Thursday, 31 July 2025
सुगंध मराठीचा
. *सुगंध मराठीचा*
मराठी भाषेचा सुगंध आगळा
तिच्या संस्कृतीचा खूप मोठा ठेवा।
शब्दाशब्दांतून वाहे गोड सार
ज्ञानविज्ञानाचा सर्वांसाठी मेवा।।
रोज तुकयाची ओवी येते ओठी
ज्ञानेशाचा मनी वसे हरिपाठ।
शब्दांनी स्पर्शतो जनाईचा भाव
सदा सर्वकाळ दाखविते वाट।।
आईच्या तोंडची तीच असे बोली
बालपणीच्या आठवणींची खाण।
शिवबांची तलवार धार मऱ्हाटीची
किती किती गावे मराठीचे गान।।
शब्द तिचे जणू मोतीयांची माळ
मराठी मातीची सृजनशीलता।
एकांकिका, कथा, कविता, नाटक
गद्य पद्यांमध्ये असे प्रगल्भता।।
माय मराठी गे तुझा अभिमान,
तूच स्वत्व माझे आणि आत्मभान।
सांभाळीन तुला जपून उराशी
वाढवीन तेज करुनी सन्मान।।
*चंद्रकांत निकाडे*
पोहाळे, पन्हाळा, कोल्हापूर
9922314564
Monday, 28 July 2025
FMGE (MCA Exam) म्हणजे काय?
Tuesday, 15 July 2025
शब्दसाधना
व्हाटसप विद्यापीठातील आजचे शब्द
देवून× *देऊन*
फुल× *फूल, अनेकवचन फुले*
चालल× *चालेल/चालेल*
१५ जुलै २०२५× *१५ जुलै, २०२५*
आशिर्वाद× *आशीर्वाद*
जेंव्हा... तेंव्हा× *जेव्हा... तेव्हा*
पाऊसात× *पावसात*
सुरु× *सुरू*
दुर्मिळ× *दुर्मीळ*
स्विकारली× *स्वीकारली*