Thursday, 18 December 2025

या मातीतच

इथेच त्याचा बाप राबला कुणी न त्याला वाली 
या मातीतच अखेर खपला दुष्काळाच्या साली

अंधाऱ्या रात्रीत सरीला लावून पाणी धडपडतो 
लावून थुंकी सुकल्या ओठी कधी मनाशीच बडबडतो

घामाचा अभिषेक दरवळे कपाळ भरुनी अबीरमाती 
घ्याया न्याहरी दुपार टाळते बोलायला नसे सोबती 

चिव चिव किलबिल रानपाखरे वारा झुळझुळणारा 
ऊन तडाका देते खरपूस पाठीत सळसळणारा 

झाड उभे बाभूळ सावली नसे जरा ही झिरमिरती 
निळ्या डोंगरी उठले काहूर उंच ढगांच्याही वरती 

सारी स्वप्न विरून गेली ढेकूळ माती संगे 
क्षणभर विश्रांती घेताना मध्येच उठले दंगे 

मोर नाचरी सांज घुटमळे होऊन कविता बांधावरती 
पीक डोलते लेकुरवाळे घेऊन कणसे खांद्यावरती
© चंद्रकांत 

हरवल्या पाऊलवाटा

हरवल्या पाऊलवाटा शोधतो मी आजही 
बिथरल्या माझ्या कुडीला रोधतो मी आजही 

ठेवली लपवून प्रेते  का कुणी अज्ञात जागी 
त्याचसाठी कैक थडगी खोदतो मी आजही 

एकदा मिसळून किल्मीश पाजले त्यांनी मला 
थेंब पाण्याचे पिताना सोधतो मी आजही 

गारवा वाटेत यावा भरवसा नाही जरी 
का उगी हळव्या मनाला बोधतो मी आजही 

करपले आयुष्य सारे भूतकाळाचा पसारा 
आठवांच्या माय भेटी मोदतो मी आजही

© चंद्रकांत

Wednesday, 26 November 2025

भाषा आणि लिपी

शुद्ध लेखन, अशुद्ध लेखन, प्रमाण भाषा आणि बोली भाषा
(कोणतीही भाषा अशुद्ध नसते, आपण जसे बोलतो तसेच आपल्या लिहिण्यात येते. आपल्या बोलीभाषेतील काही शब्द इतर बोली बोलणाऱ्यांना नीट कळवावेत म्हणून लिहिताना प्रमाण भाषेत लिहिले जावे.)
माणूस आपल्या शरिरातील स्वरयंत्र (घसा), टाळू, मुर्धा, दात, ओठ आणि जीभ यांच्या द्वारे श्वास व उच्छवास यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे ध्वनी निर्माण करू शकतो. पृथ्वीतलावर असे विविध ध्वनी निर्माण करणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे. 
भारतासारख्या बहुभाषिक देशात भाषेचे विविध प्रकार, तिचे विविध उपयोग आणि तिची भिन्न रूपे पाहायला मिळतात. मानवी विचार, भावना आणि माहिती व्यक्त करण्यासाठी भाषा हे सर्वात प्रभावी साधन आहे. भाषेचे स्वरूप काळानुसार बदलत जाते आणि तिचे विविध स्तर समाजातील व्यवहारात दिसून येतात. शुद्ध लेखन, अशुद्ध लेखन, प्रमाण भाषा आणि बोली भाषा या संकल्पना भाषावैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या सर्व रूपांमुळे भाषेचा विकास, तिची उपयोज्यता आणि तिची विविधता अधिक स्पष्ट होते.

शुद्ध लेखन म्हणजे व्याकरणशुद्ध, शब्दशुद्ध आणि नीटस पद्धतीने केलेले लेखन. या भाषेत अवांतर शब्दांचा वापर टाळला जातो आणि वाक्यरचना व्यवस्थित, सुबोध व नीटनेटकी असते. शुद्ध भाषेचा वापर प्रामुख्याने लेखनात, शिक्षणात, शासनव्यवहारात आणि औपचारिक प्रसंगी केला जातो. शुद्ध भाषा शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य भाषेचा नमुना देते. या भाषेत उच्चार, शब्दरचना आणि व्याकरणाचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. त्यामुळे शुद्ध भाषा ही सार्वजनिक जीवनात आदर्श मानली जाते.

