामत हे आहे.साधे सोपे छोटे-छोटे शब्द असतात,मात्र त्यातला गर्भित अर्थ आणि त्या मागचे तत्व खूप खोल असते.या मुळेच गझल लोकांना आवडते व त्यांच्या मनाला स्पर्श करून जाते.
ऊदाहरण- जिगर मुरादाबादी यांच्या गझलेतील मला आवडलेला हा शेर बघा-
उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो
न जाने किस गली में ज़िन्दगी की शाम हो जाये ।
का म्हणून मी आता शब्द आवरू माझे
या विराट सत्याशी बोलणे सुरू आहे ।
सुरेश भट
(क्रमश:)
[16/12/2022, 10:01 pm] +91 94034 31406: भाग क्रमांक 8 : (संकलित ) गझलचे कायदे,नियम व अपवाद. गझल लिहिताना विशिष्ट छंद (बहर)किंवा वृत्त (लगावली ) पुर्ण गझलेत एकच असावी. मूळ वृत्तामध्ये जशी लगावली दिली आहे, त्यात बदल करू नयेत. हा झाला कायदा (Act) आणि नियम (Rules). या नियमाला अपवाद (Exception to the Rule), काय आहे हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. 1) अपवादात्मक परिस्थिती मध्ये, गझलकार, एका गुरू (दीर्घ) अक्षरासाठी,(गुरू अक्षराला दोन मात्रा व लघू (र्हस्व) अक्षराला एक मात्रा असते ) , अपवाद म्हणून, दोन लघू अक्षरे लिहितो.पण माप (वजन) तेच राहाते. या साठी ऊदाहरण देतो, म्हणजे, हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल. वेशीत लक्तरांना टांगायचे कधी उखळात भावनांना कांडायचे कधी । या मतल्या मध्ये, मूळ लगावली काय दिली आहे ? तर ; गागाल , गालगागा . पहिल्या अर्ध्या ओळीत," लक्तरांना " असा शब्द आला आहे, या साठी लगावली कंसात (गालगागा ) दिली आहे. बरोबरय ना ? आता खूप महत्वाचा मराठी व्याकरणाचा नियम सांगतो. जोडाक्षराच्या आधीच्या अक्षरावर दाब (जोर किंवा Accent) पडत असेल तर तो वर्ण गुरू मानावा , दाब नसेल तर लघू मानावे. याचे ऊदाहरण दिले तर आपल्या मनात संभ्रम राहाणार नाही. " लक्तरांना " या शब्दात 'ल ' या अक्षरावर दाब येतो, 'ल' हे अक्षर वर्ण गुरू मानावे. तर, दुसरा एक काल्पनिक शब्द घेतो, " उन्हात " , यात ' उ ' या अक्षर वर्णावर दाब येत नाही. तेव्हा, लक्तरांना याची लगावली ,—U— — अशी येते. आता 'उन्हात ' याची लगावली U—U अशी आहे. (या साठी नविन व्याकरणाच्या पुस्तकातिल पानाचा , ही माहिती लिहून झाल्यावर , लगेच वेगळा फोटो काढून पाठवतो, म्हणजे या बाबत कुणाच्याही मनात शंका राहाणार नाही. 2) आता, दुसरा अन् आजच्या भागाचा शेवटचा मुद्दा. हा मुद्दा असा आहे की, वर दिलेल्या गझलच्या मतल्यातील, दुसर्या ओळी मध्ये, पहिला शब्द ,"उखळात " असा आला आहे. बरोबरय की नाही ? यासाठी लगावली आहे, " गागाल ". म्हणजे , गुरू,गुरू,लघु . या पहिल्या गुरू (दोन मात्रा) ची फोड करून दोन लघू ( दोन लघू म्हणजे एका लघूची एक मात्रा वदुसर्या लघू ची एक मात्रा अशी एकूण दोन मात्रा झाल्या.) म्हणजे , उ ख UU (UU = — ) ,हे मिळून गुरू झाले. आता आपल्या लक्षात आले असेल की , ——U साठी उखळात (UU = — ,ळा = — , आणि त = U ) ही लगावली पाळली गेली. आता कळाले का, की गझलचा आशय (अर्थ), प्रभावी करण्यासाठी, एका गुरूचे दोन लघू किंवा याच्या विरूद्ध, दोन लघुंचे एक गुरू, करणे, हे गझलच्या कायदा,नियमाला , अपवाद माणून घेतलेले चालते. या भागाचे शेवटी, काय महत्वाचे आहे ते सांगतो. अगदी र्हदयावर कोरून ठेवा की ,अपवाद म्हणून वृत्ताचे बंधन सैल झाले तर, एकदाचे चालून जाईल पण , शेरात जे सांगावयाचे असेल ते हमखास , निश्चितपणे, र्हदयस्पर्शी असावे.नुस्ता शब्दांचा सांगाडा नसावा.सादर करण्यात येणार्या शेरला वरचेवर दाद मिळाली पाहिजे, इतके त्यात प्रभावी विचार असले पाहिजेत. गझल मध्ये 'नावीन्य ' चा अर्थ असा की ,कवीने आपला विचार इतरांपेक्षा अधीक परिणामकारकपणे , र्हदयाला स्पर्श करू शकणार्या शब्दात - स्पष्ट व सरळ शैलीत मांडून दाखविणे. सारांश : गझलमध्ये हीन विचार,अश्लिलता,शिव्या, नसाव्या, कारण गझल म्हणजे शिव्या देण्याचा आखाडा नव्हे. पुढील भागात गझलचे जे पाच आंतरघटक आहेत, त्या विषयी चर्चा करूयात. प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर, औरंगाबाद , मो. 9730093331
[16/12/2022, 10:01 pm] +91 94034 31406: भाग क्र.9 गझल आणि वाक्य/शब्द रूपांतर (संकलीत)
कवी जेव्हा गझल लिहीत असतो, तेव्हा प्रतिभाशक्ती (सर्जनशिललता) ज्याला ईंग्रजीत Creativity असे म्हणतात आणि वृत्ताचे बंधन यांच्यामध्ये कविच्या मनात तुंबळ द्वंद्व चालु असते.त्या वेळी कविला अर्थाच्या दृष्टिने एखादा शब्द आणि त्या शब्दाला व ओळिला प्रभावी क्रियापद , सुचते, पण ते वृत्तात बसत नाही, तेव्हा कवी आपल्या शब्दशक्तिच्या सहाय्याने, गझलमध्ये एखादा नवीन जोडशब्द निर्माण करतो, (खरे सांगायचे तर, हे नवीन नसते, पुर्वी कोणीतरी असे केलेले असते, पण ते आपल्याला ठाऊक नसते), यालाच व्याकरणा मध्ये, वाक्यरूपांतर या भागातील " केवल संयुक्त-मिश्र वाक्यांचे परस्पर रूपांतर " असे म्हणतात. या मध्ये " शब्दांची जात बदलून वाक्य रचना करणे, असे म्हणतात. व्याकरणाच्या पुस्तकात,एका क्रियापदाचे असे ऊदाहरण दिले आहे. ते असे -
1) त्याच्या डोळ्यात पाणी आले.
2) त्याचे डोळे पाणावले
गेयता,स्मरणियता,संगिताच्या दृष्टिने 'पाणावले' हा शब्द कवी वापरतो.
मी नुकत्याच लिहिलेल्या गझलमध्ये,रदीफ ,नाचताहे,डाचताहे,वाचताहे,साचताहे,काचताहे आणि जाचताहे असे वापरले आहे.
गमतिचा भाग असा की. मला वाटले की मी काहितरी नवीन केले. पण हा भाग क्र.9 लिहिताना, व्याकरणाच्या पुस्तकामध्ये, पान क्र.396 वर " वचन/गीत- संत/कवी या सदराखाली, पहिलेच ऊदाहरण होते , ते असे -
" पैल तोगे काऊ कोकता हे, शकुन गे माये सांगताहे " -संत ज्ञानेश्वर.
कोणितरी ,कवी हे शब्दांचे ईश्वर असतात, असे काहिसे म्हटल्याचे आठवले.सर्व कविंचे आद्य कवी, कोण आहेत, माहितय ? 'महर्षी वेद व्यास ' असे ते नाव आहे, आणि त्या वरूनच , " व्यासोच्छिष्टम जगत सर्वम " असे म्हणतात. या महर्षी वेद व्यासांनी लिहिलेल्या , "ब्रह्मसूत्र " या पुस्तकाचा मी स्वत: गेली तीस वर्षे अभ्यास करतोय, पण प्रामाणिकपणे सांगतो की , मला त्यातले अद्याप पाच टक्के पण पुर्णत: आकलन झालेले नाही.
आपण जे काही काव्य/गझल लिहीत आहोत , ते व्यासांचे ऊष्टे आहे, एवढी जाणीव ठेवल्यास, कवीचा अहंकार वाढणार नाही एवढे निश्चित.
प्रयोगशिल व्हा, मराठी संस्कृती आपल्या ऊत्तमोत्तम गझलांची,मराठमोळ्या बाजाची, आध्यात्मिक स्फुल्लिंगांची वाट पहात आहे.
यावरून सहज आठवले, की बहुतेक आपण सर्वांनी, प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली यांनी गायलेली,' अकबर' इलाहाबादी, यांनीलिहिलेली सुप्रसिद्ध ग़जल , " हंगामा है क्यों बरपा , थोड़ी सी जो पी ली है । डाका तो नही डाला, चोरी तो नही की है। " ही गज़ल ऐकली असेल.माझी आपल्याला विनंती आहे की, पुन्हा एकदा, अवश्य,सतर्क होऊन ऐका की, 'अकबर'इलाहीबादी, किती ऊंचीवर ही गज़ल नेऊन ठेवतात, विशेषत: " हर सांस ये कहती है , हम है तो ख़ुदा भी है । "
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर, औरंगाबाद, मो. 9730093331 (whats app available).
[16/12/2022, 10:01 pm] +91 94034 31406: भाग क्रमांक-10
गझलेतील 'अलामत' ऊर्फ
'स्वरचिन्हे' (संकलीत)
गझलेत यमक ऊर्फ काफिया बदलत नाही,तर त्याचे शब्द बदलतात.यमकाच्या शब्दात असलेली अलामत ऊर्फ स्वरचिन्हे हेच त्या यमकाचे स्थायी यमक असते.या अलामतीवरच त्या यमकाचे अस्तित्व अवलंबून असते.हे स्वरचिन्ह सांभाळून यमक कसे साधावयाचे हेच महत्वाचे आहे, असे कवीवर्य सुरेश भटांनी म्हटले आहे.
थोडक्यात सारांश असा की,यमकाच्या शेवटच्या न बदलणार्या एक किंवा एकाहून अधीक स्थीर अक्षराच्या अगोदर येणार्या अक्षरात ,जो ण बदलणारा 'स्वर' असतो, त्या स्वरालाच अलामत ऊर्फ स्वरचिन्ह असे म्हणतात.
आता एक ऊदाहरण पाहूयात -
सगळे घरी जर थांबती,मरण्यात का रममाण हे
गवतावरी फिरणे असे,चरण्यात का रममाण हे ।
वरील दोन ओळीत, 'मरण्यात' आणि 'चरण्यात' या यमकांमध्ये ,'च' आणि 'म' मध्ये 'अ' या स्वराची अलामत आहे , तर पुढील तीन अक्षरे,'रण्यात' हे स्थीर यमक कायम आहे. या गझलेच्या पुढिल शेरांमध्ये, ही 'अ' ची अलामत कायम आहे, जसे की; 'हरण्यात','भरण्यात','धरण्यात','बरण्यात' ई.
आता,थोडे व्याकरणाकडे वळुयात. आपल्या तोंडातून निघणार्या मूलध्वनीला 'वर्ण' असे म्हणतात.वर्णाचे प्रमुख तीन प्रकार आहेत : १)स्वर २)स्वरादी ३) व्यंजन. स्वर म्हणजे 'सूर'.सूर म्हणजे आवाज.(ऊदा. आपण म्हणतो ना की ,आज गायकाचा सूर चांगला लागला आहे.).
मराठीत एकूण बारा स्वर आहेत.या मध्ये पाच र्हस्व आणि सात दीर्घ स्वर आहेत.र्हस्व स्वरांची एक मात्रा आणि दीर्घ स्वरांची दोन मात्रा मोजली जाते.
गझलेत प्रामुख्याने ,अ,इ,उ हे तीन र्हस्व स्वर व आ,ई,ऊ,ए,ऐ,ओ,औ हे दीर्घ स्वर वापरले जातात.
थोडक्यात सारांश असा की, यमक ऊर्फ काफिया कसा असावा, हे अलामतच(स्वरचिन्ह) ठरवते आणि या अलामतीच्या कायद्यानुसारच शेवट पर्यंत काफिया (यमक) चालवायचा असतो.
पुढच्या भागात, आपण गझलेच्या प्रकारा विषयी माहिती पाहू.
संकलन : प्रा. डाॅ. रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद, दि.०८-०६-२०२०, मो. ९७३००९३३३१
[16/12/2022, 10:01 pm] +91 94034 31406: भाग क्रमांक ११ - आता आपली आपणच तपासून पहा गझल . गझलेचे वृत्त(बहर),यमक(काफिया),आणि अन्त्ययमक(रदीफ) , यातील अन्त्ययमक या घटकामुळे गझलेचा आराखडा (ढाचा) ज्याला आकृतीबंध (जमीन )असे म्हणतात, तो आकृतीबंध ( जमीन ) गझलेच्या पहिल्याच शेर मधे(या पहिल्या शेर ला 'मतला' (मत्ला ) असे म्हणतात. ) तयार होतो.मतल्यातील पहिल्या ओळीला' मिस्र-ए-उला' आणि दुसर्या ओळीला ' मिस्र-ए-सानी ' असे म्हणतात.(आपणही आता एक मेकांशी बोलताना, मतल्याची पहिली ओळ, दुसरी ओळ असे न म्हणता, तेरे मतले की, मिस्रै उला बहोत बढिया जम गयी है, लेकिन जनाब , जरा मिस्रे सानी पर ध्यान दो। देखो, अलामत ठीक करो । अशा भाषेत बोलताना आपणच गझलेचे शहेनशहा आहोत असे वाटेल. आता सगळ्यात महत्वाचा नियम तपासून घ्यायचा. तो म्हणजे, अन्त्ययमक(रदीफ) चा शब्द(एक किंवा एकापेक्षा अधिक शब्द असू शकतात) जसाच्या तसा शेवट पर्यंत वापरायचा. ऊदाहरणार्थ - चंद्र आता मावळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला काय तो वेडा इथेही बोलला ? हा शहाणाही चळाया लागला ! हाक दाराने मला जेव्हा दिली उंबरा मागे वळाया लागला ! सुरेश भट या मध्ये रदीफ काय आहे ? 'लागला ' हा रदीफ आहे, जो पुर्ण गझलेत, म्हणजे गझलेच्या मतल्यातील दोन्ही ओळीत, आणि पुढील प्रत्येक शेरच्या दुसर्या ओळीत 'लागला ' हा शब्द कायम असतो. म्हणजे एकदा का रदीफ चा शब्द निश्चित झाला की तो च शब्द कायम ठेवायचा.जसा 'लागला ' हा रदीफ चा शब्द 'लागला' असाच ठेवायचा. (क्रमश:) रे.भ.
[16/12/2022, 10:01 pm] +91 94034 31406: भाग क्रमांक -12
गझलचे घटक
(एलेमेंट्स आॅफ गझलl)
(संकलित)
आज आपण गझलचे घटक (एलेमेंट्स) या बद्दल समजुन घेणार आहोत.गझल मध्ये खालिल पाच अंतर घटक असतात. ऊर्दू शब्दांच्या साहाय्याने हे घटक व त्यांचा अर्थ समजाऊन घेऊयात.
1) अंदाजे बयाँ .
अंदाजे या ऊर्दू शब्दाचा बोली भाषेतला अर्थ,पद्धती, खुबी,वैशिष्ट्य,(स्टाईल) , खासियत ई. तर बयाँ या ऊर्दू शब्दाचा अर्थ, व्यक्त करणे, अभिव्यक्ती,मांडणी, (एक्सप्रेशन आॅर मॅनिफेस्टेशन ) ई. (ईंग्रजी शब्द येथे मुद्दाम देत आहे, कारण कुठून का होईना, अर्थ कळाल्याशी आपला मतलब आहे.)
हे आपले 'शिक्षण'(एज्युकेशन) चालू आहे. या ठिकाणी, मला स्वामी विवेकानंद यांची शिक्षणाची व्याख्या सांगाविशी वाटते. ती अशी - एज्युकेशन कॅन बी डिफाईंड ॅज मॅनिफेस्टेशन आॅफ लेटेंट . (अव्यक्ताला व्यक्त करणे म्हणजे शिक्षण).
आता, अंदाजे बयाँ म्हणजे व्यक्त करण्याची , गझलकाराची आपली स्वताहाची वयक्तिक स्टाईल किंवा खुबी.
आता प्रत्येक कवीचा स्वभाव, प्रकृती, भिन्न असते.त्याच्या स्वभावानुसार त्याची व्यक्त करण्याची पद्धती असते, आणि तिच त्याच्या गझलेच्या स्टाईल वरून लक्षात येते. या स्टाईल शब्दासाठी आपण मराठी शब्द 'लकब' असा वापरू शकतो.
ऊदाहरणार्थ , एखादा कवी 'तिरकस " स्वभावाचा असतो, त्याला प्रेमच व्यक्त करायचे असते ,पण बघा तो गझलेतून कसा व्यक्त करतो ते -
जान लेनी थी , ले लिये होते
मुस्कुराने की क्या जरूरत थी ।
ही झाली तिरकसपणाची पद्धत. आता विनय, अनुनय, अजिजी, मार्दव, लालूनचांगुल करण्याची पद्धती -
आप कहे और हम ना सुनाये,ऐसे तो हालात नही,
एक ज़रासा दिल है धडका, और तो कोई बात नही ।
आता, रोखठोक , व्यवहारी पद्धतिने व्यक्त होणारी 'बयाँ " (स्टाईल) , -
मै समझता था , उन्हे मुझसे महब्बत होगी ।
वो समझते थे , मेरी जेब मे पैसा होगा ।
-पागल अंसारी.
आता, आपल्या लक्षात हा गझलेचा पहिला आंतरघटक , अंदाजे बयाँ म्हणजे, गझल सांगण्याची आणि अभिव्यक्तिची खुबी. 'कहते है के ग़ालीब का अंदाजे बयाँ ही कुछ और था ।' असेकाहिसे म्हटले आहे.
या साठी ,नवीन गझल शिकणार्यांनी, आपल्या स्वताहाच्या खुबीनुसार गझल लिहावी.आता काही जण ,असे म्हणतील की, आमच्यात कुठे अशी खुबी आहे ? तर मानसशास्राचा अभ्यासक म्हणून मी शंभर टक्के खात्रिने सांगतोय की, प्रत्येक व्यक्ती मध्ये एक ना एक सद् गुण असतो, म्हणजे असतोच.जर, माझा मलाच तो दिसला नाही, तर, खुशाल समजावे की, माझी सद् गुण ओळखण्याची पात्रता कमी पडत आहे.खरी गरज आहे ती पात्रता(अॅबिलिटी) वाढवण्याची ,न की क्षमता (कॅपॅसिटी) वाढवण्याची.आपल्याला जमत नसेल तर जवळच्या मित्रांना विचारा , ते सांगतील तुमच्या मधील खुबी, /हुनर/शैली, म्हणजेच थोडक्यात काय तर तुमच्या स्वभावाची जडण-घडण ई.
विनाकारण, प्रसिद्ध कविंच्या गझलांचे अनुकरण न करता ,आपल्या स्वताहाचा 'अंदाजे बयाँ' लेहेजा, स्टाईल,शैली, व्यक्त करण्याची खुबी शोधा, आणि मग बघा, तुमची गझल ही , 'तुमचीच ' गझल आहे, हे ईतरांनाही समजेल.सुरवात तर करा, गझलेच्या समुद्रा , खोलवर गोते खाण्यासाठी, शेवटी, आपलाच 'जिगर' कामाला येतो.
धन्यवाद.
पुढच्या भागात गझलेचा दुसरा महत्वाचा आंतर घटक ' हुस्ने ख़याल ' म्हणजे, विचारांचे सौंदर्य, ज्या मध्ये, गझलकाराचा कल्पनाविलास, सर्जनशिलता (क्रियेटीव्हिटी), नवनिर्माण ई.बाबत सोदाहरण माहिती घेऊया.
या भागाचा शेवट मी असा करतो की, प्रत्येक कवीच्या मनात, त्याचा 'अंदाजे बयाँ ' असतोच, तो सुप्त स्वरूपातील अंदाजे बयाँ, व्यक्त करण्याच्या पातळीवर यावा, अशी परमेश्वचर चरणी प्रार्थना.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर , औरंगाबाद, दि. 13-06-220 , मो. 9730093331
[16/12/2022, 10:02 pm] +91 94034 31406: भाग क्र.14
गझलेचा तिसरा आंतर घटक -
मौसिकी
संकलन-डाॅ.रे.भ. भारस्वाडकर,औरंगाबाद.
आज आपण गझलेचा तिसरा आंतरघटक " मौसिकी " या बद्दल समजून घेऊया. यापुर्वी आपण गझलेचे दोन आंतरघटक पाहिलेत , 1) अंदाजे बयाँ आणि 2) हुस्ने ख़याल . मौसिकी म्हणजे संगीतमयता, गेयता,रागदारीवर आधारित ज्याला ईंग्रजित ' मेलडी ' किंवा 'मेलोडियस' असे म्हणतात.
