Wednesday, 9 November 2022

मराठी अंक व संख्या अक्षरी लेखन

०,१,२,३,४,५,६,७,८,९
==============
एक.
दोन
तीन
चार
पाच
सहा
सात
आठ.
नऊ.
दहा.
अकरा. 
बारा. 
तेरा. 
चौदा. 
पंधरा. 
सोळा.
सतरा. 
अठरा. 
एकोणीस. 
वीस. 
एकवीस. 
बावीस. 
तेवीस. 
चोवीस. 
पंचवीस. 
सव्वीस. 
सत्तावीस.
अठ्ठावीस. 
एकोणतीस. 
तीस. 
एकतीस. 
बत्तीस. 
तेहेतीस. 
चौतीस. 
पस्तीस. 
छत्तीस.
सदतीस. 
अडतीस. 
एकोणचाळीस.
चाळीस. 
एकेचाळीस
बेचाळीस
त्रेचाळीस
चव्वेचाळीस
पंचेचाळीस
शेहेचाळीस
सत्तेचाळीस 
अठ्ठेचाळीस
एकोणपन्नास. 
पन्नास 
एकावन्न
बावन
त्रेपन
चौपन
पंचावन्न
छप्पन्न
सत्तावन्न.
अठ्ठावन्न
एकोणसाठ
साठ
एकसष्ट
बासष्ट
त्रेसष्ट
चौसष्ट
पासष्ट.
सहासष्ट
सदुसष्ट
अडुसष्ट
एकोणसत्तर
सत्तर...
एकाहत्तर 
बाहत्तर
त्र्याहत्तर
चौऱ्याहत्तर
पंचाहत्तर
शाहत्तर
सत्याहत्तर
अठ्ठ्याहत्तर
एकोणऐंशी
ऐंशी.
एक्याऐंशी
ब्याऐंशी
त्र्याऐंशी
चौऱ्याऐंशी
पंचाऐंशी
शहाऐंशी
सत्त्याऐंशी
अठ्ठयाऐंशी
एकोणनव्वद
नव्वद
एक्याण्णव
ब्याण्णव
त्र्याण्णव
चौऱ्याण्णव
पंचाण्णव
शहाण्णव
सत्त्याण्णव
अठ्ठ्याण्णव. 
नव्याण्णव
शंभर
दोनशे
तीनशे
चारशे
पाचशे
सहाशे
सातशे
आठशे
नऊशे
१,०००=हजार (सहस्र)
१०,०००=दहा हजार (दशसहस्र)
१,००,०००=लाख (लक्ष)
१०,००,०००=दहा लाख (दशलक्ष)
१,००,००,०००=कोटी
१०,००,००,०००=दहा कोटी (दशकोटी)
याप्रमाणे एकावर
नऊ शून्य = अब्ज
दहा शून्य = खर्व
अकरा शून्य =निखर्व
बारा शून्य = महापद्म
तेरा शून्य = शंकू
चौदा शून्य = जलधी
पंधरा शून्य = अन्त्य
सोळा शून्य = मध्य
सतरा शून्य = परार्ध

Sunday, 6 November 2022

एकत्र कुटुंब पद्धतीवर भाषण मंगळवार दि 27.09.22 कणेरीवाडी ता. करवीर :::

गुरुर ब्रम्हा, गुरु विषणु, गुरुदेवओ नमस्कारह, गुरु सखच्यात परब्रम्ह, तसमय श्री गरुये नमः!!

अज्ञान तिमीराध्याय ज्ञानी जन सलाकाय!
चकसू उनमिलते ऐनम तसमय श्री गुरुवेय नमः!!

वक्रतुंड महाकाय सर्वकोठी सम्पर्भा! निर्विघ्नम करुमे देवाम सर्व कार्येसू सर्वदा!! 

पद्धमासन स्तिथ देवी परब्रम्ह स्वरूपीनी!
पढम हस्ते जगात पूजते महालक्ष्मी नमस्तुते!!

वासुदेव सुतम देवाम कंस चानूर मर्दानम देवकी नंदन कृष्णाम वंदे जगद्गुरू!!!

आकाशम पतीतम तोयम यथा गचंती सागरा!!
सर्वदेवो नमस्कारहा केशवम गचंती!!

ॐ नमो भागवते वासुदेवाय!!

ॐ भूर भु्वस्व:तत्सतूर वरेनम!
भरगो दिवस्य धिमाही धियो योना प्रचोदयात!

सर्वेपी सुखीना संतु!सर्वे संतु निरामय सर्वेपी भद्रानी पसंच्याती माँ खालेस्तु दुःख भार्गव!!

हॆ ईश्वरा सर्वांना, चांगली बुद्धी दे आरोग्य दे!
 सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव!
 सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर!
 आणि तुझे हॆ गोड नाम आकांड मुखात राहू दे!!
      
           !! ज्ञानेश्वर माउलीचे पसायदान !!
            
आता विश्वात्मके देवे! येणे वाग्यज्ञ् तोषवे!
तोषओनि मज द्यावे ! पसायदान हे!!

जे खळाची व्यंकटी सांडो! तया सत्कार्मी रती वाढो!
भूतां परस्परे पडो ! मैत्र जीवाचे!!

दुरिताचे तिमिर जावो! विस्व सवधर्म सूर्य पाहो!
जो जे वांचिल ते तो लाहो ! प्राणी जात!!

वर्षत सकाळ मंडळी ! ईश्वर निष्टांची ची मंदीयाळी!
आवरत भूमंडळी ! भेटतू भूतां!!

चला कल्पतरूचे आरव ! चेतना चिंतामणीचे गाव!
बोलते जे अर्णव ! पियुषाचे!!

चंद्रमा जे आलानछन ! मार्तंड जे ताप हीन!
ते सर्वही सदा सज्जन! सोयरे होतु !!

किंबहुना सर्व सुखी !पूर्ण होऊन तिही लोंकी!
भाजीजो आदि पुरुखी ! अखंडित!!

आणि ग्रंथातोप जीविये! विशेष लोको इये!
दृष्ट दृष्ट विजये! होवावे जी!!

येथ म्हणे विश्व्हेस्वराओ! हा होईल दान पासवो!!
येने बरे ज्ञानदेवो ! सुखीया झाला!!

सजन्हो आज आपण दसऱ्याच्याधार्मिक पवित्र नवरात्री वातीच्या कालावधीत     महालक्ष्मी दक्षिण काशी कोल्हापूर , सिद्धगिरी मठ कणेरी , श्री कृष्णच्या बाळलीला आपल्या माता पित्या साठी केल्या अशा गोकुळ शिरगांव(याचा उल्लेख करवीर महात्म्य 43वा आद्यय मध्ये आहे )व कणेरीवाडी  परिसरात एकत्र आलो आहोत.

असे म्हणतात आपले कुटूंब घरातील वातावरण आपण रहात असलेला परिसर तेथील माणसे निसर्गा हवा पाणी व कालखंडाचा आपल्या जडणं घडनिवर परिणाम होत असतो. संस्कृती तसेच जीवन पद्धती घडवत असते.