याउलट अशुद्ध भाषा म्हणजे भाषेचे असे रूप ज्यात व्याकरणदोष, शब्ददोष, अपभ्रंश किंवा चुकीचे उच्चार आढळतात. अशुद्ध भाषा अशिक्षितपणा, भाषेबद्दलचे अपुरे ज्ञान किंवा बोलक्याच्या परिसरातील चुकीच्या भाषेच्या प्रचलनामुळे निर्माण होते. अशुद्ध भाषेत इतर भाषेतील अनावश्यक शब्द, अव्यवस्थित वाक्यरचना आणि भाषेतील नियमभंग दिसून येतो. अशुद्ध भाषा दैनंदिन बोलण्यात सहजपणे दिसते, परंतु लेखनात किंवा औपचारिक क्षेत्रात याचा स्वीकार होत नाही. विद्यार्थ्यांमध्ये भाषा शिकताना अशा दोषांचे निराकरण करणे आवश्यक असते.

प्रमाण भाषा ही भाषा त्या भाषिक समाजाने स्वीकारलेली, मान्य केलेली आणि सर्वत्र प्रचलित असलेली भाषा आहे. प्रमाण भाषा ही शुद्ध भाषेसारखीच असली तरी ती अधिक व्यापक आणि सर्वमान्य असते. उदाहरणार्थ, मराठीची प्रमाण भाषा पुणेरी-कोकण्याकडे झुकलेली आहे, तर हिंदीची प्रमाण भाषा खडी बोलीवर आधारित आहे. प्रमाण भाषेत नियमबद्ध व्याकरण, अचूक शब्दप्रयोग आणि सर्व समाजाला समजणारी एकसंध रचना असते. माध्यम, प्रशासन, साहित्य आणि शिक्षणात प्रमाण भाषेचा वापर सर्वाधिक केला जातो.

याच्या अगदी विरुद्ध, बोली भाषा ही भाषा त्या भाषेच्या प्रादेशिक स्वरूपात वापरली जाते. बोली भाषा म्हणजे एखाद्या प्रदेशातील लोकांच्या दैनंदिन व्यवहारातील भाषा. मराठीची वारली, अहिराणी, झाडीबोली, मावळा, कोकणी, धारवाडी, पंढरीपुरी, अगदी मुंबईची बंबैय्या हीसुद्धा बोली भाषांची उदाहरणे आहेत. बोली भाषा त्या प्रदेशातील संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धतीशी जोडलेली असल्यामुळे ती अत्यंत जिवंत, स्वाभाविक व लोकाभिमुख असते. बोली भाषेतील शब्द, उच्चार, ध्वनी आणि वाक्यरचना प्रमाण भाषेपेक्षा वेगळी असते. बोली भाषा माणसाच्या जिव्हाळ्याच्या व्यवहारात आणि लोककलेत सर्वाधिक प्रकट होते.

या सर्व भाषारूपांची तुलना केली असता असे दिसते की शुद्ध भाषा आणि प्रमाण भाषा या औपचारिक, शिस्तबद्ध व व्याकरणनिष्ठ आहेत; तर बोली भाषा अधिक मोकळी, जिवंत व लोकाभिमुख आहे. अशुद्ध भाषा ही भाषेच्या योग्य वापरापासून झालेल्या विचलनामुळे तयार होते आणि ती सुधारण्याची गरज असते. बोली भाषा अशुद्ध नसते; उलट ती स्वतंत्र, समृद्ध आणि ऐतिहासिक दृष्ट्या मौल्यवान असते. प्रत्येक बोली भाषेला स्वतःचे वैशिष्ट्य, शब्दसंपत्ती आणि सांस्कृतिक स्थान असते.

भाषेची ही विविध रूपे आपल्याला भाषेची श्रीमंती दाखवतात. एका भाषेत शुद्ध, प्रमाण आणि बोली ही तीन मुख्य रूपे झळकतात आणि प्रत्येकाचे आपले एक स्वतंत्र महत्त्व असते. भाषेच्या योग्य विकासासाठी शुद्ध आणि प्रमाण भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, तर बोली भाषा भाषेला संस्कृतीत मूळ घट्ट रोवून ठेवते.
                         चंद्रकांत निकाडे 

Friday, 31 October 2025

नेहरू

जवाहरलाल नेहरूंची देश उभारताना देशाविषयीची तळमळ होती त्यांना नाटकीयपणा आवडत नव्हता. 