रागदारी , शाम-ए-ग़ज़ल - ज्यात गायकी आणि मौसिकी यांचा संगम झालेला असतो.साज़ (वाद्ये) आणि आवाज (गायक) यांच्या संगमातून गझल जेव्हा श्रोत्यांसमोर सादर केली जाते , तेव्हा श्रोत्यांच्या दाद आणि टाळ्यांच्या कडकडाटातून गझल विजेसारखी चमकत राहते. म्हणून गायक हा नेहमी ऊत्तम आणि प्रसिद्ध गझलांच्या सतत शोधात असतो.
या मध्ये, काही गायक हे स्वताहा गझलेला चाल लाऊन गझल गायन करतात , तर काही गायक दुसर्या संगितकाराने संगितबद्ध केलेल्या गझला ध्वनीमुद्रित अल्बम साठी गात असतात.
ज्या काळात प्रसिद्धी माध्यमे कमी होती किंवा नव्हती,त्या काळात मुशायर्यातून शायर आपल्या गझला स्वताहा सादर करायचे, जे आजही चालु आहे.या मैफिली रात्री असायच्या.त्या काळात मेणबत्ती (शमा) गझल सादर करणार्या शायर समोर ठेवण्याची प्रथा होती.' आता मी आपल्या समोर माझी एक गझल सादर करतो,' असे म्हटल्या बरोबर , समोर बसलेले सर्व श्रोते मोठ्याने 'ईर्शाद 'असे म्हणून गझलकाराला प्रोत्साहन द्यायचे. या मुळे एक सुंदर वातावरणनिर्मिती (माहौल) तयार व्हायची.
गझल सादर करण्यापुर्वी गझलकार काही 'शेर' (स्वताहाचे किंवा ईतरांचे किंवा गझल गुरूंचे प्रभावी शेर सादर करून प्रचंड दाद मिळवत व मग वातावरण निमार्मिती झाली की, आपली गझल सादर करित असत.
ज्यांच्या गझलेत 'हुस्ने ख़याल' असतो अशा गझला लिहिणारे गझलकार ऊच्च दर्जाचे समजले जायचे , तर ज्यांच्या गझलांमध्ये, 'मौसिकी ' म्हणजे संगीतमयता अधिक असायची, अशा गझला ,गझल गायकांच्या मैफिलीत श्रोत्यांची वारंवार दाद मिळवत असत. आमकी एक गझल गायलिच पाहिजे असा आग्रह रसिक श्रोते करत व आपल्या चाहत्यांची ही मागणिही (फर्माईश ) गझल गायक मोठ्या प्रेमाने करतात.ही परंपरा आजही चालु आहे.
पुढील काळामधे हळुहळू, छापील माध्यम , ध्वनी माध्यम , ध्वनी-चित्र माध्यम ,डिजिटल तंत्रज्ञान, सोशल मिडिया यांनी गझलेचे क्षेत्र बहरून आले.घझलांच्या रेकाॅर्ड्स पासून ते कसेट्स, सी.डी.ज, डिव्हिडी, यांचा काळ सुरू झाला , आणि सामान्य माणुसही गझलेकडे आकर्षित झाला.आता डिजिटल तंत्रज्ञानाने तर कळस गाठला आहे. या सर्वांचा परिणाम गझलचे वाचक व श्रोते मोठ्या प्रमाणात वाढण्यावर झाला. नव्या ईलेक्ट्राॅनिक सोशल मिडियाने , मागच्या काही महिन्यात विशेषत: लाॅकडाऊनच्या काळात , बहारदार धुमाकुळ घालणे सुरू केले आहे. या पुढे आॅनलाईन सादरीकरण ही वाढत जाणार आहे.आता स्वदेशी 'नमस्ते भारत " हे अॅप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ईंटरनेटचे जाळे सर्वदूर ग्रामिण भागापर्यंत पसरत आहे, हे गझलेला बरे दिवस येण्याचे संकेत देत आहेत. ई-गझल संग्रह, ई-गझल पुस्तके,, ई-गझल मासिके, यांचे स्वागत होत आहे.
अनेक अल्बम मधून आता 8 डी आॅडिओ,16 डी आॅडिओ व त्या पुढील व्हर्जन्सची गाणी/गझला या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे.
म्हणून या काळात 'मौसिकी' गझल लिहिणारे गझलकार खरोखरच भाग्यवान आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
पुढे येणार्या युगाच्या , म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल ईंटेलिजन्स) च्या ऊंबरठ्यावर आज जगाने प्रवेश केला आहे.कदाचित भविष्यात आपण लिहिलेल्या मौसिकी गझलेला संगणकिय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून संगितबद्ध केले जाईल.
या मौसिकी गझलसाठी गझलकाराला शास्रिय संगाताची जुजबी ओळख असल्यास चांगले. ऊदाहरणार्थ, मैफिलिच्या शेवटी " भैरवी " हा राग सादर करून मैफिल संपन्न होते.गझल गायन मैफिलीत भैरवी रागातूनच गझल सादर केली जाते.ही गझल निरोपाची गझल सते.गंभीर स्वरूपाची असते.निसर्गशक्तीची आळवणी करणारी असते किंवा विश्व कल्याणाचे , मानवाच्या मंगलतेचे , कल्याणाचे , सर्व जन सुखी व्हावेत , सर्व प्राणीमात्र सुखी व्हावेत अशी दान / दुवा मागणारी असते.आयुष्याचे सार , तत्वज्ञान , अध्यात्मिक विचार (सुफी) मांडणारी असते.
अशा ऊत्तमोत्तम ' मौसिकी ' गझल लिहिण्यासाठी तुम्हाला आत्मप्रेरणा मिळो, अशी त्या परमेश्वर चरणी प्रार्थना .धन्यवाद.
प्रा.डाॅ.रे.भ. भारस्वाडकर, औरंगाबाद , दि. 16-06-2020 , मो. 9730093331.
[16/12/2022, 10:02 pm] +91 94034 31406: भाग क्र.15
गझलचा चौथा आंतरघटक
4) तसव्वुफ (मारिफत)
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर.
आता पावेतो आपण गझलेचे तीन आंतरघटक पाहिले, ते म्हणजे; अंदाजे बयाँ , हुस्ने ख़याल आणि मौसिकी . आज आपण गझलेचा चौथा आंतरघटक , ज्याला 'तसव्वुफ ' किंवा मारिफत असे म्हणतात.
तसव्वुफ म्हणजे, अध्यात्मिक ज्ञानाची झालर किंवा अध्यात्मिक विचारांची चुणूक. हे समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला , 'शेर' मधील दोन बाबी समजून घेतल्या पाहिजे.त्या म्हणजे, शेर मधील , 'दावा ' आणि 'दलील '. गझलचे एक खास वैशिष्ठ आहे, ते म्हणजे , प्रत्येक शेर मध्ये 'दावा'-'दलील' असते. 'दावा ' म्हणजे प्रस्तुतीकरण. प्रस्तुतीकरण याला ईंग्रजित 'स्टेटमेंट ' असा शब्द असून यालाच 'विधान' किंवा 'दावा पेश करणे' असे म्हणतात , आणि 'दलील' म्हणजे , त्या दाव्याचा खुलासा , ज्याला ईंग्रजित "एक्सप्लेनेशन' असे म्हणता येईल. आपण हिंदी चित्रपटात जेंव्हा कोर्टाचा प्रसंग पहात असतो, तेव्हा जजसाहेब वकिलाला असे म्हणतात की, 'तुम्हारे ईस दावे को पुख्ता बनानेके लिए और ऐसे कोई दो 'दलील' पेश करो. आता आले का लक्षात की, "दलील' म्हणजे , शेरच्या पहिल्या ओळीत केलेल्या दाव्याचा खुलासा.
हा खुलासा , त्या शेर ला असा काही कलाटणी देतो की , रसिकाच्या गणिती बुद्धिमत्तेला एक धक्कातंत्र अनुभवास येते. आता , एक अत्यंत महत्वाचे गझलच्या अंतरंगाचे रहस्य सांगतो , ते असे की , 'दावा' आणि 'दलील' मध्ये , विरोधाभास किंवा चमत्कृती ,प्रभावीपणे निर्माण करण्याचे धक्कातंत्र ज्याला जमले, तो यशस्वी गझलकार होतो , कारण वाचकाला किंवा श्रोत्याला , ते भावते,पटते,त्यातला विचारांचा वेगळेपणा लक्षात येतो , आणि तो ऊसळून दाद देतो.
गझलेच्या शेर मधून, हा दावा आणि दलील जेव्हा अध्यात्मिक ज्ञानाची झालर लाऊन येतात , तेव्हा, गझलेचा हा चौथा घटक 'तसव्वुफ ' , गझलेला अशा एका ऊंचीवर घेऊन जातात की रसिक अगदी हरखुन नतमस्तक होतात.
आता याची काही ऊदाहरणे बशीर बद्र यांच्या गझलांमधिल काही शेर पाहू -
1) उजाले अपनी यादोंके हमारे साथ रहने दो ,
न जाने किस गली मे ज़िन्दगी की शाम हो जाये ।
2) मुझे इश्तिहार-सी लगती है, ये मोहब्बतों की कहाँनिया ,
जो कहा नही वो सुना करो , जो सुना नही वो कहा करो ।
3) दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हो ।
4) मैं तो आँसुओं का सुकूत हूँ लबे शेर मुझको सदा
न दे
न 'कबीर'हूँ, न 'नज़ीर' हूँ , न मैं 'मीर' हूँ , न
'बशीर' हूँ ।
वरील बशीर बद्र यांच्या चार शेर मधून , 'तसव्वुफ' (मारिफत) म्हणजे अध्यात्मिक ज्ञानाची झालर किंवा चुणूक लक्षात आली असेल.
आता, मराठी गझलेत, गझलसम्राट सुरेश भटांनी , केवळ मराठी गझलच नाही, तर एकूण 'गझल' या काव्य प्रकाराला एका मोठ्या ऊंचीवर नेले आहे. या पुर्वी मी त्यांच्या गझलेतील शेर ची अनेक ऊदाहरणे दिलेली आहेत, आता 'तसव्वुफ' ची काही ऊदाहरणे पाहू -
1) संत समजून काल मी गेलो
भेटला शेवटी दलाल मला ।
2) मी कधीचा उभाच फिर्यादी
वाकुल्या दाखवी निकाल मला ।
3) मी असा त्या बासरीचा सूर होतो
जीवनाला मीच नामंजूर होतो.
4) गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.
5) जगाची झोकुनी दु:खे सुखाशी भांडतो आम्ही
स्वत:च्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही
6) आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा ..
माझाच भास माझ्या अंगावरून गेला !
7) आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ?
सारांश असा की, गझलेचा आंतरघटक, तसव्वुफ ( मारिफत ) , गझलेला अध्यात्माच्या पालखीत बसऊन गझल-दिंडी काढण्यासाठी आहे , त्या वारीतून गझलपंढरी गाठण्यासाठी शुभेच्छा.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर ,दि.18-06-2020, औरंगाबाद , मो.9730093331
[16/12/2022, 10:02 pm] +91 94034 31406: भाग क्र. 16
गझलचा पाचवा आंतरघटक
5) नुदरत (नाविन्य)
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर,औरंगाबाद.
गझलेचे एकूण पाच आंतरघटक आहेत.अंदाजे बयाँ , हुस्ने ख़याल ,मौसिकी , तसव्वुफ , आणि शेवटचा पाचवा, 'नुदरत ' म्हणजे 'नाविन्य '.हे गझलचे खास वैशिष्ठ्य आहे . नाविन्य म्हणजे नवेपणा.कवी असे काही तरी शेर मधे मांडतो , की ते वाचकाला / श्रोत्याला , एकदम नवीन कल्पना, नवीन विचार ,नवीन संकल्पना , नवी प्रक्रिया , नवी प्रतीक्रिया , नवा शोध , नवी भूमिका , किंवा नव्याने वेगळा अर्थ जाणवतो.
आता , नाविन्य म्हणजे काय , याचा थोडा खोलात जाऊन विचार करू या . हा 'नवेपणा' काही 'नवा' नसतो. तो कदाचित 'जुना' ही असू शकतो , पण कवी आपल्या प्रतिभाशक्तिने , तो ईतरांपेक्षा अधिक 'प्रभावशाली' पद्धतिने मांडतो , त्यात नवेपणा असतो.हा जो शोध आहे तो असा की, ईनाॅव्हेशन ईज अॅन आयडिया , थाॅट , आॅर प्रोसेस , व्हिच ईज ' परसिव्ह्ड ' अॅज न्यू बाय द ईंडिव्हिज्युअल .' याचा अर्थ असा की, एखादी बाब जेव्हा एखाद्या व्यक्तिला पहिल्यांदा 'जाणवते ' ( टू परसिव्ह मिन्स टू फील) , ते त्या व्यक्ती साठी " नाविन्य " (नुदरत) असते.
आता याचे सोपे ऊदाहरण देतो, म्हणजे ऊलगडा होण्यास मदत होईल.ऊदाहरणार्थ, "र्हदयारोपण " ( हार्ट ट्रान्सप्लांटिंग ) ही संकल्पना , एखाद्या मुंबई सारख्या महानगरात राहणार्या माणसाला ऐकून माहित असू शकते , दुर्गम ग्रामिण भागातल्या माणसाने हे नाव कधीच ऐकलेले नसेल व जेव्हा तो पहिल्यांदा हे नाव ऐकेल , तेव्हा त्याच्यासाठी हे 'नवीन' असेल. संकल्पना एकच , पण एका साठी ती जुनी असेल , तर दुसर्यासाठी ती नवीन असेल. म्हणून 'नाविन्य' (ईनाॅव्हेटिव्हनेस ) ची ही संकल्पना , 'सापेक्ष ' (सबजेक्टिव्ह ) आहे.
म्हणून , गझलच्या 'दावा' (प्रस्तुती) नंतर , शेर ची जी दुसरी ओळ असते , त्या ओळीत , 'खुलासा ' (दलील) अशी काही खुबीने मांडलेली असते , की रसिकाला 'जाणवते ' हे काहीतरी 'वेगळेपण' आहे. हे 'जाणवणे ' (परसेप्शन ) म्हणजे , 'नाविन्य '.
ही ' जाणीव ' (फिलिंग) , भावनांशी (ईमोशन्स) निगडीत (रिलेटेड) असते.'भावना ' (ईमोशन), म्हणजे, एखाद्या व्यक्तीची किंवा कोणत्याही जिवंत घटकाची (आॅर्ग्यानिझम) 'विचलीत ' (डिस्टर्ब्ड स्टेट) स्थिती असते.
आता, या भावनांची काही ऊदाहरणे पाहूया.
आनंद , दु:ख , चीड ,प्रेम, राग , मत्सर , द्वेष ,मोह, मद , लोभ ई. यांचा संबंध, ' गझल लिहिताना गझलकार आपल्या शेर च्या पहिल्या ओळीत 'दावा' (प्रस्तुतीकरण)करतो , तेव्हा वाचक/श्रोत्याच्या मनात 'ऊत्सुकता' किंवा 'ऊत्कंठा ' निर्माण करतो , आणि शेर च्या दुसर्या ओळीत जेव्हा'दलील' (खुलासा) सादर (पेश) करतो, तेव्हा त्याच्या विशिष्ट भावना , प्रतीक्रियेच्याशा स्वरूपात, अशा काही अचानक ऊफाळून येतात की , त्याच्या तोंडून , 'वाहव्वा ' व अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणारी 'दाद ' आपोआप बाहेर पडतेच.कारण त्यातले' नुदरत' (नाविन्य) त्याला खूप भावलेले असते.
सुरेश भटांचे शेर, ऊदाहणा दाखल पाहू.
दावा : ऊत्तरे जेव्हा दिली नाही कुणी
( या ओळी मुळे, मनामध्ये ऊत्सुकता सहजपणे निर्माण होते की, 'मग ऊत्तरे दिली कोणी ? आणि आता हा कवी , प्रश्न विचारणार तरी कोणाला ? आणि मग भट साहेब 'दलील ' (खुलासा) , दुसर्या ओळीत काय पेश करतात ? ते आपण आता आपण पाहुया -)
दलील : प्रश्न प्रेतांना विचारू लागलो ।
(यात 'दलील' (खुलासा) , अनपेक्षित व नाविन्यपुर्ण (नुदरत) असल्यामुळे भावना ऊचंबळून नाही आल्या तर नवलच म्हणावे लागेल.
माझ्या पुढील आॅनलाईन मिटिंग मधे मी प्रत्यक्षात अनेक शेर ,जे सुरेश भट आणि बशीर बद्र यांनी ,'नुदरत' असलेले लिहिले आहेत , त्यांचा रसस्वाद आपल्या समोर प्रत्यक्षात मांडणार आहे. स्थळमर्यादे अभावी, तुर्तास एवढेच.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर , दि.19-06-2020 ,औरंगाबाद , मो. 9730093331
[16/12/2022, 10:33 pm] Renukadas Bharaswadkar: भाग क्रमांक 13
गझलेचा दुसरा आंतरघटक
हुस्ने ख़याल (संकलित)
काल आपण गझलेचा पहिला आंतर घटक ,'अंदाजे बयाँ' बद्दल पाहिले. आज आपण गझलेचा दुसरा आंतर घटक, 'हुस्ने ख़याल' बद्दल समजुन घेऊया.
हुस्न म्हणजे सौंदर्य आणि ख़याल म्हणजे विचार.तेव्हा हुस्ने ख़याल याचा अर्थ विचारांचे सौंदर्य. काही मराठी प्रेमी याला सौंदर्य विचार असे म्हणतात, पण ते चुकिचे असू शकते.कारण यात सौंदर्याला प्राधान्य दिले जाते, म्हणून विचारांचे सौंदर्य असे म्हणने योग्य आहे, कारण यात विचारांना प्राधान्य आहे . त्या विचारातील सुंदरता गझल लिहिताना कवी आपल्या प्रतिभाशक्तिच्या कल्पनाविलासातून मांडत असतो. थोडक्यात सांगायचे तर, गझलकाराच्या कल्पनाविलासातून आलेला सुंदर विचार म्हणजे, 'हुस्ने ख़याल '.
हा कल्पनाविलास कवीच्या सर्जनशिलतेतून (यालाच नवनिर्माण किंवा क्रियेटिव्हिटी असे म्हणतात.) आलेला असतो, जो आजवर कुणीही गझलेच्या शेर मधून या पुर्वी कधिच मांडलेला नसतो.
एक ऊदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करतो.
1) धूप के ऊँचे-निचे रस्तों को
एक कमरेका बल्ब क्या जाने ।
2) तुमने देखा है किसी मीरा को मन्दिर मे कभी,
एक दिन उसने ख़ुदासे इस तरह माँगा मुझे । 3) झिल मिलाते है किश्तियों में दिये.... पूल खड़े सो रहे है पानी में ।
वरिल तीन्ही शेर बशीर बद्र यांच्या 'उजाले अपनी यादों के ' या ग़ज़ल संग्रहातील आहेत.त्यांच्या 'आस' या ग़ज़ल संग्रहाला 'साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला आहे.जगातल्या महान व्यक्तिंपासून ते रिक्शेवाला,ट्रकवाला,हमाल,मजूर ई. सामान्य माणसेही त्यांच्या या 'हुस्ने ख़याल ' मुळे त्यांचे चाहते होते.याचे कारण म्हणजे, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील दर्द-भरे क्षण ,त्यांचा राग-द्वेष हे त्यांच्या ग़ज़लेतील विचारातून व्यक्त होत होते. मी स्वताहाला भाग्यवान समजतो की, मी बशीर बद्र यांच्या गझला मुशायरा मध्ये प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकल्या आहेत.असो.
आता मराठी गझलातील 'हुस्ने ख़याल ' पाहुया. गझलसम्राट सुरेश भट यांच्या गझलेतील हुस्ने ख़याल म्हणजेच क्रियेटिव्हिटीतून व्यक्त झालेले विचारांचे सौंदर्य डोळे दिपवणारे आहे.जशी समुद्राची खोली अथांग असते, तशी त्यांच्या विचारांची ऊंची मोजण्याची मोजपट्टी अजून निर्माण व्हायची आहे.
याची स्थळमर्यादे अभावी मोजकीच चार-पाच ऊदाहरणे देतोय -
1) सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो.
2) उत्तरे जेव्हा दिली नाही कुणी
प्रश्न प्रेतांना विचारू लागलो !
3) मला येतात भूमीतून हाका
ऊठे सीता नव्या रामायणाची.
4) साय मी खातो मराठीच्या दुधाची
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ?
5) माझ्या पराभवाची समजूत घातली मी
जे वार खोल गेले , ते यार मानले मी.
