Thursday, 30 June 2022

माजी आणि निवृत्त

विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या संचालक मंडळाच्या प्रमुखास अध्यक्ष, सभापती, चेअरमन, सेक्रेटरी, सचिव, सरपंच, डेप्युटी सरपंच, खजिनदार, कार्याध्यक्ष, व्हाईस चेअरमन, उपसभापती या पदनामांनी संबोधले जाते. हे पदाधिकारी ठराविक काळासाठी संस्थेचा कारभार सांभाळण्यासाठी विश्वस्त म्हणून सभासदांमधून मतदानाने निवडून किंवा बहुमताने, बिनविरोध निवड होऊन आलेले असतात. त्यांचा कार्यकाल संपल्याबरोबर नवीन निवडणूक होते आणि नवे संचालक येतात तेव्हा जुने संचालक पदममुक्त होतात अशा पदभूषविणाऱ्या संचालकांना त्यांच्या नावापूर्वी जुने पद लावताना माजी हे विशेषण वापरतात. जसे माजी अध्यक्ष, माजी सभापती, माजी चेअरमन, माजी सेक्रेटरी, माजी सचिव, माजी सरपंच, माजी डेप्युटी सरपंच, माजी खजिनदार, माजी कार्याध्यक्ष, माजी व्हाईस चेअरमन,माजी  उपसभापती हे पदाधिकारी पुन्हा निवड किंवा निवडणुकीने त्या पदावर येऊ शकतात. त्याच प्रमाणे सैनिक देश संरक्षणासाठी काम करत असताना त्यांचा करारनाम्याने ठराविक काळाचा सेवाकाल निश्चित असतो. त्यानंतर तेही सेवेतून मुक्त होतात त्यांची सेवामुक्ती ही नियत वयोमानानुसार असेलच असे नाही, परंतु त्यांनी सेवेच्या सुरुवातीस दिलेल्या कराराप्रमाणे तेवढी मुदत संपताच त्यांना सेवामुक्त केले जाते. त्यांनाही माजी असेच संबोधले जाते. हे सेवक किंवा सैनिक शासनाच्या इतर कोणत्या खात्यामध्ये पुन्हा सेवा करू शकतात, म्हणून त्यांचाही उल्लेख माजी सैनिक या संबोधनाने केला जातो. मात्र शासकीय/निमशासकीय/प्रशासकीय सेवेमध्ये जे लोक काम करतात ते जेव्हा नियत वयोमानानुसार म्हणजे ५८ किंवा ६० वर्षानंतर सेवेतून मुक्त होतात म्हणजे निवृत्त होतात म्हणून अशा अधिकाऱ्यांच्या नावापूर्वी निवृत्ती लिहिण्याचा प्रघात आहे. जसे की निवृत्त मुख्याध्यापक, निवृत्त पर्यवेक्षक, निवृत्त शिक्षक, निवृत्त पोलीस, निवृत्त गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी हे निवृत्त झालेले अधिकारी पुन्हा त्या पदावर सहसा येऊ शकत नाहीत.
                                               © chandu64

Sunday, 26 June 2022

Thursday, 23 June 2022

एका वर्षात सहस्र कथाकथन

१) 
स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालय व ज्युनियर काॅलेज, उंडाळे
२) प्रा. रमेश ढावरे माध्यमिक आश्रमशाळा कुशिरे