आपल्या बरोबरच, आयोजकाचे प्रथम मी या स्तुत्य नवी पिढीला घडवीणाऱ्या कार्यक्रमचे आयोजन केले बद्धल आभार मानतो, आपण समाजाचे देणे लागतो म्हणून सुसंस्कृत नव निर्मित समाज निर्माण व्हावा म्हणून एकत्र कुटुंब पद्धती वर भाष्यकरण्यास मला सांगितले आहे.

मी वसंत रामचंद्र सुतार कणेरी येथील गोपाळ बळवंत सुतार याच्या एकत्र सुस्कृत कुटूंबात तील 1956 चा जन्म बालपण एकत्र कुटुंबपद्धतीच्या वातावरणत सुसोभीत झाले. (आजी म्हातारी आई, आजोबा अप्पा, आई वडील, पाच चुलते व चुलती आठ भाऊ सात बहिणी )बालपणात झालेले संस्कार  जीवनभर सोबत रहातात उदाहरणार्थ पोहणे, सायकल चालवीने, पाढे पाठांतर होणे  बे एके बे इ इ.

एकत्र कुटूंबातील बालपण गेल्या मुळे मला याविषयवर बोलता येईल.

कारण तेव्हा अप्रूक होत कुतूहल होत अप्रूक असेल तरच स्मुर्तीपाटल्यावर स्पुर्ती उमटतात. आत्मिक आनंद नाही. त्यामुळे आज आपण आपले बालपण कशात बघणार.

 आता सर्व काही मागता क्षणी पालक देतात मुलांनाही मिळते त्यामुळे अप्रूप नाही कुतूहल नाही.  त्यामुळे आपण पहातो कपडे, खेळणी,चपलाचे अनेक जोड याबद्दल अप्रूप नाही , पण बाहेर निघताना सर्व अस्वछ.  आळसीपणामुळे, वेळेची कदर  नाही, जागेवर ठेवण्याची व घेण्याची सवय नाही, सहनशीलता तर नाहीच नाही. सतत चिडचिड वैताग चेहरा सदैव त्रासलेला दुसऱयांना निरुस्ताही करणारा आपल्या बरोबर वातावरण दुषीत करण्याची संधी उपलब्ध. कमतरता माणसाला कार्यरत करते तर समृद्धी माणसाला आळशी बनविते

आपल्या जीवन दात्या कडून संस्कारातून व वर्तणुकीतून नकळत जीवन जगण्याची कला शिकवली जाते.

 टीव्ही मोबाईल तेच काम करतात व पिढी ह्हटी, निसक्रिय, आळसी, स्वयंम केंद्रित, मनाप्रमाणे वागणारी, सदाचार नसलेली असंस्कृत, निसक्रिय, चिडचिडी बनत चालली आहे.

माझे शिक्षण MA, DBM, DCM मी एक शासकीय कर्मचारी, उधोजक, लेखक.
 
       आजपर्यंतचा माझा प्रवास हा खचखळग्याचा वळणाचा अनेक अडथळ्याचा व वेदनाचा वैशाख्य वनव्याचा जख्माचा वेदनाचा त्यावर मात करीत जीवत बहार आणली. नशिबालाच कळले नाही, जाणूनबुजून पालती केलेली घागर कधी सुलटी झाली ते.माझे वसंत बहार आत्मचरित्र जरूर वाचा जीवन बदलेल.
  
       मी जे काही उधोग विस्व निर्माण करून स्वतः बरोबच अनेकांना स्थिरता देऊ शकलो,उधोग क्षेत्रात अनेक उचॅक करून गोकुळ शिरगांव कागल midc तसेच मुबंई गोवा येथे स्व मालकीच्या जागेत शाखा कार्यालय चालऊ शकलो, अनेकांना रोजगार देऊ केले.
       
       अनेकांना मदत केली , स्वतः बरोबरच कुटूंबातील सर्वांना उच्च शिक्षण देऊ घेऊ शकलो. नातेवाईकांनाही स्थिरता देऊ शकलो.
       
       आपण समाजाचे देणे लागतो म्हणून कर्मभूमीत शिक्षण संस्था/ पतसंथा उभारणीत योगदान दिले. शिक्षण संस्था सचिव म्हणून 20 वर्षे काम केले व नंतर मुक्त झालो.
      
बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले!देव तेथेची जाणावा!! 

        दुनिया पाहिली, भारत देशा बरोबरच सिगापूर, मालेशीया, थायलंड,इडोनेसीया, दुबई, SHRILANKA चीन, यूरोप मधील जर्मनी, स्वीझारलंड,ऑस्ट्रीया इत्यादी परदेशी प्रवास केला संपत्नीक.
        
        जीवन कालावधीत तारुण्यात जाणते अजाणते काही कारणास्तव चुकीचा मार्ग धरला तर तो तात्पुरता असतो. नियती सरळ माणसाला सरळ रस्त्यावर आणते व सरळ करते. माझ्या अपघाताने मला आपली जात कुळी व आपण केलेल्या चुका समजल्या. मी बदललो.
        
         माझ्या कर्बगारीचे स्रेय मी माझेवर झालेल्या बालपणतील संस्कारास देईन मग ते संस्कार असतील, सकाळी लवकर उठणे, लवकर झोपणे.  वडील धाऱ्याचे ऐकणे, त्यांना नमस्कार करणे, पायावर माथा ठेवणे, त्याचे कडून भरभरून आशीर्वाद घेणे व कामाला लागणे. 

         सकाळी लवकर उठे लवकर निजे त्याला आरोग्य धनसंपदा  लाभे, कष्टाचे फळ, उद्याचे काम आज कार, आजचे आता.  
 
       मी त्या काळी एकत्र कुटुंबातील केलेले कष्ट, कामाला, गरिबीला लाजायचे नाही किंवा मी केलेल्या सुतार कामामुळे गुण्या समजतो. गुण्यात काटकोनात वा ऑगल किंवा वळब्यात सरळ असलेली इमारत कोसळत नाही.
       
        तसेच लूज फिटींग किंवा लूज कनेक्सन मुळेच मशीन किंवा कोणत्याही उपकारणात बिघाड होतो यांचे ज्ञान मला मिळाले.

         शिक्षणाचे महत्व व " वाचलं तर वाचलं " समजले व पुढे मी लेखक होऊ शकलो  61 व्या वयात अपघाता मुळे सक्तीच्या बिचान्यावर असले मुळे संधी मिळाली मी त्याचे सोने केले व मी लेखक घडलो.
         
         माझे " वसंत बहार" आत्मचरित्र जे मराठी,हिंदी इंग्रजी मध्ये दुसरी आवृत्ती करावी लागली व अनेक नवीन उधोजकांना मार्गदर्शक ठरले स्वप्ने फक्त पहायची नसतात ती साध्य होईपर्यंत कार्यरत व्हावे लागते हें ज्ञात झाले.
         