आता थोडेसे निरूपण, नवीन गझल लिहायला शिकणार्यांसाठी. क्रिएटीव्हिटी म्हणजे सर्जनशिलता, नवनिर्माण शक्ती, किंवा , आता मी जो शब्द लिहिणार आहे तो शब्द बरोबर म्हणता येणार नाही, पण लक्षात येण्यासाठी, 'कल्पनाशक्ती 'प्रत्येकात ऊपजत असते. आता थोडे मानसशास्र सांगतो. आपल्या मेंदुचे दोन भाग असतात.आपला डावी कडचा पन्नास टक्के मेंदू हा 'मॅथेमॅटिकल ईंटेलिजन्स ' म्हणजे गणिती बुद्धी शी संबंधित असतो व ऊजवीकडचा पन्नास टक्के मेंदू हा 'क्रिएटिव्ह ईंटेलिजन्स ' म्हणजे, नवनिर्माण बुद्धीमत्तेशी संबंधीत असतो.या दोन्हितला फरक म्हणजे, गणिती बुद्धिमत्ते मध्ये 'लाॅजिक ' असते तर नवनिर्मिती संबंधी बुद्धिमत्ते मध्ये 'लाॅजिक ' म्हणजे तर्कशास्र नसते. लाॅजिक हे सायन्स आॅफ रिझनिंग आहे , जिथे तर्कशुद्ध (रॅशनल) वेल रिझन्ड (कारण मिमांसा ) असते. ऊदा. 2x2 = 4 हे गणिती बुद्धिमत्तेने प्रमेयासह सिद्ध करता येते. याला आपल्या दैनंदिन भाषेत 'व्यवहारी ज्ञान ' असे म्हणतात.
आता आपण क्रिएटिव्ह ईंटेलिजन्स बद्दल थोडक्यात पाहू.या साठी सर्वांना माहित असलेले ऊदाहरण देतो. न्युटन ने झाडावरून सफरचंद पडताना पाहिले, आणि त्याची कल्पनाशक्ती (क्रिएटिव्हिटी) जागी झाली आणि त्याने गुरूत्वाकर्ण शक्तिचे नियम शोधून काढले.(लाॅ आॅफ ग्रॅव्हिटी). आता तुम्ही साधा विचार करा की, न्युटनच्या अगोदर हजारो लोकांनी सफरचंद झाडावरून पडताना पाहिले असणारच की ! मग त्यांना का नाही गुरूत्वाकर्षणाचा शोध लावता आला ? याचे ऊत्तर असे आहे की, ईट वाॅज दि क्रिएटिव्ह जिनस आफ द न्युटन, हू ईन्व्हेंटेड लाॅ आॅफ ग्रॅव्हिटी. गझलकार हा असाच सर्व सामान्यांच्या , मानवी मनातील अव्यक्त भावनांना आपल्या गझलेच्या शेर मधून , व्यक्त करत असतो , तेंव्हा ,रसिक वाचक , श्रोता ऊसळून दाद का देतो, तर त्यांच्या सूप्त भावनाच कवी आपल्या क्रिएटिव्हिटीतून व्यक्त करित असतो. ही वाहव्वा, ही दाद म्हणजे , 'मेरे मूह की बात छिन ली यार तुने ' असेच त्यांना म्हणायचे असते. असो.
या सर्जनशिलते मध्ये जेव्हा सकारात्मकता असते तेव्हा ते विश्वगान ठरते. पसायदान हे त्याचे ऊदाहरण.हा आशावाद आपल्या गझलेतून यावा या साठी हा लेखनप्रपंच. या भाग क्र13 चा शेवट' बशीर बद्र च्या या माझ्या अत्यंत आवडणार्या गझलेतील एका 'शेर' ने करतो -
कभी मैं अपने हाथों की लकीरों से नही उलझा,
मुझे मालूम है क़िस्मत का लिक्खा भी बदलता है ।
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर , औरंगाबाद , दि.14-06-2020, मो. 9730093331
[17/12/2022, 2:47 pm] Renukadas Bharaswadkar: स्वर काफिया मध्ये शेवटचे अक्षर बदलते, पण स्वर समान असतो. जसे की, आग,सार,भाव,ई. (या मध्ये, ग,र,व मधे समान स्वर 'अ' आहे. तसेच या समान स्वराच्या आधिच्या अक्षराची अलामत, 'आ' आहे ,जसे आ,सा,भा)
[17/12/2022, 3:17 pm] Renukadas Bharaswadkar: सर्वांसाठी ,परत एकदा ,स्वर काफिया संबंधी सोपे करून सांगतो.स्वर काफिया मध्ये यमकाचे (काफिया) शेवटचे अक्षर बदलावे,पण स्वर समान असावा जसे की, आभाळ,शेंदाड,घेराव,साधार या चार स्वर कवाफी मध्ये बघा, शेवटची अक्षरे ळ,ड,व,र वेगळी असली तरी यात समान स्वर काय आहे? 'अ' आहे. आणि या शेवटच्या अक्षरा आधिची अक्षरे? भा,दा,रा,धा अशी आहेत,त्यात अलामत काय आहे? 'आ' आहे. म्हणजे थोडक्यात सारांश काय? तर ,स्वर काफिया मध्ये शेवटचे अक्षर स्थीर (Fix) नसते तर त्याचा समान स्वर असतो, व या समान स्वराच्या अगोदरच्या अक्षरात अलामत(स्वरचिन्ह) कायम असावी लागते. स्वर काफियात गझलकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिक असते. प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर
[17/12/2022, 8:08 pm] Renukadas Bharaswadkar: हो चालतात, फक्त समान स्वर असावा.खूप सोपे झाले की नाही? शब्द काफिया मधे, आडकून राहाण्याची शक्यता असते,तशी मानसिकता, फक्त तंत्रावर भर देते त्या नादात, बलवान, सशक्त गझलेच्या शेर निर्मिती कडे कदाचित दुर्लक्ष होऊ शकते. मोठा नाजूक विषय आहे हा. पुढच्या बुधवारी, अतिशय स्पष्टपणे ,मी या संबंधी सविस्तर बोलणार आहे.आज, शेकड्याने रोज ,फेसबुक,व्हाॅट्सअॅपवर गझला येतात, त्या तांत्रिक दृष्ट्या एकदम परफेक्टही असतात, आपण त्या वाचतोही. पण त्यातला एकही शेर आपल्या लक्षात राहात नाही.असे का होते? तर त्या गझलांमध्ये काही दम नसतो.गझल लिहायची,प्रसिद्ध करायची, व वाहव्वा मिळवायची, की झाले खूश! स्वताहाच स्वताहाची पाठ थोपटून घ्यायची! खरी बलवान,सशक्त, दीर्घ काळ वाचकाच्या स्मरणात राहाणारे गझल चे शेर, कसे लिहायचे, हे माझ्या शिकवण्याचे ऊद्दिष्ट आहे. मला तुम्हा सर्वांना 'देवाच्या आळंदी ' ला न्यायचे आहे.तुमची तयारी आहे का? प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद
[18/12/2022, 10:52 am] Renukadas Bharaswadkar: रोशनी के घर अँधेरे इस क़दर कैसे हुए,
सोचता हूँ , ताज वाले दर-ब-दर कैसे हुए।
हादसों की उम्र कितनी कम बतायीथी मुझे,
हादसे दर हादसे फिर उम्र -भर कैसे हुए।
माँ यही कहती रही कमज़र्फ़ से बचकर रहो,
लोग, ऐसे साथ मेरे हमसफर कैसे हुए।
है नहीं मालूम जिनको राह,मंज़िल का पता,
ये सियासत है ,भला, वो राहबर कैसे हुए।
हर तरफ हत्या ,तबाही,लूट,डाका ,रहज़नी,
किन्तु पहरेदार सारे बे -ख़बर कैसे हुए।
वक़्त ज़ालिमहै,किसीको माफ़ करता ही नहीं,
कल तलक जो शीर्ष पर थे,बेहुनर कैसे हुए।
बरगदों को भी न जाने क्याहुआ है दोस्तो,
मान लें बौने हुए ,पर बेसमर कैसे हुए।
स्वरूप
[18/12/2022, 12:18 pm] Renukadas Bharaswadkar: हर तरफ हत्या ,तबाही,लूट,डाका ,रहज़नी,
किन्तु पहरेदार सारे बे -ख़बर कैसे हुए।*
[18/12/2022, 12:18 pm] Renukadas Bharaswadkar: स्वर काफिया मध्ये शेवटचे अक्षर बदलते, पण स्वर समान असतो. जसे की, आग,सार,भाव,ई. (या मध्ये, ग,र,व मधे समान स्वर 'अ' आहे. तसेच या समान स्वराच्या आधिच्या अक्षराची अलामत, 'आ' आहे ,जसे आ,सा,भा)
[18/12/2022, 12:18 pm] Renukadas Bharaswadkar: सर्वांसाठी ,परत एकदा ,स्वर काफिया संबंधी सोपे करून सांगतो.स्वर काफिया मध्ये यमकाचे (काफिया) शेवटचे अक्षर बदलावे,पण स्वर समान असावा जसे की, आभाळ,शेंदाड,घेराव,साधार या चार स्वर कवाफी मध्ये बघा, शेवटची अक्षरे ळ,ड,व,र वेगळी असली तरी यात समान स्वर काय आहे? 'अ' आहे. आणि या शेवटच्या अक्षरा आधिची अक्षरे? भा,दा,रा,धा अशी आहेत,त्यात अलामत काय आहे? 'आ' आहे. म्हणजे थोडक्यात सारांश काय? तर ,स्वर काफिया मध्ये शेवटचे अक्षर स्थीर (Fix) नसते तर त्याचा समान स्वर असतो, व या समान स्वराच्या अगोदरच्या अक्षरात अलामत(स्वरचिन्ह) कायम असावी लागते. स्वर काफियात गझलकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिक असते. प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर
[18/12/2022, 12:18 pm] Renukadas Bharaswadkar: स्वर काफिया हा नेहमी यमकाच्या (काफिया) शेवटच्या अक्षराच्या समान स्वरावर घ्यायचा असतो. यमकानंतर, अंत्ययमक (रदीफ) असतो, तो शेवटी असतो. यती हा ओळीच्या मध्यभागी असतो.यती म्हणजे, ओळीतील स्माॅल पाॅज.
[18/12/2022, 12:18 pm] Renukadas Bharaswadkar: हो चालतात, फक्त समान स्वर असावा.खूप सोपे झाले की नाही? शब्द काफिया मधे, आडकून राहाण्याची शक्यता असते,तशी मानसिकता, फक्त तंत्रावर भर देते त्या नादात, बलवान, सशक्त गझलेच्या शेर निर्मिती कडे कदाचित दुर्लक्ष होऊ शकते. मोठा नाजूक विषय आहे हा. पुढच्या बुधवारी, अतिशय स्पष्टपणे ,मी या संबंधी सविस्तर बोलणार आहे.आज, शेकड्याने रोज ,फेसबुक,व्हाॅट्सअॅपवर गझला येतात, त्या तांत्रिक दृष्ट्या एकदम परफेक्टही असतात, आपण त्या वाचतोही. पण त्यातला एकही शेर आपल्या लक्षात राहात नाही.असे का होते? तर त्या गझलांमध्ये काही दम नसतो.गझल लिहायची,प्रसिद्ध करायची, व वाहव्वा मिळवायची, की झाले खूश! स्वताहाच स्वताहाची पाठ थोपटून घ्यायची! खरी बलवान,सशक्त, दीर्घ काळ वाचकाच्या स्मरणात राहाणारे गझल चे शेर, कसे लिहायचे, हे माझ्या शिकवण्याचे ऊद्दिष्ट आहे. मला तुम्हा सर्वांना 'देवाच्या आळंदी ' ला न्यायचे आहे.तुमची तयारी आहे का? प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद
[18/12/2022, 12:18 pm] Renukadas Bharaswadkar: शेवटचा शेर खूपच छान लिहिला'वाचवाया पैलतीरी थांबला आहेस तू..' जीव ओवाळून टाकावा असा ऊत्तम शेर लिहिल्या बद्दल मी व्यक्तिश: माझ्यातर्फे व सर्व ग्रुप तर्फे मन:पुर्वक अभिनंदन करतो. आता खर्या अर्थाने डायमंड सापडायला सुरवात झाली.मी सौ.किरण चौधरी, ग्रुप अॅडमिन यांचे आभार मानतो, की त्यांनी हा ग्रुप सुरू करून खूप चांगले सामाजिक कार्य केले आहे. तसेच आपण सर्वांनी अतिशय ऊत्साहाने सहभागी होत आहात, तेव्हा सर्व सहभागी बंधू-भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रा.डाॅरेभ.भारस्वाडकर,औरंगाबाद,मो.9730093331
[18/12/2022, 9:36 pm] Renukadas Bharaswadkar: स्वर काफियाचे ऊदाहरण.राहू,सारू,काढू हेतीन कवाफी (यमके) आहेत.स्वर काफिया मधे यमकाच्या शेवटच्या अक्षराचा'स्वर' समान असावा लागतो.जसे की, हू,रू,ढू या यमकांच्या शेवटच्या अक्षरांमध्ये समान स्वर कोणता आहे, सांगा बरं? तो समान स्वर 'ऊ' आहे.आता हा 'ऊ' कसा शोधून काढायचा? तर, 'हू' हे अक्षर तोंडाने दीर्घ ऊच्चारा, आणि शेवटी काय ध्वनी (स्वर) ऐकू येतो? (प्रत्येकाने करून पहा.) 'ऊ'ssss असा स्वर ऐकू येतो की नाही? येतो ना? आता, असेच रू आणि ढू या दोन अक्षरांचा तोंडाने मोठ्याने दीर्घ ऊच्चार करून बा. शेवटी काय स्वर ऐकू येतो? 'ऊ' असाच येतो ना?, म्हणजेच, आता कळाले का, की अक्षरे बदलली तरी स्वर सारखाच येतो. यालाच स्वर काफिया म्हणतात. शिवाय अलामत(स्वरचिन्ह) ही सुद्धा सारखी असावीच लागते. आता अलामत म्हणजे काय, तर शेवटच्या समान स्वराच्या आधी जे अक्षर आहे, ते , पहिल्या मतल्याच्या दोन ओळीत आणि पुढे प्रत्येक शेरच्या दुसर्या ओळीत, सारखेच स्वरचिन्ह असलेच पाहिजे. जसे की या वरच्या ऊदाहरणात श्रीकृष्ण राऊत यांनी काय अक्षरे वापरली? राहू,सारू,काढू; आता रा,सा,का , या अक्षरात अलामत काय आहे , सांगा पाहू? 'आ' ची अलामत आहे.हे कसे शोधायचे याचे टेकनिक सांगितलेच आहे.रा,सा,का , ही अक्षरे दीर्घ ऊच्चारून बघा(बघाच), काय स्वर येतो शेवटी? 'आ' येतो की नाही? तीच'आ' ची अलामत. मला वाटते, आता आपण सर्वजण, नव्या ऊत्साहाने, कालगंगा वृत्तात (वज़न -2122,2122,2122,212) मधे एक मतला व एक शेर ,स्वर काफियामधे लिहावा.लिहिल्यावर,"सुटले बाई एकदाची" असा निश्वास टाकून, लगेच ग्रुपवर टाकून "चुकले का बघा", "तपासून सांगा" ई. फर्राटेदार शेरे लिहून (हे लाईटली घ्यावे ही विनंती) पाठवण्या पुर्वी आपण स्वताहा वज़न वापरून तिनतिनदा तपासा,दुरूस्त्या करा व शेवटी समाधान झाले की 'दाद' मिळवण्यासाठी ग्रुप वर टाकावे , ही सर्वांना नम्र विनंती. प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद
[19/12/2022, 6:51 pm] शिक्षणयात्राShikshanyatra: एक मतला एक शेर
वृत्त - कालगंगा
रदिफ-लागले
कवाफी-भाव, डाव, पाव
समान स्वर-अ
अलामत-आ
लगावली
गालगागा गालगागा गालगागा गालगा
बेगडीचे रंग सारे भाव खाऊ लागले
भरवशाचे पंच आता डाव खाऊ लागले
सांगताना मूक झाली भूक त्यांची लाजली
भाकरी होती हवी पण पाव खाऊ लागले
[20/12/2022, 12:33 pm] Renukadas Bharaswadkar: हा शब्द काफिया तुम्ही निवडला आहे.यात 'चा' हा स्थीर काफियाचे अक्षर असून, त्या अगोदरच्या अक्षरात, म्हणजे,'घनाचा,' 'जलाचा',आणि माणसांच्या', या कवाफिंमध्ये,'ना",'ला" ,'सां' याअक्षरात ,"आ" ची आलामत (म्हणजे स्वरचिन्ह) आहे. गझल बरोबर आहे.छान जमली आहे.मात्र, वर जे समान स्वर-'आ' असे लिहिले आहे ते ,समान स्वर ऐवजी, अलामत-आ असे लिहावे. डाॅ.रे.भ. भारस्वाडकर.
[20/12/2022, 12:46 pm] Renukadas Bharaswadkar: जनाचा, हा शब्द खाली माणसांचा असा आहे.तेव्हा, कवाफी मधून जनाचा शब्द बदलून'माणसांचा' ,हा शब्द लिहावा.जर जनाचा हाच शब्द लिहायचा असेल तर खाली शेर च्या ओळीत लिहिताना, 'या जनाचा' असे लिहावे, कारण लगावली तेथे 'गालगागा' ,अशी लगावली असायला हवी.
[20/12/2022, 12:55 pm] Renukadas Bharaswadkar: सर्वांसाठी हे लिहीत आहे. 'या जनाचा' मधे मी जो 'या' हे अक्षर घातले आहे, त्याला ऊभयान्वयी अव्यय असे म्हणतात.यालाच 'भरीचे अक्षर' असे ही म्हणतात.या वर माझा लेख भाग क्र. 4 आवर्जून वाचावा. परत तो भाग खाली पाठवत आहे. डाॅ.रे.भ.
[20/12/2022, 12:56 pm] Renukadas Bharaswadkar: भाग क्र.4
गझल लिहिताना उभयान्वयी अव्ययांची विपुलता नसावी.शक्य तो कमी असावेत.
आता आपण उभयान्वयी अव्यय म्हणजे काय हे पाहू." " दोन किंवा अधिक शब्द , दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. "
ऊदाहरणार्थ: अथवा , आणि , व , आणखी , शिवाय , अन् , न् , कि , किंवा , वा , नाहीतर , का , आगर ,पण , बाकी , तरी , परी , किंतू , परंतू , कारण , म्हणून , जर , जरी , तरी , तर , की ,मात्र , म्हणजे ई.
काही वाक्ये पाहू.यावाक्यातिल उभयान्वयी अव्यय सहज ओळखता येतिल.
1) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.
2 ) देह जावो अथवा राहो.
3 ) मरावे परी किर्तीरूपे उरावे.
4 ) शेतकर्याने शेती नांगरली पण पाऊस पडला नाही.
5 ) जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल.
उभयान्वयी अव्यय कमी वापरायचे असल्यास ,म्हणजे भरतीचे अनावश्यक शब्द यावयास नको असल्यास, त्याकरिता योग्य मात्रेचा , योग्य तोलामोलाचा शब्द योजावयाची कुवत आणि शब्दसाठा असणे किंवा वाढवणे आवश्यक आहे. या बाबत माझा वयक्तिक अनुभव सांगतो. मी नेहमी शब्दकोडे सोडवतो.माझा तो आवडता छंद आहे.यामुळे शब्दसाठा वाढवण्यास मदत होते व पर्यायी शब्द शोधण्यासाठी मेंदुला चांगली चालना मिळते.असो.
दुसरा पर्याय असा की, गझल, लहान वृत्तात लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.म्हणजेगझलमध्ये सुरवातीपासून ते शेवटपर्यंत , " अन् , हा , ही ,हे , तो , ती , च , " असे भरतीचे शब्द येण्यास वाव राहणार नाही.
शेवटी , गझलमध्ये भरतीचे अनावश्यक शब्दच काय पण " शेर " सुध्दा यायला नकोत.
आता याच्या ऊलट जे मूळ शब्द आहेत त्यांची मोडतोड करून वजनात बसवण्याची कसरत करू नये.
अशा चुका होतात. माझ्याही बाबतित घडतात.पण माझा मित्र, सेलूचा गौतम सुर्यवंशी लगेच मला व्हाॅट्सअॅपवर कळवतो, मी दुरूस्त करतो.
नविन लिहिलेली गझल कोणाकडून तपासून घेण्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही व कोणाला वाटुही नये.
ऊद्या, गझलेतील क्रियापद आणि गझलेची स्मरणियता याबद्दलची संकलित ऊपयुक्त अशी माहिती, ऊदाहरणासह देतो.
या शिवाय जे संगिताचे जाणकार किंवा कानसेन आहेत, त्यांनिही गझलेतील " लयमाधुर्य " व सादरीकरण,श्रोत्यांचा प्रतिसाद ,याबाबत मार्गदर्शन/अनुभवकथन/ किस्से/ आठवणी शेअर कराव्यात ही नम्र विनंती.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर,औरंगाबाद, मो.9730093331
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग-2
1) लगावली म्हणजे काय ?
र्हस्व अक्षरे "लघू"असतात, ज्यांना U या चिन्हाने दर्शवितात.
दीर्घ अक्षरे "गुरू" असतात,ज्यांना — या चिन्हाने दर्शवितात.
आता आपण याचे ऊदाहरण पाहू.
आताच वेदनेला , आले फुलून तारे.
घरट्यात मेनकेला , घाले उठून वारे ।
——U , —U —— , ——U, —U—— .
हे गझलेचे अतिशय लोकप्रिय वृत्त आहे.
आपल्याला "प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाऊ तूज आता मी कोणत्या उपायी" याची चाल माहित आहे,तसेच जुने हिंदी गाणे " ऐ दील मूझे बतादे, मेरा कसूर क्या है ।" याचिही चाल माहित असेल.वृत्त एकच असेल तर ईकडची चाल तिकडे अन् तिकडची ईकडे करून बघा.
आता, आज याच वृत्तात चाल गुणगुणत, गझलचा पहिला शेर, ज्याला"मतला" असे म्हणतात, तो लिहा.
