.
मोहरतो वसंत अलगद
कोणाची शिशिरी गळती
कुणी इतके नाजूक हळवे
जखमांतून अश्रू खळती
सोसावे लागे उन्ह
माथ्यावर विरता वस्त्रे
का वृथाच होते परवड
अन् फुलकाट्यांची शस्त्रे
हिरवाई करपुनी जाता
मग श्रावण कोठे रुसतो
बासरी हरवली ज्याची
तो कृष्ण राहिला नसतो
तू इतके कर सम्राज्ञी
दिसलो मी तुज कधीकाळी
नात्यांच्या बदनामीचे
ऋतू टाकून दे आभाळी
बघ तसाच मोहरलेला
वाटेवर लावून डोळा
मी असेन एकांतीही
अगदीच जीर्ण पाचोळा
©रमेश
No comments:
Post a Comment