Thursday, 30 August 2018
मराठी कविता सहा:रमेश कुरलीकर
[7/12, 12:28 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: . *जलचक्र*
नदी तळे तलाव आणि
समुद्रातील साठ्याची
सूर्याच्या उष्णतेने
वाफ होते पाण्याची
वाफ म्हणजे पाण्याचेच
एक वायूरूप असते
मात्र आपल्या डोळ्यांनी
ते नेहमी दिसत नसते
वाफेचे बनतात ढग
हलके होऊन वर जातात
वारा जेव्हा वाहतो तेव्हा
हळू पुढे पळू लागतात
ढगांना भेटतात डोंगर
तिथली हिरवी झाडे
थंड हवा लागताच ते
होतात खूप जाडे
थेंब थेंब गळू लागतात
त्यालाच म्हणतात पाऊस
पावसात भिजायची
मुलांना खूप हौस
पाऊस धुके दव दहीवर
हीही रूपे वृष्टीचीच
शोभा असतात वाढवत
हिरव्यागार सृष्टीची
गटर नाले नदीत मजेत
हे पाणी वाहत असते
शेवटी जाऊन समुद्राला
आपोआप मिळत असते.
समुद्राच्या पाण्याची
वाफच वाफ होते पुन्हा
याला म्हणतात जलचक्र
धरतीसाठी अमृतपान्हा
. *चंद्रकांत निकाडे*
[7/12, 1:23 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: . *अनेक रूपे*
पाऊस प्रात:काळी
अंकुर पोसण्याला
शेतात राबणाऱ्या
दु:खास सोसण्याला
पाऊस भरदुपारी
रोपास गोड पान्हा
घेईल आवडीने
बांधावरील तान्हा
पाऊस सांजवेळी
अवघ्या चराचराला
घेऊन जात असतो
शिणल्या जिवा घराला
पाऊस भयाण रात्री
येतो स्मशानवैरी
अंधारल्या दिशांनी
होतो कधी अघोरी
पाऊस हा अवेळी
आघात सोसण्याचा
आश्वस्त पावलांनी
आधार पोसण्याचा
*रमेश कुरलीकर*
[7/13, 3:28 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *गझल पावसाची*
माणसांना पावसाने
गालगागा गालगागा
जाणले पाहिजे
गालगा गालगा
पावसाला माणसांनी मानले पाहिजे
सारखा जो वेळवेळी लोचतो त्या ठगा
दांडग्याला जाणत्यांनी ताणले पाहिजे
नुसते पाहाणे *नको
गालगागा
ना आपुल्याही अंगी
सगळ्यांच्या *शौर्य थोडे बाणले पाहिजे
भ्रष्ट नेत्या भरसभेतच एकदा पैजारे
दणक्याने *स्वागताला हाणले पाहिजे
छळवाद्या *दांडग्याला टोणप्या कोडग्या
सगळ्यांच्या *घातपाता छानले पाहिजे
दुसऱ्याशी *वागताना तेढ का ठेवता
सुगंधाशी* आर्जवाने आणले पाहिजे
. *रमेश*
[7/13, 7:09 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *शेंदरी दगड डोहात फेकले*
पांढऱ्या दातांच्या काळ्याशा बाहुल्या
अंधाऱ्या रात्रीत कण्हत चालल्या
भीषण शांतता अोसाड दरीत
घुबडे गटाने चीत्कार करीत
गुहेच्या तोंडाशी पाकोळ्या घुमत
वडाच्या पारंबी पिंगळे जमत
झुलते पालखी अमावस्ये रात्री
समंध वेताळ घुमतात गात्री
अक्राळविक्राळ रूपात थांबल्या
सातीही अप्सरा झाडाला झोंबल्या
घरी परताया उशीर झालेल्या
शंखिनी डंकिनी मुकाट चालल्या
पहाट सरली तांबडे फुटले
घोळके बायांचे पुजून चालले
शाळेच्या पोरीने स्वप्नात
शेंदरी दगड डोहात फेकले.
. *चंद्रकांत निकाडे*
[7/14, 12:23 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: . आठवणी
रोज रात्री
मी उसवतो मनाचा गाभारा
साचलेल्या आठवणी
पुसून टाकतो
तरीही काही उरतातच
त्या हाकलता हकलत नाहीत
घराच्या कोनाड्यात
चिकटून राहावीत जळमटे तशा
एक बरे आहे
त्या धुमसत राहिल्या तरी
कळत नाहीत इतरांना
आणि द्यावी लागत नाहीत उत्तरे
अनाहूत प्रश्नांची
काही आठवणी
आतल्या आत पोखरत राहतात
वाळवीने कुरतडावी फळी तशा
काही मात्र मीच मुद्दाम जपतो
त्यांना कवितेत गुंफून मोकळा होतो
आणि भेटतात जिवाभावाचे सखे
दूरदूरच्या गावांतून
शहरांतून की खेड्यांतून ?
असा प्रश्न नाही पडत कधी
या सुहृद्यांच्या शुभेच्छेनेच तर
उगवत असते उद्याची सकाळ
माझ्यासाठी
. *रमेश
मराठीकविता पाच : रमेश कुरलीकर
[7/13, 7:09 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *शेंदरी दगड डोहात फेकले*
पांढऱ्या दातांच्या काळ्याशा बाहुल्या
अंधाऱ्या रात्रीत कण्हत चालल्या
भीषण शांतता अोसाड दरीत
घुबडे गटाने चीत्कार करीत
गुहेच्या तोंडाशी पाकोळ्या घुमत
वडाच्या पारंबी पिंगळे जमत
झुलते पालखी अमावस्ये रात्री
समंध वेताळ घुमतात गात्री
अक्राळविक्राळ रूपात थांबल्या
सातीही अप्सरा झाडाला झोंबल्या
घरी परताया उशीर झालेल्या
शंखिनी डंकिनी मुकाट चालल्या
पहाट सरली तांबडे फुटले
घोळके बायांचे पुजून चालले
शाळेच्या पोरीने स्वप्नात पाहिले
शेंदरी दगड डोहात फेकले.
. *चंद्रकांत निकाडे*
[7/13, 7:34 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: तिथे
दुर्लक्षित
अनाथ
बगळ्यांसमोर
भूमी
आबादानी
पाहात
भीक
तिथे
माणुसकीचा
शिरजोर
कुंपनानीच
बहिणींचा
घटना
चिखलातच
नीती
8552833839
[7/14, 12:23 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: . आठवणी
रोज रात्री
मी उसवतो मनाचा गाभारा
साचलेल्या आठवणी
पुसून टाकतो
तरीही काही उरतातच
त्या हाकलता हकलत नाहीत
घराच्या कोनाड्यात
चिकटून राहावीत जळमटे तशा
एक बरे आहे
त्या धुमसत राहिल्या तरी
कळत नाहीत इतरांना
आणि द्यावी लागत नाहीत उत्तरे
अनाहूत प्रश्नांची
काही आठवणी
आतल्या आत पोखरत राहतात
वाळवीने कुरतडावी फळी तशा
काही मात्र मीच मुद्दाम जपतो
त्यांना कवितेत गुंफून मोकळा होतो
आणि भेटतात जिवाभावाचे सखे
दूरदूरच्या गावांतून
शहरांतून की खेड्यांतून ?
असा प्रश्न नाही पडत कधी
या सुहृद्यांच्या शुभेच्छेनेच तर
उगवत असते उद्याची सकाळ
माझ्यासाठी
. *रमेश*
[7/14, 11:23 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *"एस्सर !"*
पहिलीच्या वर्गात हजेरी घेताना
"निशा एकनाथ दातार !"
नाव पुकारताच
एक गोंडस चिमुरडी
उठून उभी राहायची "एस्सर." म्हणत.
दुसरीच्या वर्गात
पहिल्याच दिवशी
हजेरी घेताना नाव पुकारताच थोडी रडवेली होत
जवळ येऊन म्हणाली,
"सर, माझं नाव चुकलंय लिहायला. निशा गुलाब दातार हवंय! "
मी सुन्न.
तरीही म्हटलं, "ठीक आहे, करू दुरूस्त. "
आणि पुन्हा तिसरीच्या सहामाही नंतर तिची तीच तक्रार
'नावात बापाच्या ठिकाणी मायकल लिहा.' अशी
तेव्हाही मी 'हो! बाळा' म्हणालो.
तिचं नाव बदलता आलं हजेरी नावाच्या कागदी तुकड्यावर
नशीब बदलायची हिंमत-ताकद नव्हतीच माझ्याकडे
तिच्या डब्यात
पोळी-भाजी,भाजी-भाकरी
ऐवजी वडापाव,भजी,भडंग किंवा असंच काहीतरी कोरडं असायचं
कधी म्हटलं, "निशा माझ्या डब्यात आज पोळी जास्तय.घे ना तुला एक."
तर म्हणायची, "तुम्ही माझ्या डब्यातला चिवडा घेणार असाल तरच !."