पुढिल शेर मध्ये(शेर म्हणजे गझलेच्या दोन ओळी), पहिल्या ओळित रदीफ काफियाचे बंधन नाही,मात्र वृत्ताचे बंधन आहे.दुसर्या ओळित मात्र रदीफ-काफियाचे बंधन पाळायचे आहे. जसे की,
बोलावयास आता , उरलेच ना कुणीही
दारास बंद केले , आले कुठून सारे ।
एक गोष्ट सांगायची आहे, ती अशी की, एका गुरू(—) अक्षरासाठी, दोन लघू (UU),अक्षरे लिहिली तर, अपवाद म्हणून चालतात.
जसे की, ——U च्या ठिकाणी वरिल ओळित, "उरलेच" (UU—U)असा शब्द आला आहे.
आज या वृत्तात गझलचा कमितकमी मतला(पहिल्या दोन ओळिंचा शेर) लिहून या ग्रुप मधे टाकावा ही विनंती. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पाच शेर लिहावेत.
गझलेतला प्रत्येक शेर हा स्वतंत्र असतो,पण पाच शेर मध्ये एक अंतरिक धागा असतो.
रोज एक शेर लिहा. मी तपासूनदेण्यासाठी ग्रुप वर टाका. लक्षात घ्या, कोणिही perfect नसतो.pratice makes man perfect.
जसे,विहीर खांदताना ,लगेच एक फुटावर पाणी लागत नाही, पण एकदा का ते लागले की मग कधीच आटत नाही.विद्येची देवता सरस्वती माता, आपली काव्य प्रतिभा ऊन्नती कडे नेऊ दे,एक ऊत्तम गझल आपल्या प्रतिभेतून निर्माण होऊ दे, अशीपरमेश्वराकडे प्रार्थना करतो.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर,औरंगाबाद,मो.9730093331
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग-3 काफिया
1) यमक (काफिया) ची निर्दोष निवड करण्यात,हमवजन-हमस्वर प्रासांची निवड करावी. 2)यमक (काफिया) ची निवड करताना अधिक लक्ष "स्वरांच्या समानतेवर " दिले पाहिजे.
जसे, गळाया,जळाया,कळाया,छळाया,वळाया,दळाया,फळाया ,असे हमवजन-हमस्वर प्रास निवडावेत.
जर आपण, मिळाया,जुळाया,झुराया,चोळाया असे प्रयोग करू नयेत, ते चुकिचे ठरेल.
याचप्रमाणे,"कास" या प्रास च्या जोडीला "प्रकाश", "आकाश", "विनाश" असे शब्द प्रास म्हणून निवडता येणार नाही. कारण "कास"मधील 'स" आणि "प्रकाश" मधील 'श', यांच्या ध्वनीत एकरूपता नाही.गझल लिहिताना अशा चुका करू नयेत.
3) गझलचा आणि संगीताचा खुप जवळचा संबंध असल्याने , यमक व अंत्य यमक (काफिया-रदीफ) च्या शब्दांमधे,कठोर शब्दांचा "वापर करू नये. जसे की , ट,ठ,ड,ढ,ण.
4) गझलेतिल शेर म्हणजे, "हेतुपूर्वक लिहिलेली समाप (हमवजन) प्रासयुक्त विचार-वाणी.
"माप" (वजन) म्हणजे लघु-गुरू अक्षरांच्या क्रमाप्रमाणे दोन शब्दातील साम्य.
वजनात बसणार्या सर्व शब्दांना 'हमवजन' असे म्हणतात.
ऊदाहरणार्थ : 'सवारी' या शब्दाचे वजन "लगागा" आहे.या सवारी शब्दाचे हमवजन शब्द नवाबी,रिकामा,तरीही,असाही,करावे,धरावे , हे आहेत.
शेर लिहिण्यासाठीनिवडलेल्या वजनानुसार,शब्दांचे संयोजन केले पाहिजे असा अर्थ "समाप" ( हमवजन) शब्द सूचित करतो.
5) शेवटी, शेरात जे सांगायचे आहे,तो आशय निश्चित पणे,वाचक/श्रोते यांच्या र्हदयाला स्पर्शून गेला पाहिजे. नुस्ता शब्दांचा सांगाडा नसावा.
प्रत्येक "शेर" ला हमखास दाद मिळालिच पाहिजे, ईतके त्या शेर मधे प्रभावी विचार असले पाहिजेत.
संकलक:डाॅ.रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद,मो.9730093331
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्र.5 (संकलन)
क्रियापद
वाक्याचा अर्थ पूर्ण करणार्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
गझलच्या शेर मधे क्रियापद असतेच, ज्या मुळे अर्थ पुर्ण होतो.
क्रियापपदातील मूळ शब्दाला धातू असे म्हणतात.या धातू असलेल्या शब्दाच्या शेवटी जे अक्षर लावले जाते त्यास प्रत्यय असे म्हणतात.
म्हणजे धातूला प्रत्यय लावल्यानंतर क्रियापद बनते.
ऊदाहरणार्थ :
खेळ हा धातू ,"तो "हा प्रत्यय तर क्रियापद काय होईल ?
खेळतो हे क्रियापद होईल.
आता फक्त धातू बदलू, व प्रत्यय "तो " हे कायम ठेऊ.
मी काही क्रियापद लिहितो, तुम्ही धातू ओळखा.
बसतो , चालवितो , खातो , जातो , पडतो , रडवितो.
म्हणजे, धातू + प्रत्यय= क्रियापद.
आता खालिल वाक्यातिल क्रियापद ओळखा.
"आई रोज देवाला जाऊन येते."
वरिल वाक्यामध्ये दोन क्रिया घडतात.एक क्रिया जाण्याची व दुसरी येण्याची.यात, "जाऊन" या क्रियावाचक शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही."येते" या क्रियावाचक शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.
वाक्याचा अर्थ पुर्ण करणार्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात, हे आपण अगोदर समजून घेतले आहेच.म्हणून "येते" हे वरिल वाक्यातिल क्रियापद आहे. डाॅ.रे.भ.भारस्वाडकर
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्र.4
गझल लिहिताना उभयान्वयी अव्ययांची विपुलता नसावी.शक्य तो कमी असावेत.
आता आपण उभयान्वयी अव्यय म्हणजे काय हे पाहू." " दोन किंवा अधिक शब्द , दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. "
ऊदाहरणार्थ: अथवा , आणि , व , आणखी , शिवाय , अन् , न् , कि , किंवा , वा , नाहीतर , का , आगर ,पण , बाकी , तरी , परी , किंतू , परंतू , कारण , म्हणून , जर , जरी , तरी , तर , की ,मात्र , म्हणजे ई.
काही वाक्ये पाहू.यावाक्यातिल उभयान्वयी अव्यय सहज ओळखता येतिल.
1) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.
2 ) देह जावो अथवा राहो.
3 ) मरावे परी किर्तीरूपे उरावे.
4 ) शेतकर्याने शेती नांगरली पण पाऊस पडला नाही.
5 ) जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल.
उभयान्वयी अव्यय कमी वापरायचे असल्यास ,म्हणजे भरतीचे अनावश्यक शब्द यावयास नको असल्यास, त्याकरिता योग्य मात्रेचा , योग्य तोलामोलाचा शब्द योजावयाची कुवत आणि शब्दसाठा असणे किंवा वाढवणे आवश्यक आहे. या बाबत माझा वयक्तिक अनुभव सांगतो. मी नेहमी शब्दकोडे सोडवतो.माझा तो आवडता छंद आहे.यामुळे शब्दसाठा वाढवण्यास मदत होते व पर्यायी शब्द शोधण्यासाठी मेंदुला चांगली चालना मिळते.असो.
दुसरा पर्याय असा की, गझल, लहान वृत्तात लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे.म्हणजेगझलमध्ये सुरवातीपासून ते शेवटपर्यंत , " अन् , हा , ही ,हे , तो , ती , च , " असे भरतीचे शब्द येण्यास वाव राहणार नाही.
शेवटी , गझलमध्ये भरतीचे अनावश्यक शब्दच काय पण " शेर " सुध्दा यायला नकोत.
आता याच्या ऊलट जे मूळ शब्द आहेत त्यांची मोडतोड करून वजनात बसवण्याची कसरत करू नये.
अशा चुका होतात. माझ्याही बाबतित घडतात.पण माझा मित्र, सेलूचा गौतम सुर्यवंशी लगेच मला व्हाॅट्सअॅपवर कळवतो, मी दुरूस्त करतो.
नविन लिहिलेली गझल कोणाकडून तपासून घेण्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही व कोणाला वाटुही नये.
ऊद्या, गझलेतील क्रियापद आणि गझलेची स्मरणियता याबद्दलची संकलित ऊपयुक्त अशी माहिती, ऊदाहरणासह देतो.
या शिवाय जे संगिताचे जाणकार किंवा कानसेन आहेत, त्यांनिही गझलेतील " लयमाधुर्य " व सादरीकरण,श्रोत्यांचा प्रतिसाद ,याबाबत मार्गदर्शन/अनुभवकथन/ किस्से/ आठवणी शेअर कराव्यात ही नम्र विनंती.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर,औरंगाबाद, मो.9730093331
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्र.6 (संकलन)
आज आपण मराठी गझल आणि ईतर भाषांमधिल गझल(जसे की हिंदी,ऊर्दू,अरबी,फारसी) यांच्यातिल भाषेचा बाज (लहेजा) व फरक समजून घेणार आहोत.
ईतर भाषांमध्ये ज्या छंदामध्ये ,अंत्ययमक ची लगावली(गण), "गाल गाल" अशी शेवटी येत असेल, तर अशा छंदात, मराठीतून गझल लिहिण्याचा प्रयत्न टाळावा.कारण शेवटी हलन्त लघु येत आहे.मराठी गझलमध्ये तशी परंपरा नाही.परंपरे प्रमाणे, मराठी गझल मधील अंत्य यमक (रदीफ) कधीही हलन्त सापडणार नाही.
म्हणजे,थोडक्यात काय तर,मराठी भाषेत गझल लिहिताना,अंत्य यमकातील शेवटचे अक्षर कधीही लघू(र्हस्व) असू नये.
मात्र ईतर भाषेत अंत्य यमकातील शेवटचे अक्षर लघु चालते.या साठी ,एक ऊदाहरण देतो-
अजीब दास्ताँ है ये कहाँ शुरू कहाँ खतम
ये मंज़िले है कौनसी न वो समझ सके न हम ।
या मध्ये, "खतम " आणि "हम" हे हलन्त अंत्य यमक आले आहेत, ते हिंदी,ऊर्दू भाषेत चालते.
परंतू, मराठी गझल मध्ये, असे अंत्य यमकाच्या शेवटचे अक्षर लघु(र्हस्व) चालत नाही.ते गुरू(दीर्घ)च असावे लागते.
गझल ही गाण्याच्या दृष्टीने परिणामकारक असते,याची संपूर्ण जाणीव कविला असावी, म्हणून हा उपदव्याप.
हा झाला लयमाधुर्य/गेयता बाबत पहिला मुद्दा.
2) आता दुसरा मुद्दा, असा की , दोन ओळींच्या शेर च्या माध्यमातून संवाद साधण्याची कला गझल मध्ये छान करता येते.हा संवाद (डायलाॅग),कधी प्रियेसी बरोबर,कधी परमेश्वराशी चालु असतो,तर कधी अजून कुणाशी असतो.
ऊदाहरणार्थ -
जान लेनी थी ले लिये होते
मुस्कुराने की क्या ज़रूरत थी ।
एवढे तरी करून जा
हा वसंत आवरून जा
- सुरेश भट
3) दोन ओळींमधला विरोधाभास, हे गझलचे खास वैशिष्ट आहे.शेरच्या पहिल्या ओळीतले विधान अगदी सोपे आणि सरळ असते मात्र लगेच दुसर्या ओळीत कवी असे काही लिहून जातो की वाचक, हा विरोधाभास,किंवा कवी असे काही विपरित लिहून जातो की , वाचक किंवा श्रोता एकदम ऊसळून दाद देतो. हेच गझलचे वैशिष्ट्य, नविन गझल लिहिणार्यांनी पक्के लक्षात ठेऊन गझलचे शेर लिहावेत,अशी माझी आग्रहाची,कळकळिची विनंती आहे.
ऊदाहरण -
हमसे पुछो मिज़ाज बारिश का
हम जो कच्चे मकान वाले है ।
।
ऊत्तरे जेव्हा दिली नाही कुणी...
प्रश्न प्रेतांना विचारू लागलो !
सुरेश भट
4) गझल चे वैशिष्ट म्हणजे,थोडक्यात खूप सांगण्याची करामत हे आहे.साधे सोपे छोटे-छोटे शब्द असतात,मात्र त्यातला गर्भित अर्थ आणि त्या मागचे तत्व खूप खोल असते.या मुळेच गझल लोकांना आवडते व त्यांच्या मनाला स्पर्श करून जाते.
ऊदाहरण- जिगर मुरादाबादी यांच्या गझलेतील मला आवडलेला हा शेर बघा-
उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो
न जाने किस गली में ज़िन्दगी की शाम हो जाये ।
का म्हणून मी आता शब्द आवरू माझे
या विराट सत्याशी बोलणे सुरू आहे ।
सुरेश भट
(क्रमश:)
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्र.7 (संकलित)
5) गझल आणि अध्यात्मिक तत्वज्ञान.
मराठी परंपरा,संस्कृती,अध्यात्म,तत्वज्ञान, परमेश्वराची आळवणी,परमोच्च भक्तीभाव,परस्पर देवोभव ही शिकवण,अध्यात्मिक विचारधारा,मानवी जिवनाचा ऊद्देश ई.ई. मराठीपण ,जे फक्त मराठी माणसालाच लाभलेले आहे, त्याचे गझलेतून प्रगटीकरण, अत्यंत प्रभावीपणे करणे, अपेक्षित आहे.नवी पिढी या संबंधी पुढाकार घेईल अशी अपेक्षा करतो.
ईतर भाषेतिल अशा गझलांमुळे अनेक गझलकार अजरामर झाले आहेत. मराठी भाषेत सुरेश भटांनी सुरवात केली आहे.नव्या पिढिने, ही मराठी मातीची पताका ,आपल्या खांद्यावरून ,मराठी गझलेची दिंडी पुढे सक्षमपणे नेता यावी या साठी , गझल लिहिण्याचे शिकले पाहिजे.
या बाबत दोन ऊदाहरणे देतो. एक ऊर्दू मधील व एक मराठी मधील. ते असे -
हर ज़र्रा चमकता है अनवारे-इलाहीसे
हर सांस ये कहती है, हम है तो ख़ुदा भी है ।
अकबर इलाहाबादी.
कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
सुरेश भट
थोडक्यात असे की , आपले जे श्रध्दास्थान आहे,
त्या बाबतचा आपला समर्पण भाव, मानव कल्याणासाठी त्या श्रध्दास्थानाची आळवणी, आपल्याला सन्मार्ग दाखवा म्हणून संपुर्ण शरणागत भाव, हा फक्त आणि फक्त मराठी अध्यात्माचा वारसा लाभलेला मराठी गझलकारच अत्यंत प्रभावीपणे करू शकतो.अत्यंतिक तिव्र भावना गझलेच्या शेर मधून व्यक्त करताना एखादा वृत्तदोष जरी झाला तरी असा एक मात्रेचा दोष मराठी गझलेत चालतो.ऊर्दू गझलेत फक्त अर्धा मात्रा दोष चालतो.
तेव्हा ऊत्साहाने नव्याने गझल लिहायला आज आणि आत्तापासून सुरवात करा.
6) गझल गायकी
गझल आवडण्याचे व लोकप्रिय होण्याचे एक कारण म्हणजे गझल गाता येते.शब्द,सूर आणि चाल , या तीन गोष्टिंना त्रिवेणी संगम म्हणतात.एखादी गझल जन्मभर आपल्या मनात घर करून असते ती या मुळे.
ऊदाहरणादाखल अशा काही ऊर्दू गझला सांगतो.
कभी खुद पे कभी हालात पे रोना आया
बात निकली तो हर इक बात पे रोना आया ।
कौन रोता है किसी और के ख़ातिर ऐ दोस्त
सबको अपनी ही किसी बात पे रोना आया ।
(फिल्म-हम दोनों , संगीतकार जयदेव , शायर साहिर लुधियानवी , गायक महम्मद रफी)
स्थळ मर्यादे मूळे लिहिण्या पेक्षा अशा गझला ऊर्दूतील , तसेच मराठीतील सुरेश भटांच्या गझला गेय स्वरूपात टाकता येतील.रसिकांनिही टाकाव्यात.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्रमांक 8 : (संकलित ) गझलचे कायदे,नियम व अपवाद. गझल लिहिताना विशिष्ट छंद (बहर)किंवा वृत्त (लगावली ) पुर्ण गझलेत एकच असावी. मूळ वृत्तामध्ये जशी लगावली दिली आहे, त्यात बदल करू नयेत. हा झाला कायदा (Act) आणि नियम (Rules). या नियमाला अपवाद (Exception to the Rule), काय आहे हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. 1) अपवादात्मक परिस्थिती मध्ये, गझलकार, एका गुरू (दीर्घ) अक्षरासाठी,(गुरू अक्षराला दोन मात्रा व लघू (र्हस्व) अक्षराला एक मात्रा असते ) , अपवाद म्हणून, दोन लघू अक्षरे लिहितो.पण माप (वजन) तेच राहाते. या साठी ऊदाहरण देतो, म्हणजे, हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल. वेशीत लक्तरांना टांगायचे कधी उखळात भावनांना कांडायचे कधी । या मतल्या मध्ये, मूळ लगावली काय दिली आहे ? तर ; गागाल , गालगागा . पहिल्या अर्ध्या ओळीत," लक्तरांना " असा शब्द आला आहे, या साठी लगावली कंसात (गालगागा ) दिली आहे. बरोबरय ना ? आता खूप महत्वाचा मराठी व्याकरणाचा नियम सांगतो. जोडाक्षराच्या आधीच्या अक्षरावर दाब (जोर किंवा Accent) पडत असेल तर तो वर्ण गुरू मानावा , दाब नसेल तर लघू मानावे. याचे ऊदाहरण दिले तर आपल्या मनात संभ्रम राहाणार नाही. " लक्तरांना " या शब्दात 'ल ' या अक्षरावर दाब येतो, 'ल' हे अक्षर वर्ण गुरू मानावे. तर, दुसरा एक काल्पनिक शब्द घेतो, " उन्हात " , यात ' उ ' या अक्षर वर्णावर दाब येत नाही. तेव्हा, लक्तरांना याची लगावली ,—U— — अशी येते. आता 'उन्हात ' याची लगावली U—U अशी आहे. (या साठी नविन व्याकरणाच्या पुस्तकातिल पानाचा , ही माहिती लिहून झाल्यावर , लगेच वेगळा फोटो काढून पाठवतो, म्हणजे या बाबत कुणाच्याही मनात शंका राहाणार नाही. 2) आता, दुसरा अन् आजच्या भागाचा शेवटचा मुद्दा. हा मुद्दा असा आहे की, वर दिलेल्या गझलच्या मतल्यातील, दुसर्या ओळी मध्ये, पहिला शब्द ,"उखळात " असा आला आहे. बरोबरय की नाही ? यासाठी लगावली आहे, " गागाल ". म्हणजे , गुरू,गुरू,लघु . या पहिल्या गुरू (दोन मात्रा) ची फोड करून दोन लघू ( दोन लघू म्हणजे एका लघूची एक मात्रा वदुसर्या लघू ची एक मात्रा अशी एकूण दोन मात्रा झाल्या.) म्हणजे , उ ख UU (UU = — ) ,हे मिळून गुरू झाले. आता आपल्या लक्षात आले असेल की , ——U साठी उखळात (UU = — ,ळा = — , आणि त = U ) ही लगावली पाळली गेली. आता कळाले का, की गझलचा आशय (अर्थ), प्रभावी करण्यासाठी, एका गुरूचे दोन लघू किंवा याच्या विरूद्ध, दोन लघुंचे एक गुरू, करणे, हे गझलच्या कायदा,नियमाला , अपवाद माणून घेतलेले चालते. या भागाचे शेवटी, काय महत्वाचे आहे ते सांगतो. अगदी र्हदयावर कोरून ठेवा की ,अपवाद म्हणून वृत्ताचे बंधन सैल झाले तर, एकदाचे चालून जाईल पण , शेरात जे सांगावयाचे असेल ते हमखास , निश्चितपणे, र्हदयस्पर्शी असावे.नुस्ता शब्दांचा सांगाडा नसावा.सादर करण्यात येणार्या शेरला वरचेवर दाद मिळाली पाहिजे, इतके त्यात प्रभावी विचार असले पाहिजेत. गझल मध्ये 'नावीन्य ' चा अर्थ असा की ,कवीने आपला विचार इतरांपेक्षा अधीक परिणामकारकपणे , र्हदयाला स्पर्श करू शकणार्या शब्दात - स्पष्ट व सरळ शैलीत मांडून दाखविणे. सारांश : गझलमध्ये हीन विचार,अश्लिलता,शिव्या, नसाव्या, कारण गझल म्हणजे शिव्या देण्याचा आखाडा नव्हे. पुढील भागात गझलचे जे पाच आंतरघटक आहेत, त्या विषयी चर्चा करूयात. प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर, औरंगाबाद , मो. 9730093331
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्र.9 गझल आणि वाक्य/शब्द रूपांतर (संकलीत)
कवी जेव्हा गझल लिहीत असतो, तेव्हा प्रतिभाशक्ती (सर्जनशिललता) ज्याला ईंग्रजीत Creativity असे म्हणतात आणि वृत्ताचे बंधन यांच्यामध्ये कविच्या मनात तुंबळ द्वंद्व चालु असते.त्या वेळी कविला अर्थाच्या दृष्टिने एखादा शब्द आणि त्या शब्दाला व ओळिला प्रभावी क्रियापद , सुचते, पण ते वृत्तात बसत नाही, तेव्हा कवी आपल्या शब्दशक्तिच्या सहाय्याने, गझलमध्ये एखादा नवीन जोडशब्द निर्माण करतो, (खरे सांगायचे तर, हे नवीन नसते, पुर्वी कोणीतरी असे केलेले असते, पण ते आपल्याला ठाऊक नसते), यालाच व्याकरणा मध्ये, वाक्यरूपांतर या भागातील " केवल संयुक्त-मिश्र वाक्यांचे परस्पर रूपांतर " असे म्हणतात. या मध्ये " शब्दांची जात बदलून वाक्य रचना करणे, असे म्हणतात. व्याकरणाच्या पुस्तकात,एका क्रियापदाचे असे ऊदाहरण दिले आहे. ते असे -
1) त्याच्या डोळ्यात पाणी आले.