शाखेतले समलैंगिक देशद्रोही संघी, नेहरू बद्दल अत्यंत विषारी प्रचार करतात. परंतु नेहरुंचा इतिहास हा लिखित आहे ,कितीही बदनामी केली तरी तो बदनाम होत नसतो. 

1960-61 ची ही घटना आहे पंजाबातील दहेदी गावी धरणाचा पायाभरणी शुभारंभ होता. जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते शुभारंभ पार पडणार होता. 

नेहमीच्या प्रथेप्रमाणे थोडीशी जमीन खोदून उद्घाटन करणे आवश्यक होते .त्यासाठी अधिकाऱ्यांनी चांदीची कुदळ आणली. उद्घाटन समारंभाच्या वेळी नेहरूच्या हातात ती कुदळ देण्यात आली. 

नेहरूजी आश्चर्याने त्या कुदळीकडे पाहत राहिले. त्यांनी ती कुदळीला खाली वर आणि उलट सुलट करत विचारले," हे काय आहे " ?

अधिकारी म्हणाला ,"ती कुदळ आहे सर!"

नेहरू म्हणाले , होय मलाही ती कुदळीसारखीच वाटते ,पण ही कशासाची बनवली आहे ?

नेहरूंना तो अधिकारी अत्यंत आदबीने म्हणाला ,
 "चांदीची आहे सर ! "

नेहरूजीने त्या अधिकाऱ्याकडे आणि आजूबाजूच्या लोकांकडे पाहिले आणि म्हणाले , "चांदीची कुदळ ती कशासाठी ! " भारतातील शेतकरी मजूर काय चांदीच्या कुदळीने काम करतात ?मग मीच चांदीची कुदळ का वापरावी ?मला नेहमीचीच लोखंडाची पोलादाची कुदळ आणून द्या.

मुहूर्तासाठी मुद्दाम आणलेली त्या कुदळीनेच उद्घाटन करा असा आग्रह जमलेल्या मंडळींनी निर्णय केला; पण नेहरू अशा औपचारिक खोट्या प्रथाविरुद्ध होते.

थोड्याशा रागाने नेहरू म्हणाले ,"हे असले ढोल मला मान्य नाहीत .जर तुम्हाला उद्घाटन करायचे असेल तर लोखंडाची कुदळ आणा." अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.

थोडेसे धावपळीने अधिकाऱ्यांनी लोखंडी कुदळ आणली आणि नेहरूंनी पायाभरणी समारंभ पार पाडला ही वागणे होते .

 जवाहरलाल नेहरूंचं या देशातील योगदान कुणालाही विसरता येणार नाही.  देशातील शेतकऱ्यांच्या हातात साधी कुदळ असताना मी चांदीची कशी वापरणार? पंतप्रधान म्हणून हा विचार बाळगणं सोपी गोष्ट नाही.

जागतिक फेकू नरेंद्र मोदी आठ हजार कोटीचा विमान वापरतो ,दहा लाखाचा सूट ,दोन लाखाचा गॉगल. जेवताना चीनहून आणलेलं महागडं मसरुम खातो आणि नेहरूंना शिव्या देतो .बायको सोडणारा हा संघी.

देशातील तरुण बांधवांना जागृत व्हा तरच तुमचं भवितव्य सुरक्षित राहील नसता अंधारात देश ढकल्या चालला आहे समजून घ्या.

जय हिंद जय भारत जय संविधान जय काँग्रेस.

 हरिभाऊ सोळंके.
 सादोळा 

Saturday, 25 October 2025

बैलाचे गाणे

बैलाला वडी लाव
माझ्या बैलाला वडी लाव...||धु||
काम क्रोध दोन्ही बैल जुंपूनी
विषयाचे शिवळ खांद्यावर देऊनी
देह क्षेत्र नांगरवं..॥१॥
हरी नामाचे बीज पेरूनी
प्रेम भावाचे पाणी पाजूनी
संसार शेत वाढवावं. ॥२॥
पीक काढावं फळ सोडावं
ज्ञान विळ्याने त्या खुडाव
वैराग्याचं पोतं भरावं..||३||
दया-क्षमेचे खळे बनवूनी
दृढ भक्तीचा खांब रोवोनी
माया पीक तुडवावं..||४||
दास जनार्दन क्षेत्र पेरीले
श्री गुरुवचनाचे कुंपण लाविले
कुळी बीज पेरावं

Saturday, 11 October 2025

एक मिठी

का मारली असेल मी मिठी त्याला..
मी काही कोणी नवथर तरूणी नाही..
ना तो कोणी पंचवीस वर्षाचा शाइन मारणारा तरूण..