एकदा पालक सभेत बऱ्याच विनंती नंतर
तिची आई आली होती शाळेत
डब्याबद्दल बोलताना
"सांभाळून घ्या निशाला." इतकच बोलली, तेव्हा समजलं तीच निशाची आई.
माझ्या येण्याजाण्याच्या रस्त्यावरच्या थिएटरसमोर ती उभी असायची नटूनथटून
एरव्ही रस्त्यावरून जाणारा पुरूष दिसला की त्याला रोखणारी, तिची घायाळ नजर
मी समोरून जाताना
खाली झुकायची
सातवीनंतर निशाची शाळा संपली
माझीही बदली झाली.
आणि परवा
ती मला दिसली
दीड-एक तपानंतर
त्याच रस्त्यावरून जाताना
तिथेच
जिथे तिची आई उभी असायची
तिचीही नजर झुकली.
मी फक्त आठवत राहिलो
"एस्सर ! "
तिच्या कोमल आवाजातील अभिवादन
हताशपणे!
*रमेश*
मराठी कविता तीन : रमेश कुरलीकर
[7/20, 9:01 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *बंधुप्रेम*
त्या दोघांचं बंधुप्रेम आता
शेजाऱ्यांसह गल्ली अन गावातही जगजाहीर झालंय
रविवारी सकाळी सकाळी
चहा घ्यायच्याही आधी
हमखास फोन करतात.
दिलखुलास गप्पा मारत शेवटी एकमेकांना निरोप देतात
किती हे बंधुप्रेम !
राम-लक्ष्मण
किंवा भरत-राम फिके पडतील
असं वाटतं त्यांच्याकडे बघून नवख्या माणसाला
परवा तर म्हणे कुठल्याशा मंडळाच्या वाढदिनातील कार्यक्रमावेळी त्यांचे नाॅमिनेशन झाले होते
आदर्शबंधू पुरस्कारासाठी
रविवारी
धाकटा ब्रश करत करत
शहरातील उच्चभ्रू वस्तीतील
अलिशान बंगल्याच्या टेरेसवरून
आपल्या रत्नजडित मोबाईलवरून
दादाला करत असतो फोन
त्याच्या शेजारच्या घरात
तो येईपर्यंत फोन तसाच कनेक्ट ठेवून
आतुरतेनं वाट पाहात असतो
"दादा, नमस्कार."
नंतर बराचवेळ गप्पा मारत राहातो
महत्वाचा निरोप हळूच शेवटी सांगतो
दादाही पुढच्या रविवारी
पानटपरीतल्या काॅईनबाॅक्स मध्ये
एक रुपयाचं नाणं टाकून धाकट्याच्या मोबाईल नंबरची बटणं दाबतो
वेळ उरला तर मारतोच गप्पा
पण कनेक्ट झाल्याबरोबर बाॅक्सच्या डिस्प्लेवरील सेकंदांची उलटी गिनती संपण्याअगोदर
महत्वाचा निरोप देतो
अगदी सेम त्याच्यासारखाच
*"आज रविवार आहे. उद्यापासून तुझा आठवडा सुरू होतोय संध्याकाळी कधी येतोयस आई-बाबांना न्यायला ? "*
. *रमेश कुरलीकर*
[7/21, 9:41 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: प्रत्येक कवितेला असते
उंची, खोली आणि रुंदीही
आपल्या कवितेइतकी
उंची असणारे कवी
किंवा आपल्या उंचीइतकी
कविता लिहिणारे कवी क्वचितच भेटतात
खोली असणाऱ्या कविता
घर करतात मनात
उथळ अशाच जातात वाहात वाऱ्यावर फुसक्या ढगांसारख्या
रूंद कविता असतात
शिंपल्यातले मोती अनमोल
खुज्या टरफलासारख्या शेंगेच्या
उंच, खोल आणि रूंद
कवितेच्या शोधात
अजूनही वावरतो आत्मा
द्याल ना अशी एखादी
कविता हृदयापासून
हृदयापर्यंत झिरपणारी
. *रमेश*
[7/23, 7:57 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: पांडुरंग देव पांडुरंग भाव
पांडुरंग नाव विठोबाचे ॥
घेईन पताका करीन मी वारी
चंद्रभागा तिरी स्नानसंध्या
नामाचा गजर अभंग गाईन
कीर्तन पाहीन वाळवंटी
*चंदनाचा* टिळा लावीन मी भाळा
तुळशीच्या माळा वाहुनिया
[7/24, 3:29 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: तशी तर
कुणालाच गरज नाही
विठ्ठल-रखुमाईच्या
पूजा आणि दर्शनासाठी
घराबाहेर जाण्याची
पोरांंच्या शिक्षणासाठी
फॅक्टरी,आॅफिसात
कणकण झिजणारा
पोटभर मिळावी त्यांना
भाकरी यासाठी
मातीत मळणारा
दूध-दुभत्यांनी व्हावं
लहानग्यांचं पोषण म्हणून
शेण-घाण उपसणारा
हौसमौज चिमुरड्यांची
भागवणं हे
आपलं जन्मसिद्ध कर्तव्य म्हणून
कारखान्यात पत्र्याच्या छताखाली जळणारा
उसणे,मागून,कर्जाऊ,भिक्षून
अाणि क्वचित उचलेगिरी,चोरी,
दरोडा,धाक-दादागिरी करूनही
कुणी बाप जमवत असतो
पै-पै आपल्या लेकरांसाठी
नसेल त्याच्या पायाखाली वीट
किंवा नसतील त्याचे कमरेवर हात
म्हणून काय तो विठ्ठल नाही?
आणि नऊ महिने पोटात वागवून
जन्मावेळी मरणयातना सोसून
जन्मानंतरही कित्येक दिवस
पाजण्यासाठी स्वत:च्या
रक्ताचं दूध करून
प्रसंगी स्वत: उपाशी राहून
चिऊकाऊचा घास
बाळाला भरवणारी
त्याचं दुखणं-खुपणं निस्तरणारी
काळजाच्या तुकड्याप्रमाणं जीव लावणारी
मुलाची हौसमौज पुरवताना
बापाची बोलणी आणि
मारही खाणारी
आलेल्या शिदोरीतील
घास-घास बाळांना वाटणारी आई
अंगावर भरजरी शेला नाही
म्हणून
ऐटीत उभी नाही म्हणून
काय ती रखुमाई नाही?
ही जितीजागती दैवतं
सोडून खरंच कुणालाही
गरज नाही
विठ्ठल-रखुमाईच्या पूजेसाठी
घराबाहेर जाण्याची.
. *रमेश*
[7/25, 12:29 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: तुझ्यासारख्या गंधफुलांनी
फुलला माझा मळा ॥
सखे गं हळूच खुड मंजुळा ॥धृ॥
मिरगाची पेरणी साधली
रिमझिम पाऊस आला खाली
धरती हिरवा शालू ल्याली
थेंब दवाचा तुझिया गाली
जीव तुझ्यावर खुळा ॥१॥
सखे गं...
वाऱ्यावरती पीक डोलते
तुरा शीरावर सहज तोलते
फांदीआडून फूल बोलते
तुझे नि माझे गुपित खोलते
कांदा भाजी मुळा ॥३॥
सखे गं...
सुगी खळ्यावर भरल्या राशी
बाळगलेले स्वप्न उराशी
तूही अल्लड हसून जराशी
खेटून लाजत माझ्यापाशी
दाटून आला गळा ॥३॥
सखे गं...
. *रमेश कुरलीकर*
पोळा २ : चंद्रकांत निकाडे
🐂🐂 *बेंदूर* 🐂
(पूर्वी बैल हा शेतकरी जीवनाचा अविभाज्य घटक होता.
या सणाच्या दरम्यान शेतीच्या कष्टाची/मशागतीची कामे जवळ जवळ पूर्ण होतात. आपल्या कष्टाचा वाटेकरी म्हणून शेतकरी त्याचा सन्मान करतात.
त्याला न्हाऊमाखू घालतात. ज्यांच्याकडे सजीव बैल नसतात ते लोक मातीच्या बैलांची पूजा करतात.
कुंभार समाजातील लोक घरोघरी मातीचे बैल पुरवतात. काही विशिष्ट समाजातील लोक घरादाराला, शेतीऔजारांना तोरण बांधण्यासाठी पिंपळपानाच्या फांद्या व सुमन नावाच्या गवतापासून वळलेली दोरी देतात. शेतकरीही आपल्या आनंदात सहभागी झाले म्हणून या लोकांना सुपभर धान्य, पोळी,चकली,कडबोळी असा नैवेद्य देतात. त्यास *ब्यारा* म्हणतात.)
दुपारी कर तोडण्यासाठी तिकटीवर गर्दी व्हायची.यावेळी गावातल्या अस्सल खोंडामध्ये चुरस असायची. कर म्हणून एखादी फेसाटी(पेरणी वेळी पेरलेले दाणे झाकून जावेत म्हणून व कोळपणी नंतर मातीत बुजलरले अंकुर उघडे व्हावेत यासाठी शेतात फिरवण्यासाठी मेंदी,घाणेरीच्या फांद्या जोडून तयार केलेले अवजार. अनेकदा *फेसाटी* हा शब्दप्रयोग कथा, कादंबरीत वाचायला मिळतो. तो शब्द वरील वर्णनातील फेसाटीवरूनच घेतलेला असावा.