2) त्याचे डोळे पाणावले
गेयता,स्मरणियता,संगिताच्या दृष्टिने 'पाणावले' हा शब्द कवी वापरतो.
मी नुकत्याच लिहिलेल्या गझलमध्ये,रदीफ ,नाचताहे,डाचताहे,वाचताहे,साचताहे,काचताहे आणि जाचताहे असे वापरले आहे.
गमतिचा भाग असा की. मला वाटले की मी काहितरी नवीन केले. पण हा भाग क्र.9 लिहिताना, व्याकरणाच्या पुस्तकामध्ये, पान क्र.396 वर " वचन/गीत- संत/कवी या सदराखाली, पहिलेच ऊदाहरण होते , ते असे -
" पैल तोगे काऊ कोकता हे, शकुन गे माये सांगताहे " -संत ज्ञानेश्वर.
कोणितरी ,कवी हे शब्दांचे ईश्वर असतात, असे काहिसे म्हटल्याचे आठवले.सर्व कविंचे आद्य कवी, कोण आहेत, माहितय ? 'महर्षी वेद व्यास ' असे ते नाव आहे, आणि त्या वरूनच , " व्यासोच्छिष्टम जगत सर्वम " असे म्हणतात. या महर्षी वेद व्यासांनी लिहिलेल्या , "ब्रह्मसूत्र " या पुस्तकाचा मी स्वत: गेली तीस वर्षे अभ्यास करतोय, पण प्रामाणिकपणे सांगतो की , मला त्यातले अद्याप पाच टक्के पण पुर्णत: आकलन झालेले नाही.
आपण जे काही काव्य/गझल लिहीत आहोत , ते व्यासांचे ऊष्टे आहे, एवढी जाणीव ठेवल्यास, कवीचा अहंकार वाढणार नाही एवढे निश्चित.
प्रयोगशिल व्हा, मराठी संस्कृती आपल्या ऊत्तमोत्तम गझलांची,मराठमोळ्या बाजाची, आध्यात्मिक स्फुल्लिंगांची वाट पहात आहे.
यावरून सहज आठवले, की बहुतेक आपण सर्वांनी, प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली यांनी गायलेली,' अकबर' इलाहाबादी, यांनीलिहिलेली सुप्रसिद्ध ग़जल , " हंगामा है क्यों बरपा , थोड़ी सी जो पी ली है । डाका तो नही डाला, चोरी तो नही की है। " ही गज़ल ऐकली असेल.माझी आपल्याला विनंती आहे की, पुन्हा एकदा, अवश्य,सतर्क होऊन ऐका की, 'अकबर'इलाहीबादी, किती ऊंचीवर ही गज़ल नेऊन ठेवतात, विशेषत: " हर सांस ये कहती है , हम है तो ख़ुदा भी है । "
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर, औरंगाबाद, मो. 9730093331 (whats app available).
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्रमांक ११ - आता आपली आपणच तपासून पहा गझल . गझलेचे वृत्त(बहर),यमक(काफिया),आणि अन्त्ययमक(रदीफ) , यातील अन्त्ययमक या घटकामुळे गझलेचा आराखडा (ढाचा) ज्याला आकृतीबंध (जमीन )असे म्हणतात, तो आकृतीबंध ( जमीन ) गझलेच्या पहिल्याच शेर मधे(या पहिल्या शेर ला 'मतला' (मत्ला ) असे म्हणतात. ) तयार होतो.मतल्यातील पहिल्या ओळीला' मिस्र-ए-उला' आणि दुसर्या ओळीला ' मिस्र-ए-सानी ' असे म्हणतात.(आपणही आता एक मेकांशी बोलताना, मतल्याची पहिली ओळ, दुसरी ओळ असे न म्हणता, तेरे मतले की, मिस्रै उला बहोत बढिया जम गयी है, लेकिन जनाब , जरा मिस्रे सानी पर ध्यान दो। देखो, अलामत ठीक करो । अशा भाषेत बोलताना आपणच गझलेचे शहेनशहा आहोत असे वाटेल. आता सगळ्यात महत्वाचा नियम तपासून घ्यायचा. तो म्हणजे, अन्त्ययमक(रदीफ) चा शब्द(एक किंवा एकापेक्षा अधिक शब्द असू शकतात) जसाच्या तसा शेवट पर्यंत वापरायचा. ऊदाहरणार्थ - चंद्र आता मावळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला काय तो वेडा इथेही बोलला ? हा शहाणाही चळाया लागला ! हाक दाराने मला जेव्हा दिली उंबरा मागे वळाया लागला ! सुरेश भट या मध्ये रदीफ काय आहे ? 'लागला ' हा रदीफ आहे, जो पुर्ण गझलेत, म्हणजे गझलेच्या मतल्यातील दोन्ही ओळीत, आणि पुढील प्रत्येक शेरच्या दुसर्या ओळीत 'लागला ' हा शब्द कायम असतो. म्हणजे एकदा का रदीफ चा शब्द निश्चित झाला की तो च शब्द कायम ठेवायचा.जसा 'लागला ' हा रदीफ चा शब्द 'लागला' असाच ठेवायचा. (क्रमश:) रे.भ.
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्रमांक-10
गझलेतील 'अलामत' ऊर्फ
'स्वरचिन्हे' (संकलीत)
गझलेत यमक ऊर्फ काफिया बदलत नाही,तर त्याचे शब्द बदलतात.यमकाच्या शब्दात असलेली अलामत ऊर्फ स्वरचिन्हे हेच त्या यमकाचे स्थायी यमक असते.या अलामतीवरच त्या यमकाचे अस्तित्व अवलंबून असते.हे स्वरचिन्ह सांभाळून यमक कसे साधावयाचे हेच महत्वाचे आहे, असे कवीवर्य सुरेश भटांनी म्हटले आहे.
थोडक्यात सारांश असा की,यमकाच्या शेवटच्या न बदलणार्या एक किंवा एकाहून अधीक स्थीर अक्षराच्या अगोदर येणार्या अक्षरात ,जो ण बदलणारा 'स्वर' असतो, त्या स्वरालाच अलामत ऊर्फ स्वरचिन्ह असे म्हणतात.
आता एक ऊदाहरण पाहूयात -
सगळे घरी जर थांबती,मरण्यात का रममाण हे
गवतावरी फिरणे असे,चरण्यात का रममाण हे ।
वरील दोन ओळीत, 'मरण्यात' आणि 'चरण्यात' या यमकांमध्ये ,'च' आणि 'म' मध्ये 'अ' या स्वराची अलामत आहे , तर पुढील तीन अक्षरे,'रण्यात' हे स्थीर यमक कायम आहे. या गझलेच्या पुढिल शेरांमध्ये, ही 'अ' ची अलामत कायम आहे, जसे की; 'हरण्यात','भरण्यात','धरण्यात','बरण्यात' ई.
आता,थोडे व्याकरणाकडे वळुयात. आपल्या तोंडातून निघणार्या मूलध्वनीला 'वर्ण' असे म्हणतात.वर्णाचे प्रमुख तीन प्रकार आहेत : १)स्वर २)स्वरादी ३) व्यंजन. स्वर म्हणजे 'सूर'.सूर म्हणजे आवाज.(ऊदा. आपण म्हणतो ना की ,आज गायकाचा सूर चांगला लागला आहे.).
मराठीत एकूण बारा स्वर आहेत.या मध्ये पाच र्हस्व आणि सात दीर्घ स्वर आहेत.र्हस्व स्वरांची एक मात्रा आणि दीर्घ स्वरांची दोन मात्रा मोजली जाते.
गझलेत प्रामुख्याने ,अ,इ,उ हे तीन र्हस्व स्वर व आ,ई,ऊ,ए,ऐ,ओ,औ हे दीर्घ स्वर वापरले जातात.
थोडक्यात सारांश असा की, यमक ऊर्फ काफिया कसा असावा, हे अलामतच(स्वरचिन्ह) ठरवते आणि या अलामतीच्या कायद्यानुसारच शेवट पर्यंत काफिया (यमक) चालवायचा असतो.
पुढच्या भागात, आपण गझलेच्या प्रकारा विषयी माहिती पाहू.
संकलन : प्रा. डाॅ. रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद, दि.०८-०६-२०२०, मो. ९७३००९३३३१
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्रमांक -12
गझलचे घटक
(एलेमेंट्स आॅफ गझलl)
(संकलित)
आज आपण गझलचे घटक (एलेमेंट्स) या बद्दल समजुन घेणार आहोत.गझल मध्ये खालिल पाच अंतर घटक असतात. ऊर्दू शब्दांच्या साहाय्याने हे घटक व त्यांचा अर्थ समजाऊन घेऊयात.
1) अंदाजे बयाँ .
अंदाजे या ऊर्दू शब्दाचा बोली भाषेतला अर्थ,पद्धती, खुबी,वैशिष्ट्य,(स्टाईल) , खासियत ई. तर बयाँ या ऊर्दू शब्दाचा अर्थ, व्यक्त करणे, अभिव्यक्ती,मांडणी, (एक्सप्रेशन आॅर मॅनिफेस्टेशन ) ई. (ईंग्रजी शब्द येथे मुद्दाम देत आहे, कारण कुठून का होईना, अर्थ कळाल्याशी आपला मतलब आहे.)
हे आपले 'शिक्षण'(एज्युकेशन) चालू आहे. या ठिकाणी, मला स्वामी विवेकानंद यांची शिक्षणाची व्याख्या सांगाविशी वाटते. ती अशी - एज्युकेशन कॅन बी डिफाईंड ॅज मॅनिफेस्टेशन आॅफ लेटेंट . (अव्यक्ताला व्यक्त करणे म्हणजे शिक्षण).
आता, अंदाजे बयाँ म्हणजे व्यक्त करण्याची , गझलकाराची आपली स्वताहाची वयक्तिक स्टाईल किंवा खुबी.
आता प्रत्येक कवीचा स्वभाव, प्रकृती, भिन्न असते.त्याच्या स्वभावानुसार त्याची व्यक्त करण्याची पद्धती असते, आणि तिच त्याच्या गझलेच्या स्टाईल वरून लक्षात येते. या स्टाईल शब्दासाठी आपण मराठी शब्द 'लकब' असा वापरू शकतो.
ऊदाहरणार्थ , एखादा कवी 'तिरकस " स्वभावाचा असतो, त्याला प्रेमच व्यक्त करायचे असते ,पण बघा तो गझलेतून कसा व्यक्त करतो ते -
जान लेनी थी , ले लिये होते
मुस्कुराने की क्या जरूरत थी ।
ही झाली तिरकसपणाची पद्धत. आता विनय, अनुनय, अजिजी, मार्दव, लालूनचांगुल करण्याची पद्धती -
आप कहे और हम ना सुनाये,ऐसे तो हालात नही,
एक ज़रासा दिल है धडका, और तो कोई बात नही ।
आता, रोखठोक , व्यवहारी पद्धतिने व्यक्त होणारी 'बयाँ " (स्टाईल) , -
मै समझता था , उन्हे मुझसे महब्बत होगी ।
वो समझते थे , मेरी जेब मे पैसा होगा ।
-पागल अंसारी.
आता, आपल्या लक्षात हा गझलेचा पहिला आंतरघटक , अंदाजे बयाँ म्हणजे, गझल सांगण्याची आणि अभिव्यक्तिची खुबी. 'कहते है के ग़ालीब का अंदाजे बयाँ ही कुछ और था ।' असेकाहिसे म्हटले आहे.
या साठी ,नवीन गझल शिकणार्यांनी, आपल्या स्वताहाच्या खुबीनुसार गझल लिहावी.आता काही जण ,असे म्हणतील की, आमच्यात कुठे अशी खुबी आहे ? तर मानसशास्राचा अभ्यासक म्हणून मी शंभर टक्के खात्रिने सांगतोय की, प्रत्येक व्यक्ती मध्ये एक ना एक सद् गुण असतो, म्हणजे असतोच.जर, माझा मलाच तो दिसला नाही, तर, खुशाल समजावे की, माझी सद् गुण ओळखण्याची पात्रता कमी पडत आहे.खरी गरज आहे ती पात्रता(अॅबिलिटी) वाढवण्याची ,न की क्षमता (कॅपॅसिटी) वाढवण्याची.आपल्याला जमत नसेल तर जवळच्या मित्रांना विचारा , ते सांगतील तुमच्या मधील खुबी, /हुनर/शैली, म्हणजेच थोडक्यात काय तर तुमच्या स्वभावाची जडण-घडण ई.
विनाकारण, प्रसिद्ध कविंच्या गझलांचे अनुकरण न करता ,आपल्या स्वताहाचा 'अंदाजे बयाँ' लेहेजा, स्टाईल,शैली, व्यक्त करण्याची खुबी शोधा, आणि मग बघा, तुमची गझल ही , 'तुमचीच ' गझल आहे, हे ईतरांनाही समजेल.सुरवात तर करा, गझलेच्या समुद्रा , खोलवर गोते खाण्यासाठी, शेवटी, आपलाच 'जिगर' कामाला येतो.
धन्यवाद.
पुढच्या भागात गझलेचा दुसरा महत्वाचा आंतर घटक ' हुस्ने ख़याल ' म्हणजे, विचारांचे सौंदर्य, ज्या मध्ये, गझलकाराचा कल्पनाविलास, सर्जनशिलता (क्रियेटीव्हिटी), नवनिर्माण ई.बाबत सोदाहरण माहिती घेऊया.
या भागाचा शेवट मी असा करतो की, प्रत्येक कवीच्या मनात, त्याचा 'अंदाजे बयाँ ' असतोच, तो सुप्त स्वरूपातील अंदाजे बयाँ, व्यक्त करण्याच्या पातळीवर यावा, अशी परमेश्वचर चरणी प्रार्थना.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर , औरंगाबाद, दि. 13-06-220 , मो. 9730093331
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्र.14
गझलेचा तिसरा आंतर घटक -
मौसिकी
संकलन-डाॅ.रे.भ. भारस्वाडकर,औरंगाबाद.
आज आपण गझलेचा तिसरा आंतरघटक " मौसिकी " या बद्दल समजून घेऊया. यापुर्वी आपण गझलेचे दोन आंतरघटक पाहिलेत , 1) अंदाजे बयाँ आणि 2) हुस्ने ख़याल . मौसिकी म्हणजे संगीतमयता, गेयता,रागदारीवर आधारित ज्याला ईंग्रजित ' मेलडी ' किंवा 'मेलोडियस' असे म्हणतात.
रागदारी , शाम-ए-ग़ज़ल - ज्यात गायकी आणि मौसिकी यांचा संगम झालेला असतो.साज़ (वाद्ये) आणि आवाज (गायक) यांच्या संगमातून गझल जेव्हा श्रोत्यांसमोर सादर केली जाते , तेव्हा श्रोत्यांच्या दाद आणि टाळ्यांच्या कडकडाटातून गझल विजेसारखी चमकत राहते. म्हणून गायक हा नेहमी ऊत्तम आणि प्रसिद्ध गझलांच्या सतत शोधात असतो.
या मध्ये, काही गायक हे स्वताहा गझलेला चाल लाऊन गझल गायन करतात , तर काही गायक दुसर्या संगितकाराने संगितबद्ध केलेल्या गझला ध्वनीमुद्रित अल्बम साठी गात असतात.
ज्या काळात प्रसिद्धी माध्यमे कमी होती किंवा नव्हती,त्या काळात मुशायर्यातून शायर आपल्या गझला स्वताहा सादर करायचे, जे आजही चालु आहे.या मैफिली रात्री असायच्या.त्या काळात मेणबत्ती (शमा) गझल सादर करणार्या शायर समोर ठेवण्याची प्रथा होती.' आता मी आपल्या समोर माझी एक गझल सादर करतो,' असे म्हटल्या बरोबर , समोर बसलेले सर्व श्रोते मोठ्याने 'ईर्शाद 'असे म्हणून गझलकाराला प्रोत्साहन द्यायचे. या मुळे एक सुंदर वातावरणनिर्मिती (माहौल) तयार व्हायची.
गझल सादर करण्यापुर्वी गझलकार काही 'शेर' (स्वताहाचे किंवा ईतरांचे किंवा गझल गुरूंचे प्रभावी शेर सादर करून प्रचंड दाद मिळवत व मग वातावरण निमार्मिती झाली की, आपली गझल सादर करित असत.
ज्यांच्या गझलेत 'हुस्ने ख़याल' असतो अशा गझला लिहिणारे गझलकार ऊच्च दर्जाचे समजले जायचे , तर ज्यांच्या गझलांमध्ये, 'मौसिकी ' म्हणजे संगीतमयता अधिक असायची, अशा गझला ,गझल गायकांच्या मैफिलीत श्रोत्यांची वारंवार दाद मिळवत असत. आमकी एक गझल गायलिच पाहिजे असा आग्रह रसिक श्रोते करत व आपल्या चाहत्यांची ही मागणिही (फर्माईश ) गझल गायक मोठ्या प्रेमाने करतात.ही परंपरा आजही चालु आहे.
पुढील काळामधे हळुहळू, छापील माध्यम , ध्वनी माध्यम , ध्वनी-चित्र माध्यम ,डिजिटल तंत्रज्ञान, सोशल मिडिया यांनी गझलेचे क्षेत्र बहरून आले.घझलांच्या रेकाॅर्ड्स पासून ते कसेट्स, सी.डी.ज, डिव्हिडी, यांचा काळ सुरू झाला , आणि सामान्य माणुसही गझलेकडे आकर्षित झाला.आता डिजिटल तंत्रज्ञानाने तर कळस गाठला आहे. या सर्वांचा परिणाम गझलचे वाचक व श्रोते मोठ्या प्रमाणात वाढण्यावर झाला. नव्या ईलेक्ट्राॅनिक सोशल मिडियाने , मागच्या काही महिन्यात विशेषत: लाॅकडाऊनच्या काळात , बहारदार धुमाकुळ घालणे सुरू केले आहे. या पुढे आॅनलाईन सादरीकरण ही वाढत जाणार आहे.आता स्वदेशी 'नमस्ते भारत " हे अॅप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ईंटरनेटचे जाळे सर्वदूर ग्रामिण भागापर्यंत पसरत आहे, हे गझलेला बरे दिवस येण्याचे संकेत देत आहेत. ई-गझल संग्रह, ई-गझल पुस्तके,, ई-गझल मासिके, यांचे स्वागत होत आहे.
अनेक अल्बम मधून आता 8 डी आॅडिओ,16 डी आॅडिओ व त्या पुढील व्हर्जन्सची गाणी/गझला या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे.
म्हणून या काळात 'मौसिकी' गझल लिहिणारे गझलकार खरोखरच भाग्यवान आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
पुढे येणार्या युगाच्या , म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल ईंटेलिजन्स) च्या ऊंबरठ्यावर आज जगाने प्रवेश केला आहे.कदाचित भविष्यात आपण लिहिलेल्या मौसिकी गझलेला संगणकिय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून संगितबद्ध केले जाईल.
या मौसिकी गझलसाठी गझलकाराला शास्रिय संगाताची जुजबी ओळख असल्यास चांगले. ऊदाहरणार्थ, मैफिलिच्या शेवटी " भैरवी " हा राग सादर करून मैफिल संपन्न होते.गझल गायन मैफिलीत भैरवी रागातूनच गझल सादर केली जाते.ही गझल निरोपाची गझल सते.गंभीर स्वरूपाची असते.निसर्गशक्तीची आळवणी करणारी असते किंवा विश्व कल्याणाचे , मानवाच्या मंगलतेचे , कल्याणाचे , सर्व जन सुखी व्हावेत , सर्व प्राणीमात्र सुखी व्हावेत अशी दान / दुवा मागणारी असते.आयुष्याचे सार , तत्वज्ञान , अध्यात्मिक विचार (सुफी) मांडणारी असते.
अशा ऊत्तमोत्तम ' मौसिकी ' गझल लिहिण्यासाठी तुम्हाला आत्मप्रेरणा मिळो, अशी त्या परमेश्वर चरणी प्रार्थना .धन्यवाद.
प्रा.डाॅ.रे.भ. भारस्वाडकर, औरंगाबाद , दि. 16-06-2020 , मो. 9730093331.