         दुसरे पुस्तक "प्रेम मुंबपुरीतले " हॆ वडीलधाऱ्याचे  न ऐकून घेऊन कार्यरत होणे महत्वाचे कसे सांगते हॆ पुस्तकं जुन्या व नव्या पिढीतील संघर्ष रहश्यामय कादंबरी मराठी,हिंदी इंग्रजी मध्ये प्रसिद्ध झाली आहे.

          मित्रहो, आपल्या हाताची पाच बोटे अंगुठा,तरजानी, माद्यमा, अनामिका आणि कणिस्ता किंवा करंगळी एकत्र येतात तेव्हा शक्तीशाली वज्र मूठ बनते. ही मूठ झाकलेली असते तेव्हा यात काय दडले आहे हें माहित नसलेने समाजात दरारा निर्माण होतो.

           एकत्र कुटूंबातील व्यक्ती कडे समाज आदराने पाहतो त्याचा सहसा कोण नाद करीत नाहीत.
           
         आपण आता एकत्र कुटूंबातील मी पहिलेल्याला काही गोष्टीचा उहापोह करू.

घरातील स्त्रियाना पहाटे चुलीवर स्वयंपाक करावा लागे चूल पेटविन्या साठी फुकणी असे. त्यापुर्वी सकाळी लवकर उठून धार काढणे, ताक रविने घुसलने, दळण दळावे लागे माझी आई व काकू जात्यावरच्या ओव्या म्हणत त्यात आमच्या नावाचे कौतुक गात असतात, अशा रम्य वातावरणात मी जागा होत असे. मला प्रभाती कर दर्शनाची सवय होती " करागृहे वस्ती लक्ष्मी, करा मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदा ".

सकाळी लवकर उठणे सूर्य्योदया पूर्वी आपले घराचे आंगण सडा, रांगोळी सह स्वछ ठेवणे येणारा खूष. पाणी आणणे, धुणे धुण्याची गडबड, जनावराची स्वच्छता देखभाल इ, इ आपण करीत असलेले काम 100%  कुचराई नाही. घराच्या हुबरयचे महत्व होते.
आजी कडे अनेक आजारा वर उपाय असायचा.
पुरुष मंडळी शेतात जात किंवा आपल्या कामावर जात
गरजेनुसार आम्हालाही मदत करावी लागे.

ज्या कामाचे वेळी तेच काम तेही वेळेत व टाइम
 म्यानेजजमेंट मद्ये करणे हॆ मला सकाळी स्त्रिया करत असलेल्या नियोजतून समजतं असे त्यांचे लवकर उठणे  आघोळीचे पाणी तापे पर्यंत अनेक कामे करणे अनेकांना जे हवे ते वेळेत देणे, देव पुज्या ई इ  जेवण करणे.

        गाव जगवायला वासुदेवाची स्वारी यायची, वागण्याची रीत भात सांगायची ऐकल जायच.
दान पावलं म्हणायची सुपातून दान देईल तो शिधा घेऊन "पोटपूरता पसा पाहिज़े नको पिकाया पोळी देणारऱ्याचे हाथ हजारो दुबली माझी झोळी" म्हणत पुढे.
 देण्याचा सिद्धांत law of giving व नेहमी समाधानी रहाण्याचा संदेश.
          
       सदैव दुसऱ्याचा विचार करणे फक्त स्वतः साठी जगतात त्याला animal life म्हणतात, ज्यामुळे आपण एकटे नाही यांची जाणीव होत असे.
       
       इतरांना त्रास होणार नाही असे वागणे गरजेचे तसेच स्वतः साठी नाही इतरांसाठी प्रसन्न आनंदी, हसत मुख राहिल्याने इतरांना उत्साह वाढतो ऊर्जा वाढते.
       
       काही व्यक्ती हेतू पुरस्कृतपणे आपणास सदैव दुःखी नाराज ठेवतात ( बऱ्याच लोकांना आपण पहातो, जीवन सुरळीत असते काही प्रॉब्लेम नाही हा त्याचा प्रॉब्लेम असतो इतरांना निरुस्ताही करण्यासाठी त्रास देणे आपला जन्म आहे हक्क आहे व तो आम्ही सोडणार नाही असे त्यांचे मत असते )आपला सहवास इतरांना मार्गदर्शक ठरवा, त्रासदायक होणार नाही यांची दक्षता सदैव मनी असावी.
       
आपली कामे आपण करण्यासाठी समर्थ आहोत याची सदैव जाणीव व कृती असावी. आपण पहातो चागुलपणा सहानुभूतीचा गैरफायदा अनेकजण घेतात व तो आपला जन्मसिद्ध हक्कच समजतात उदाहरणार्थ  आज ही पुरुष मंडळी स्त्रियाच्या कडून सर्च काम करून घेणे पुरुषांर्थ समजतात व स्वतः आळशी बनत चालले आहेत व कार्यछम बनत चालले आहेत दुबळ्या सारखे.

       सायंकाळी देवा समोर दिवा लावला जायचा " दिव्या दिव्या दिपक्कार कानी कुदल मोतिहार "  अंगणात गप्पा रंगायच्या आकाश तरांगनाची व नभाची माहिती मिळायची. घरातील स्त्रिया मुलांना खाऊ देत व म्हणत "चादोचांदोबा भागलास काय लिबोणीच्या झाडमागे लपलास काय लिंबोनीचे झाड करवंदि मामाच्या वाढ्यात येऊन जा तूप रोटी खाऊन जा तुपात पडली माशी चांदोबा गेला उपाशी " 
       
" देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो."

कुटुंबात साधू संतांची पाहुण्याची मोठी वर्दल असे. साधू संत येती घरा! तोच दिवाळी दसरा!! वातावरण निसर्गाचा पंच महाभूतावर पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी वर चर्चा होत असे तसेच अंधश्रद्धा व विज्ञान यावर वादविवाद रंगात असत. गप्पा रंगत आम्ही बचचे कंपनी खूष व ऐकण्यात मग्न होत असू.

         वरिष्ठाचा, गुरुजनाचा मनसन्मान ठेवणे.
 सकाळी व सायंकाळी देवापुढे दिवा, अगरबत्ती लावणे "शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा" किंवा दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडली मोती हार..... "
म्हणून स्वतः ला प्रकामान करणे उपग्रेड करणे एकाग्रता वाढविणे.
 
 पुरुष मंडळी पाणी आणणे, जनावरे देखभाल व शेती बरोबरच सुतार काम करीत आम्हाला ही मदत करावी लागे.
 
 स्त्रीया नऊवारी साडी कासुटा व चोळी डोक्यायावर पदर व कपाळवर कुंकू असे  .. पुरुषांना धोतर शर्ट टोपी पायात रुबाबदार पायताण असे.
 
 आम्हाला शर्ट चड्डी व डोकवर टोपी तर मुलींना परकर झम्पर  दोनच असत.. पायात चपल 11 वी नंतर त्यामुळे  जमिनीशी घट्ट नाते आर्थिंग होत असे.
 