फेसाटी शेतात फिरवताना फिरवणाऱ्यास अनाठायी वावरभर फिरावे लागते. ओली माती लागून ती कधीकधी इतकी जड होते की, ओढणारा थकून जातो. म्हणून ग्रामबोलीत "माझी फेसाटी करू नका","माझी फेसाटी झाली." असे शब्दप्रयोग रूढ झाले आहेत.)
उभी केली जायची. एक एक खोंडाला मालक थोड्या अंतरावरून पळवत आणून, उडी घेऊन ही फेसाटी ओलांडायला लावत. यावेळी फेसाटीला पायांचा स्पर्श होणारा खोंड पुढच्या फेरीसाठी बाद ठरत असे. प्रत्येक वेळी फेसाटी थोडी थोडी उंच धरली जाई. एका अर्थाने ही बैलांसाठी उंच उडीची स्पर्धा असे. काही वेळा हीच फेसाटी आडवी ठेवली जाई आणि लांब उडीची स्पर्धा होत असे. जिंकणाऱ्या खोंडाला मिरवणुकीत पहिला मान दिला जात असे.
संध्याकाळी मुख्य बैलांची मिरवणूक निघण्याआधी आमची चिल्यापिल्यांची मातीच्या बनविलेल्या, तालमीत ठेवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यासाठी धडपड चालू होई.
या जोडीची एखाद्या छकड्यात बसवून हलगी, कैताळ, घुमक्याच्या तालावर मिरवणूक काढायची.
काही सधन शेतकरी खास बेंदूरातील मिरवणुकीत मान मिळविण्यासाठी बैलजोडीची बडदास्त ठेवत असत.
मुख्य मिरवणूक बराच वेळ चालत असे. आम्ही थकून भूक लागल्यावर घराकडे धूम ठोकत असू.
दुसऱ्या दिवशीपासून देव्हाऱ्यात पुजलेले मातीचे बैल घेऊन आमचा कर तोडण्याचा खेळ, मिरवणुकीचा खेळ आठवडाभर चालत असे.
हल्ली अस्सल बैलांची संख्या रोडावली. दारोदारी शेतोशेती मशागतीसाठी ट्रॅक्टर आले आणि हळूहळू गावगाड्यातल्या बैल सजविण्याच्या, कर तोडण्याच्या, मिरवणुकीच्या गोष्टी तुरळक आणि पुसट होत गेल्या.
काळ बदलला. हल्ली ट्रॅक्टर सुलटा-उलटा पळविण्याच्या स्पर्धा होतात.पण साजिवंत बैलांच्या मिरवणूक व स्पर्धेतील मजा त्यात नाही येत. आणखी काही काळ लोटल्यावर तर केवळ कथा-गितातूनच ही मजा सांगावी लागेल.
बैलपोळा एक : चंद्रकांत निकाडे
🐂🐂 *बेंदूर* 🐂🐂
आमच्या गावी देशी (महाराष्ट्रीय) बेंदूर साजरा करण्याची प्रथा आहे, आणि त्याअगोदर २७ दिवस कर्नाटकी (कोकणा) बेंदूर व्हायचा. शेजारच्या गावामधून हा साजरा केला जायचा. दुसऱ्या दिवशी शेजापाजारचे मांसाहरी लोक ठेवणीतले कपडे लेवून, सज्ज होऊन बाहेर पडायचे. आमच्या शेजारी लखूनाना राहायचा. त्याची एक वेगळीच स्टाईल होती.तो पाहुण्यांकडं जाताना नवा सदरा अंगात घालायचा, पण पंचा(धोतर) कधीही नेसायचा नाही. धोतराची घडी करून खांद्यावर टाकायचा. पाहुण्यांचे गाव जवळ आले की स्टँडवर उतरून पंचा नेसायचा नि ऐटीत जायचा.
गावात कुणी विचारलं तर म्हणायचा ,"पावण्यानं सांगितलंय बेंदरीला जेवायला. (बेंदुराचा दुसरा दिवस-या दिवस मांसाहारी जेवण असते.) येतो जरा जाऊन." त्यामुळं आम्हाला आमच्या गावातील बेंदराची चाहूल लागायची.
कधी पावसाला सुरवात झालेली असायची, कधी नसायची.
शनिवारी,रविवारी आम्ही मित्रमंडळी गोणपाटाचं पोतं घेऊन बाहेर पडायचो. थेट तांबड्या मातीचं वारूळ शोधत. दुपार उलटून जायची घरी परतायला. तहान-भूक भरलेली असायची. ते पोतं कोणाला न सांगता तालमीत नेऊन ठेवायचं.
घासभर खाऊन पुन्हा तालमीत. चिखल मळून घ्यायचा. सांजच्याला वस्ताद आले की बैल बनवायला सुरवात करायची. भली मोठी कंबरेइतकी उंच बैलजोडी. गळ्यात व अंगावर डाळी,तांदूळ,धान्ये यांची सजावट करायची. शिंगात खडुगळी(गोड चकल्या) डोळ्यांच्या जागी काचेच्या गोट्या घातलेल्या असायच्या.
बेंदराच्या अगोदर घराघरांत चकल्या, कडबोळी,खिचडा बनविण्याची तयारी चालू असायची.आधल्या रात्री जनावरांची शिंगे रंगविली जायची.बरेच लोक आॅईल पेंटने रंगवताना असत. काही लोक दुकानातून चार-आठ आण्यांची लाल रंगाची माती - त्याला हुरमुंज म्हणत - तेलात मिसळून लावत असत.
आमची आजी कधी हुरमुंज आणायलाही पैसे द्यायची नाही. ती म्हणायची,"आपली रेडी गाभण हाय. लई नटवली तर दृष्ट लागंल कुणाची तरी." आणि प्रत्येक वर्षी चार-पाच म्हैशीतली एखादी तरी गाभण असायचीच . आजीला तेवढंच फावायचं.
मग दादा घरातल्या मडक्यातला थोडा चुना नारळाच्या करवंटीत घेऊन पाणी मिसळून लावायचा म्हैशींच्या शिंगांना. कसातरी दिवसभर टिकायचा. पावसाच्या पाण्यानंही कधी धुतला जायचा तेही कळायचं नाही.
बेंदराची सकाळ उजाडायची ती गोठ्यातच.ओढ्यावर बैल, गायी व म्हैशी धुण्यासाठी न्यायला झुंबड उडालेली असायची.
धुतलेल्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या बैलांच्या अंगावर हळद, कुंकू, हुरमुंजाच्या रंगानं भेंडी, बोटे, हाताचे पंजे यांनी नक्षी काढली जायची.
त्यानंतर घराच्या दरवाजांना, शेतीतील मशागतीसाठी उपयुक्त औजारांना पिंपळ किंवा आंब्याच्या झाडाच्या पानांचे तोरण बांधण्याची लगबग सुरू व्हायची.त्या अवजारांची सफाई व्हावी हाच मुख्य उद्देश असायचा.
(पूर्वी बैल हा शेतकरी जीवनाचा अविभाज्य घटक होता.
या सणाच्या दरम्यान शेतीच्या कष्टाची/मशागतीची कामे जवळ जवळ पूर्ण होतात. आपल्या कष्टाचा वाटेकरी म्हणून शेतकरी त्याचा सन्मान करतात.
त्याला न्हाऊमाखू घालतात. ज्यांच्याकडे सजीव बैल नसतात ते लोक मातीच्या बैलांची पूजा करतात.
कुंभार समाजातील लोक घरोघरी मातीचे बैल पुरवतात. काही विशिष्ट समाजातील लोक घरादाराला, शेतीऔजारांना तोरण बांधण्यासाठी पिंपळपानाच्या फांद्या व सुमन नावाच्या गवतापासून वळलेली दोरी देतात. शेतकरीही आपल्या आनंदात सहभागी झाले म्हणून या लोकांना सुपभर धान्य, पोळी,चकली,कडबोळी असा नैवेद्य देतात. त्यास *ब्यारा* म्हणतात.)
दुपारी कर तोडण्यासाठी तिकटीवर गर्दी व्हायची.यावेळी गावातल्या अस्सल खोंडामध्ये चुरस असायची. कर म्हणून एखादी फेसाटी(पेरणी वेळी पेरलेले दाणे झाकून जावेत म्हणून व कोळपणी नंतर मातीत बुजलरले अंकुर उघडे व्हावेत यासाठी शेतात फिरवण्यासाठी मेंदी,घाणेरीच्या फांद्या जोडून तयार केलेले अवजार. अनेकदा *फेसाटी* हा शब्दप्रयोग कथा, कादंबरीत वाचायला मिळतो. तो शब्द वरील वर्णनातील फेसाटीवरूनच घेतलेला असावा.