पण तरीही एका स्त्री ने, एका आईने ,एका पत्नी ने हजारों लोकांसमोर अशी कोणाला मिठी मारावी..

समाजात एका प्रतिष्ठित व्यक्ती ची बायको म्हणून वावरताना,प्रत्येक लहानसहान गोष्ट करताना लोक काय म्हणतील हा विचार करणाऱ्या स्त्रीने अशी परक्या व्यक्तीला अख्ख्या जगासमोर मिठी का मारली असेल...

मी त्याला भेटल्याचा आनंद माझ्याहून ही जास्त कोणाला झाला असेल तर तो माझ्या मुलीला..

ती मुलगी म्हणजे कोणी चार पाच वर्षाची चिमणी नाही , जी फोटोत आई दिसतंय सगळीकडे म्हणून खुश होणारी...
ती आता साडे सतरा वर्षाची एक प्रगल्भ आणि ठाम विचार करणारी तरूणी आहे.. 
एका बारावीत शिकणाऱ्या तरुण मुलीच्या आईने का मारली असेल अशी मिठी त्याला! तेही अगदी नवरा सोबत असताना..

सर्वात आधी तो फोटो मी तिला पाठवला होता...
" लहानपणापासून मी ऐकून ऐकून मी थकली होती राहुल गांधी ला भेटायचं आहे चला आता भेटलीस एकदाची तू त्याला " हे तिचं पहिलं वाक्य...

स्त्री ला स्पर्शाची भाषा चांगलीच अवगत असते..
अगदी पुरूषाच्या नजरेतून तिला ते कळते की त्याच्या मनात काय असेल..

अशीच नाही ती कोणालाही मिठ्या मारत फिरत..
राहुल ला भेटणं हे माझं स्वप्न होतं तेव्हापासून.. जेव्हा तो कोणीच नव्हता आणि लोकांच्या भाषेत पप्पू होता..

का भेटायचं होतं मला त्याला तर तो नेहमीच मला आपला माणूस वाटला..
द्वेष पसरवणाऱ्या या समाजात प्रेम वाटत फिरणारा, प्रेमाची खरी किंमत कळणारा राहुल..

बालवयात आजी नी तरूणपणी वडील गमावणारा तरीही मनात कुठेही राग, द्वेष न ठेवता मारेकऱ्यांना माफ करणारा मोठ्या मनाचा माणूस..

कठीण परिस्थितीत न डगमगता आई, बहिणीला सांभाळणारा खंबीर राहुल..
कसलाही भेद न करता माणसाला माणूस म्हणून वागवणारा प्रेमाचा खळखळता झरा म्हणजे राहुल..

लोकांनी कितीही हिणवून टिकाटिपण्णी केली तरी कुठलाही आक्रस्ताळेपणा न करणारा संस्कारी राहुल..

त्याच्या मृदु बोलण्याने आणि गोड हसण्याने भुरळ पाडणारा राहुल..
त्याच्या डोळ्यात बघताच सारं जग विसरायला लावणारा राहुल..

काही लोकांच्या कपटनीतीचा भाग होऊन जगापुढे हसं झालेला पण तरीही आपला चांगुलपणा न सोडणारा राहुल..

बापाच्या शरीराच्या चिंध्या झालेल्या असतानाही असा बिनधास्त रस्त्यावर उतरायला जिगरा लगता है यारों..

त्याला पप्पू म्हणा किंवा कोणी काहीही म्हटलं तरी तो ठासून खोटं बोलणारा खोटारडा, क्रूर, खुनशी, कपटी नाही हेच माझ्यासाठी खूप आहे..

राहुल गांधी एक जिवंत प्रेमळ,आपलासा वाटणारा एक साधा मनुष्य आहे तुमच्या आमच्या सारखा..