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्रमांक 13
गझलेचा दुसरा आंतरघटक
हुस्ने ख़याल (संकलित)
काल आपण गझलेचा पहिला आंतर घटक ,'अंदाजे बयाँ' बद्दल पाहिले. आज आपण गझलेचा दुसरा आंतर घटक, 'हुस्ने ख़याल' बद्दल समजुन घेऊया.
हुस्न म्हणजे सौंदर्य आणि ख़याल म्हणजे विचार.तेव्हा हुस्ने ख़याल याचा अर्थ विचारांचे सौंदर्य. काही मराठी प्रेमी याला सौंदर्य विचार असे म्हणतात, पण ते चुकिचे असू शकते.कारण यात सौंदर्याला प्राधान्य दिले जाते, म्हणून विचारांचे सौंदर्य असे म्हणने योग्य आहे, कारण यात विचारांना प्राधान्य आहे . त्या विचारातील सुंदरता गझल लिहिताना कवी आपल्या प्रतिभाशक्तिच्या कल्पनाविलासातून मांडत असतो. थोडक्यात सांगायचे तर, गझलकाराच्या कल्पनाविलासातून आलेला सुंदर विचार म्हणजे, 'हुस्ने ख़याल '.
हा कल्पनाविलास कवीच्या सर्जनशिलतेतून (यालाच नवनिर्माण किंवा क्रियेटिव्हिटी असे म्हणतात.) आलेला असतो, जो आजवर कुणीही गझलेच्या शेर मधून या पुर्वी कधिच मांडलेला नसतो.
एक ऊदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करतो.
1) धूप के ऊँचे-निचे रस्तों को
एक कमरेका बल्ब क्या जाने ।
2) तुमने देखा है किसी मीरा को मन्दिर मे कभी,
एक दिन उसने ख़ुदासे इस तरह माँगा मुझे । 3) झिल मिलाते है किश्तियों में दिये.... पूल खड़े सो रहे है पानी में ।
वरिल तीन्ही शेर बशीर बद्र यांच्या 'उजाले अपनी यादों के ' या ग़ज़ल संग्रहातील आहेत.त्यांच्या 'आस' या ग़ज़ल संग्रहाला 'साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला आहे.जगातल्या महान व्यक्तिंपासून ते रिक्शेवाला,ट्रकवाला,हमाल,मजूर ई. सामान्य माणसेही त्यांच्या या 'हुस्ने ख़याल ' मुळे त्यांचे चाहते होते.याचे कारण म्हणजे, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील दर्द-भरे क्षण ,त्यांचा राग-द्वेष हे त्यांच्या ग़ज़लेतील विचारातून व्यक्त होत होते. मी स्वताहाला भाग्यवान समजतो की, मी बशीर बद्र यांच्या गझला मुशायरा मध्ये प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकल्या आहेत.असो.
आता मराठी गझलातील 'हुस्ने ख़याल ' पाहुया. गझलसम्राट सुरेश भट यांच्या गझलेतील हुस्ने ख़याल म्हणजेच क्रियेटिव्हिटीतून व्यक्त झालेले विचारांचे सौंदर्य डोळे दिपवणारे आहे.जशी समुद्राची खोली अथांग असते, तशी त्यांच्या विचारांची ऊंची मोजण्याची मोजपट्टी अजून निर्माण व्हायची आहे.
याची स्थळमर्यादे अभावी मोजकीच चार-पाच ऊदाहरणे देतोय -
1) सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो.
2) उत्तरे जेव्हा दिली नाही कुणी
प्रश्न प्रेतांना विचारू लागलो !
3) मला येतात भूमीतून हाका
ऊठे सीता नव्या रामायणाची.
4) साय मी खातो मराठीच्या दुधाची
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ?
5) माझ्या पराभवाची समजूत घातली मी
जे वार खोल गेले , ते यार मानले मी.
आता थोडेसे निरूपण, नवीन गझल लिहायला शिकणार्यांसाठी. क्रिएटीव्हिटी म्हणजे सर्जनशिलता, नवनिर्माण शक्ती, किंवा , आता मी जो शब्द लिहिणार आहे तो शब्द बरोबर म्हणता येणार नाही, ण लक्षात येण्यासाठी, 'कल्पनाशक्ती 'प्रत्येकात ऊपजत असते. आता डे मानसशास्र सांगतो. आपल्या मेंदुचे दोन भाग असतात.आपला डावी कडचा पन्नास टक्के मेंदू हा 'मॅथेमॅटिकल ईंटेलिजन्स ' म्हणजे गणिती बुद्धी शी संबंधित असतो व ऊजवीकडचा पन्नास टक्के मेंदू हा 'क्रिएटिव्ह ईंटेलिजन्स ' म्हणजे, नवनिर्माण बुद्धीमत्तेशी संबंधीत असतो.या दोन्हितला फरक म्हणजे, गणिती बुद्धिमत्ते मध्ये 'लाॅजिक ' असते तर नवनिर्मिती संबंधी बुद्धिमत्ते मध्ये 'लाॅजिक ' म्हणजे तर्कशास्र नसते. लाॅजिक हे सायन्स आॅफ रिझनिंग आहे , जिथे तर्कशुद्ध (रॅशनल) वेल रिझन्ड (कारण मिमांसा ) असते. ऊदा. 2x2 = 4 हे गणिती बुद्धिमत्तेने प्रमेयासह सिद्ध करता येते. याला आपल्या दैनंदिन भाषेत 'व्यवहारी ज्ञान ' असे म्हणतात.
आता आपण क्रिएटिव्ह ईंटेलिजन्स बद्दल थोडक्यात पाहू.या साठी सर्वांना माहित असलेले ऊदाहरण देतो. न्युटन ने झाडावरून सफरचंद पडताना पाहिले, आणि त्याची कल्पनाशक्ती (क्रिएटिव्हिटी) जागी झाली आणि त्याने गुरूत्वाकर्ण शक्तिचे नियम शोधून काढले.(लाॅ आॅफ ग्रॅव्हिटी). आता तुम्ही साधा विचार करा की, न्युटनच्या अगोदर हजारो लोकांनी सफरचंद झाडावरून पडताना पाहिले असणारच की ! मग त्यांना का नाही गुरूत्वाकर्षणाचा शोध लावता आला ? याचे ऊत्तर असे आहे की, ईट वाॅज दि क्रिएटिव्ह जिनियस आफ द न्युटन, हू ईन्व्हेंटेड लाॅ आॅफ ग्रॅव्हिटी. गझलकार हा असाच सर्व सामान्यांच्या , मानवी मनातील अव्यक्त भावनांना आपल्या गझलेच्या शेर मधून , व्यक्त करत असतो , तेंव्हा ,रसिक वाचक , श्रोता ऊसळून दाद का देतो, तर त्यांच्या सूप्त भावनाच कवी आपल्या क्रिएटिव्हिटीतून व्यक्त करित असतो. ही वाहव्वा, ही दाद म्हणजे , 'मेरे मू की बात छिन ली यार तुने ' असेच त्यांना म्हणायचे असते. असो.
या सर्जनशिलते मध्ये जेव्हा सकारात्मकता असते तेव्हा ते विश्वगान ठरते. पसायदान हे त्याचे ऊदाहरण.हा आशावाद आपल्या गझलेतून यावा या साठी हा लेखनप्रपंच. या भाग क्र13 चा शेवट' बशीर बद्र च्या या माझ्या अत्यंत आवडणार्या गझलेतील एका 'शेर' ने करतो -
कभी मैं अपने हाथों की लकीरों से नही उलझा,
मुझे मालूम है क़िस्मत का लिक्खा भी बदलता है ।
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर , औरंगाबाद , दि.14-06-2020, मो. 9730093331
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्र.15
गझलचा चौथा आंतरघटक
4) तसव्वुफ (मारिफत)
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर.
आता पावेतो आपण गझलेचे तीन आंतरघटक पाहिले, ते म्हणजे; अंदाजे बयाँ , हुस्ने ख़याल आणि मौसिकी . आज आपण गझलेचा चौथा आंतरघटक , ज्याला 'तसव्वुफ ' किंवा मारिफत असे म्हणतात.
तसव्वुफ म्हणजे, अध्यात्मिक ज्ञानाची झालर किंवा अध्यात्मिक विचारांची चुणूक. हे समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला , 'शेर' मधील दोन बाबी समजून घेतल्या पाहिजे.त्या म्हणजे, शेर मधील , 'दावा ' आणि 'दलील '. गझलचे एक खास वैशिष्ठ आहे, ते म्हणजे , प्रत्येक शेर मध्ये 'दावा'-'दलील' असते. 'दावा ' म्हणजे प्रस्तुतीकरण. प्रस्तुतीकरण याला ईंग्रजित 'स्टेटमेंट ' असा शब्द असून यालाच 'विधान' किंवा 'दावा पेश करणे' असे म्हणतात , आणि 'दलील' म्हणजे , त्या दाव्याचा खुलासा , ज्याला ईंग्रजित "एक्सप्लेनेशन' असे म्हणता येईल. आपण हिंदी चित्रपटात जेंव्हा कोर्टाचा प्रसंग पहात असतो, तेव्हा जजसाहेब वकिलाला असे म्हणतात की, 'तुम्हारे ईस दावे को पुख्ता बनानेके लिए और ऐसे कोई दो 'दलील' पेश करो. आता आले का लक्षात की, "दलील' म्हणजे , शेरच्या पहिल्या ओळीत केलेल्या दाव्याचा खुलासा.
हा खुलासा , त्या शेर ला असा काही कलाटणी देतो की , रसिकाच्या गणिती बुद्धिमत्तेला एक धक्कातंत्र अनुभवास येते. आता , एक अत्यंत महत्वाचे गझलच्या अंतरंगाचे रहस्य सांगतो , ते असे की , 'दावा' आणि 'दलील' मध्ये , विरोधाभास किंवा चमत्कृती ,प्रभावीपणे निर्माण करण्याचे धक्कातंत्र ज्याला जमले, तो यशस्वी गझलकार होतो , कारण वाचकाला किंवा श्रोत्याला , ते भावते,पटते,त्यातला विचारांचा वेगळेपणा लक्षात येतो , आणि तो ऊसळून दाद देतो.
गझलेच्या शेर मधून, हा दावा आणि दलील जेव्हा अध्यात्मिक ज्ञानाची झालर लाऊन येतात , तेव्हा, गझलेचा हा चौथा घटक 'तसव्वुफ ' , गझलेला अशा एका ऊंचीवर घेऊन जातात की रसिक अगदी हरखुन नतमस्तक होतात.
आता याची काही ऊदाहरणे बशीर बद्र यांच्या गझलांमधिल काही शेर पाहू -
1) उजाले अपनी यादोंके हमारे साथ रहने दो ,
न जाने किस गली मे ज़िन्दगी की शाम हो जाये ।
2) मुझे इश्तिहार-सी लगती है, ये मोहब्बतों की कहाँनिया ,
जो कहा नही वो सुना करो , जो सुना नही वो कहा करो ।
3) दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हो ।
4) मैं तो आँसुओं का सुकूत हूँ लबे शेर मुझको सदा
न दे
न 'कबीर'हूँ, न 'नज़ीर' हूँ , न मैं 'मीर' हूँ , न
'बशीर' हूँ ।
वरील बशीर बद्र यांच्या चार शेर मधून , 'तसव्वुफ' (मारिफत) म्हणजे अध्यात्मिक ज्ञानाची झालर किंवा चुणूक लक्षात आली असेल.
आता, मराठी गझलेत, गझलसम्राट सुरेश भटांनी , केवळ मराठी गझलच नाही, तर एकूण 'गझल' या काव्य प्रकाराला एका मोठ्या ऊंचीवर नेले आहे. या पुर्वी मी त्यांच्या गझलेतील शेर ची अनेक ऊदाहरणे दिलेली आहेत, आता 'तसव्वुफ' ची काही ऊदाहरणे पाहू -
1) संत समजून काल मी गेलो
भेटला शेवटी दलाल मला ।
2) मी कधीचा उभाच फिर्यादी
वाकुल्या दाखवी निकाल मला ।
3) मी असा त्या बासरीचा सूर होतो
जीवनाला मीच नामंजूर होतो.
4) गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.
5) जगाची झोकुनी दु:खे सुखाशी भांडतो आम्ही
स्वत:च्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही
6) आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा ..
माझाच भास माझ्या अंगावरून गेला !
7) आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ?
सारांश असा की, गझलेचा आंतरघटक, तसव्वुफ ( मारिफत ) , गझलेला अध्यात्माच्या पालखीत बसऊन गझल-दिंडी काढण्यासाठी आहे , त्या वारीतून गझलपंढरी गाठण्यासाठी शुभेच्छा.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर ,दि.18-06-2020, औरंगाबाद , मो.9730093331
[21/12/2022, 11:00 pm] +91 94034 31406: भाग क्र. 16
गझलचा पाचवा आंतरघटक
5) नुदरत (नाविन्य)
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर,औरंगाबाद.
गझलेचे एकूण पाच आंतरघटक आहेत.अंदाजे बयाँ , हुस्ने ख़याल ,मौसिकी , तसव्वुफ , आणि शेवटचा पाचवा, 'नुदरत ' म्हणजे 'नाविन्य '.हे गझलचे खास वैशिष्ठ्य आहे . नाविन्य म्हणजे नवेपणा.कवी असे काही तरी शेर मधे मांडतो , की ते वाचकाला / श्रोत्याला , एकदम नवीन कल्पना, नवीन विचार ,नवीन संकल्पना , नवी प्रक्रिया , नवी प्रतीक्रिया , नवा शोध , नवी भूमिका , किंवा नव्याने वेगळा अर्थ जाणवतो.
आता , नाविन्य म्हणजे काय , याचा थोडा खोलात जाऊन विचार करू या . हा 'नवेपणा' काही 'नवा' नसतो. तो कदाचित 'जुना' ही असू शकतो , पण कवी आपल्या प्रतिभाशक्तिने , तो ईतरांपेक्षा अधिक 'प्रभावशाली' पद्धतिने मांडतो , त्यात नवेपणा असतो.हा जो शोध आहे तो असा की, ईनाॅव्हेशन ईज अॅन आयडिया , थाॅट , आॅर प्रोसेस , व्हिच ईज ' परसिव्ह्ड ' अॅज न्यू बाय द ईंडिव्हिज्युअल .' याचा अर्थ असा की, एखादी बाब जेव्हा एखाद्या व्यक्तिला पहिल्यांदा 'जाणवते ' ( टू परसिव्ह मिन्स टू फील) , ते त्या व्यक्ती साठी " नाविन्य " (नुदरत) असते.
आता याचे सोपे ऊदाहरण देतो, म्हणजे ऊलगडा होण्यास मदत होईल.ऊदाहरणार्थ, "र्हदयारोपण " ( हार्ट ट्रान्सप्लांटिंग ) ही संकल्पना , एखाद्या मुंबई सारख्या महानगरात राहणार्या माणसाला ऐकून माहित असू शकते , दुर्गम ग्रामिण भागातल्या माणसाने हे नाव कधीच ऐकलेले नसेल व जेव्हा तो पहिल्यांदा हे नाव ऐकेल , तेव्हा त्याच्यासाठी हे 'नवीन' असेल. संकल्पना एकच , पण एका साठी ती जुनी असेल , तर दुसर्यासाठी ती नवीन असेल. म्हणून 'नाविन्य' (ईनाॅव्हेटिव्हनेस ) ची ही संकल्पना , 'सापेक्ष ' (सबजेक्टिव्ह ) आहे.
म्हणून , गझलच्या 'दावा' (प्रस्तुती) नंतर , शेर ची जी दुसरी ओळ असते , त्या ओळीत , 'खुलासा ' (दलील) अशी काही खुबीने मांडलेली असते , की रसिकाला 'जाणवते ' हे काहीतरी 'वेगळेपण' आहे. हे 'जाणवणे ' (परसेप्शन ) म्हणजे , 'नाविन्य '.
ही ' जाणीव ' (फिलिंग) , भावनांशी (ईमोशन्स) निगडीत (रिलेटेड) असते.'भावना ' (ईमोशन), म्हणजे, एखाद्या व्यक्तीची किंवा कोणत्याही जिवंत घटकाची (आॅर्ग्यानिझम) 'विचलीत ' (डिस्टर्ब्ड स्टेट) स्थिती असते.
आता, या भावनांची काही ऊदाहरणे पाहूया.
आनंद , दु:ख , चीड ,प्रेम, राग , मत्सर , द्वेष ,मोह, मद , लोभ ई. यांचा संबंध, ' गझल लिहिताना गझलकार आपल्या शेर च्या पहिल्या ओळीत 'दावा' (प्रस्तुतीकरण)करतो , तेव्हा वाचक/श्रोत्याच्या मनात 'ऊत्सुकता' किंवा 'ऊत्कंठा ' निर्माण करतो , आणि शेर च्या दुसर्या ओळीत जेव्हा'दलील' (खुलासा) सादर (पेश) करतो, तेव्हा त्याच्या विशिष्ट भावना , प्रतीक्रियेच्याशा स्वरूपात, अशा काही अचानक ऊफाळून येतात की , त्याच्या तोंडून , 'वाहव्वा ' व अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणारी 'दाद ' आपोआप बाहेर पडतेच.कारण त्यातले' नुदरत' (नाविन्य) त्याला खूप भावलेले असते.
सुरेश भटांचे शेर, ऊदाहणा दाखल पाहू.
दावा : ऊत्तरे जेव्हा दिली नाही कुणी
( या ओळी मुळे, मनामध्ये ऊत्सुकता सहजपणे निर्माण होते की, 'मग ऊत्तरे दिली कोणी ? आणि आता हा कवी , प्रश्न विचारणार तरी कोणाला ? आणि मग भट साहेब 'दलील ' (खुलासा) , दुसर्या ओळीत काय पेश करतात ? ते आपण आता आपण पाहुया -)
दलील : प्रश्न प्रेतांना विचारू लागलो ।
(यात 'दलील' (खुलासा) , अनपेक्षित व नाविन्यपुर्ण (नुदरत) असल्यामुळे भावना ऊचंबळून नाही आल्या तर नवलच म्हणावे लागेल.
माझ्या पुढील आॅनलाईन मिटिंग मधे मी प्रत्यक्षात अनेक शेर ,जे सुरेश भट आणि बशीर बद्र यांनी ,'नुदरत' असलेले लिहिले आहेत , त्यांचा रसस्वाद आपल्या समोर प्रत्यक्षात मांडणार आहे. स्थळमर्यादे अभावी, तुर्तास एवढेच.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर , दि.19-06-2020 ,औरंगाबाद , मो. 9730093331
[21/12/2022, 11:48 pm] Renukadas Bharaswadkar: गझल -मागतो
वृत्त-चामर
लगावली- गालगाल,गालगाल,गालगाल,गालगा.
वज़न (मिटर)- 2121,2121,2121,212
यती-8व्या अक्षरानंतर.
अक्षरे- 15
कवाफी- झूल,फूल,चूल,पूल,हूल,भूल.
रदीफ- रोज मागतो.
झाकण्या उदास रंग, झूल रोज मागतो
वाळले कधीच रोप,फूल रोज मागतो ।
पाहतेस रोज काय, तीच तू तसाच मी
पेटण्या मनात आग, चूल रोज मागतो ।
काळजात खोल जात, वाट का दुभंगली
जोडण्या मनास आज, पूल रोज मागतो ।
भेटली अशी कशास, रोम रोम जागला
टाळण्या तुझाच स्पर्श, हूल रोज मागतो ।
आरशाविना असेच, पाहतो मलाच मी
विसरण्या तुझीच साथ, भूल रोज मागतो ।
रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद,मो.9730093331
[23/12/2022, 7:49 am] Renukadas Bharaswadkar: सांस्कृतिक ,पौराणिक संदर्भ असलेले ,आपल्याला भावलेले ईतरांचे शेर आपण या समुहावर उद् घृत केले तर स्वागतच आहे.काही शेर ऊदाहरणादाखल देत आहे- सुरेश भट -1) स्पंदने ज्ञानेश्वराची, माझिया वक्षात व्हावी, 2) एकनाथाने मलाही, बैसवावे पंगतीला 3) माझिया गीतात वेडे, दु:ख संतांचे भिनावे ; वाळल्या वेलीस माझ्या, अमृताचे फूल यावे, 4) सूर्य केव्हाच अंधारला यार हो ; या, नवा सूर्य आणू चला यार हो। ,5) साय मी खातो मराठीच्या दुधाची ; मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला? ,6) आसवांनी मी मला भिजऊ कशाला ; एवढेसे दु:ख मी सजऊ कशाला ।
[25/12/2022, 11:17 am] Renukadas Bharaswadkar: आवाहन - ज्यांनी कोणी अद्याप या आठवड्यात आनंदकंद,कालगंगा आणि चामर यावृत्तात, एक मतला एक शेर अद्याप ग्रुपवर पोस्ट केला नाही, अशा सदस्यांनी प्रयत्न करून ग्रुप वर टाकावा ही विनंती. चुका झाल्यास, सुधारणा करण्याची, ही आपणास दिलेली एक संधी आहे आहे, असे समजून या संधी चे सोने करावे.ही कार्यशाळा गझल शिकण्यासाठीच आहे. आज मी ग्रुप वर वयक्तिक लक्ष देणारआहे.तेव्हा, लिहिते व्हा. प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर.