फेसाटी शेतात फिरवताना फिरवणाऱ्यास अनाठायी वावरभर फिरावे लागते. ओली माती लागून ती कधीकधी इतकी जड होते की, ओढणारा थकून जातो. म्हणून ग्रामबोलीत "माझी फेसाटी करू नका","माझी फेसाटी झाली." असे शब्दप्रयोग रूढ झाले आहेत.)
उभी केली जायची. एक एक खोंडाला मालक थोड्या अंतरावरून पळवत आणून, उडी घेऊन ही फेसाटी ओलांडायला लावत. यावेळी फेसाटीला पायांचा स्पर्श होणारा खोंड पुढच्या फेरीसाठी बाद ठरत असे. प्रत्येक वेळी फेसाटी थोडी थोडी उंच धरली जाई. एका अर्थाने ही बैलांसाठी उंच उडीची स्पर्धा असे. काही वेळा हीच फेसाटी आडवी ठेवली जाई आणि लांब उडीची स्पर्धा होत असे. जिंकणाऱ्या खोंडाला मिरवणुकीत पहिला मान दिला जात असे.
संध्याकाळी मुख्य बैलांची मिरवणूक निघण्याआधी आमची चिल्यापिल्यांची मातीच्या बनविलेल्या, तालमीत ठेवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यासाठी धडपड चालू होई.
कवित ६ ते १२ : रमेश कुरलीकर
[7/28, 10:50 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: कोरे कोरे छान
कागदाचे पान
दादा मला एक वही आण
वहीला कव्हर पानावर फुलांचे
लक्ष त्याच्याकडे सर्व मुलांचे
मीही त्यात लिहीन हरपून भान ॥१॥
निळ्या निळ्या रेषांची मला प्यारी वही
शुभ्र कागदाची अशी कुणाकडे नाही
सारे तिला देतील राणीचा मान ॥२॥
कथा आणि कविता वहीत लिहीन गोडगोड गाणे मी आवडीने गाईन
वहीच होईल माझी साहित्याची खाण ॥३॥
© *अनुतनय*
[7/29, 1:11 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: पाऊस वारा या जलधारा
तुझ्या बटांतून निथळती
थेंब टपोरे माणिक मोती
गालावरच्या तुझ्या खळीला
बघ लाली तेव्हा आली होती
होती सांज मंद अनावर
आणि हळवे गीत कुणाचे
तू गाताना मीही क्षणभर
हरवून गेलो साऱ्या वाटा
त्या वाटांचे गाणे मनभर
मनभर वारा आणि गाणे
घेऊन फिरतो मीही वेडा
शोधीत वाटा रानफुलांच्या
सापडते सारे अचानक
गुंत्यामधुनी तुझ्या बटांच्या
. © *रमेश कुरलीकर*
[7/29, 11:20 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: . *काव्यसंगत*
काव्य माझे जीवन
जीवनात काव्य माझ्या
कवी कवयित्री सखे
जिवाभावाचा संग लाभे
त्यांच्या संगतीने सदा
हरतोय सर्व दु:खे
. *रमेश*
[7/30, 8:26 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: कधी ऊन वारा
नभी चंद्र तारा
हा सोहळा श्रावणाचा
नदी गीत गाते
पिके छान शेते
आधार या जीवनाचा
. *रमेश*
[7/30, 10:59 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: . षटकोळी -१
. *काव्यसंगत*
काव्य माझे जीवन
जीवनात काव्य माझ्या
कवी कवयित्री सखे
जिवाभावाचा संग लाभे
त्यांच्या संगतीने सदा
हरतोय सर्व दु:खे
. *रमेश*
चंद्रकांत निकाडे,पोहाळे.
. षटकोळी -2
. *आधार या जीवनाचा*
कधी ऊन वारा
नभी चंद्र तारा
हा सोहळा श्रावणाचा
नदी गीत गाते
पिके छान शेते
आधार या जीवनाचा
. *रमेश*
[8/4, 7:27 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *ताकद शब्दांची*
दोस्त(उभयवचन,लिंग)
तुझ्या शब्दांतच
हवी इतकी ताकद
वाचकांच्या चक्षूंसमोर
राहिलं पाहिजे उभं चित्र
आणि
गहिवरले पाहिजे अंतकरण
निष्ठुराचेही
हृदय पिळवटून योग्य भावबंधासह
रसांचा परिपोष शब्दाशब्दांतून इतका निथळला पाहिजे की
आठवणच नये होऊ
इतर माध्यमांची
चित्र समजत नाही म्हणून कविता
की
काव्यातील दुर्बोधता झाकण्यासाठी चित्र?
समांतरणच असेल करायचं तर
एका वेळी एकाच रंगशब्दमंचावर हवं असं की
रेलगाडीचे समांतर रूळ
वाचक/दर्शनार्थी यांची भंबेरीच उडायला पाहिजे सर्वोत्तम निवडताना
वाचताना नुसता शब्दांच्या महापुरात घुटमळला पाहिजे आत्माही
तसा रंगांच्या महासागरातही विरघळला पाहिजे
दोस्त
आणखी एक
मला हवी तुमच्याकडून
अशी जादूमय गुंफण शब्दांची
मीच जावा स्वत:ला हरवून वर्तमान,भूत आणि भविष्यातील व्यथा-चिंता, सुख-दुःख:, याग-यातनांसह
किंवा
व्हायला हवा साकार
असा रंगांचा माहौल
होईल एकरूप त्यात
अनंतकाळ अंतराळात तरंगणारा आत्मा त्रिशंकू अाणि माझाही
मी एक
तुमच्या शब्दांवर
तथा रंगांवरही
स्वतंत्र-स्वतंत्र
जीव ओवाळणारा
रसिक.
. *रमेश*
[8/5, 9:07 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: मित्रहो!
नाही माझा विश्वास देवावर
पण माणसांतल्या देवत्वावर
नक्कीच आहे
म्हणून
तुम्ही माझ्यासाठी
जे काही चिंतता
व पाठवता
ते चांगलेच असणार
या माझ्या दृढविश्वासाला
नेहमीच दुजोरा मिळत गेला
तेव्हापासून माझ्याही अंगावर मूठमूठ मांस चढत गेलं.
मुळीच फिकिर नको
पुनर्जन्मावर तसाच
कोणत्या झाडाला सात फेरे घालून पुढील सात जन्मात मिळतील हेच मित्र यावर माझा विश्वास नाही
तरीही
तुमच्या आठवणींसाठी
प्रत्येक वर्षी मी लावणार आहे माझ्या शेताच्या बांधावर सात-सात झाडे.
ती हमखास सावली देतील
वार्धक्याच्या काळी
आणि फुलं- फळं
आपणा सर्वांची
प्रेमळ याद !
. *रमेश*
टोपणनामपुराण : चंद्रकांत निकाडे
. *टोपणनाम पुराण*
(लेखनासाठी टोपणनाव का घेतले गेले? का घेतले जाते? त्यास काही अर्थ असतो का?टोपणनाव घेण्याची कारणे कोणती? या प्रश्नांची उकल करण्याचा छोटासा/संक्षिप्त प्रयत्न.)
'हे काय पुराण आहे.' असे न म्हणता थोडं समजून घेऊ.
मौखिक परंपरेने साहित्याचे आदान-प्रदान होत असलेल्या काळात *मक्ता* प्रचलित होता.आपली कथा, कविता,नाटक, निबंध, वात्रटिका, अभंग, अोवी, भारूड, गवळण, पोवाडा, फटका किंवा अन्य साहित्य लिहिल्यानंतर ते आपलेच आहे हे वाचकाला ओळखता यावे यासाठी
अभंग, ओवी, गझल, भारूड, फटका यामधून पुढीलप्रमाणे रचनाकार आपले नाव त्यात गुंफता असत त्यालाच मक्ता असे म्हणतात.
' *नामा* म्हणे जगजेठी। भक्तपुंडलिकासाठी॥ उभा तू प्रसंगा ॥॥
' *तुका* म्हणे तुज । सोडविला कोणी ॥ एक चक्रपाणी ।॥ वाचुनिया ॥॥'
' *ज्ञानदेव* म्हणे । व्यासाचिये खुणा ॥ द्वारकेचा राणा ।॥ पांडवाघरी ॥॥'
' *एका* जनार्दनी । भोग प्रारब्दाचा ॥ हरीकृपे त्याचा ।॥ नाश होय ॥॥'
'आठवुणी हैदर गुरीजींला, *उमाजी* गातो पवाड्याला जी रं जी ॥'
संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत एकनाथ, शाहीर उमाजी सरनाईक यांनी आपल्या रचनेत अशा प्रकारे मक्ता गुंफल्याचे पाहावयास मिळते.
मुद्रणकलेचा शोध लागला. ती कला अस्तेअस्ते धूळपाटी, दगड, मातीच्या विटा, ताडपत्र, भूर्जपत्र, ताम्रपत्र, कापड, कागद
अशा माध्यमातून विकसित होत गेली आणि मक्त्याऐवजी रचनेखाली आपले नाव लिहायला किंवा साक्षरी करायला सुरवात केली.