        माझे चुलते सर्व शेती जणांवाराकडून करीत असत शेतीला पाणी मोठेने दिले जाई खूप कष्ट होत पण बैला साठी मोठेवारची गाणी म्हणत सकाळ पासून सायंकाळी पर्यंत काम सर्योदया पासून असता पर्यंत.. कोणतेही आजार नाहीत.नेहमी निसर्गार्च्या सानिद्यात, नौसर्गिक खाध  मुळे आजार कमी  असत. सुरक्षित तेचि जाणीव असे आपण एकटे नाही प्रसंगी आपल्या संपूर्ण कुटूंब पाठीशी आहे यांची जाणीव असलेने तू चल पुढे रे गड्या भीती कश्याची.
        
        वर्षभरात ऋतू चक्रनुसार नुसार येणारे सण व वार साजरे होत असत व त्याचे महत्व समजत असे.
        
        आपला आहार कसा व कोणता असावा आपण जगण्यासाठी खावे खाण्यासाठी जगू नये.
         निसर्गाने ठरवून दिले आहे मांसाहार त्यांनी करावा ज्याचे दात सुळे आहेत, जे जिभेने पाणी पितात ज्याचे मोठे आतडे त्यांच्या उंची इतकेच असते.
        शाकाहार व मांसाहारयाचा संबंध शक्ती वा गतीशी नाही कारण हत्ती व घोडा शाकाहारी प्राणी आहेत.
       
पांगतीला बसून जेवताना वडिलधार्यांच्या धाकात वेळेवर जेवणे ताटात येईल ते आनंदाने मनसोक्त खाणे.   अन्नपूर्णे सदा पूर्णे आन्नदात्या बद्धल असलेची जाणीव. कारण जेवण बनविणाऱ्यांच्या मानसिकतेचा वर्तणुकीचा परिणाम बनलेल्या अन्नावर होत असतो.

"जणीभोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोसे म्हणावे वदानी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे उदर भरणं नव्हे जणींजे यज्ञ कर्म.." किडे मुंगी मांजर याचा वाटा ठेऊन जेवणे इतरांचा विचार करून .

    नियमित वेळेवर वेळेत जेवणामुळे पचन यंत्रणा योग्य कार्य करते.
    
 इतरांचे ऐकून घेण्या मुळे ऐकतो ते आपल्याला माहित नसलेले समजते.  तर आपण बोलतो ते माहित असलेले.

श्रीमत दासबोध मध्ये :-
आता श्रवण केल्याचे फळ!क्रिया पालटे तात्काळ!!ऐकल्या्विन कळले!शिकविल्यवीन शहाणपण आले ऐसे न देखिले न ऐकले!भुमंडळी!!
ऐकणे म्हणजे नुसते ऐकणे नाही तर ते ऐकल्याने मनुष्याच्या अंतर्गत, अमूलग्र बदल होतो सहज गुण जाऊन क्रियेत पालट होतो! याला ऐकणे म्हणतात
पहावे आपणाशी आपण!!
अर्थात ऐकावे जणांचे करावे मनाचे महत्वाचे.

 जया किशोरी म्हणतात, " आपण जे ऐकतो ते आपणास माहित नसलेले ज्ञान माहित होते तर आपण जे बोलतो ते आपणास माहित असलेलच.
 
 आजकाल कोण कोणाचे ऐकत नाही  बाप मुलाचे, मुलगा बापाचे,  विध्यार्थी शिक्षकांचे, पेशन्ट डॉक्टरचे, प्रियकर प्रियसीचे, नोकर मालकाचे व प्रत्येकाचे नुकसान होत आहे.
 
     संवाद सम्पत चालला आहे असुरक्षित समाज अविस्वासाचा बनत आहे. चर्चा संपली तर विचार करण्याची अधिकचे माहित होण्याची प्रक्रिया थांबते पूर्वी अंगणात, चौकात व्हायफळं गप्पा मारल्या जात होत्या. माणसा माणसातलं प्रेम कमी  स्वार्थ वाढत आहे. त्यामुळे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हॆ बंद होत चाले आहे आपल्या कडील संपत्ती  प्रदर्शन करण्याची सवय बनत चालला आहॆ.
     
टीव्ही, मोबाईल मुळे  येणाऱ्याची दखल घेतली जात नाही नाती संपत चालली आहेत. स्वभाव मतलबी व ऐकलंकोंडा बनत आहे. स्मरणशक्ती कमी होत चालली आहे कारण वापर नाही व ज्या गोष्टीचा वापर नाही ती नामशेष होते हॆ शास्त्र सांगते उदा. माणसाची शेपटी गेली कारण वापर नाही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पाढे पाठांतर नको, दिवस, तारीख, वेळ फोन क्रमांक सर्वकाही मोबाईल मग स्मरणशक्तीचे काय होईल? .  सुरवातीलाच मी अनेक प्रार्थना म्हणण्या मागे कारण आहे की लक्ष्यात रहाणे, समरणशक्ती दाखविणे होय.

टीव्ही मुळे नाती सुरक्षित नाहीत बालमनावर चुकीचे संस्कार होत चाललेत करमणूक नव्हे तर निसक्रिय व चिडचिड पणा वाढत आहे.कुटुंब व्यवस्था अडचणीत येत आहे.
बालपणा दिलेल्या सवलती, लाड,  केलेले संस्कार कायमचे रहातात. मोबाईल गेम मुळे मुले सवइच गुलाम बनत असून गुरुफडत चालली आहेत. तर काही प्रणाला मूकत आहेत. मग भोगा परिणाम गेमच्या मागे सवय बनते कधी कधी आयुष्य संपते!!!.

अर्थात पालकच याला जवाबदार आहेत. मुले अनुकरण करतात व त्याना तसे करण्यासाठी शिकविले जाते. 

पूर्वी मोबाईल टीव्ही नव्हता त्यामुळे लक्ष पूर्वक सात्विक पोटात जात होते तूप भात खाताना ना पोटात सुरा खूपस्ता रक्त अथवा टॉयलेट क्लिनिग ची जाहिरात व वेळेत जेवताना पचन यंत्रनेवर योग्य नियंत्रण... नाहीं.
 जेवणाची वेळ ठरलेली नसते. हा आता काय करत आहे  हे पचन यंत्रणेला समजतं नाही..  अपचन करपे ढेकर किंवा दुर्गुणधीयुक्त गॅस बाहेर पडतो  त्याच बरोबर इतर बीपी शुगरचे आजाराला आमंत्रण.दवाखाने, हॉटेल, मेडिकल शॉप, पान शॉप , जोरात.

एकत्र कुटूंबात जवाबदाऱ्या समस्या विभाल्या जातात.
आपले प्रश्न अडचणी सांगायला ऐकणारी माणसे होती 

बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले असे आचरण असावे खरे तेच बोला  खरं बोलले लक्ष्यात ठेवावे लागत नाही

...........

