Saturday, 25 October 2025

बैलाचे गाणे

बैलाला वडी लाव
माझ्या बैलाला वडी लाव...||धु||
काम क्रोध दोन्ही बैल जुंपूनी
विषयाचे शिवळ खांद्यावर देऊनी
देह क्षेत्र नांगरवं..॥१॥
हरी नामाचे बीज पेरूनी
प्रेम भावाचे पाणी पाजूनी
संसार शेत वाढवावं. ॥२॥
पीक काढावं फळ सोडावं
ज्ञान विळ्याने त्या खुडाव
वैराग्याचं पोतं भरावं..||३||
दया-क्षमेचे खळे बनवूनी
दृढ भक्तीचा खांब रोवोनी
माया पीक तुडवावं..||४||
दास जनार्दन क्षेत्र पेरीले
श्री गुरुवचनाचे कुंपण लाविले
कुळी बीज पेरावं

No comments:

Post a Comment