आणि त्यातूनच आपले लेखन लोकांपर्यंत पोहचावे पण ओळख होऊ नये यासाठी प्रचलित नावाऐवजी एखादे दुसरेच एकशब्दी किंवा द्विशब्दी नाव लिहिण्यास सुरवात झाली. या नावालाच *टोपणनाव* असे म्हणतात.
हे टोपणनाव घेऊन लिहिण्याची अनेक कारणे आहेत.
*क* ) अगदी सुरवातीच्या काळात नावात कमीतकमी शब्द असावेत या हेतूने टोपणनाव धारण केले असावे.
*नामा,तुका,जनी,ज्ञानदेव*
*ख*) पुढील काळात आपल्या ज्ञातीचे/समूहाचे/ नाव कळू नये यासाठी रचनाकारांनी अशा टोपणनावांचा आधार घेतला असावा.
*ग*) स्वातंत्र्यपूर्व काळात युवकांना गुलामगिरीविरुद्ध चेतवण्यासाठी देशप्रेमाने भारलेले काव्य साकारू लागले. असे काव्य वाचून-ऐकून-गाऊन किंवा स्वातंत्र्याचा अट्टाहास धरणारे लेख, कथा, वर्तमानपत्रातील सदरे वाचून तरूण स्वातंत्र्याबाबत जागृत होऊ लागले. तेव्हा असे कवी-लेखक इंग्रजांना राजद्रोही वाटू लागले. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन खटले भरले गेले. या गुन्ह्याच्या व खटल्यांच्या कटकटीतून स्वत:ला सुरक्षीत राहून स्वातंत्र्याचे कार्य निर्धोकपणे पुढे चालू ठेवता यावे यासाठी टोपणनावाचा आधार घेतला गेला.
*घ*) आपले लेखन हे एखाद्याच्या प्रेरणेतून किंवा आशीर्वादाने घडत आहे. किंबहुना आपले जीवन घडण्यासाठी आपल्या गुरूंचे खूप योगदान आहे. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या टोपणनावात अशा आदरणीय व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला गेला.
*एका जनार्दनी,आठवुनी हैदर गुरुजींला*
*च*) काही व्यक्तींनी आपले भवितव्य व जीवन घडण्यासाठी अनमोल सहकार्य केलेले असते. याची जाणीव म्हणून त्या व्यक्तींच्या नावाशी आपले नाव किंवा नाते जोडून टोपणनाव धारण केले जाते.
*कुसुमाग्रज,अनुतनय,चंद्रकुमार,केशवसुत,गोविंदाग्रज,रत्नाकर*
*छ*) काही व्यक्ती लाजाळू असतात. त्यांना आपल्या रचना इतरांपर्यंत पोहोचवायच्या असतात, पण आपल्या मूळ नावाची गुप्तता ठेवून. अशावेळी मूळ नावाशी दुराण्वयेही संबंध नसणारे टोपणनाव स्वीकारले जाते.
*ज*) तसेच काही रचनाकार भित्रे असतात, रचना उत्तम असतानाही त्यांना आत्मविश्वासाच्या अभावामुळे स्वत:चे नाव लावायचे धाडस होत नाही. टोपणनावाचा आधार घेऊन त्या रचना प्रसिद्ध करतात व तटस्थपणे प्रतिक्रिया अजमावत असतात.
*छ*) कधीकधी सहज वेगळेपण म्हणूनही टोपणनाव स्वीकारले जाते. अनेक लेखनप्रकारात लिहिणारे. प्रत्येक साहित्य प्रकारासाठी वेगळे टोपणनाव निवडतात.
*ट*) काही संपादक संकुचित वृत्तीने ठरावीक ज्ञातीच्या रचनाकारांचेच साहित्य प्रसिद्धीसाठी निवडत असत, त्यांना वळवण्यासाठी; त्यांच्या आवडीच्या नावाशी साधर्म्य असणारे टोपणनाव निवडल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात.
*ठ*) विनोदी/चावट/अश्लील लेखन करणारे सर्रास टोपणनावाआडून लेखन करतात.
*ड*) ज्यांच्या लेखनास घरातून/स्वजनांकडून विरोध असतो, ते लोक टोपणनावाने लेखन पाठवून लेखनाची हौस पूर्ण करत असतात.
*ढ*) काही लोक प्रिय व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी टोपणनाव धारण करतात.
*ण*) स्त्रीवादी लेखन करणाऱ्या काही विद्वानांनी व पुरूषवादी लेखन करणाऱ्या काही विदूषींनी त्या साहित्य प्रकारासाठी साजेसे टोपणनाव घेऊन आपले लेखन समाजमनात यशस्वीपणे रूजविले आहे.
*॥ इतिश्री टोपणनाम पुराण अपूर्णम ॥*
© Chandrakant
(ता.क. *जाणत्यांनी अधिक भर घालावी*)
मराठी कविता : १ ते ५
[8/21, 1:57 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: जिचे बोल खोलखोल
भान हरे गातागाता
काळजात करी घर
तिला म्हणावे कविता ॥धृ॥
अंकुरले रोप जसे
काढी भुईतून मान
वर नाजूक पालवी
तळी जडशीळ पान
. अलगद उमलते
येते वेलीवर कळी
सान बाळाच्या गालात
खुले सहजच खळी
भरे वाटेतील खोली
पाटपाणी जाताजाता ॥१॥
काळजात करी घर
तिला म्हणावे कविता
जिचे रूप थंडगार
भासे झऱ्यातले पाणी
खलखळ नाद करी
जशी मैना गाई गाणी
उगवता रविबिंब
लख्ख उजेड पडावा
चराचर उजळून
जीव सहज जडावा
भर उन्हात सावली
देई विसावा पांथस्था ॥२॥
काळजात करी घर
तिला म्हणावे कविता
© *रमेश*
[8/21, 11:34 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: आजी
जिथे आजी तिथे घर
बाकी इमारती सा-या
तिला सोडून एकटे
लोक करतात वा-या
आजी विठूचे राऊळ
आणि पंढरीची वाट
भाव हृदयी शीतल
वसे चंद्रभागा काठ
आहे दैवत देवांचे
धूळ चरणाची बुका
डोईवरचा पदर
असे भगवी पताका
घडे सहजी दर्शन
दंडवत तिला एक
त्याच अखंड विश्वाला
प्रदक्षिणा होती लाख
[8/26, 12:48 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *प्रिय ताईंनो!*
अनिष्ट रूढी-परंपरांच्या कचाट्यातून
बाहेर पडण्याचे
आणि केवळ स्वत:ला सबल समजून अन्याय-अत्याचार करणाऱ्या
पुरुष जातीच्या हुकूमशाहाशी
दोन हात करण्याचे
सामर्थ्य जागृत होऊ दे (आहेच तुमच्या नसानसातून ते त्याची आठवण राहू दे)
आजकाल मानवी वस्तीतही आढळणाऱ्या हिंस्र श्वापदांची
नखे आणि दात काढण्याची कला
विकसित होवो
संकटापेक्षा
भीती आणि न्यूनगंडाचे
असलेले प्राबल्य
जळून खाक होवो
जिजाऊ, सावित्रीच्या
लेकी म्हणून
राष्ट्रपुरुष घडवण्याचा
मान-सन्मान मिळवत असतानाच
सुनिता, कल्पना, आशा, पी टी उषा आणि मेरी कोमबरोबरच राहींनासुद्धा
आपल्या पंखातील शक्तीची जाणीव करू द्या
जेणेकरून या युगात
कुणा कृष्णाची
वाट नाही पाहावी लागणार
ऐनवेळी
आपला हाथ जगन्नाथ
या न्यायाने
जीवनातल्या प्रत्येक संकटाशी लढण्याची जिद्द
आणि आत्मविश्वास वाढू दे
तुमच्याही लेकी-सुना
नव्या शतकाच्या उंबरठ्यावर
विश्वकल्याणाच्या भागीदार बनण्यासाठी अवतरू देत
(त्यांच्या वाटेवर स्वजातीचेच अडसर फार असतात म्हणे)
तुम्हांपैकी असा अडसर
कुणीही असणार नाही
ही अपेक्षा
आणि रक्षाबंधनाची ओवाळणी
. © *रमेश कुरलीकर*
[8/27, 7:29 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: मन उदास उदास
तुझी आठवण येता
मन पाखरू पाखरू
फुले भवती दिसता
मन हलके हलके
ढग वाऱ्यावर डोले
मन पावसाची सर
चिंब मातीगत ओले
मन घायाळ घायाळ
भेट संपता अखेरी
मन गहिरे गहिरे
आठवणींची शिदोरी
मन इंद्रधनुष्याचे
कडे अर्धगोल सदा
कधी होईल वर्तुळ
जाणे राम जाणे खुदा
.© *रमेश*
[8/30, 11:31 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: . *पेट्रोयचे भाव*
पेट्रोयचे भाव असे
गगनाले भिडले
माझ्या शेजाऱ्याने तवा
नवे घोडेच काढले
त्यावर बसून ते
हापीसाला जाई
घोडा मस्त बागेत
फिरून गवत खाई
एक दिवस घोड्याने
पेट्रोयपंप पाह्यला
माणसांची रांग पाहून
थितच उभा राह्यला
मालक म्हणे बे
चल घराकडं
आता मले घ्यायचं
हाय तीर्थ थोडं
थो म्हणे मालकाले
घे डब्बल घोडा
मले दे पाह्यजे तेवढा
तू पी थोडा
तो म्हणला घोड्याचं
एक दिस ऐकून
घेऊ ना आनुभाव
काय व्हते पाहून
दोघांनी अर्धा अर्धा
डबल घोडा मारला
तवा घोडा येताना
ठेसनात शिरला
म्हणे मले हवी एक
बायको काठेवाडी
त्याबिगार नाय मी
सोडन माही गाडी
. © *रमेश*
Missprint 23 to 26
[8/28, 12:20 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔴 *23*/25-8-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(करमणुक) = करमणूक
(करविर) = करवीर
(करीता) = करिता (अव्यय)
(करूण) = करुण (विशेषण)
(करुन) = करून(क्रियापद)
(कर्जाउ) = कर्जाऊ
(कर्तुत्व) = कर्तृत्व
(कर्तृत्त्व) = कर्तृत्व
(कर्पुर) = कर्पूर
(कलंकीत) = कलंकित
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
[8/28, 12:32 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔴 *24*/28-8-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(कलाबूत) = कलाबतू
(कलीयुग) = कलियुग
(कवयत्री) = कवयित्री
(कवयीत्री) = कवयित्री
(कवीता) = कविता
(कवि) = कवी