व्यक्तिमत्व विकास साठी गरज आहे:- 

नियमित सकाळी लवकर उठणे, यासाठी लवकर झोपावे लागेल काय होईल टीव्ही, मोबाईल पाहणे बंद होईल.
 काही दिवसातच कळेल किती चागले झाले.

प्राथविधी नंतर 

निसर्गाचा आस्वाद घ्या 

थोडे फिरायला जा 

घाम येईल इतका व्यायाम.
योगा, प्राणायाम. 

आंघोळ

देव पूजा प्रार्थना, माता पिता गुरुजन वरिष्ठ यांना नमस्काराणे दिवसाची सुरवात  well begin is half dan 

मौन पाळा व  परिपूर्ण तेचा अनुभव घ्या.

ॐ कर गुजन करा व सदैव उस्ताही ही आनंदी जीवन जागा.

ठिकाण, वातावरण शुद्ध स्वछ व प्रसन्न  असावे
ॐ कर  करताना ताठ पद्धमासन किंवा सुखान मध्ये ध्यानास्त डोळे अलगद बंद करून बसावे.

एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर.
 असे परत परत तीन वेळा.
 ॐ कर करताना दीर्घ श्वास आत व श्वास सोडत "ओ " म्हणत रहावे पोट आत जाते. हे आपल्या जन्मचे, उत्पतीचे , ब्रम्हाचे स्थान आहे, जाणीव ठेवावी.
 
नंतर दीर्घ श्वास आत व "ऊ" म्हणत रहावे.
छातीत संवेदना जाणवतात. हे  पालन्हार भगवान विष्णु
चे स्थळ आहे जो आपणास आकार देतो घडवितो शृंगारीत करतो. येथेच आपली छाती व आत मध्ये ह्रदय जाणीव ठेवावी.

नंतर दीर्घ श्वास आत व "म" म्हणत रहावे डोक्यात संवेदना जाणवतात हे ठिकाण विनाश भगवान शंकराचे स्थान आहे जाणीव असावी.

ॐ कर गुजनाने आपले संपूर्ण शरीर व परिसराच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा तयार होत असते.
त्यासाठी नियमित ॐ कार गुजन फायधायचे आहे.

ॐ कार गुजनाने आपल्या शरीराभोवती ऑरा तयार होतो तर वातावरणातील सर्व घटक आपल्या कडे आकर्षित होतात.
       
:: थोडे 15 मिनिटांचे ध्यान करा व 6 तासाच्या झोपे इतकी विश्रन्तीचा अनुभव घ्या.::

ध्यान करताना पद्धमासन, अर्धपाधमांसन किंवा सुखासन मध्ये बसा.
पाठीचा कणा ताठ, बाजूचा परिसराचा अंदाज घेत शांत बसावे अलगद डोळे बंद करावेत.
येणारे विचार येऊ देत त्याना थोपवू नका. पण पाठपुरावा नको, पहावे आपणाशी आपण, अहं ब्राम्हस्मिचा अनुभव घ्या एकाग्र होऊन शांत बसा.

लक्षात घ्या 15 मिनिटांचे ध्यान 6 तासा इतक्या झोपची विश्रान्ती व ऊर्जा मिळते रक्त वाहिन्या कार्यरत होतात ब्लॉकजेस निघून जातात रक्त प्रवाह व श्वासोश्वास नैसर्गिक व कार्यक्षम होतो. नाडीचे 72 ठोके नियमित रहातात.
ह्रदयात चेतना निर्माण होते ह्रदय कर्यक्षम बनते.

लक्ष्यात ठेवा आपण सक्षम तर सर्व काही सक्षम.
.......

आपण नेहमी तल्लक व जागृत राहण्यासाठी ज्ञान असावे.

काकात दृष्टी:- कावळ्याची नजर आपली नजर भक्ष शोधक असावी.

बकत ध्यान :- बगळयांचे ध्यान आपले ध्यान आपल्या ध्येयाचा वेध घेणारे असावे.

स्वान निद्रा:- कुत्र्यासारखी जागरूक व पूर्ण झोप असावी.

अल्पोहारी:- जेवण वेळेत व प्रमाणात असावे, आपण जगण्यासाठी खातो काय खाण्यासाठी जगतो,विचार व्हावा.

त्वजन्य नारी :- पर स्त्री माता भगिनी.
....

गुरुजन, माता पिता, वडिलधाऱ्यांच्या समोर नतमस्तक, नम्र व्हावे , त्याचा भरभरून आशीर्वाद घेऊन, विश्वासने कामाला लागल्यास अपयश निराशा नाहीच. अश्यक्य ते श्यक्य होईल ,भिऊ नकोस मी आहे तूझ्या आहे ची जाणीव सदैव असावी.
....

मनाचा अंतरमनाचा ताबा घेऊन विलक्षण शक्ती  जागृत करण्यासाठी :-

         :: सप्ताचक्र शुद्धी क्रिया महत्वाची  ::
 साधना करण्यासाठी पाठीचा कणा ताठ, बाजूचा परिसराचा अंदाज घेत शांत बसावे अलगद डोळे बंद करावेत.      
आणि व आपल्या मनाला सप्तचक्रराची सहल करावी व मनास थोडा वेळ तेथेच रमवावे.

1. मुळाधर चक्र :-आपल्या पाठच्या कण्यावर माकड हाडयाच्या किंवा गुरडवाराच्या ठिकाणी हे चक्र असून याचा आकार गोल रंग लाल हे गणेशाचे स्थान आहे. माणसानी माणसाशी माणसासारखे वागावे याचे ज्ञान होते. कुंडलीनी शक्ती येथेच असते ज्ञानेश्वर माऊलीची कुंडलिनी शक्ती जागृत होती.
2. साधुस्थान चक्र :-
3. माणिपूर चक्र :-
4. अनाहत चक्र :-
5. विशुद्ध चक्र :-
6. आज्ञा चक्र :-
7. शस्त्रदल चक्र :-

क्रियटीव्ह  विझवलायझे, Creative Visvlization 
हवे ते आणि हवे तसेच मिळविण्यासाठी काही
नियम व कायदे आहेत.

1. Law of acceptance स्विकृतीचा सिद्धांत
2. Law of fargate and fargive विसरण्याचा, माफ करण्याचा सिद्धांत
3. Law of gratitude कृतज्ञतेचा सिद्धांत
4. Law of giving देण्याचा सिद्धांत
5. Law of diwalqyiदोन गोष्टी एकमेकांस पूरक असतात हे सत्य आहे.
7. Nothing is permanant everything is changing.कोणतीही गोष्ट कायम नसते बदल हा निसर्गाचा नियम आहे.

19.10.22    वसंत बहार

Friday, 4 November 2022

यथा नोकर... तथा राजा

(ता.क.- अलीकडे लाचलुचपतच्या जाळ्यात सापडलेल्या घटनांशी या कथेचा काहीही संबंध नाही.) 