आज त्याच्या भोवती एक वलय तयार झालंय.. आज प्रत्येकाला त्याला मिठी मारायची आहे.. अगदी लहानमोठे,स्त्री, पुरुष सगळ्यांना.. 
आहेच तो तसा विश्वासक,आपला वाटणारा..

माझंही तसंच झालं अगदी अनपेक्षितपणे तो मला भेटला.. त्याक्षणी माझी काय अवस्था झाली असेल माझं मलाच माहीत आहे.. मला नाही आठवत मी काय बोलले पण मी त्याला मिठी मारली.. तिथे उपस्थित लोक काय विचार करतील ,कोणी फोटो घेईल किंवा आणखी कसलाही विचार माझ्या डोक्यात नव्हता.. एक संमोहन अवस्था होती ती.. माझ्या डोळ्यासमोर माझा आवडता राहुल गांधी होता आणि मी होती.. बाकी सारं जग जणू थांबलं होतं त्या क्षणाला.. मला नाही आठवत समोर पोझ देत काढलेला फोटो कधी काढला किंवा मी कधी तशी त्याच्या कमरेत हात घालून पोझ दिली.. अगदी आता पाच दिवसानंतर ही मी ब्लॅंक आहे.. 
पण मी त्याला भेटली, गुलाब दिला,हात धरून चालली,बोलली,मिठी मारली.. हे सत्य आहे!! 
तो आनंद, उत्साह आणि आपुलकीचा क्षण आयुष्यभरासाठी कायम माझ्या मनात कोरल्या गेलाय!
प्रत्येक पुरुष असा आश्वासक आणि विश्वासक असेल त्या दिवशी या देशातील प्रत्येक स्त्री सुरक्षित असेल!!
❤️ क्योंकी वो अपनासा लगता हैं ❤️
Rahul Is Love ❤️ 
Love you Rahul 🤗🥰
#RahulGandhi#
 
कल्पना सुर्यवंशी गेडाम 
ब्रम्हपुरी 😊🙏

Monday, 22 September 2025

पहिलंवहिलं

पेन
पत्र लेखन
फोटो
चप्पल
शर्ट-पॅंट
पुस्तक
घर
सायकल
मोटरसायकल
गाडी
कथा
प्रवास-अंतर्देशीय
प्रवास-आंतरराष्ट्रीय
नोकरी-प्राथमिक
नोकरी-माध्यमिक
निवृत्ती
शेत
संगणक
लॅपटॉप
प्रकाशन





Monday, 4 August 2025

३५० वर्षांचा शिवकालीन पूल

      प्रतापगडाच्या पायथ्याशी 'पार्वतीपूर'  नावाचे एक गाव आहे. नंतर त्याचे नाव 'पार' असे पडले. 
या पार गावाजवळ शिवरायांनी एक पूल बांधून घेतला होता. 
     ८ मीटर रुंदीचा हा पूल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा.
     कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असा हा भक्कम दगडी पूल आहे. पुलाला असणाऱ्या पाच आधारांवर पुलाच्या चार कमानी तयार केल्या आहेत. त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने  पुलाच्या कमानींना धोका पोहचू नये म्हणून कमानींमधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो. हे सारेच बांधकाम फक्त चुन्यात केलेले आहे. 
     सुमारे साडेतीनशे वर्षांंनंतरही हा पूल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे. दगडांच्या फटीमध्ये साधे छोटे झुडूपही उगवलेले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभार उंचीचा १ फुटी दगडी कठडा आहे. 
      ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांना १०० वर्षे झाली म्हणून कौतुक केले जाते. या पुलाच्या बांधणीला ३५० वर्षे झाली. त्यास अद्याप एकही तडा गेलेला नाही अथवा साधा भरीचा दगडही निसटलेला नाही.