(कशीदा) = कशिदा
(काजी) = काझी
(काटकोण) = काटकोन
(कापुर) = कापूर
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
[8/29, 7:33 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔴 *25*/29-8-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(काफीला) = काफिला
(कामीनी) = कामिनी
(कायदेशिर) = कायदेशीर
(कायीक) = कायिक
(कारकीर्द) = कारकिर्द
(कारखाणीस) = कारखानीस
(कारागीरी) = कारागिरी
(कारागिर) = कारागीर
(कारून्य) = कारुण्य
(कार्बुरेटर) = कार्ब्युरेटर
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
[8/30, 7:43 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔴 *26*/30-8-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(कार्यकारीणी) = कार्यकारिणी
(कार्यालयिन) = कार्यालयीन
(काल्पनीक) = काल्पनिक
(कासाविस) = कासावीस
(काहितरी) = काहीतरी
(काळाकुट) = काळाकुट्ट
(काळीमा) = काळिमा
(काळिज) = काळीज
(किंतू) = किंतु(अव्यय)
(किंतु) = किंतू (शंका)
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
Missprints 17 to 23
[8/19, 10:48 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *17*/20-8-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(इद) = ईद
(इश्वर) = ईश्वर
(इशान्य) = ईशान्य
(इर्षा) = ईर्षा
(इर्ष्या) =ईर्ष्या
(ईकडे) = इकडे
(इब्रत) = इभ्रत
(इरजिक) =इर्जिक
(इस्तरी) =इस्त्री
(ईंधन) = इंधन
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. Chandrakant
क्रमशः
[8/21, 7:20 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *18*/21-8-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(उकीरडा) =उकिरडा
(ऊग्र) = उग्र
(उच्चनिचता) =उच्चनीचता
(उच्चारीत) =उच्चारित
(उज्वल) =उज्ज्वल
(उडाणटपू) =उडाणटप्पू
(उणिव) =उणीव
(उतराइ) =उतराई
(उतारु) =उतारू
(उत्कृष्ठ) =उत्कृष्ट
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
[8/22, 7:12 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *19*/22-8-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(उत्तरदायीत्व) =उत्तरदायित्व
(उत्तरदायि) =उत्तरदायी
(उत्साहीत) =उत्साहित
(उदसिकरण) =उदासीकरण
(उदासिनीकरण) =उदासीनीकरण
(उदिम) =उदीम
(उद्दीष्ठ) =उद्दिष्ट
(उधृत) =उद्धृत
(उध्वस्त) =उद्ध्वस्त
(उध्दट) = उद्धट
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
[8/23, 7:22 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔴 *20*/23-8-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(उध्दव) = उद्धव
(उधृत) = उद्धृत
(औद्योगिकरण) =उद्योगीकरण
(उपहार) =उपाहार
(अपेक्षीत) =अपेक्षित
(उपराटा) =उफराटा,उरफाटा
(ऊबदार) = उबदार
(उलाघाल) =उलघाल
(उशिर) = उशीर
(उशीरा) =उशिरा
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
[8/24, 9:46 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔴 *21*/24-8-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(ऊष्णता) = उष्णता
(उठबस) = ऊठबस
(उनपाऊस) = ऊनपाऊस
(उन) = ऊन
(उर्जा) = ऊर्जा
(उब) = ऊब
(उहापोह) = ऊहापोह
(उस) = ऊस
(उर्ध्व) = ऊर्ध्व
(उर्फ) = ऊर्फ
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
[8/25, 6:46 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔴 *22*/25-8-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(उनाळा) = उन्हाळा
(कंजुस) = कंजूष
(कटु) = कटू (भावना,विचार)
(कडू) = कडू(चव)
(कंदिल) = कंदील
(कदाचित्) = कदाचित
(कधी तरी) = कधीतरी
(कनिष्ट) = कनिष्ठ
(कबूतर) = कबुतर
(कबूली) = कबुली
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
[8/27, 2:18 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔴 *23*/25-8-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(करमणुक) = करमणूक
(करविर) = करवीर
(करीता) = करिता (अव्यय)
(करूण) = करुण (विशेषण)
(करुन) = करून(क्रियापद)
(कर्जाउ) = कर्जाऊ
(कर्तुत्व) = कर्तृत्व
(कर्तृत्त्व) = कर्तृत्व
(कर्पुर) = कर्पूर
(कलंकीत) = कलंकित
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमश
Missprints 10 to 16
[8/10, 12:38 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵10/10-8-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
(अागाडा) = अघाडा
(अासमन्त) = आसमंत
(अन्याव) = अन्याय
(अघोचर) = अगोचर
(अभीमान ) = अभिमान
(आर्धा) = अर्धा
(आतुल) = अतुल
(आग्नी) = अग्नी
(आंदोलण) = आंदोलन
(आस्त) = अस्त
. Chandrakant
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
क्रमशः
[8/12, 1:43 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *11* /13-08-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(आटातटी) = अटातटी
(आनिकेत) = अनिकेत
(आकादमी) =अकादमी
(अाकांडतांडव) = अकांडतांडव
(अहींसा) =अहिंसा
(अबलक) =अबलख
(अनागोंधी) = अनागोंदी
(आशीयाना) = आशियाना
(अणु) = अणू
(आपरंपार) = अपरंपार
. Chandrakant
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
क्रमशः
[8/12, 10:48 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *11* /13-08-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(आटीतटी) = अटीतटी
(अंध:कार) = अंधकार
(आकादमी) =अकादमी
(अाकांडतांडव) = अकांडतांडव
(अंधुक) =अंधूक
(अंतरमुख) =अंतर्मुख
(अंतरीक्ष) = अंतरिक्ष
(अांतरीम) = अंतरिम
(अागापिछा) = अगापिछा
(आंबोळी) = अंबोळी
. Chandrakant
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
क्रमशः
[8/13, 12:03 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *12*/14-8-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(आवनी) = अवनी
(अग्नीकुंड) = अग्निकुंड
(अजस्त्र) = अजस्र
(अठ्ठावीसवा) = अठ्ठाविसावा
(अडिचसे) = अडीचशे
(अतिशोक्ती) = अतिशयोक्ती
(अतिंद्रिय) =अतींद्रिय
(अनाधिकृत) = अनधिकृत
(आनवाणी) = अनवाणी
(अनुकुलता) = अनुकूलता
. Chandrakant
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
क्रमशः
[8/15, 6:48 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *13*/15-8-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(आदबशीर) = अदबशीर
(अद्यावत) = अद्ययावत
(अधपात) = अध:पात
(आधिवेशन) = अधिवेशन
(आधीन) = अधीन
(अधुनमधून) =अधूनमधून
(अदेली) = अधेली
(अनाधिकृत) =अनधिकृत
(अनावधान) =अनवधान
(अनुकुलता) =अनुकूलता
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. Chandrakant
क्रमशः
[8/15, 11:26 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *14*/16-8-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(अनुभुती) = अनुभूती
(अनुवादीत) =अनुवादित
(अनुसुचीत) =अनुसूचीत
(अनुज्ञाप्ती) =अनुज्ञप्ती
(अनौपचारीक) =अनौपचारिक
(अन्नपुर्णा) =अन्नपूर्णा
(अपकिर्ती) =अपकीर्ती
(अपमानीत) =अपमानित
(अपराजीत) = अपराजित
(अपिल) =अपील
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. Chandrakant
क्रमशः
[8/16, 10:43 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *15*/17-8-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(अध्यात्मिक) =आध्यात्मिक
(अानंदाश्रु) =अानंदाश्रू
(आनंदीत) =आनंदित
(अनुवांशिकता) =आनुवांशिकता
(अमुलाग्र) =आमूलाग्र
(अविष्कार) =आविष्कार
(आशितोश) =आशुतोश
(अश्विन) =आश्विन
(असूर) =आसुर
(आसेतूहिमालय) =आसेतुहिमालय
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
