[7/20, 9:01 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *बंधुप्रेम*
त्या दोघांचं बंधुप्रेम आता
शेजाऱ्यांसह गल्ली अन गावातही जगजाहीर झालंय
रविवारी सकाळी सकाळी
चहा घ्यायच्याही आधी
हमखास फोन करतात.
दिलखुलास गप्पा मारत शेवटी एकमेकांना निरोप देतात
किती हे बंधुप्रेम !
राम-लक्ष्मण
किंवा भरत-राम फिके पडतील
असं वाटतं त्यांच्याकडे बघून नवख्या माणसाला
परवा तर म्हणे कुठल्याशा मंडळाच्या वाढदिनातील कार्यक्रमावेळी त्यांचे नाॅमिनेशन झाले होते
आदर्शबंधू पुरस्कारासाठी
रविवारी
धाकटा ब्रश करत करत
शहरातील उच्चभ्रू वस्तीतील
अलिशान बंगल्याच्या टेरेसवरून
आपल्या रत्नजडित मोबाईलवरून
दादाला करत असतो फोन
त्याच्या शेजारच्या घरात
तो येईपर्यंत फोन तसाच कनेक्ट ठेवून
आतुरतेनं वाट पाहात असतो
"दादा, नमस्कार."
नंतर बराचवेळ गप्पा मारत राहातो
महत्वाचा निरोप हळूच शेवटी सांगतो
दादाही पुढच्या रविवारी
पानटपरीतल्या काॅईनबाॅक्स मध्ये
एक रुपयाचं नाणं टाकून धाकट्याच्या मोबाईल नंबरची बटणं दाबतो
वेळ उरला तर मारतोच गप्पा
पण कनेक्ट झाल्याबरोबर बाॅक्सच्या डिस्प्लेवरील सेकंदांची उलटी गिनती संपण्याअगोदर
महत्वाचा निरोप देतो
अगदी सेम त्याच्यासारखाच
*"आज रविवार आहे. उद्यापासून तुझा आठवडा सुरू होतोय संध्याकाळी कधी येतोयस आई-बाबांना न्यायला ? "*
. *रमेश कुरलीकर*
[7/21, 9:41 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: प्रत्येक कवितेला असते
उंची, खोली आणि रुंदीही
आपल्या कवितेइतकी
उंची असणारे कवी
किंवा आपल्या उंचीइतकी
कविता लिहिणारे कवी क्वचितच भेटतात
खोली असणाऱ्या कविता
घर करतात मनात
उथळ अशाच जातात वाहात वाऱ्यावर फुसक्या ढगांसारख्या
रूंद कविता असतात
शिंपल्यातले मोती अनमोल
खुज्या टरफलासारख्या शेंगेच्या
उंच, खोल आणि रूंद
कवितेच्या शोधात
अजूनही वावरतो आत्मा
द्याल ना अशी एखादी
कविता हृदयापासून
हृदयापर्यंत झिरपणारी
. *रमेश*
[7/23, 7:57 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: पांडुरंग देव पांडुरंग भाव
पांडुरंग नाव विठोबाचे ॥
घेईन पताका करीन मी वारी
चंद्रभागा तिरी स्नानसंध्या
नामाचा गजर अभंग गाईन
कीर्तन पाहीन वाळवंटी
*चंदनाचा* टिळा लावीन मी भाळा
तुळशीच्या माळा वाहुनिया
[7/24, 3:29 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: तशी तर
कुणालाच गरज नाही
विठ्ठल-रखुमाईच्या
पूजा आणि दर्शनासाठी
घराबाहेर जाण्याची
पोरांंच्या शिक्षणासाठी
फॅक्टरी,आॅफिसात
कणकण झिजणारा
पोटभर मिळावी त्यांना
भाकरी यासाठी
मातीत मळणारा
दूध-दुभत्यांनी व्हावं
लहानग्यांचं पोषण म्हणून
शेण-घाण उपसणारा
हौसमौज चिमुरड्यांची
भागवणं हे
आपलं जन्मसिद्ध कर्तव्य म्हणून
कारखान्यात पत्र्याच्या छताखाली जळणारा
उसणे,मागून,कर्जाऊ,भिक्षून
अाणि क्वचित उचलेगिरी,चोरी,
दरोडा,धाक-दादागिरी करूनही
कुणी बाप जमवत असतो
पै-पै आपल्या लेकरांसाठी
नसेल त्याच्या पायाखाली वीट
किंवा नसतील त्याचे कमरेवर हात
म्हणून काय तो विठ्ठल नाही?
आणि नऊ महिने पोटात वागवून
जन्मावेळी मरणयातना सोसून
जन्मानंतरही कित्येक दिवस
पाजण्यासाठी स्वत:च्या
रक्ताचं दूध करून
प्रसंगी स्वत: उपाशी राहून
चिऊकाऊचा घास
बाळाला भरवणारी
त्याचं दुखणं-खुपणं निस्तरणारी
काळजाच्या तुकड्याप्रमाणं जीव लावणारी
मुलाची हौसमौज पुरवताना
बापाची बोलणी आणि
मारही खाणारी
आलेल्या शिदोरीतील
घास-घास बाळांना वाटणारी आई
अंगावर भरजरी शेला नाही
म्हणून
ऐटीत उभी नाही म्हणून
काय ती रखुमाई नाही?
ही जितीजागती दैवतं
सोडून खरंच कुणालाही
गरज नाही
विठ्ठल-रखुमाईच्या पूजेसाठी
घराबाहेर जाण्याची.
. *रमेश*
[7/25, 12:29 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: तुझ्यासारख्या गंधफुलांनी
फुलला माझा मळा ॥
सखे गं हळूच खुड मंजुळा ॥धृ॥
मिरगाची पेरणी साधली
रिमझिम पाऊस आला खाली
धरती हिरवा शालू ल्याली
थेंब दवाचा तुझिया गाली
जीव तुझ्यावर खुळा ॥१॥
सखे गं...
वाऱ्यावरती पीक डोलते
तुरा शीरावर सहज तोलते
फांदीआडून फूल बोलते
तुझे नि माझे गुपित खोलते
कांदा भाजी मुळा ॥३॥
सखे गं...
सुगी खळ्यावर भरल्या राशी
बाळगलेले स्वप्न उराशी
तूही अल्लड हसून जराशी
खेटून लाजत माझ्यापाशी
दाटून आला गळा ॥३॥
सखे गं...
. *रमेश कुरलीकर*
No comments:
Post a Comment