[25/12/2022, 2:12 pm] Renukadas Bharaswadkar: वृत्त -आनंदकंद
लगावली- गागाल , गालगागा ; गागाल , गालगागा
मिटर- 221 , 2122 ; 221, 2122
अक्षरे- 14
यती-7व्या अक्षरा नंतर
शब्द काफिया -स्थीर अक्षर 'र'
कवाफी- आभार , उपकार , दिलदार
अलामत - आ('भा', 'का' , 'दा')
रदीफ- 'मानले मी '
गझलकार- सुरेश भट
मेल्यावरी जगाचे आभार मानले मी
जाऊ दिले मला हे उपकार मानले मी ।
आयुष्य संपताना इतकीच खंत होती
काही भिकारड्यांना दिलदार मानले मी ।
[25/12/2022, 8:17 pm] Gautam Suryawanshi Gazal: [01/12, 08:00] सौ. किरण महादेव चौधरी: आज आपण बघणार आहोत
मात्रा वृत्ताबद्दल
यालाच जाती सुद्धा म्हणतात
एखाद्या अक्षराचा उच्चार
करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्याला मात्रा असे म्हणतात
[ तत्पूर्वी काही व्याकरणातील सज्ञा बघू
अक्षरे ही दोन प्रकारची असतात ऱ्हस्व अक्षरे दीर्घ अक्षरे
यांनाच पद्य भाषेत लघु गुरू असे म्हणतात
अक्षर स्वर लघु - अ इ उ ऋ
दिर्घ- आ ई ऊ ए ऐ ओ औ
स्वरयुक्त अक्षरे- लघु क कि कु कृ
दीर्घ- का की कू के कौ को
यासारखी
संकेत खूण- लघु -U (अर्धचंद्र)
गुरू - ( आडवी रेषा)
मात्रा संकेत लघु करिता 1 मात्रा
दीर्घ / गुरू करिता 2 मात्रा
जसे किरण
कि- क+ इ र्हस्व = लघु
र ऱ् + अ र्हस्व = लघु
ण ण् + अ र्हस्व लघु
हेच कारण असल्यास
का क् +आ दीर्घ गुरू
लघु मध्ये अ इ उ स्वर लागलेली अक्षरे असतील
स्वरादी ही संकल्पना सामान्य भाषेत असली तरी ती बारकाईने वा उच्चार दृष्टीने जोडाक्षरे आहेत
अर्धचंद्र लघु , आडवी रेषा दीर्घ
ही लघु गुरू ची संकेत खूण आहे
मोजत असतांना ती या संकेत खुणेने मोजतात
जसे
परमानंद
UU--U
मात्रा
परमानंद
1 1 2 2 1
वृं दा
- -
2 2 = 4
आता
2 2
आराम
- - u
2 2 1
काजळ
- u u
2 1 1
कविता
U u -
1 1 2
स्वागत
- u u
2 1 1
दाता
- -
2 2
गंगाराम
- - - u
2 2 2 1
भाविक
- u u
2 1 1
अनुराधा
U u - -
1 1 2 2
[25/12, 20:03] +91 98902 58977: नाही सर .ती मोडतोड नाही ते बरोबर आहे .
[25/12/2022, 8:23 pm] Renukadas Bharaswadkar: रदीफ हा एक किंवा अधीक 'शब्दांचा' असतो.शब्दातील शेवटच्या अक्षराचा नसतो. स्वतंत्र एकच अक्षराराचा रदीफ असू शकतो, जसे 'मी', 'का?','तू' ईत्यादी.आला, झाला ई. बाबत चुकिचेच आहे, असे नाही. त्या बाबत पुढे शिकवणार आहे. सध्या, सगळ्यांबरोबर राहावे.म्हणजे, ईतरांना संभ्रम होणार नाही. तेव्हा पूर्ण एक शब्द जसाच्या तसा, रदीफ म्हणून कायम ठेवावा, ही विनंती.
[25/12/2022, 8:32 pm] Renukadas Bharaswadkar: या टिपण्या वयक्तिक नसून, या निमित्ताने, सर्वांनी योग्य तो बोध घ्यावा,हा ऊद्देश आहे.सर्वांनी अशा सर्व टिपण्यांची नोंद घेऊन त्या नुसार ऊत्साहाने एक मतला एक शेर चे लिखाण करावे. विशेष म्हणजे, आज रवीवार तसेच ख्रिसमस ची सुट्टी असतांनाही ,आपण सर्वांनी गझल लिखाणाप्रती जी निष्ठा दाखवलीत ,हे पाहून मी कमिटेड कलाकारांच्या समुहात आहे याचा मला खूप आनंद झाला. किप ईट अप।
[25/12/2022, 11:26 pm] Renukadas Bharaswadkar: 2 1 2 2 , 2 1 2 2 , 2 1 2 2 , 2 1 2. फ़ाइलातुन,फ़ाइलातुन,फ़ाइलातुन,फ़ाइलुन।
बहरे रमल मुसम्मन महज़ूफ़।।
ग़ज़ल:---
जब भरोसे का सफ़र में सिलसिला हो जाएगा।
राह में चलते सभी का फ़ायदा हो जाएगा।।
संग को तब तक सभी कहते रहेंगे संग ही।
जब इबादत उसकी होगी देवता हो जाएगा।।
हाज़िरी रब की अदालत में ही लगने की है देर।
झूठ सच का तब यक़ीनन फ़ैसला हो जाएगा।।
नींव समझोते की जब भी दरमियां पड़ जाएगी।
हल तभी दोनों का ही हर मस'अला हो जाएगा।।
हर किसी की सोच जब भी एक सी हो जाएगी।
एक से तब इक मिलेगा क़ाफ़िला हो जाएगा।।
देखते ही मैल दिल की साफ़ ख़ुद हो जाएगी।
हर कोई इक दूजे का जब आइना हो जाएगा।।
हर अँधेरा टिक नहीं पाएगा इनके सामने।
चाँद भी जब साथ "अंजुम"के खड़ा हो जाएगा।।
............................................................
मेरे क़लम से प्यासा अंजुम
............................................................(हे कालगंगा वृत्त आहे.)
[26/12/2022, 11:50 am] Renukadas Bharaswadkar: असे काहीच बंधन नाही.तिन्ही वृत्तात , स्वर किंवा शब्द काफिया , घेता येतील.मात्र, स्वर काफिया घेतला तर संपुर्ण गझलेत स्वर काफियाच असावा आणि त्या ऊलट ,जर शब्द काफिया घेतलात, तर संपुर्ण गझलेत शब्द काफियाच घ्यावा. म्हणजे काय, तर एका गझलेत सरमिसळ करू नये, असा संकेत आहे. रे.भ.भारस्वाडकर
[26/12/2022, 12:09 pm] Renukadas Bharaswadkar: "कळले मनातल्याशी वादे हजार झाले
खोटी शपथ कुणाशी खोटे करार झाले
ते बालपण निरागस जर सोबतीस नाही
आत्म्यास बोललो मी मोठे विकार झाले
आभाळ आठवांचे येता कधी नभाशी
भटके चुकार पक्षी कोठे पसार झाले?
गावास आज येते स्मरणी जुनाटलेपण
का मोडलेत घरटे? सारे मिनार झाले
नव्हतेच गुंतने मज प्रेमात सारिके पण
एका तुझ्या तिरावर मन हे तयार झाले
बघताच लाजली ती परडीतली कळी अन
त्या पांगल्या नभावर डोळे चुकार झाले
केलेत प्रयास मी पण जमलेच ना मला ते
जगता मला न आले सारे प्रकार झाले
मी गुंतलो तळाशी होतो कधी नदीच्या
जीवन पुन्हा तिरावर येण्यात पार झाले
सांगेन भेटली जर रुणझुण तिच्या मनाची
दोघांत जे निसटले नियती नुसार झाले
भलतीच माणसे ती आली उगा स्मशानी
खोटे मुखात किस्से कोठे स्विकार झाले."
-©®साईनाथ फुसे
[26/12/2022, 12:23 pm] Renukadas Bharaswadkar: भाग-2
1) लगावली म्हणजे काय ?
र्हस्व अक्षरे "लघू"असतात, ज्यांना U या चिन्हाने दर्शवितात.
दीर्घ अक्षरे "गुरू" असतात,ज्यांना — या चिन्हाने दर्शवितात.
आता आपण याचे ऊदाहरण पाहू.
आताच वेदनेला , आले फुलून तारे.
घरट्यात मेनकेला , घाले उठून वारे ।
——U , —U —— , ——U, —U—— .
हे गझलेचे अतिशय लोकप्रिय वृत्त आहे.
आपल्याला "प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाऊ तूज आता मी कोणत्या उपायी" याची चाल माहित आहे,तसेच जुने हिंदी गाणे " ऐ दील मूझे बतादे, मेरा कसूर क्या है ।" याचिही चाल माहित असेल.वृत्त एकच असेल तर ईकडची चाल तिकडे अन् तिकडची ईकडे करून बघा.
आता, आज याच वृत्तात चाल गुणगुणत, गझलचा पहिला शेर, ज्याला"मतला" असे म्हणतात, तो लिहा.
पुढिल शेर मध्ये(शेर म्हणजे गझलेच्या दोन ओळी), पहिल्या ओळित रदीफ काफियाचे बंधन नाही,मात्र वृत्ताचे बंधन आहे.दुसर्या ओळित मात्र रदीफ-काफियाचे बंधन पाळायचे आहे. जसे की,
बोलावयास आता , उरलेच ना कुणीही
दारास बंद केले , आले कुठून सारे ।
एक गोष्ट सांगायची आहे, ती अशी की, एका गुरू(—) अक्षरासाठी, दोन लघू (UU),अक्षरे लिहिली तर, अपवाद म्हणून चालतात.
जसे की, ——U च्या ठिकाणी वरिल ओळित, "उरलेच" (UU—U)असा शब्द आला आहे.
आज या वृत्तात गझलचा कमितकमी मतला(पहिल्या दोन ओळिंचा शेर) लिहून या ग्रुप मधे टाकावा ही विनंती. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पाच शेर लिहावेत.
गझलेतला प्रत्येक शेर हा स्वतंत्र असतो,पण पाच शेर मध्ये एक अंतरिक धागा असतो.
रोज एक शेर लिहा. मी तपासूनदेण्यासाठी ग्रुप वर टाका. लक्षात घ्या, कोणिही perfect नसतो.pratice makes man perfect.
जसे,विहीर खांदताना ,लगेच एक फुटावर पाणी लागत नाही, पण एकदा का ते लागले की मग कधीच आटत नाही.विद्येची देवता सरस्वती माता, आपली काव्य प्रतिभा ऊन्नती कडे नेऊ दे,एक ऊत्तम गझल आपल्या प्रतिभेतून निर्माण होऊ दे, अशीपरमेश्वराकडे प्रार्थना करतो.
प्रा.डाॅ. रे.भ. भारस्वाडकर,औरंगाबाद,मो.9730093331
[26/12/2022, 12:23 pm] Renukadas Bharaswadkar: गझल संबंधी माहिती-(संकलित)-भाग-1 (कंसात दिलेले शब्द मूळ अरबी भाषेतिल आहेत.) 1) गझल शेवट पर्यंत एकाच वृत्तात(बहर) असली पाहिजे. 2) वृत्त (बहर) , यमक (काफिया) , अंत्य यमक (रदीफ) हे गझलेचे तीन प्रमुख घटक आहेत. 3) अंत्य यमक (रदीफ) कायम असते,त्यात बदल होत नाही.यमक (काफिया) चे वजन(Form) कायम असतो, पण तसेच वजन असलेले शब्द बदलतात. 4) यमक जर अनुनासिक असेल तर, गझल मधील सर्व यमके ( काफिये किंवा कवाफी), तशिच असली पाहिजेत. ऊदाहरणार्थ- संसार हे यमक असेल तर, प्रत्येक शेर च्या दुसर्या ओळित, अंगार, गंधार ,शृंगार अशिच अनुनासिक यमके असावी. 5) प्रत्येक गझलेत ,दोन-दोन ओळिंचे, कमित कमी पाच शेर असले पाहिजेत. पाच पेक्षा जास्त शेर असल्यास चालते. 6) गझल मध्ये चुकूनही भरतीचे अनावश्यक शब्द येणे अपेक्षित नाही.
-प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर
[26/12/2022, 12:23 pm] Renukadas Bharaswadkar: भाग-3 काफिया
1) यमक (काफिया) ची निर्दोष निवड करण्यात,हमवजन-हमस्वर प्रासांची निवड करावी. 2)यमक (काफिया) ची निवड करताना अधिक लक्ष "स्वरांच्या समानतेवर " दिले पाहिजे.
जसे, गळाया,जळाया,कळाया,छळाया,वळाया,दळाया,फळाया ,असे हमवजन-हमस्वर प्रास निवडावेत.
जर आपण, मिळाया,जुळाया,झुराया,चोळाया असे प्रयोग करू नयेत, ते चुकिचे ठरेल.
याचप्रमाणे,"कास" या प्रास च्या जोडीला "प्रकाश", "आकाश", "विनाश" असे शब्द प्रास म्हणून निवडता येणार नाही. कारण "कास"मधील 'स" आणि "प्रकाश" मधील 'श', यांच्या ध्वनीत एकरूपता नाही.गझल लिहिताना अशा चुका करू नयेत.
3) गझलचा आणि संगीताचा खुप जवळचा संबंध असल्याने , यमक व अंत्य यमक (काफिया-रदीफ) च्या शब्दांमधे,कठोर शब्दांचा "वापर करू नये. जसे की , ट,ठ,ड,ढ,ण.
4) गझलेतिल शेर म्हणजे, "हेतुपूर्वक लिहिलेली समाप (हमवजन) प्रासयुक्त विचार-वाणी.
"माप" (वजन) म्हणजे लघु-गुरू अक्षरांच्या क्रमाप्रमाणे दोन शब्दातील साम्य.
वजनात बसणार्या सर्व शब्दांना 'हमवजन' असे म्हणतात.
ऊदाहरणार्थ : 'सवारी' या शब्दाचे वजन "लगागा" आहे.या सवारी शब्दाचे हमवजन शब्द नवाबी,रिकामा,तरीही,असाही,करावे,धरावे , हे आहेत.
शेर लिहिण्यासाठीनिवडलेल्या वजनानुसार,शब्दांचे संयोजन केले पाहिजे असा अर्थ "समाप" ( हमवजन) शब्द सूचित करतो.
5) शेवटी, शेरात जे सांगायचे आहे,तो आशय निश्चित पणे,वाचक/श्रोते यांच्या र्हदयाला स्पर्शून गेला पाहिजे. नुस्ता शब्दांचा सांगाडा नसावा.
प्रत्येक "शेर" ला हमखास दाद मिळालिच पाहिजे, ईतके त्या शेर मधे प्रभावी विचार असले पाहिजेत.
संकलक:डाॅ.रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद,मो.9730093331
[26/12/2022, 5:14 pm] Renukadas Bharaswadkar: यमक(काफिया) अत्यंत महत्वाचा.काफिया नसेल तर ती गझल असणारच नाही.तसेच काफियाची 'अलामत' (स्वरचिन्ह), मतल्याच्या ,पहिल्या दोन्हीही ओळीत आणि पुढील प्रत्येक 'शेर'(द्विपदी/चरण) च्या, दुसर्या ओळीत,स्वरचिन्ह जुळलेच पाहिजे.अलामत चुकली की गझल चुकली. रे.भ.
[26/12/2022, 6:50 pm] Renukadas Bharaswadkar: ज्या गझलेत 'रदीफ' (अंत्य यमक) आहे, अशा गझलांना 'मुर्रद्दफ ग़जल' ,व ज्या गझलेत रदीफ नाही, तीला 'गैर मुर्रद्दफ ग़जल' असे म्हणतात. रदीफ असलेल्या व रदीफ नसलेल्या ,दोन्ही गझला तितक्याच महत्वाच्या असतात.सगळ्यात महत्वाची बाब अशी की, रदीफवर गझलचा दर्जा अवलंबून नसतो.तर, काफिया हा गझलेतील सर्वात महत्वाचा भाग आहे. आशा करतो की आपली शंका आता दूर झाली असेल. डाॅ.रे.भ.
[27/12/2022, 12:02 pm] Renukadas Bharaswadkar: आजचा गृहपाठ
आनंदकंद वृत्त
*गागाल गालगागा गागाल गालगागा*
रदिफ- रोज घेती
काफिया- न्हाऊन, माळून, चाळून , जाळून ,गाळून..
स्थिर अक्षर- न
अलामत - ऊ
प्रेमात मायलेकी न्हाऊन रोज घेती
वासल्य अंगभर त्या माळून रोज घेती
विश्वात सर्व लटके प्रेमाशिवाय आहे
नाटक उगाच का ते, लावून रोज घेती
पुष्पा
[27/12/2022, 12:16 pm] Renukadas Bharaswadkar: कोणी तुला पहावे हा दुर्विलास आहे
तो हक्क पारदर्शी केवळ मलाच आहे
सांभाळतेस जेव्हा खट्याळ त्या बटांना
अभ्रात खेळणारा बुजराच चांद आहे
वृत्त.....आनंदकंद
लगावली....गागाल गालगागा गागाल गालगागा
रदीफ.....आहे
स्वरकाफिया....दुर्विलास,मलाच,चांद
अलामत ( काफियाच्या शेवटच्या अक्षराच्या आधीच्या अक्षराचे स्वरचिन्ह-) आ . स्थीर स्वर( स्वर काफियाच्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा "स्वर") - अ
[27/12/2022, 8:30 pm] Renukadas Bharaswadkar: 2122 2122 2122 212
तेरी यादों का कफ़स तो अब सज़ा रखेंगे हम
याद बाक़ी है इसे ही अब छुपा रखेंगे हम
जो किया वादा कभी था है उसी का इंतज़ार
है नहीं मुमकिन ये लेकिन साबक़ा रखेंगे हम
हो नहीं पाया मिलन ये वक़्त है सरताज, पर
खूबसूरत ख़्वाब के गुंचे खिला रखेंगे हम
रेशमी से ख़्वाब जो हमने बुने थे साथ में
टूट जाएँ फिर न, अब हर वास्ता रखेंगे हम
ज़िंदगी की साँझ में गर दफ्अतन मिल जाए तू
इस हसीं सी साँझ का दीपक जला रखेंगे हम
डॉ अलका शर्मा
26/12/2022 (हे कालगंगा वृत्ताचे ऊदाहरण आहे.कसे वाटले,ते वाचून आपल्याला सर्वाधिक कोणता शेर आवडला ते कळवावे.या अशा वाचनातून आपली 'दृष्टी' तयार होऊ शकते, असे वाटते.
[27/12/2022, 9:26 pm] Renukadas Bharaswadkar: भाग-3 काफिया
1) यमक (काफिया) ची निर्दोष निवड करण्यात,हमवजन-हमस्वर प्रासांची निवड करावी. 2)यमक (काफिया) ची निवड करताना अधिक लक्ष "स्वरांच्या समानतेवर " दिले पाहिजे.
जसे, गळाया,जळाया,कळाया,छळाया,वळाया,दळाया,फळाया ,असे हमवजन-हमस्वर प्रास निवडावेत.
जर आपण, मिळाया,जुळाया,झुराया,चोळाया असे प्रयोग करू नयेत, ते चुकिचे ठरेल.
याचप्रमाणे,"कास" या प्रास च्या जोडीला "प्रकाश", "आकाश", "विनाश" असे शब्द प्रास म्हणून निवडता येणार नाही. कारण "कास"मधील 'स" आणि "प्रकाश" मधील 'श', यांच्या ध्वनीत एकरूपता नाही.गझल लिहिताना अशा चुका करू नयेत.
3) गझलचा आणि संगीताचा खुप जवळचा संबंध असल्याने , यमक व अंत्य यमक (काफिया-रदीफ) च्या शब्दांमधे,कठोर शब्दांचा "वापर करू नये. जसे की , ट,ठ,ड,ढ,ण.
4) गझलेतिल शेर म्हणजे, "हेतुपूर्वक लिहिलेली समाप (हमवजन) प्रासयुक्त विचार-वाणी.
"माप" (वजन) म्हणजे लघु-गुरू अक्षरांच्या क्रमाप्रमाणे दोन शब्दातील साम्य.
वजनात बसणार्या सर्व शब्दांना 'हमवजन' असे म्हणतात.
ऊदाहरणार्थ : 'सवारी' या शब्दाचे वजन "लगागा" आहे.या सवारी शब्दाचे हमवजन शब्द नवाबी,रिकामा,तरीही,असाही,करावे,धरावे , हे आहेत.
शेर लिहिण्यासाठीनिवडलेल्या वजनानुसार,शब्दांचे संयोजन केले पाहिजे असा अर्थ "समाप" ( हमवजन) शब्द सूचित करतो.
5) शेवटी, शेरात जे सांगायचे आहे,तो आशय निश्चित पणे,वाचक/श्रोते यांच्या र्हदयाला स्पर्शून गेला पाहिजे. नुस्ता शब्दांचा सांगाडा नसावा.
प्रत्येक "शेर" ला हमखास दाद मिळालिच पाहिजे, ईतके त्या शेर मधे प्रभावी विचार असले पाहिजेत.
