*आनंदकंद*
गागाल गाल गागा गागाल गाल गागा
*झाले तुझे नि माझे आकाश वेगळाले*
*नाते विरून पिकल्या पानांसवे गळाले*
नाही कशात उरली आशा उगी मनाची
रानात पाय आपसुक भट्टीकडे वळाले
आगीत तेल ज्यांनी ओतून घात केला
सांगायचे कुणाला आतून ते जळाले
वाटा विरून गेल्या स्वप्ने कशास पाहू
दारे कुणी मिटवली आता मला कळाले
साऱ्याच वाघळांच्या पोटात भूक होती
ते झाड उंबराचे उशिरा जरी फळाले
होतेच जायचे तर का खेळ मांडलासी?
गुन्हा तुझाच नव्हता आता मला कळाले
____चाँद परछाई
No comments:
Post a Comment