Thursday, 31 July 2025

बिस्किटांचा पुडा











सुगंध मराठीचा

.        *सुगंध मराठीचा*

मराठी भाषेचा सुगंध आगळा
तिच्या संस्कृतीचा खूप मोठा ठेवा।
शब्दाशब्दांतून वाहे गोड सार
ज्ञानविज्ञानाचा सर्वांसाठी मेवा।।

रोज तुकयाची ओवी येते ओठी
ज्ञानेशाचा मनी वसे हरिपाठ।
शब्दांनी स्पर्शतो जनाईचा भाव
सदा सर्वकाळ दाखविते वाट।।

आईच्या तोंडची तीच असे बोली
बालपणीच्या आठवणींची खाण।
शिवबांची तलवार धार मऱ्हाटीची
किती किती गावे मराठीचे गान।।

शब्द तिचे जणू मोतीयांची माळ
मराठी मातीची सृजनशीलता।
एकांकिका, कथा, कविता, नाटक
गद्य पद्यांमध्ये असे प्रगल्भता।।

माय मराठी गे तुझा अभिमान,
तूच स्वत्व माझे आणि आत्मभान।
सांभाळीन तुला जपून उराशी
वाढवीन तेज करुनी सन्मान।।

          *चंद्रकांत निकाडे*
    पोहाळे, पन्हाळा, कोल्हापूर
             9922314564

Monday, 28 July 2025

FMGE (MCA Exam) म्हणजे काय?

✅ 1. FMGE (MCA Exam) म्हणजे काय?
FMGE (Foreign Medical Graduates Examination) ही एक लायसन्सिंग परीक्षा आहे.
भारताबाहेर M.B.B.S. केल्यावर भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी ही परीक्षा पास होणं आवश्यक आहे.
पूर्वी ही परीक्षा Medical Council of India (MCI) द्वारे घेतली जात होती, आता National Board of Examinations (NBE) आणि NMC अंतर्गत घेतली जाते.
---
✅ 2. परीक्षा कोण देऊ शकतो? (Eligibility)
उमेदवाराने NMC ने मान्यता दिलेल्या परदेशी विद्यापीठातून M.B.B.S. पूर्ण केलेले असावे.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे आणि इंटर्नशिप केल्याचे सर्टिफिकेट असावे.
भारतीय नागरिक किंवा OCI (Overseas Citizen of India) असणे आवश्यक.
---
✅ 3. FMGE परीक्षा कधी होते?
वर्षातून दोन वेळा (जून आणि डिसेंबर महिन्यात) ही परीक्षा घेतली जाते.
---
✅ 4. परीक्षेचा स्वरूप (Exam Pattern)
Computer Based Test (CBT)
2 भागांमध्ये (Part A आणि Part B) परीक्षा घेतली जाते.
प्रत्येक भागात 150 प्रश्न (एकूण 300 प्रश्न)
सर्व प्रश्न MCQ प्रकाराचे असतात.
Negative marking नाही
पासिंग मार्क्स: 50% (150/300)
---
✅ 5. कोणती नियमावली (Rules & Regulations)?

🔸नियम:
1. NMC च्या नियमांनुसार, उमेदवाराच्या परदेशी शिक्षण संस्थेने WHO/NMC च्या यादीत असणे आवश्यक.
2. उमेदवाराने परदेशात इंटर्नशिप/क्लिनिकल ट्रेनिंग पूर्ण केलेली असावी.
3. FMGE पास केल्यावर, उमेदवाराने भारतात Compulsory Rotatory Residential Internship (CRRI) करणे आवश्यक (1 वर्ष).
4. त्यानंतर उमेदवार State Medical Council मध्ये नोंदणीस पात्र ठरतो.
🔸नियमांची नवीन सुधारणा:
2024 पासून NExT (National Exit Test) लागू होण्याची शक्यता होती. आता ती 2026 पासून लागू होऊ शकते.
त्या वेळी FMGE च्या जागी NExT Step 1 व Step 2 येतील.
---
✅ 6. महत्वाची संकेतस्थळे (Official Links)
NBE (परीक्षा घेणारी संस्था): https://natboard.edu.in
National Medical Commission (NMC): https://www.nmc.org.in

Tuesday, 15 July 2025

शब्दसाधना

व्हाटसप विद्यापीठातील आजचे शब्द
देवून× *देऊन*
फुल× *फूल, अनेकवचन फुले*
चालल× *चालेल/चालेल*
१५ जुलै २०२५× *१५ जुलै, २०२५*
आशिर्वाद× *आशीर्वाद*
जेंव्हा... तेंव्हा× *जेव्हा... तेव्हा*
पाऊसात× *पावसात*
सुरु× *सुरू*
दुर्मिळ× *दुर्मीळ*
स्विकारली× *स्वीकारली*