Friday, 11 August 2023

नाट्यछटा


*एकाच सादरकर्त्याने अवतीभोवती एक किंवा अनेक व्यक्ती/पात्रे आहेत असे भासवून त्यांच्याशी कल्पिलेल्या एखाद्या विषयावर एकट्यानेच मार्मिकपणे/मिश्कीलपणे केलेला/साधलेला साभिनय वाद/संवाद/सुसंवाद असणारा गद्य लघु वाड़्मय प्रकार म्हणजे नाट्यछटा होय.*

..                              चंद्रकांत निकाडे


Thursday, 3 August 2023

ना.धा.महानोर श्रद्धांजली


.      *बाप गेला*

गेले टिप्पूर चांदणे
सुनासुनासा शिवार
बाभळीच्या काट्यांनाही
आली अश्रूंची किनार

शेत-शिवाराचा बाप
गेला झाला मुका मका
एकमेकांस बघती
धान ज्वारी  टकामका

अशा तेजाची आरती
ढग वारा थेंब गाती
मूक सारा आसमंत
मूक झाली नातीगोती

         *© रमेश*