Sunday, 19 June 2022

श्वास दिला घास दिला

श्वास दिला घास दिला
पिला-पाखरांना
पंख लेऊनी भरारी
घ्या दहा दिशांना

चढा नव्या शिखरांवर
वाढू दे कमान
माता अन् मातीशी 
राखुनी इमान

क्षण वेचा मोदाचे
आयुष्य फुलू दे
क्षितिजावर कळी कळी
स्नेहाची खुलू दे

        रमेश

Thursday, 2 June 2022

मा.संपत गायकवाडसो

*काही लोक निवृत्ती पूर्वी निवृत्त व्हावेत असं वाटतं,तर काही लोक नियत वयोमानानुसार निवृत्त व्हावेत असं वाटतं,पण मा निकाडे सरांसारखे लोक निवृत्त होऊच नयेत असं वाटतं.*
   *मा निकाडेसर मातृह्रदयी शिक्षक,पितृह्रदयी मुख्याध्यापक होते.*
    *मा निकाडेसर यांच्यावर मी लिहिणे म्हणजे पर्वताची उंची फुटपट्टीने मोजल्या सारखे आहे.*
   *माझ्यापेक्षा सहा* 
*वर्षांनी लहान असूनही मी सरांना चंद्रकांत या नावाने कधीच बोलावले नाही,तर निकाडेसर म्हणूनच त्यांना बोलावत असे यातूनच सरांकडे असणारा मोठेपणा दिसून येतो*
   *निकाडेसर लहान असूनही नेहमीच मोठ्या भावाप्रमाणे त्यांना मानत आलो.*
   *लेखक, प्रकाशक, अभिनेता, शिस्तीचे, सजग व समृद्ध प्रशासक, लक्ष्यवेधी व्यवस्थापक सर होते.*
   *सच्चा मित्र, स्नेही, सखा, सवंगडी, सहकारी व बाप माणूस परीस बनून माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वातील लोखंडाचे सोनं झालं.*
  *सरांना लाभलेली आई म्हणजे परमेश्वराचे दुसरे रुप होय.सरांची पत्नी म्हणजे साक्षात ऐश्वर्यलक्ष्मी.दोन्ही मुले व कन्या ही तर दैवी देणगी आहे.जावई,सूना म्हणजे सोन्याला सुगंध आहे.मुलगी सासरी तर सूना सरांच्या घरी दुधात साखर मिसळावी तशा मिसळून गेल्या आहेत.सरांचं घर म्हणजे गोकूळ आहे*
    *सरांना व कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना .जगातील सर्व सुखांच्या राशी या कुटुंबाच्या पायाशी लोळण घेऊ देत ही परमेश्वराचे चरणी अंत:करत पूर्वक प्रार्थना*
(संपत गायकवाड)

आरती लाटणे : साहित्यिक क्षेत्रामध्ये एक आदरयुक्त धाक

*आदरणीय, विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय,आदर्श शिक्षक,लेखक,प्रकाशक, मा. निकाडे सर आपण शासकीय नियमानुसार आज सेवानिवृत्त होत आहात.*  
       *वयोमानानुसार विचार करता ही एक आनंदाचीच बाब आहे. परंतु तुमच्यासारख्या व्यक्तीमत्वाची शिक्षण क्षेत्रात खूप गरज आहे. एखाद्या संस्थेची प्रगती ,यशस्वी वाटचाल, हे त्या संस्थेच्या प्रमुख व्यक्तीवर अवलंबून असते . त्याप्रमाणेच
आपल्या रूपाने संस्थेला कुशल प्रशासक मिळाला आणिआपल्या
कारकिर्दीतील प्रत्येक क्षण संस्थेसाठी एक सुवर्णपान निर्माण झाले आहे निश्चित.ज्ञानदानाच्या वाटेवरील ज्ञानदाते मा. निकाडे सर आपले शैक्षणिककार्य एक 
आदर्श राहील. आपल्या हाताखालून गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी त्याच्या यशस्वी कार्यासाठी आपण दीपस्तंभ आहात.*
     *शैक्षणिक कार्याबरोबरच आपले साहित्यीक कार्य देखील अतिशय मोलाची आहे. माझ्यासारख्या अनेक लेखक, लेखिका ,कवी ,कवयित्री, इत्यादींना आपली प्रेरणा मिळत राहिली. साहित्यिक क्षेत्रामध्ये एक आदरयुक्त धाक आपल्या रूपाने आम्ही अनुभवत आहोत.* 
     *वयोमानानुसार सेवानिवृत्ती अपरिहार्य आहे तरीही आपले मार्गदर्शन आम्हाला कायमस्वरूपी राहील अशी आशा व्यक्त करते.* 
    *सेवानिवृत्तीनंतरचा कालावधी आपल्याला अतिशय आनंद, समाधानी आणि सर्वात महत्वाचं आरोग्यसंपन्न राहील अशी ईश्वराकडे प्रार्थना करते.* 
  *सेवानिवृत्तीच्या आपणाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.*💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🏻
सौ आरती लाटणे.

