Thursday, 30 August 2018

मराठी कविता : १ ते ५


[8/21, 1:57 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: जिचे बोल खोलखोल
भान हरे गातागाता
काळजात करी घर
तिला म्हणावे कविता ॥धृ॥

अंकुरले रोप जसे
काढी भुईतून मान
वर नाजूक पालवी
तळी जडशीळ पान
.       अलगद उमलते
         येते वेलीवर कळी
         सान बाळाच्या गालात
         खुले सहजच खळी
भरे वाटेतील खोली
पाटपाणी जाताजाता ॥१॥
काळजात करी घर
तिला म्हणावे कविता

जिचे रूप थंडगार
भासे झऱ्यातले पाणी
खलखळ नाद करी
जशी मैना गाई गाणी
        उगवता रविबिंब
        लख्ख उजेड पडावा
        चराचर उजळून
        जीव सहज जडावा
भर उन्हात सावली
देई विसावा पांथस्था ॥२॥
काळजात करी घर
तिला म्हणावे कविता

©              *रमेश*
[8/21, 11:34 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: आजी

जिथे आजी तिथे घर
बाकी इमारती सा-या
तिला सोडून एकटे
लोक करतात वा-या

आजी विठूचे राऊळ
आणि पंढरीची वाट
भाव हृदयी शीतल
वसे चंद्रभागा काठ

आहे दैवत देवांचे
धूळ चरणाची बुका
डोईवरचा पदर
असे भगवी पताका

घडे सहजी दर्शन
दंडवत तिला एक
त्याच अखंड विश्वाला
प्रदक्षिणा होती लाख
[8/26, 12:48 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *प्रिय ताईंनो!*

अनिष्ट रूढी-परंपरांच्या कचाट्यातून
बाहेर पडण्याचे
आणि केवळ स्वत:ला सबल समजून अन्याय-अत्याचार करणाऱ्या
पुरुष जातीच्या हुकूमशाहाशी
दोन हात करण्याचे
सामर्थ्य जागृत होऊ दे (आहेच तुमच्या नसानसातून ते त्याची आठवण राहू दे)

आजकाल मानवी वस्तीतही आढळणाऱ्या हिंस्र श्वापदांची
नखे आणि दात काढण्याची कला
विकसित होवो

संकटापेक्षा
भीती आणि न्यूनगंडाचे
असलेले प्राबल्य
जळून खाक होवो

जिजाऊ, सावित्रीच्या
लेकी म्हणून
राष्ट्रपुरुष घडवण्याचा
मान-सन्मान मिळवत असतानाच
सुनिता, कल्पना, आशा, पी टी उषा आणि मेरी कोमबरोबरच  राहींनासुद्धा
आपल्या पंखातील शक्तीची जाणीव करू द्या

जेणेकरून या युगात
कुणा कृष्णाची
वाट नाही पाहावी लागणार
ऐनवेळी

आपला हाथ जगन्नाथ
या न्यायाने
जीवनातल्या प्रत्येक संकटाशी लढण्याची जिद्द
आणि आत्मविश्वास वाढू दे

तुमच्याही लेकी-सुना
नव्या शतकाच्या उंबरठ्यावर
विश्वकल्याणाच्या भागीदार बनण्यासाठी अवतरू देत
(त्यांच्या वाटेवर स्वजातीचेच अडसर फार असतात म्हणे)

तुम्हांपैकी असा अडसर
कुणीही असणार नाही

ही अपेक्षा
आणि रक्षाबंधनाची ओवाळणी

.  © *रमेश कुरलीकर*
[8/27, 7:29 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: मन उदास उदास
तुझी आठवण येता
मन पाखरू पाखरू
फुले भवती दिसता

मन हलके हलके
ढग वाऱ्यावर डोले
मन पावसाची सर
चिंब मातीगत ओले

मन घायाळ घायाळ
भेट संपता अखेरी
मन गहिरे गहिरे
आठवणींची शिदोरी

मन इंद्रधनुष्याचे
कडे अर्धगोल सदा
कधी होईल वर्तुळ
जाणे राम जाणे खुदा

.©           *रमेश*


[8/30, 11:31 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: .     *पेट्रोयचे भाव*

पेट्रोयचे भाव असे
गगनाले भिडले
माझ्या शेजाऱ्याने तवा
नवे घोडेच काढले

त्यावर बसून ते
हापीसाला जाई
घोडा मस्त बागेत
फिरून गवत खाई

एक दिवस घोड्याने
पेट्रोयपंप पाह्यला
माणसांची रांग पाहून
थितच उभा राह्यला

मालक म्हणे बे
चल घराकडं
आता मले घ्यायचं
हाय तीर्थ थोडं

थो म्हणे मालकाले
घे डब्बल घोडा
मले दे पाह्यजे तेवढा
तू पी थोडा

तो म्हणला घोड्याचं
एक दिस ऐकून
घेऊ ना आनुभाव
काय व्हते पाहून

दोघांनी अर्धा अर्धा
डबल घोडा मारला
तवा घोडा येताना
ठेसनात शिरला

म्हणे मले हवी एक
बायको काठेवाडी
त्याबिगार नाय मी
सोडन माही गाडी

.    ©      *रमेश*

No comments:

Post a Comment