.                *यथा नोकर तथा राजा*
    आटपाट नगरातील दरबारात एक कवी उभा राहिला. दरबार गच्च भरलेला होता. लोक त्याला ऐकायला उत्सुक होते. स्वतः राजालाही त्याच्या कविता ऐकायच्या होत्या. फार दिवसापासून तो त्याची स्तुती ऐकत होता, म्हणून त्याने या कवीला पाचारण केले होते. 
कवी म्हणाला, "राजन तुम्ही मला काय बक्षीस देणार?"
राजा म्हणाला, "अरे मला कविता आवडली तर सुवर्णकंठा देईन."
कवी म्हणाला, "मला सुवर्ण कंठा नको. मला १५ आणे बक्षीस हवे." 
राजा म्हणाला, "तू म्हणतोस तर ठीक आहे. १५ आणे तर १५ आणे बक्षीस देईन. पण मला कविता आवडली तर! आता तुला  कविता वाचायला हरकत नाही."
 कवीने आपले चोपडी सावरली. घसा खाकरला आणि कविता वाचायला उभा राहिला. 
"जो कोतवाल भ्रष्ट 
त्याचा शिपाई भ्रष्ट 
जो शिपाई भ्रष्ट 
त्याचा कारकून भ्रष्ट 
जो कारकून भ्रष्ट 
त्याचा अधिकारी भ्रष्ट 
जो अधिकारी भ्रष्ट 
त्याचा प्रधानमंत्री भ्रष्ट 
आणि जिथे प्रधानमंत्री भ्रष्ट 
तिथे या सर्व व्यवस्थेवर 
अंकुश ठेवणारे 
सत्ताधारी भ्रष्ट 
हेच अंतिम सत्य."
दरबारात आलेल्या त्या साहित्यिकाने कवितावाचन केले आणि राजा चाट पडला. 
तो म्हटला, "हा प्रत्यक्ष माझ्यावरतीच आरोप आहे. फक्त आरोप करू नकोस सिद्ध करून दाखव."
साहित्यिक म्हणाला, "ठीक आहे. दाखवतो. तुमच्या शिपायाला बोलवा."
राजाने द्वारपालाला सांगून शिपायाला बोलवले. साहित्यिकाने शिपायाला विचारले, "बाबारे, महाराजांनी घातलेला नियम मोडून मी आज सकाळी राजबागेतील एक गुलाबाचे फूल तोडून घेतले तेव्हा तू काय केलेस?"
तो शिपाई म्हणाला, "तुम्ही गुन्हा केला म्हणून मी तुम्हाला दंड केला."
साहित्यिक म्हणाला, "ठीक आहे. माझ्याकडून किती दंड वसूल केला? ते खरे खरे सांगावे."
 सुरुवातीला तो शिपाई कुरकुरत होता, 5पण राजाने दटावल्यानंतर त्याने कबूल केले आणि म्हणाला की, "हे खरे आहे. या माणसाकडून सोळा आणे दंड वसूल केला आहे. परंतु ते सगळे सोळा आणे माझ्याकडे नाहीत. त्यातला फक्त एक आणा माझ्याकडे आहे बाकीचे १५ आणे मी कारकुनाकडे दिले आहेत."
राजा म्हणाला, "ठीक आहे. आता काय करायचे." 
साहित्यिक म्हणाला, "कारकुनाला बोलवा."
त्यानंतर शिपायाने कारकुनाला बोलावून आणले. कारकुनाला राजाने विचारले, "बाबारे, हा साहित्यिक दरबारात येत असताना त्याने राजबागेतील गुलाबाचे फूल तोडले म्हणून त्याला शिपायाने १६ आणे दंड केला आहे आणि तो वसूल करण्यात आला आहे, पण शिपाई म्हणतो त्यातील एकच आणा त्याच्याकडे आहे बाकीचे पैसे कुठे आहेत?"
कारकून म्हणाला, "गोष्ट खरी आहे. १६ आणे वसूल केले असले तरी त्यातला एक आणा शिपायाकडे आहे. बाकीचे पंधरा आणे माझ्याकडे दिले होते. त्या १५ आण्यातील दोन आणे मी ठेवून घेतले आणि उरलेले १३ आणे अधिकाऱ्याकडे दिलेले आहेत."
राजाने त्या कारकुनास अधिकाऱ्याला बोलवायला सांगितले. कारकुनाने अधिकाऱ्याला बोलावून आणले. राजाने अधिकाऱ्याला विचारले, "कारभारी, या साहित्यिकाने  राजबागेतील गुलाबाचे फूल तोडले म्हणून शिपायाने १६ आणे दंड केला आहे. ते पैसे तुमच्याकडे आले आहेत का?"
तो बोलण्यास चाचरत होता, पण महाराजांनी दरडावल्यावर पोपटासारखा बोलू लागला आणि म्हणाला, "घेतले असतील पण माझ्यापर्यंत फक्त १३ आणे आले. त्यातले चार आणि ठेवून घेऊन उरलेले ९ आणे मी प्रधानजींकडे दिलेले आहेत. विचारा त्यांना." 
राजा म्हणाला प्रधानजींना बोलवा. त्या अधिकाऱ्याने प्रधानजींना बोलावले. 
 राजाने प्रधानजीला विचारले, "का हो! आपल्या राज्यात राजाचा हुकूम कोणी मोडला तर त्याला किती दंड केला जातो."
महाराजांच्या बायकोचा भाऊच प्रधान होता. तो म्हणाला, "अर्थातच नियमाप्रमाणे एक आणा दंड आकारला जातो. आज सकाळी एका इसमाने राज बागेतील एक गुलाबाचे फूल तोडले म्हणून एक आणा दंड केला आहे आणि तो मी राजकोषात जमा केला आहे."
अहो प्रधानजी पण हा एक साहित्यिक आहे तो म्हणतो की त्याच्याकडून १६ आणे दंड वसूल केला आहे. जे काय खरे खरे असेल ते कथन करा. लपवाछपवी अजिबात करू नका. कोणाची गय केली जाणार नाही." 
महाराजांच्या या दटावणीने प्रधानजी थोडासा चपापला आणि बोलता झाला, 
"महाराज १६ आण्याचे मला काय माहीत नाही. परंतु अधिकाऱ्याने मला नऊ आणे आणून दिले होते मी त्यातील आठ आणे काढून घेतले आणि एक आणा दंड म्हणून राजकोषात जमा केला." 
महाराज म्हणाले, "पण आपल्याकडून १६ आणे वसूल केले गेले असा त्याचा आरोप आहे. त्यात काही तथ्य आहे का?"
प्रधानमंत्री म्हणाला, "असेल... पण माझ्यापर्यंत फक्त नऊच आणि आलेले आहेत."
राजा प्रधानाला म्हणाला, "अरे! मी तर दंड किंवा मदत म्हणून केवळ एका व्यक्तीकडून एक आणाच वसूल करायला परवानगी दिलेली आहे. मग हे कसे काय घडले. तुमच्याकडे आलेल्या नऊ आण्यातील एक आणा राजकोषात जमा करून आठ आणे आपल्याकडे का ठेवले? याचा त्वरित खुलासा करा नाहीतर तुम्ही सर्वजण म्हणजे शिपाई, कारकून, अधिकारी व तुम्ही दंडासस पात्र व्हाल."
