[7/28, 10:50 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: कोरे कोरे छान
कागदाचे पान
दादा मला एक वही आण
वहीला कव्हर पानावर फुलांचे
लक्ष त्याच्याकडे सर्व मुलांचे
मीही त्यात लिहीन हरपून भान ॥१॥
निळ्या निळ्या रेषांची मला प्यारी वही
शुभ्र कागदाची अशी कुणाकडे नाही
सारे तिला देतील राणीचा मान ॥२॥
कथा आणि कविता वहीत लिहीन गोडगोड गाणे मी आवडीने गाईन
वहीच होईल माझी साहित्याची खाण ॥३॥
© *अनुतनय*
[7/29, 1:11 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: पाऊस वारा या जलधारा
तुझ्या बटांतून निथळती
थेंब टपोरे माणिक मोती
गालावरच्या तुझ्या खळीला
बघ लाली तेव्हा आली होती
होती सांज मंद अनावर
आणि हळवे गीत कुणाचे
तू गाताना मीही क्षणभर
हरवून गेलो साऱ्या वाटा
त्या वाटांचे गाणे मनभर
मनभर वारा आणि गाणे
घेऊन फिरतो मीही वेडा
शोधीत वाटा रानफुलांच्या
सापडते सारे अचानक
गुंत्यामधुनी तुझ्या बटांच्या
. © *रमेश कुरलीकर*
[7/29, 11:20 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: . *काव्यसंगत*
काव्य माझे जीवन
जीवनात काव्य माझ्या
कवी कवयित्री सखे
जिवाभावाचा संग लाभे
त्यांच्या संगतीने सदा
हरतोय सर्व दु:खे
. *रमेश*
[7/30, 8:26 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: कधी ऊन वारा
नभी चंद्र तारा
हा सोहळा श्रावणाचा
नदी गीत गाते
पिके छान शेते
आधार या जीवनाचा
. *रमेश*
[7/30, 10:59 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: . षटकोळी -१
. *काव्यसंगत*
काव्य माझे जीवन
जीवनात काव्य माझ्या
कवी कवयित्री सखे
जिवाभावाचा संग लाभे
त्यांच्या संगतीने सदा
हरतोय सर्व दु:खे
. *रमेश*
चंद्रकांत निकाडे,पोहाळे.
. षटकोळी -2
. *आधार या जीवनाचा*
कधी ऊन वारा
नभी चंद्र तारा
हा सोहळा श्रावणाचा
नदी गीत गाते
पिके छान शेते
आधार या जीवनाचा
. *रमेश*
[8/4, 7:27 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *ताकद शब्दांची*
दोस्त(उभयवचन,लिंग)
तुझ्या शब्दांतच
हवी इतकी ताकद
वाचकांच्या चक्षूंसमोर
राहिलं पाहिजे उभं चित्र
आणि
गहिवरले पाहिजे अंतकरण
निष्ठुराचेही
हृदय पिळवटून योग्य भावबंधासह
रसांचा परिपोष शब्दाशब्दांतून इतका निथळला पाहिजे की
आठवणच नये होऊ
इतर माध्यमांची
चित्र समजत नाही म्हणून कविता
की
काव्यातील दुर्बोधता झाकण्यासाठी चित्र?
समांतरणच असेल करायचं तर
एका वेळी एकाच रंगशब्दमंचावर हवं असं की
रेलगाडीचे समांतर रूळ
वाचक/दर्शनार्थी यांची भंबेरीच उडायला पाहिजे सर्वोत्तम निवडताना
वाचताना नुसता शब्दांच्या महापुरात घुटमळला पाहिजे आत्माही
तसा रंगांच्या महासागरातही विरघळला पाहिजे
दोस्त
आणखी एक
मला हवी तुमच्याकडून
अशी जादूमय गुंफण शब्दांची
मीच जावा स्वत:ला हरवून वर्तमान,भूत आणि भविष्यातील व्यथा-चिंता, सुख-दुःख:, याग-यातनांसह
किंवा
व्हायला हवा साकार
असा रंगांचा माहौल
होईल एकरूप त्यात
अनंतकाळ अंतराळात तरंगणारा आत्मा त्रिशंकू अाणि माझाही
मी एक
तुमच्या शब्दांवर
तथा रंगांवरही
स्वतंत्र-स्वतंत्र
जीव ओवाळणारा
रसिक.
. *रमेश*
[8/5, 9:07 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: मित्रहो!
नाही माझा विश्वास देवावर
पण माणसांतल्या देवत्वावर
नक्कीच आहे
म्हणून
तुम्ही माझ्यासाठी
जे काही चिंतता
व पाठवता
ते चांगलेच असणार
या माझ्या दृढविश्वासाला
नेहमीच दुजोरा मिळत गेला
तेव्हापासून माझ्याही अंगावर मूठमूठ मांस चढत गेलं.
मुळीच फिकिर नको
पुनर्जन्मावर तसाच
कोणत्या झाडाला सात फेरे घालून पुढील सात जन्मात मिळतील हेच मित्र यावर माझा विश्वास नाही
तरीही
तुमच्या आठवणींसाठी
प्रत्येक वर्षी मी लावणार आहे माझ्या शेताच्या बांधावर सात-सात झाडे.
ती हमखास सावली देतील
वार्धक्याच्या काळी
आणि फुलं- फळं
आपणा सर्वांची
प्रेमळ याद !
. *रमेश*
No comments:
Post a Comment