[8/17, 1:08 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *16*/18-8-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
*(आशितोश) = आशुतोष*
*(असूर) =असुर*
*(आसूर) =आसुर*
(इंगीत) = इंगित
(इंग्लीश ) =इंग्लिश
(इंजिन) =इंजीन
(ईच्छा) =इच्छा
(इच्छूक ) =इच्छुक
(इत्यंभूत) =इत्थंभूत
(इष्ठ) =इष्ट
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे क
Missprints 1 to 9
[8/1, 2:23 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵01/31-7-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्याMissprint
. दुरूस्तीसह
(अन्) = *अन्* हा व्यंजनान्त अचूक आहे.(दुरूस्ती)
(आवांतर) = अवांतर
(अध्यात्मिक )=आध्यात्मिक
(अचानक्) = अचानक
(आभ्यास) = अभ्यास
(अपुर्व) = अपूर्व
(अपुर्ण) = अपूर्ण
(अतीशय) = अतिशय
(अंतर्देशीय) = अांतर्देशीय
(आर्शिवाद) = आशीर्वाद
(आशिर्वाद) = आशीर्वाद
. Chandrakant
क्रमशः
[8/1, 9:29 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *02*/01-8-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरूस्तीसह
(अन्) = *अन्* हा व्यंजनान्त अचूक आहे.(दुरूस्ती)
(आवांतर) = अवांतर
(अध्यात्मिक )=आध्यात्मिक
(अचानक्) = अचानक
(आभ्यास) = अभ्यास
(अपुर्व) = अपूर्व
(अपुर्ण) = अपूर्ण
(अतीशय) = अतिशय
(अंतर्देशीय) = अांतर्देशीय
(आर्शिवाद) = आशीर्वाद
(आशिर्वाद) = आशीर्वाद
. Chandrakant
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
क्रमशः
[8/2, 12:11 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *03* /02-7-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्याMissprint
. दुरूस्तीसह
(अवगड) = अवघड
(अराम) = आराम
(अच्चे) = अच्छे
(आकरा) = अकरा
(अचारी) = आचारी
(आठरा) = अठरा
(आत्ता) = आता
(अंथरुन) = अंथरूण
(अदा) = आदा
(अाण्णा) = अण्णा
. Chandrakant
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
क्रमशः
[8/2, 7:46 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *04* /03-7-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्याMissprint
. दुरूस्तीसह
(अनुसया) = अनसूया
(अकाडी) = आखाडी
(आवतार) = अवतार
(अाश्रू) = अश्रू
(अाजिव) = अाजीव
(अाजरामर) = अजरामर
(अजिर्ण ) = अजीर्ण
(आपघात) = अपघात
(अवगड) = अवघड
(आस्मीता) = अस्मिता
. Chandrakant
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
क्रमशः
[8/3, 7:51 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *05* /04-7-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरूस्तीसह
(अप्पा) = आप्पा
(अंकुर) = अंकूर
(अंजिर) = अंजीर
(असूर) = असुर
(आगडबंब) = अगडबंब
(आट) = आठ
(अादमाशे) = अदमासे
(अाशोक) = अशोक
(अमरण) = अामरण
(अगाऊ) = आगाऊ
. Chandrakant
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
क्रमशः
[8/6, 8:28 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *06* /06-7-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरूस्तीसह
(अाखिल) = अखिल
(अांगोळ) = अंघोळ
(अागणित) = अगणित
(अराध्य) = आराध्य
(अडी) = आडी
(अवधुत) = अवधूत
(अंशता) = अंशत:
(आस्त) = अस्त
(अंतयात्रा) = अंत्ययात्रा
(अंथरुन) = अंथरुण
. Chandrakant
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
क्रमशः
[8/6, 10:54 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *07* /07-07-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरूस्तीसह
(इज) = वीज
(ईशारा) = इशारा
(इश्वर) = ईश्वर
(इच्चा/इच्या) = इच्छा
(इट) = वीट
(इजार) = विजार
(इतभर) = वितभर
(इत्तर) = इतर
(ईमान) = इमान
(इर्षा) = ईर्षा
. Chandrakant
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
क्रमशः
[8/7, 8:43 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *07* /07-08-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरूस्तीसह
(आगोदर) = अगोदर
(अावात्न) = आवतान
(अश्लिल) = अश्लील
(अगणीत) = अगणित
(अापसुक) = अापसूक
(आकडू) = अाखडू
(आस्मादिक) = अस्मादिक
(अस्तिक ) = आस्तिक
(आबकारी ) = अबकारी
(अबाळ ) = आबाळ
. Chandrakant
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
क्रमशः
[8/8, 8:07 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *08* /08-07-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
(अच्छादन) = आच्छादन
(आनारोग्य) = अनारोग्य
(अपुलकी) = आपुलकी
(अल्हाद ) = आल्हाद
(अदमासे) = आदमासे
(आचानक) = अचानक
(अापहरन) = अपहरण
(अाक्षतारोपण) = अक्षतारोपन
(अनकुचीदार) = अणकुचीदार
(आरबाट) = अरबट
. Chandrakant
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
क्रमशः
[8/8, 9:00 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: 🔵 *09* /09-07-2018🔴
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
.
Poems
मन उदास उदास
तुझी आठवण येता
मन पाखरू पाखरू
फुले भवती दिसता
मन हलके हलके
ढग वाऱ्यावर डोले
मन पावसाची सर
चिंब मातीगत ओले
मन घायाळ घायाळ
भेट संपता अखेरी
मन गहिरे गहिरे
आठवणींची शिदोरी
मन इंद्रधनुष्याचे
कडे अर्धगोल सदा
कधी होईल वर्तुळ
जाणे राम जाणे खुदा
.© *रमेश*
इथे बंड आहे
तिथे षंढ आहे
तुला हरवाया
उभी झुंड आहे
करू एक यात्रा
नवा फंड आहे
उद्या घर सोडू
जरा खंड आहे
नको मन तोडू
हवा थंड आहे
कधी बघ डाका
कधी दंड आहे
. *रमेश*
जिचे बोल खोलखोल
भान हरे गातागाता
काळजात करी घर
तिला म्हणावे कविता ॥धृ॥
अंकुरले रोप जसे
काढी भुईतून मान
वर नाजूक पालवी
तळी जडशीळ पान
. अलगद उमलते
येते वेलीवर कळी
सान बाळाच्या गालात
खुले सहजच खळी
भरे वाटेतील खोली
पाटपाणी जाताजाता ॥१॥
काळजात करी घर
तिला म्हणावे कविता
जिचे रूप थंडगार
भासे झऱ्यातले पाणी
खलखळ नाद करी
जशी मैना गाई गाणी
उगवता रविबिंब
लख्ख उजेड पडावा
चराचर उजळून
जीव सहज जडावा
भर उन्हात सावली
देई विसावा पांथस्था ॥२॥
काळजात करी घर
तिला म्हणावे कविता
© *रमेश*
. *चूक*
चुकूनही चुकू नये
चुकलेले चूक शब्द
चुकीचाही चुकतोय
चुकारीने चोख शब्द
चुकताना चुका फार
चुके चुकीची वेलांटी
चुकचुकते चूकही
चुकी मारते कोलांटी
चुक्या चुकत चुकत
चुचकारतो चुकांना
चुका टाळून चुकीच्या
चक्क विसरतो काना
© *रमेश*
*प्रिय ताईंनो!*
अनिष्ट रूढी-परंपरांच्या कचाट्यातून
बाहेर पडण्याचे
आणि केवळ स्वत:ला सबल समजून अन्याय-अत्याचार करणाऱ्या
पुरुष जातीच्या हुकूमशाहाशी
दोन हात करण्याचे
सामर्थ्य जागृत होऊ दे (आहेच तुमच्या नसानसातून ते त्याची आठवण राहू दे)
आजकाल मानवी वस्तीतही आढळणाऱ्या हिंस्र श्वापदांची
नखे आणि दात काढण्याची कला
विकसित होवो
संकटापेक्षा
भीती आणि न्यूनगंडाचे
असलेले प्राबल्य
जळून खाक होवो
जिजाऊ, सावित्रीच्या
लेकी म्हणून
राष्ट्रपुरुष घडवण्याचा
मान-सन्मान मिळवत असतानाच
सुनिता, कल्पना, आशा, पी टी उषा आणि मेरी कोमबरोबरच राहींनासुद्धा
आपल्या पंखातील शक्तीची जाणीव करू द्या
जेणेकरून या युगात
कुणा कृष्णाची
वाट नाही पाहावी लागणार
ऐनवेळी
आपला हाथ जगन्नाथ
या न्यायाने
जीवनातल्या प्रत्येक संकटाशी लढण्याची जिद्द
आणि आत्मविश्वास वाढू दे
तुमच्याही लेकी-सुना
नव्या शतकाच्या उंबरठ्यावर
विश्वकल्याणाच्या भागीदार बनण्यासाठी अवतरू देत
(त्यांच्या वाटेवर स्वजातीचेच अडसर फार असतात म्हणे)
तुम्हांपैकी असा अडसर
कुणीही असणार नाही
ही अपेक्षा
आणि रक्षाबंधनाची ओवाळणी
. © *रमेश कुरलीकर*
. *टोपणनाम पुराण*
(लेखनासाठी टोपणनाव का घेतले गेले? का घेतले जाते? त्यास काही अर्थ असतो का?टोपणनाव घेण्याची कारणे कोणती? या प्रश्नांची उकल करण्याचा छोटासा/संक्षिप्त प्रयत्न.)