प्रधानजीने तोंड उघडले. ते म्हणाले, "महाराज, तुम्ही म्हणता ते ठीक आहे. दंड एक आणा किंवा मदत एक आणा वसूल करा परंतु महाराणीसाहेब दररोज बाजारात व सराफ कट्ट्यावर जात असताना त्यांचा होणारा खर्च मला करावा लागतो. तो नाही केला तर प्रधानजी पदावरून हाकलून देण्याची धमकी त्या मला देतात. त्यासाठी मी नऊ आणे दंड वसूल करून द्या असे अधिकाऱ्याला सांगितले आहे. नऊ आणे दंड जमा झाला की, मी त्यातील एक आणा रितसर राजकोषात भरतो व उरलेले आठ आणे महाराणीसाहेबांचे शौक पूर्ण करण्यासाठी खर्च करतो. त्यामुळे दंडही वसूल होतो आणि माझी प्रधानपदाची नोकरीही टिकते."
त्यानंतर महाराजांनी अधिकाऱ्याकडे मोर्चा वळवला आणि त्याला म्हणाले, "बाबारे तू चार आणे कशासाठी ठेवून घेतलेस? का ठेवून घेतलेस?"
 त्यावर अधिकारी म्हणाला, "महाराज, माझा पगार तर तुम्हाला माहीत आहेच. पण प्रत्येक महिन्याला माझी बदली करतो असे सांगून प्रधानजी काही रक्कम मागून घेतात. ती रक्कम मी पगारातून देऊ शकत नाही आणि इच्छितही नाही. मग कुठून द्यावे हे पैसे? त्यासाठी युक्ती सुचली म्हणून प्रधानजींनी सांगितलेल्या नऊ आण्यांऐवजी मी तेरा आणे दंड वसूल करायला  कारकुनाला सांगतो व त्यातील चार आणे माझ्याकडे ठेवून घेतो. माझे वर्तन गैर असेल तर मला शिक्षा व्हावी."
यानंतर महाराजांनी कारकुनाला विचारले, "बाबारे, अधिकाऱ्याने सांगितलेल्या १३ आण्यांऐवजी १५ आणे दंडवत वसुली तू का सांगतोस?"
कारकून म्हणाला, "महाराज, तुम्ही प्रधानजीसह प्रत्येक महिन्याला राज्याचा हालहवाल बघण्यासाठी दौरे करत असता त्यावेळी होणारा खर्च मी करावा असे प्रधानजी सांगतात. माझ्या पगारात माझे घरचे कसेबसे भागते. मग तुमच्या दौऱ्याचा खर्च करण्यासाठी म्हणून मी माझे दोन आणे दंडात वाढवायला सांगत असतो."
शेवटी महाराजांनी शिपायाला विचारले, "बाबारे, मग तू १५ आणे दंड वसूल करण्याऐवजी एक आणा वाढवून दंड वसुली का करतोस?"
शिपाई म्हणाला, "महाराज, हे प्रधानजी माझ्या गल्लीतच राहतात. त्यांची बायका-मुले नेहमी ऐश करत असतात. ते बघून माझ्या बायकोलाही थोडीफार हौस मौज करावी वाटते. ती करता यावी तसेच मलाही मित्रांच्या संगतीने काही सवयी लागल्या आहेत, त्या पूर्ण करता याव्यात म्हणून मी प्रत्येक वेळी कायदा मोडणाऱ्या व्यक्तीकडून वसूल करायच्या दंडात कायदा मोडणाऱ्या व्यक्तीकडून वसूल करायच्या दंडात माझ्यासाठीचा एक आणा अधिक करून दंड वसुली करतो. मी गुन्हा करतो हे मला माहीत आहे. मी गुन्हा केल्यानंतर चौकशी होणार आणि माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मला दंड/शिक्षा होणार, परंतु मी तशी वेळच येऊ देत नाही. माझ्यावरील आरोपाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचे मी हात ओले करतो आणि निर्दोष राहतो. त्यासाठीही या एका आण्याचा उपयोग होत असतो."
राजाने शेवटी पुन्हा एकदा प्रधानजीकडे मोर्चा वळवला आणि म्हणाले, "प्रधानजी, अशा प्रकारे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधी लाचलुचपत प्रतिबंध विभाग काम करत असतो ना? तरी असे का घडते?"
मधेच तोंड घालून साहित्यिक म्हणाला, "महाराज मी सांगतो, तुम्ही कायदा केला एका इसमाकडून केवळ एक आणा दंड किंवा मदत वसूल करायची आणि तुम्ही गुन्हा झाल्याचे कळल्यानंतर फक्त विचारत होता की 'आज किती  लोकांनी कायदा मोडला? त्या इसमांकडून दंड वसूल केला का?' सगळी यंत्रणा 'होय' म्हणत होती आणि प्रत्येक इसमाचा दंडाचा एक आणा राजकोषात जमा होत होता. त्यामुळे खाली आणखी काय-काय घडत आहे याची तुम्हाला कल्पना नव्हती. ते सर्व तर आत्ता तुमच्या लक्षात आलेच आहे. उरली गोष्ट लाचलुचपत खात्याची. लाचलुचपत खाते तक्रार आल्यास सापळा रचून अधिकाऱ्यांना अधून मधून पकडते. मात्र बऱ्याच अधिकाऱ्यांना आपण आज रचल्या जाणाऱ्या सापळ्यात पकडले जाणार आहोत याचे स्वप्न पडते. त्यामुळे ते सावध होतात. आमचा विभाग जागृत आहे, चलाख आहे, कार्यरत आहे हे दाखवण्यासाठी ज्या काही कारवाया होतात त्या कारवायानंतर नियमाप्रमाणे सहा महिने लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित केले जाते, परंतु त्यानंतर वरिष्ठांच्या मर्जीने व कायद्यातील त्रुटींचा आधार घेऊन अर्ध्या पगारावर सहा महिने व पुढे पूर्ण पगारावर काम करत राहतो. लाच लुचपत विभागाने पकडलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व शिक्षेचे काम करण्याचा अधिकार त्यांना नाही. ते न्यायालयात खटला दाखल करतात आणि पुढे 'तारीख पे तारीख' होत जाते. बऱ्याचदा जाळ्यात पकडलेला अधिकारी सेवानिवृत्त होतो, पेन्शन खाऊन, मृत्यूही पावतो, परंतु त्या केसचा निकाल लागत नाही. या दरम्यान लाचलुचपत खात्याकडे तक्रार करणाऱ्या व्यक्तीला तारखेसाठी किती हेलपाटे घालावे लागतात याची मोजदाद नाही. ते बघून सहसा लोक तक्रार करायलाच धजावत नाहीत. जे मूठभर धजावतात आणि तक्रार करतात त्यांच्या बाबतीत हे असे घडते. ती कल्पना तुम्हाला यावी म्हणूनच मी कविता सादर केलेली आहे. आणि माझ्याकडून जे पैसे घेतले त्यातला एक आणा तर दंडाचा आहे तो नियमाप्रमाणे जमा व्हायलाच हवा. उरलेले माझे १५ आणे मला मिळावेत म्हणून कवितेची बक्षिशी १५ आणे हवी असे मी सांगितले."