संकलक:डाॅ.रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद,मो.9730093331
[28/12/2022, 10:29 am] Renukadas Bharaswadkar: हो.अशा प्रकारच्या गझलेस'मुसलसल ग़जल' असे म्हणतातमुसलसल गझल ही,क्रमबद्ध, एकाच विषयावर किंवा एकाच आशयावर लिहिलेली गझल असते.कोणत्या प्रकारची गझल लिहावी म्हणजे, मुसलसल ग़जल की गैरमुसलसल ग़जल, या बाबत तज्ञांमध्ये मतभिन्रता दिसून येते.मुसलसल ग़जल ही कवितेच्या जवळची असते.म्हणून लिहू नये.या ऊलट गैरमुसलसल ग़जल ही एका शेर चा दुसर्या शेर शी संबंध असतोच असे नाही.प्रत्येक शेर हा स्वतंत्र असतो. ऊर्दू मध्ये गैरमुसलसल ग़जल अधिक प्रमाणात लिहीली जाते. मी सुद्धा गैरमुसलसल ग़जल लिहावी याच मताचा आहे.मुसलसल ग़जल लिहिण्यापेक्षा, वृत्तबद्ध कविताच लिहावी असे माझे मत आहे.परंतू मुसलसल ग़जल ही, शेवटी ग़जलच असते, हे मान्य करावे. प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद,मो.9730093331
[28/12/2022, 1:28 pm] +91 98902 58977: वेगवेगळे विषयावरचे शेर असले की मजा येते .मला गझलेचे रसग्रहण करायला खूप आवडते .आजपर्यंत 25 गजलांचे मी रसग्रहण केले आहे गझल कर्त्याची परवानगी घेऊन. आणि त्यांना पण ते खूप आवडले आहे. ज्या वेळी प्रत्येक शेर वेगळा असतो अशा गजलेचं रस ग्रहण लिहायला खरंच मजा येते
[29/12/2022, 12:22 pm] Renukadas Bharaswadkar: फ़ैसले सब आपके मंज़ूर होते हैं
हम तहे-दिल कुछ मगर मजबूर होते हैं
आजकल दिल से सभी दिल दूर होते हैं
इसलिए मिलकर भी हम रंजूर होते हैं
होश में इज़हार करता ही नहीं कोई
जब भी करते हैं,नशे में चूर होते हैं
प्यार करते हैं मगर सजदा नहीं करते
बेख़ुदी में भी ज़रा मग़रूर होते हैं
ज़ख़्म देते हैं कभी लख़्ते-जिगर भी कुछ
ज़ख़्म ऐसे पल के सब नासूर होते हैं
हर किसी शाइर के शेरों में नहीं ख़ुशबू
मृग सब के सब नहीं कस्तूर होते हैं
जागकर भी जागता है कब कोई यारो
होश में भी सोने को मजबूर होते हैं
ख़ून के आँसू बहाते हैं सभी 'ख़ामोश'
मुफ़्त में शाइर नहीं मशहूर होते हैं
-डॉ भागिया 'ख़ामोश'
बहर: 2122 2122 2122 2
शब्दर्थ
कस्तूर-वह हिरण जिसकी नाभि में कस्तूरी होती है
मृग-हिरण
लख़्ते-जिगर-जिगर के टुकड़े, औलाद
रंजूर-दुखी (वृत्त- राधा अक्षरे,13, लगावली- गालगागा,गालगागा,गालगागा,गा).
[29/12/2022, 1:31 pm] Renukadas Bharaswadkar: गझल चा महत्वाचा आंतरघटक म्हणजे 'मौसिकी' (संगीतमयता,गेयता,सूर,ताल) . ही मौसिकी गझलकाराच्या आतून , ऊस्फर्ततेतुन बाहेर येते, याला कारण, बाहेरून आत आलेला अनुभव असतो.ठाण्याचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डाॅ.आनंद नाडकर्णी यांनी संगीतकार व गायक अजय-अतूल (गोगावले) यांची अतिशय सुंदर मुलाखत घेतली, ती आपल्या गझल लेखनासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मला ती मुलाखत ऐकल्यावर वाटले. रे.भ.भारस्वाडकर
[29/12/2022, 1:35 pm] +91 98902 58977: मी काल कार्यशाळेमध्ये जॉईन झाले. प्रथम वाटलं आपल्याला येते गझल लिहिता ,नको जॉईन व्हायला! पण म्हटलं पाहू यात, आणि जॉईन झाले. आणि मला खूप छान अनुभव आला. अजून अशी प्रत्यक्ष गजल कोणाकडे शिकली नव्हती .असंच सांगोवांगी तांत्रिक पद्धतीने लिहित आलो. पण गजलीयत आणि खयाल अजून कमी पडतात. इथे आल्याने त्याचीही पूर्तता निश्चित होईल अशी खात्री पटली आहे .इतके दिवस एकलव्यासारखे आम्ही फक्त वाचून शिकत होतो पण काल प्रत्यक्ष समोर सरांच्या तोंडून संपूर्ण गझलची लगावली ते गझल सादरीकरण इथपर्यंतचे विषय ऐकले आणि खूप समाधान वाटलं .मला नेमका आजपर्यंत काफिया आणि रदीफ यातला फरक कळत नव्हता ,तोही काल लक्षात आला. भारस्वाडकर सर , खूप खूप धन्यवाद !खूप छान गुरु मिळाले आम्हाला. छानच मार्गदर्शन .आणि किरण चौधरी सर मला जॉईन करून घेतलं म्हणून तुमचे पण खूप खूप धन्यवाद.
[30/12/2022, 6:23 am] Renukadas Bharaswadkar: गझल चे स्वताहाचे खासम खास वैशिष्ट्य म्हणजे, उला मिसरा मध्ये जो 'दावा' (प्रस्तुती) केली जाते, त्या दाव्या बाबतची 'दलील' (खुलासा), हा असा काही अनपेक्षित धक्का देऊन जाणारा असतो की, तो गझलेचा शेर वाचणारा वाचक / गझल ऐकणारा श्रोता, या खुलाशावर ,असा काही टूणकन् उडतो की, त्याच्या तोंडून आपोआप ," आरेच्चा! ' आरे बाप , वाहव्वा!, क्या बात है।, बढिया, माशाल्ला, सुभानल्ला, दिल जीत लिया यार, व्वा काळीज खाऊन टाकलं रे ।," अशा प्रकारची दाद (प्रतिसाद-Response) निघते. ऊदाहरणादाखल खाली काही सुरेश भटांच्या विविध गझलेतील,विविध वृत्तातील, जबरदस्त शेर देत आहे.विनंती की, या शेरांचा, त्यातील दावा-दलील चा आपण सर्वांनी बारकाईने 'अभ्यास' करावा, आणि 'स्रग्विणी' वृत्ता मध्ये आज एक मतला एक शेर असा पोस्ट करावा.
1) विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही ।
2) काय आगित कधी आग जळाली होती
लोक नेतील मला खोल पुरायासाठी।
3) माझे जगावयाचे अप्रूप एवढे की
जमले मला बघाया मुडदेच भोवताली।
4) जात्यात गातगात उडी मीच घेतली.....
आयुष्य सावकाश दळायास लागले ।
5) देवदूता तुझा पगार किती ?
का मला सांग नोकरी नाही ?
6) अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली ?
सुरेश भट.
[30/12/2022, 6:32 am] Renukadas Bharaswadkar: केसांवरी कधी तू... भाळू नकोस माझ्या.
वेणीत मोगर्याला... माळू नकोस माझ्या.
आहे वसंत फुलला... कोकीळ गीत गाते.
गालात आसवांना... जाळू नकोस माझ्या.
मी वेल बहरलेली... गंधाळल्या फुलांची.
भुंग्यास भोवताली... पाळू नकोस माझ्या.
श्रृंगार मांडला मी... नयनात काजळाचा.
निष्पाप पापण्यांशी... खेळू नकोस माझ्या.
मी आरसा बिलोरी... निरखून बघ तुला तू.
देहावरी चरे तू.... पाडू नकोस माझ्या.
वाटा तुझ्या नि माझ्या... आहेत वेगळ्या त्या.
वचनास तू दिलेल्या... टाळू नकोस माझ्या.
गजानन निमकर्डे.
पुणे. २८/१२/२०२२ (चौथ्या शेर मधील 'नज़ाकत' (नाजुकपणा) बघा, डाॅ.बशीर बद्र यांचा असाच शेर आठवतो, तो असा - ' अभी ईस तरफ ना निगाह कर, मै ग़जल की पलके सवाँर दूँ ; मेरा लफ्जो लफ्ज हो आईना , तुझे आईने में उतार दूँ ।' प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर.
[30/12/2022, 12:04 pm] Renukadas Bharaswadkar: ग़ज़ल
बह्र 212 212 212 212
खुद का तन्हाई से वास्ता सोचकर
प्यार हमने किया था बिना सोचकर
मैंने क्या सोचकर तुमको चाहा कभी
तुम हुए क्या बताओ ज़रा सोचकर
एक अरसे से चाहत थी समझो मुझे
आप उसकाए क्यों फासला सोचकर
सारे दुनियां में मतलब ही मतलब दिखा
ए खुदा दिल में उल्फत दी क्या सोचकर
वो मुझे आदमी भी समझ न सके
जिनको पूजा था मैं इक खुदा सोचकर
रात की बात छोड़ो कि दहका है दिन
एक दिलसद को अब बेवफ़ा सोचकर
मेरे चेहरे ने खोया चमक प्यार में
सांस लेता हूं खुद को मरा सोचकर
और फिर से ये उल्फत न चुन ले मुझे
अब सहमता हूं "दीपक" दुआ सोचकर
दीपक झा "रुद्रा"
[30/12/2022, 1:54 pm] Renukadas Bharaswadkar: ग़ज़ल
2122 2122 2122 2
अब क़दम पीछे नहीं हर्गिज़ हटाना है
आज़मा ले ज़ीस्त जितना आज़माना है
उतने दिन के ही सभी मेहमाँ हैं दुनिया में
जितने दिन लिक्खा जहां में आब-ओ-दाना है
हर निराशा को मिटा कर ज़िन्दगी में फिर
इक नया उम्मीद का सूरज उगाना है
चंद लम्हों की ख़ुशी बस मीत है लेकिन
आदमी का दर्द से रिश्ता पुराना है
बढ़ता रहता है कभी जो कम नहीं होता
दिल मेरा दुख-दर्द का ऐसा खजाना है
हीरालाल यादव *हीरा* ( हे ऊदाहरण ,वृत्त-राधा, अक्षरे 13, लगावली-गालगागा,गालगागा,गालगागा, गा) प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर
[31/12/2022, 9:31 am] Renukadas Bharaswadkar: ही मुसलसल गझल आहेबरी आहे. आता, गैरमुसलसल गझल चा फक्त एक मतला एक शेर , ज्यात दावा आणि त्या नंतर येणार्या सानी मिसरा मध्ये नाविन्यअसलेली अनपेक्षित कलाटणी असेल, असे तुम्ही नक्की लिहू शकता हे सिद्ध झालेले आहे.आज दिवसभर प्रयत्न करावा ही विनंती.(ज्यांना गझल जमते आहे त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे. गुडी गुडी लिहिण्यात काही मजा नाही.गझलचा मत्ला आणि शेर कसा वाचकांच्या अंगावर आला पाहिजे, व वाचकाने आनंदाने, 'वाहव्वा' ची आपसूक आरोळी ठोकली पाहिजे.) प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद.
[31/12/2022, 10:12 am] Renukadas Bharaswadkar: आता, या समुहातील गझल शिकणारे सर्वजण,तंत्राच्या बाबतीत चौथी पास झाले आहेत.आता, पोहणे शिकले आहात, तेंव्हा तंत्राचा भोपळा बाजूला ठेऊन ,डोक्यात फक्त, ज्या वृत्तात गझल लिहायची आहे, त्या वृत्ताची लय डोक्यात भिनवा (म्हणजे आपोआप लगावली पाळली जाते) , आणि गझलेचे पाच आंतरघटक (अंदाजे बयाँ,हुस्ने खयाल,मौसिकी,तसव्वुफ(मारिफत) ,आणि नुदरत (माझ्या लेखाचे भाग क्र.10 ते 16 पुन्हा एकदा वाचा.), यावर लक्ष केंद्रित करावे, सामाजिक विषय निवडावा.गैरमुसलसल गझल लिहावी.ऊदाहरणा दाखल एक (वेगळ्या वृत्तातील) खाली गझल पाठवतोय, म्हणजे ,आपल्याला सर्वांना नुदरत शोधण्यास ऊत्साह येईल. प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर.
[31/12/2022, 12:11 pm] Renukadas Bharaswadkar: ग़ज़ल
साथ अपने जहाँ मिल गए।
हाथ उनसे वहाँ मिल गए।
फ़ासलों का पता न चला,
रास्ते कब कहाँ मिल गए।
कट गया मुश्किलों का सफ़र,
लोग सब मेहरबाँ मिल गए।
जो तलाशे वहाँ दूर तक,
वो सभी अब यहाँ मिल गए।
था मिलेंगे किसी दौर में,
वो इसी दरमियाँ मिल गए।
ख़ुश-नसीबी रही वास्ते,
फिर से हमकों जवाँ मिल गए।
साथ रहकर गए जो निकल,
फ़िर वही कारवाँ मिल गए।
हाल ऐसा हमारा रहा,
सख़्त कुछ इम्तिहाँ मिल गए।
नवीन माथुर पंचोली
अमझेरा धार मप्र
9893119724
[01/01, 11:30 am] Renukadas Bharaswadkar: नए साल में
खुद के गुरुर को जलाना, नए साल में
बिछड़ों को गले लगाना, नए साल में
खुद के लिए लड़ना तो मजबूरी है तेरी
मजलूमों को हक दिलाना,नए साल में
सर्दी बहुत है,फुटपाथ पर जी सो रहे
कुछ दान उन्हें कर आना,नए साल में
मुफलिसी में जीना,भला कौन चाहता है
काम आना उनके कर कोई बहाना,नए साल में
चेहरों पर छाई है उदासी,वक्त बेरहम है
हो सके तो सबको हंसाना,नए साल में
गिले शिकवे,अपनों से ही तो होते हैं
इस बार सबको मनाना,नए साल में
छोड़ दिया था कल तूने,वृद्धाश्रम में जिन्हें
बूढ़े मां-बाप को घर वापिस लाना,नए साल में
जीत लिया था तूने,हर मैदान होशियारी से
मगर,एक बार तो खुद को हराना,नए साल में
बहुत कुछ खोया,बहुत पाया इस साल
बीती बातों ना भूल जाना,नए साल में
एक वबा ने सताया है हमें बीते सालों में
सबको बस ढांढस बंधाना,नए साल में
इश्क से गुलजार हो जाती है जिंदगी,यार
एक बार को तो दिल लगाना,नए साल में
डॉ विनोद कुमार शकुचंद्र
[01/01, 9:31 pm] Renukadas Bharaswadkar: है जश्न बाजारवाद का नए साल के लिए
जबरन खुशी मनाओ नए साल के लिए
करो अभिनंदन मलो चन्दन मगर ध्यान रहे
कहीं सर्प न लिपट जाए नए साल के लिए
दशक गुजर रहा यहां अच्छे दिनो के वास्ते
ये खुशी किस उम्मीद में नए साल के लिए
है दिन वही राते वहीं जंगल वहीं पंक्षी वही
पुराने जाल है शिकारी के नए साल के लिए
तर्जे सुखन की न पूछो वो पूस की रात में
बसन्त पे छंद लिख देंगे नए साल के लिए
"सरल"सराब के पीछे जो भागोगे इस कदर
हुजुमें यास बढ़ जाएगी नए साल के लिए
सरल कुमार वर्मा
उन्नाव,यूपी
9695164945
शब्दार्थ;
तर्जे सुखन : काव्य शैली
सराब : मृगतृष्णा
हुजुमें यास : मायूसी की भीड़
[02/01, 5:09 pm] Renukadas Bharaswadkar: गझलेचा चौथा आंतरघटक, 'तसव्वुफ' (मारिफत), म्हणजे अध्यात्मिक ज्ञानाची झालर किंवा चुणूक, या 'दुआ' तून किती तिव्रतेने जाणवते.मी स्वताहा ही दुआ शंभरपेक्षा अधिक वेळा ऐकली आहे. खूप मोठा सामाजिक आशय आणि मानवतेचा विचार, धर्म बंधनाच्या पलिकडे घेऊन जातो. (हेड फोन लाऊन डोळे बंद करून ऐकावी.सर्हदय व्यक्तिचे डोळे पाणवल्या शिवाय रहात नाहीत.) √ प्रा.डाॅ.रे.भ. भारस्वाडकर,औरंगाबाद.
[02/01, 5:28 pm] Renukadas Bharaswadkar: सुनिलजी, माफ करा, पण कवी/कवयत्री यांना 'परकाया प्रवेश' (डाॅ.ईकबाल मिन्ने, यांनी मागच्या बुधवारी ,परकाया प्रवेश ही कलावंताची खासियत असते असे निवेदन केले होते. त्या वेळी मी यावर,(Empathy-ability to take the role of other ,like 'Put your leg ,in to others' shoe) येत्या बुधवारी 04-01-2023 रोजी सविस्तर बोलणार आहे ,असे सांगितले होते.(रेकाॅर्डेड कार्यक्रम आहे तपासून पहावे. त्यात पुढे मी असे म्हणालो की, मी मानसशास्र या विषयातला पिएच. डी. (1980ला बेंगलोर येथून केले.). व्यक्तिमत्व विकास हा विषय मी गेल्या चाळीस वर्षापासून शिकवतोय. तेव्हा, पुढील बुधवार पर्यंत हा विषय थांबवावा ही विनंती.चूकभूल द्यावी-घ्यावी.आपण आपले मत प्रांजळपणे मांडलेत, धन्यवाद. - प्रा.डाॅ.रेणुकादास भ. भारस्वाडकर, औरंगाबाद.
[04/01, 12:23 pm] Renukadas Bharaswadkar: #नमाज़_ए_मोहब्बत
याद करने में तुझको सुकूँ न रहा,
आशिक़ी में मेरी अब जूनूँ न रहा!
आईने की भी अब तो उमर हो चली,
मेरा चेहरा मेरे हू-ब-हू न रहा!
पास जितने थे हम दूर उतने हुए,
तुझमें मैं न रहा मुझमें तू न रहा!
मेरी आँखों से तू इतना ओझल हुआ,
मेरे ख़्वाबों में भी तू रु-ब-रु न रहा!
हम नमाज़-ए-मोहब्बत क्या करते अदा,
जब अज़ानें हुईं तब वुज़ू न रहा!
दिल धड़कता नहीं अब तेरे नाम से,
अब तू ‘अल्फ़ाज़’ की आरज़ू न रहा!
||| अल्फ़ाज़ |||
सुकूँ (Sukūñ) = Peace, शांति
जुनूँ (Junūñ) = Frenzy, Madness, उन्माद
हू-ब-हू (Hū-Ba-Hū) = Exactly, समान
रू-ब-रू (Rū-Ba-Rū) =Face To Face, In The Presence Of, सामने, आमने-सामने
अज़ानें (Azāneñ) = Azaan- Calls To Prayer (Plural)
नमाज़-ए-मोहब्बत (Namāz-E-Mohabbat) = Prayer, Supplication, Invocation Of Love
वुज़ू (Vuzuu) = Ablution, Sacred Ablution Performed Before Muslim Prayer, And Which Consists In Washing, First The Hands, Then The Mouth Inside, Then Throwing Water On The Forehead, Washing The Whole Face, The Arms, And Lastly The Feet)
[04/01, 2:09 pm] Renukadas Bharaswadkar: एक विनंती. आज रात्री 8-45 ला, गुगल मीट वर सर्वांनी मोठ्या प्रमाणावर जाॅईन व्हावे. आज, शेर कसा लिहावा याचा महत्वाचा अभ्यास करणार आहोत. आता पर्यंत, मत्ला कसा लिहावा हे आपण पाहिले , ज्या मध्ये गझल ची ज़मीन पक्की केली. ज़मीन म्हणजे गझल चा 'ढाँचा' . गझल ची ज़मीन काय आहे हे त्या गझल च्या मत्ल्यावरून निश्चित होते. यात , गझल ची 'बहर' (वृत्त/छंद) ,काफिया, काफियाची अलामत ,आणि रदीफ. आपण 'गैरमुसलसल' गझल चा पुरस्कार करत आहोत. यात प्रत्येक 'शेर' स्वतंत्र असतो.शिवाय एका शेर चा दुसर्या शेर शी संबंध असतोच असे नाही. परंतू, एकाच शेर मध्ये, ज्या दोन ओळी असतात , त्या मध्ये 'राबता' (सहसंबंध/ मेल-मिलाप/लगाव/ उर्दू मध्ये 'रेख्ता'(Rekhta)/ The Quint ईत्यादि), या बाबत आज, महत्वाचे सांगणार आहे. तेंव्हा, आज खूप महत्वाच्या मिटिंग साठी ऊत्साहाने सहभागी व्हा.(या नंतर फक्त दोनच व्याख्याने ऊरली आहेत.). प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर,औरंगाबाद.
[04/01, 3:54 pm] शिक्षणयात्राShikshanyatra: *स्रग्विणी*
कोवळी वेल मी हात लावू नको
सांजवेळी सख्या गीत गाऊ नको
जाहल्या ज्या चुका बोलता बोलता
झाकण्या हुंदके ओठ चावू नको
[04/01, 11:17 pm] Dr Shashikant Gangawane Gazal: *पारिजात* शब्द एखाद्या शेराच्या शेवटी येत असेल तरच, लघु अक्षराचे गुरू होते. हाच शब्द शेराच्या मध्ये येत असेल तर, उच्चारानुसार ते लघुच राहते.
[04/01, 11:30 pm] Dr Shashikant Gangawane Gazal: सरांनी सांगितल्या प्रमाणे, *(मराठी गझलेत)* शेरच्या शेवटच्या येणार्या *कोणत्याही शब्दाच्या शेवटी* लघु अक्षर आले, तर ते गुरु मानावे असा नियमच आहे.