POEMS
*बाप*
काल
तिचा बाप इश्वरा होता परवा इम्रान,
अन् त्याआधी इल्सन. कधी लोड असलेला ट्रक
रस्त्यावर थांबवून झुलत येणारा इसरतसिंगही
तिचाच बाप *** ***
शेवटी
तासांच्या, दिसांच्या बोलीनं
मातेच्या अंथरुणावर
खिदळणारा पुरूष म्हणजेच
बाप
तिच्या लेखी
*** *** ***
*रमेश कुरलीकर*
*एवढीच इच्छा*
आनंद फक्त त्या रंगीत बाटलीत
बंद करून ठेवलेला असतो.
असं तुला कोणी सांगितलंय का मित्रा !
*** *** ***
की तो फक्त डाॅल्बीच्या ठेक्यात नि
सामिश भोजनात असतो
असं सांगितलंय मित्रा !
*** *** ***
असेल सांगितले तर ते साफ खोटं आहे
आनंदाचं असं आहे तो राहतो एकीकडे
आणि पत्ता भलताच देतो मित्रा !
*** *** ***
तू म्हणशील 'काय हे !
आज 31'st आहे.
आमच्याही पायाला आता
बापाचं पायताण येऊ लागलंय की !'
*** *** ***
मित्रा !
उद्या इंग्रजी वर्षातला शेवटचा
दिवस आहे
तो तुझ्या आयुष्यातला नये ठरू
हीच प्रार्थना, हीच सदिच्छा
*** *** ***
*रमेश कुरलीकर*
*बाप*
काल
तिचा बाप इश्वरा होता परवा इम्रान,
अन् त्याआधी इल्सन. कधी लोड असलेला ट्रक
रस्त्यावर थांबवून झुलत येणारा इसरतसिंगही
तिचाच बाप *** ***
शेवटी
तासांच्या, दिसांच्या बोलीनं
मातेच्या अंथरुणावर
खिदळणारा पुरूष म्हणजेच
बाप
तिच्या लेखी
*** *** ***
*रमेश कुरलीकर*
*एवढीच इच्छा*
आनंद फक्त त्या रंगीत बाटलीत
बंद करून ठेवलेला असतो.
असं तुला कोणी सांगितलंय का मित्रा !
*** *** ***
की तो फक्त डाॅल्बीच्या ठेक्यात नि
सामिश भोजनात असतो
असं सांगितलंय मित्रा !
*** *** ***
असेल सांगितले तर ते साफ खोटं आहे
आनंदाचं असं आहे तो राहतो एकीकडे
आणि पत्ता भलताच देतो मित्रा !
*** *** ***
तू म्हणशील 'काय हे !
आज 31'st आहे.
आमच्याही पायाला आता
बापाचं पायताण येऊ लागलंय की !'
*** *** ***
मित्रा !
उद्या इंग्रजी वर्षातला शेवटचा
दिवस आहे
तो तुझ्या आयुष्यातला नये ठरू
हीच प्रार्थना, हीच सदिच्छा
*** *** ***
*रमेश कुरलीकर*






























No comments:
Post a Comment