महाराणीचा शौक म्हणजे अवघड जागचे दुखणे होते. 
महाराज म्हणाले, "कवी महाशय, मी न्यायाधीशामार्फत एकसदस्यीय समितीची स्थापना करून खरे खोटे निश्चिती करून जे दोषी आहेत त्यांना शिक्षा द्यायची व्यवस्था करतो. आणि खरोखरच घडलेला प्रकार सत्य असेल, तसे सिद्ध झाले तर तुमचे १५ आणे तुम्हाला परत करतो. पण त्यासाठी तुम्ही आणि तुमच्या सर्व नागरिकांनी येत्या निवडणुकीत मलाच जिंकून देऊन राजपदावर बसवायला हवे."
तो साहित्यिक महाराजांच्या आज्ञेची, न्यायालयाच्या कारवाईची वाट बघत आहे. त्याच्या हयातीत खटल्याचा निकाल लागावा एवढीच त्याची अपेक्षा. 
               ©चंद्रकांत निकाडे माझ्यासाठीचा एक आणा अधिक करून दंड वसुली करतो. मी गुन्हा करतो हे मला माहीत आहे. मी गुन्हा केल्यानंतर चौकशी होणार आणि माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मला दंड/शिक्षा होणार, परंतु मी तशी वेळच येऊ देत नाही. माझ्यावरील आरोपाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचे मी हात ओले करतो आणि निर्दोष राहतो. त्यासाठीही या एका आण्याचा उपयोग होत असतो."
राजाने शेवटी पुन्हा एकदा प्रधानजीकडे मोर्चा वळवला आणि म्हणाले, "प्रधानजी, अशा प्रकारे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधी लाचलुचपत प्रतिबंध विभाग काम करत असतो ना? तरी असे का घडते?"
मधेच तोंड घालून साहित्यिक म्हणाला, "महाराज मी सांगतो, तुम्ही कायदा केला एका इसमाकडून केवळ एक आणा दंड किंवा मदत वसूल करायची आणि तुम्ही गुन्हा झाल्याचे कळल्यानंतर फक्त विचारत होता की 'आज किती  लोकांनी कायदा मोडला? त्या इसमांकडून दंड वसूल केला का?' सगळी यंत्रणा 'होय' म्हणत होती आणि प्रत्येक इसमाचा दंडाचा एक आणा राजकोषात जमा होत होता. त्यामुळे खाली आणखी काय-काय घडत आहे याची तुम्हाला कल्पना नव्हती. ते सर्व तर आत्ता तुमच्या लक्षात आलेच आहे. उरली गोष्ट लाचलुचपत खात्याची. लाचलुचपत खाते तक्रार आल्यास सापळा रचून अधिकाऱ्यांना अधून मधून पकडते. मात्र बऱ्याच अधिकाऱ्यांना आपण आज रचल्या जाणाऱ्या सापळ्यात पकडले जाणार आहोत याचे स्वप्न पडते. त्यामुळे ते सावध होतात. आमचा विभाग जागृत आहे, चलाख आहे, कार्यरत आहे हे दाखवण्यासाठी ज्या काही कारवाया होतात त्या कारवायानंतर नियमाप्रमाणे सहा महिने लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित केले जाते, परंतु त्यानंतर वरिष्ठांच्या मर्जीने व कायद्यातील त्रुटींचा आधार घेऊन अर्ध्या पगारावर सहा महिने व पुढे पूर्ण पगारावर काम करत राहतो. लाच लुचपत विभागाने पकडलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व शिक्षेचे काम करण्याचा अधिकार त्यांना नाही. ते न्यायालयात खटला दाखल करतात आणि पुढे 'तारीख पे तारीख' होत जाते. बऱ्याचदा जाळ्यात पकडलेला अधिकारी सेवानिवृत्त होतो, पेन्शन खाऊन, मृत्यूही पावतो, परंतु त्या केसचा निकाल लागत नाही. या दरम्यान लाचलुचपत खात्याकडे तक्रार करणाऱ्या व्यक्तीला तारखेसाठी किती हेलपाटे घालावे लागतात याची मोजदाद नाही. ते बघून सहसा लोक तक्रार करायलाच धजावत नाहीत. जे मूठभर धजावतात आणि तक्रार करतात त्यांच्या बाबतीत हे असे घडते. ती कल्पना तुम्हाला यावी म्हणूनच मी कविता सादर केलेली आहे. आणि माझ्याकडून जे पैसे घेतले त्यातला एक आणा तर दंडाचा आहे तो नियमाप्रमाणे जमा व्हायलाच हवा. उरलेले माझे १५ आणे मला मिळावेत म्हणून कवितेची बक्षिशी १५ आणे हवी असे मी सांगितले."
महाराणीचा शौक म्हणजे अवघड जागचे दुखणे होते. 
महाराज म्हणाले, "कवी महाशय, मी न्यायाधीशामार्फत एकसदस्यीय समितीची स्थापना करून खरे खोटे निश्चिती करून जे दोषी आहेत त्यांना शिक्षा द्यायची व्यवस्था करतो. आणि खरोखरच घडलेला प्रकार सत्य असेल, तसे सिद्ध झाले तर तुमचे १५ आणे तुम्हाला परत करतो. पण त्यासाठी तुम्ही आणि तुमच्या सर्व नागरिकांनी येत्या निवडणुकीत मलाच जिंकून देऊन राजपदावर बसवायला हवे."
तो साहित्यिक महाराजांच्या आज्ञेची, न्यायालयाच्या कारवाईची वाट बघत आहे. त्याच्या हयातीत खटल्याचा निकाल लागावा एवढीच त्याची अपेक्षा. 
               ©चंद्रकांत निकाडे

( कथा आवडल्यास आपल्या आपल्या समूहामध्ये प्रसारित करण्यास काही हरकत नाही.)

ऋतूरंग


.          

मोहरतो वसंत अलगद
कोणाची शिशिरी गळती
कुणी इतके नाजूक हळवे
जखमांतून अश्रू खळती

सोसावे लागे उन्ह 
माथ्यावर विरता वस्त्रे
का वृथाच होते परवड 
अन् फुलकाट्यांची शस्त्रे

हिरवाई करपुनी जाता
मग श्रावण कोठे रुसतो
बासरी हरवली ज्याची
तो कृष्ण राहिला नसतो

तू इतके कर सम्राज्ञी
दिसलो मी तुज कधीकाळी
नात्यांच्या बदनामीचे
ऋतू टाकून दे आभाळी

बघ तसाच मोहरलेला
वाटेवर लावून डोळा
मी असेन एकांतीही
अगदीच जीर्ण पाचोळा

                   ©रमेश