Thursday, 30 August 2018

मराठी कविता सहा:रमेश कुरलीकर


[7/12, 12:28 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: .      *जलचक्र*

नदी तळे तलाव आणि
समुद्रातील साठ्याची
सूर्याच्या उष्णतेने
वाफ होते पाण्याची

वाफ म्हणजे पाण्याचेच
एक वायूरूप असते
मात्र आपल्या डोळ्यांनी
ते नेहमी दिसत नसते

वाफेचे बनतात ढग
हलके होऊन वर जातात
वारा जेव्हा वाहतो तेव्हा
हळू पुढे पळू लागतात

ढगांना भेटतात डोंगर
तिथली हिरवी झाडे
थंड हवा लागताच ते
होतात खूप जाडे

थेंब थेंब गळू लागतात
त्यालाच म्हणतात पाऊस
पावसात भिजायची
मुलांना खूप हौस

पाऊस धुके दव दहीवर
हीही रूपे वृष्टीचीच
शोभा असतात वाढवत
हिरव्यागार सृष्टीची

गटर नाले नदीत मजेत
हे पाणी वाहत असते
शेवटी जाऊन समुद्राला
आपोआप मिळत असते.

समुद्राच्या पाण्याची
वाफच वाफ होते पुन्हा
याला म्हणतात जलचक्र
धरतीसाठी अमृतपान्हा

.      *चंद्रकांत निकाडे*
[7/12, 1:23 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: .     *अनेक रूपे*

पाऊस प्रात:काळी
अंकुर पोसण्याला
शेतात राबणाऱ्या
दु:खास सोसण्याला

पाऊस भरदुपारी
रोपास गोड पान्हा
घेईल आवडीने
बांधावरील तान्हा

पाऊस सांजवेळी
अवघ्या चराचराला
घेऊन जात असतो
शिणल्या जिवा घराला

पाऊस भयाण रात्री
येतो स्मशानवैरी
अंधारल्या दिशांनी
होतो कधी अघोरी

पाऊस हा अवेळी
आघात सोसण्याचा
आश्वस्त पावलांनी
आधार पोसण्याचा

   *रमेश कुरलीकर*
[7/13, 3:28 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *गझल पावसाची*

माणसांना पावसाने
गालगागा गालगागा

जाणले पाहिजे
गालगा गालगा
पावसाला माणसांनी मानले पाहिजे

सारखा जो वेळवेळी लोचतो त्या ठगा
दांडग्याला जाणत्यांनी ताणले पाहिजे

नुसते पाहाणे *नको
गालगागा
ना आपुल्याही अंगी
सगळ्यांच्या *शौर्य थोडे बाणले पाहिजे

भ्रष्ट नेत्या भरसभेतच एकदा पैजारे
दणक्याने *स्वागताला हाणले पाहिजे

छळवाद्या *दांडग्याला टोणप्या कोडग्या
सगळ्यांच्या *घातपाता छानले पाहिजे

दुसऱ्याशी *वागताना तेढ का ठेवता
सुगंधाशी* आर्जवाने आणले पाहिजे

.                   *रमेश*
[7/13, 7:09 PM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: *शेंदरी दगड डोहात फेकले*

पांढऱ्या दातांच्या काळ्याशा बाहुल्या
अंधाऱ्या रात्रीत कण्हत चालल्या

भीषण शांतता अोसाड दरीत
घुबडे गटाने चीत्कार करीत

गुहेच्या तोंडाशी पाकोळ्या घुमत
वडाच्या पारंबी पिंगळे जमत

झुलते पालखी अमावस्ये रात्री
समंध वेताळ घुमतात गात्री

अक्राळविक्राळ रूपात थांबल्या
सातीही अप्सरा झाडाला झोंबल्या

घरी परताया उशीर झालेल्या
शंखिनी डंकिनी मुकाट चालल्या

पहाट सरली तांबडे फुटले
घोळके बायांचे पुजून चालले

शाळेच्या पोरीने स्वप्नात
शेंदरी दगड डोहात फेकले.

.            *चंद्रकांत निकाडे*
[7/14, 12:23 AM] चंद्रकांत निकाडे,पोहाळे.: .        आठवणी

रोज रात्री
मी उसवतो मनाचा गाभारा
साचलेल्या आठवणी
पुसून टाकतो
तरीही काही उरतातच
त्या हाकलता हकलत नाहीत

घराच्या कोनाड्यात
चिकटून राहावीत जळमटे तशा

एक बरे आहे
त्या धुमसत राहिल्या तरी
कळत नाहीत इतरांना
आणि द्यावी लागत नाहीत उत्तरे
अनाहूत प्रश्नांची

काही आठवणी
आतल्या आत पोखरत राहतात
वाळवीने कुरतडावी फळी तशा

काही मात्र मीच मुद्दाम जपतो
त्यांना कवितेत गुंफून मोकळा होतो
आणि भेटतात जिवाभावाचे सखे
दूरदूरच्या गावांतून

शहरांतून की खेड्यांतून ?
असा प्रश्न नाही पडत कधी
या सुहृद्यांच्या शुभेच्छेनेच तर
उगवत असते उद्याची सकाळ
माझ्यासाठी

.          *रमेश

No comments:

Post a Comment