[7/13, 7:09 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *शेंदरी दगड डोहात फेकले*
पांढऱ्या दातांच्या काळ्याशा बाहुल्या
अंधाऱ्या रात्रीत कण्हत चालल्या
भीषण शांतता अोसाड दरीत
घुबडे गटाने चीत्कार करीत
गुहेच्या तोंडाशी पाकोळ्या घुमत
वडाच्या पारंबी पिंगळे जमत
झुलते पालखी अमावस्ये रात्री
समंध वेताळ घुमतात गात्री
अक्राळविक्राळ रूपात थांबल्या
सातीही अप्सरा झाडाला झोंबल्या
घरी परताया उशीर झालेल्या
शंखिनी डंकिनी मुकाट चालल्या
पहाट सरली तांबडे फुटले
घोळके बायांचे पुजून चालले
शाळेच्या पोरीने स्वप्नात पाहिले
शेंदरी दगड डोहात फेकले.
. *चंद्रकांत निकाडे*
[7/13, 7:34 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: तिथे
दुर्लक्षित
अनाथ
बगळ्यांसमोर
भूमी
आबादानी
पाहात
भीक
तिथे
माणुसकीचा
शिरजोर
कुंपनानीच
बहिणींचा
घटना
चिखलातच
नीती
8552833839
[7/14, 12:23 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: . आठवणी
रोज रात्री
मी उसवतो मनाचा गाभारा
साचलेल्या आठवणी
पुसून टाकतो
तरीही काही उरतातच
त्या हाकलता हकलत नाहीत
घराच्या कोनाड्यात
चिकटून राहावीत जळमटे तशा
एक बरे आहे
त्या धुमसत राहिल्या तरी
कळत नाहीत इतरांना
आणि द्यावी लागत नाहीत उत्तरे
अनाहूत प्रश्नांची
काही आठवणी
आतल्या आत पोखरत राहतात
वाळवीने कुरतडावी फळी तशा
काही मात्र मीच मुद्दाम जपतो
त्यांना कवितेत गुंफून मोकळा होतो
आणि भेटतात जिवाभावाचे सखे
दूरदूरच्या गावांतून
शहरांतून की खेड्यांतून ?
असा प्रश्न नाही पडत कधी
या सुहृद्यांच्या शुभेच्छेनेच तर
उगवत असते उद्याची सकाळ
माझ्यासाठी
. *रमेश*
[7/14, 11:23 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *"एस्सर !"*
पहिलीच्या वर्गात हजेरी घेताना
"निशा एकनाथ दातार !"
नाव पुकारताच
एक गोंडस चिमुरडी
उठून उभी राहायची "एस्सर." म्हणत.
दुसरीच्या वर्गात
पहिल्याच दिवशी
हजेरी घेताना नाव पुकारताच थोडी रडवेली होत
जवळ येऊन म्हणाली,
"सर, माझं नाव चुकलंय लिहायला. निशा गुलाब दातार हवंय! "
मी सुन्न.
तरीही म्हटलं, "ठीक आहे, करू दुरूस्त. "
आणि पुन्हा तिसरीच्या सहामाही नंतर तिची तीच तक्रार
'नावात बापाच्या ठिकाणी मायकल लिहा.' अशी
तेव्हाही मी 'हो! बाळा' म्हणालो.
तिचं नाव बदलता आलं हजेरी नावाच्या कागदी तुकड्यावर
नशीब बदलायची हिंमत-ताकद नव्हतीच माझ्याकडे
तिच्या डब्यात
पोळी-भाजी,भाजी-भाकरी
ऐवजी वडापाव,भजी,भडंग किंवा असंच काहीतरी कोरडं असायचं
कधी म्हटलं, "निशा माझ्या डब्यात आज पोळी जास्तय.घे ना तुला एक."
तर म्हणायची, "तुम्ही माझ्या डब्यातला चिवडा घेणार असाल तरच !."
एकदा पालक सभेत बऱ्याच विनंती नंतर
तिची आई आली होती शाळेत
डब्याबद्दल बोलताना
"सांभाळून घ्या निशाला." इतकच बोलली, तेव्हा समजलं तीच निशाची आई.
माझ्या येण्याजाण्याच्या रस्त्यावरच्या थिएटरसमोर ती उभी असायची नटूनथटून
एरव्ही रस्त्यावरून जाणारा पुरूष दिसला की त्याला रोखणारी, तिची घायाळ नजर
मी समोरून जाताना
खाली झुकायची
सातवीनंतर निशाची शाळा संपली
माझीही बदली झाली.
आणि परवा
ती मला दिसली
दीड-एक तपानंतर
त्याच रस्त्यावरून जाताना
तिथेच
जिथे तिची आई उभी असायची
तिचीही नजर झुकली.
मी फक्त आठवत राहिलो
"एस्सर ! "
तिच्या कोमल आवाजातील अभिवादन
हताशपणे!
*रमेश*
No comments:
Post a Comment