'हे काय पुराण आहे.' असे न म्हणता थोडं समजून घेऊ.
मौखिक परंपरेने साहित्याचे आदान-प्रदान होत असलेल्या काळात *मक्ता* प्रचलित होता.आपली कथा, कविता,नाटक, निबंध, वात्रटिका, अभंग, अोवी, भारूड, गवळण, पोवाडा, फटका किंवा अन्य साहित्य लिहिल्यानंतर ते आपलेच आहे हे वाचकाला ओळखता यावे यासाठी
अभंग, ओवी, गझल, भारूड, फटका यामधून पुढीलप्रमाणे रचनाकार आपले नाव त्यात गुंफता असत त्यालाच मक्ता असे म्हणतात.
' *नामा* म्हणे जगजेठी। भक्तपुंडलिकासाठी॥ उभा तू प्रसंगा ॥॥
' *तुका* म्हणे तुज । सोडविला कोणी ॥ एक चक्रपाणी ।॥ वाचुनिया ॥॥'
' *ज्ञानदेव* म्हणे । व्यासाचिये खुणा ॥ द्वारकेचा राणा ।॥ पांडवाघरी ॥॥'
' *एका* जनार्दनी । भोग प्रारब्दाचा ॥ हरीकृपे त्याचा ।॥ नाश होय ॥॥'
'आठवुणी हैदर गुरीजींला, *उमाजी* गातो पवाड्याला जी रं जी ॥'
संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत एकनाथ, शाहीर उमाजी सरनाईक यांनी आपल्या रचनेत अशा प्रकारे मक्ता गुंफल्याचे पाहावयास मिळते.
मुद्रणकलेचा शोध लागला. ती कला अस्तेअस्ते धूळपाटी, दगड, मातीच्या विटा, ताडपत्र, भूर्जपत्र, ताम्रपत्र, कापड, कागद
अशा माध्यमातून विकसित होत गेली आणि मक्त्याऐवजी रचनेखाली आपले नाव लिहायला किंवा साक्षरी करायला सुरवात केली.
आणि त्यातूनच आपले लेखन लोकांपर्यंत पोहचावे पण ओळख होऊ नये यासाठी प्रचलित नावाऐवजी एखादे दुसरेच एकशब्दी किंवा द्विशब्दी नाव लिहिण्यास सुरवात झाली. या नावालाच *टोपणनाव* असे म्हणतात.
हे टोपणनाव घेऊन लिहिण्याची अनेक कारणे आहेत.
*क* ) अगदी सुरवातीच्या काळात नावात कमीतकमी शब्द असावेत या हेतूने टोपणनाव धारण केले असावे.
*नामा,तुका,जनी,ज्ञानदेव*
*ख*) पुढील काळात आपल्या ज्ञातीचे/समूहाचे/ नाव कळू नये यासाठी रचनाकारांनी अशा टोपणनावांचा आधार घेतला असावा.
*ग*) स्वातंत्र्यपूर्व काळात युवकांना गुलामगिरीविरुद्ध चेतवण्यासाठी देशप्रेमाने भारलेले काव्य साकारू लागले. असे काव्य वाचून-ऐकून-गाऊन किंवा स्वातंत्र्याचा अट्टाहास धरणारे लेख, कथा, वर्तमानपत्रातील सदरे वाचून तरूण स्वातंत्र्याबाबत जागृत होऊ लागले. तेव्हा असे कवी-लेखक इंग्रजांना राजद्रोही वाटू लागले. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन खटले भरले गेले. या गुन्ह्याच्या व खटल्यांच्या कटकटीतून स्वत:ला सुरक्षीत राहून स्वातंत्र्याचे कार्य निर्धोकपणे पुढे चालू ठेवता यावे यासाठी टोपणनावाचा आधार घेतला गेला.
*घ*) आपले लेखन हे एखाद्याच्या प्रेरणेतून किंवा आशीर्वादाने घडत आहे. किंबहुना आपले जीवन घडण्यासाठी आपल्या गुरूंचे खूप योगदान आहे. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या टोपणनावात अशा आदरणीय व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला गेला.
*एका जनार्दनी,आठवुनी हैदर गुरुजींला*
*च*) काही व्यक्तींनी आपले भवितव्य व जीवन घडण्यासाठी अनमोल सहकार्य केलेले असते. याची जाणीव म्हणून त्या व्यक्तींच्या नावाशी आपले नाव किंवा नाते जोडून टोपणनाव धारण केले जाते.
*कुसुमाग्रज,अनुतनय,चंद्रकुमार,केशवसुत,गोविंदाग्रज,रत्नाकर*
*छ*) काही व्यक्ती लाजाळू असतात. त्यांना आपल्या रचना इतरांपर्यंत पोहोचवायच्या असतात, पण आपल्या मूळ नावाची गुप्तता ठेवून. अशावेळी मूळ नावाशी दुराण्वयेही संबंध नसणारे टोपणनाव स्वीकारले जाते.
*ज*) तसेच काही रचनाकार भित्रे असतात, रचना उत्तम असतानाही त्यांना आत्मविश्वासाच्या अभावामुळे स्वत:चे नाव लावायचे धाडस होत नाही. टोपणनावाचा आधार घेऊन त्या रचना प्रसिद्ध करतात व तटस्थपणे प्रतिक्रिया अजमावत असतात.
*छ*) कधीकधी सहज वेगळेपण म्हणूनही टोपणनाव स्वीकारले जाते. अनेक लेखनप्रकारात लिहिणारे. प्रत्येक साहित्य प्रकारासाठी वेगळे टोपणनाव निवडतात.
*ट*) काही संपादक संकुचित वृत्तीने ठरावीक ज्ञातीच्या रचनाकारांचेच साहित्य प्रसिद्धीसाठी निवडत असत, त्यांना वळवण्यासाठी; त्यांच्या आवडीच्या नावाशी साधर्म्य असणारे टोपणनाव निवडल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात.
*ठ*) विनोदी/चावट/अश्लील लेखन करणारे सर्रास टोपणनावाआडून लेखन करतात.
*ड*) ज्यांच्या लेखनास घरातून/स्वजनांकडून विरोध असतो, ते लोक टोपणनावाने लेखन पाठवून लेखनाची हौस पूर्ण करत असतात.
*ढ*) काही लोक प्रिय व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी टोपणनाव धारण करतात.
*ण*) स्त्रीवादी लेखन करणाऱ्या काही विद्वानांनी व पुरूषवादी लेखन करणाऱ्या काही विदूषींनी त्या साहित्य प्रकारासाठी साजेसे टोपणनाव घेऊन आपले लेखन समाजमनात यशस्वीपणे रूजविले आहे.
*॥ इतिश्री टोपणनाम पुराण अपूर्णम ॥*
© Chandrakant
(ता.क. *जाणत्यांनी अधिक भर घालावी*)
बदलता येतील काचा
कारच्या तुटलेल्या
अन्
टायर फुटलेले
चार जादा पैसे देऊन.
हकनाक बळी पडलेल्या
तरूणाच्या विधवेनं
कुंकू भरल्या करंड्याचं
काय करावं ?
© *रमेश*
तो प्रिझम कुठे मिळेल ?
ज्यातून माझ्या रक्ताची
शलाका सोडली तर
झेंड्याचे रंग विखुरतील
आणि म्हणतील सारे
अरे! हा आपल्याच गटाचा
सोडा त्याला
उगाच संशय घेतला आपण
© रमेश
वीज कडकडत जाईल
मेघ घडघडत जाईल
जीव तरसता पाण्यास
रेल धडधडत जाईल
ठार न करता शिकार
वाघ चरफडत जाईल
काय वरवर दिमाखात
वीर बडबडत जाईल
घोटभर बिअर ढोसून
पोर लडखडत जाईल
*चाँद* अडकवून फासात
जीव तडफडत जाईल
चाँद परछाई
Subscribe to:
Posts (Atom)