बाबा कदम

💐💐 शुभेच्छा💐💐

सन्माननीय निकाडे सर नियत तारखेनुसार निवृत्त झाला आहात. परंतु आदर्श शिक्षक
शिस्तप्रिय प्रशासक
प्रेरणादायी बालसाहित्यीक
शिस्तबद्ध मुख्याध्यापक
उपक्रमशील शिक्षक
उत्तम प्रकाशक
मनस्वी लेखक
उस्फूर्त कवी
परखड समीक्षक
आदर्श कथाकार
व्यासंगी नाटककार
अशा अष्टपैलू अंगाने निवृत्तीच्या अखेरच्या दिवसापर्यंत उत्साही, आनंदी, कृतीशील जीवन जगला आहात. निवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने आपल्यातील साहित्य क्षेत्रातील नवीन इनिंगला सुरुवात कराल. तुम्ही थांबाल , निवृती घ्याल अस वाटत नाही.
तरीदेखील तुम्हाला मनस्वी शुभेच्छा.....
💐🌹💐🌹💐🌹

नसीम जमादार

आज नियत वयोमानानुसार आदरणीय श्री.निकाडे सर सेवानिवृत्त होत आहेत.आजपासून आयुष्याच्या तिसर्‍या टप्प्याची सुरूवात.बालपणापासून नोकरीलागेपर्यतचा पहिला टप्पा,नोकरी लागल्यापासून ते सेवानिवृत्तिपर्यतचा दुसरा टप्पा आणि सेवानिवृत्तीपासूनचा पुढील आयुष्याचा तिसरा टप्पा,तिसर्‍या टप्प्याकडे जायच्या आधीच निकाडे सरांनी दमदारपणे,अत्यंत उत्साहात या इनिंगची सुरूवात केली आहे.First impression is the last impression या उक्तिप्रमाणेसरांनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे.
       सरांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना लेखन,वाचनाचे मार्गदर्शन  करण्याचा संकल्प केला आहे आणि त्याची सुरूवात सेवानिवृत्तीआधीच केली आहे.तसेच मराठी बालकुमार साहित्य सभेच्या  अध्यक्षपदी विराजमान झाल्याबरोबर सभेच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे.अध्यक्षपदाचा कोणताही मोठेपणा न मानता कार्यक्रमप्रसंगी अगदी मोमेटों तयार करून घेण्यापासून ते पुरस्कार्थीनां पुरस्कार वितरणावेळी स्वतः शाल,पुस्तक,बुके ट्रेमध्ये भरून देणारे निकाडे सर हे एक अद्वितीय व्यक्तिमत्वच.कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता प्रत्येक परिस्थितीत समतोल साधण्याचा सुंदर प्रयत्न सर करत असतात.लहानथोर कुणीही मार्गदर्शनासाठी सरांच्याकडे जावो आपल्याजवळील ज्ञानाची दौलत  नेहमीच सगळ्यांसाठी ते खुली करतात.
      आज शिक्षणश्रेत्रात सरांच्यासारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्व मिळणे विरळच.आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहून आपल्या कार्याचा ठसा विद्यार्थ्यांपर्यतच मर्यादित न ठेवता संपूर्ण शिक्षणक्षेत्रावर उमटवला आहे.सरांनी घालून दिलेले पाठ कधीही पुसले जाणार नाहीत उलट त्यांच्याच मार्गाने अनेक आदर्श विद्यार्थी व साहित्यिक निर्माण होतील.सरांच्या अंगभूत कलांनी नवपिढीला दिशा मिळवून दिली आहे.
        अशा हरहुन्नरी,सदैव उत्साही असणार्‍या आदरणीय निकाडे सरांना   पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.
💐💐
         सौ.नसीम जमादार.

भागिदार यश अपयशाचे

आपल्या जीवनातल्या 
प्रत्येक अपयशाला 
आपणच जबाबदार असतो 
हा गैरसमज मनातून काढून टाकावा

प्रत्येक यशासाठी 
आपला सहभाग, सहकार्य 
आणि इतर गोष्टींमध्ये 
ज्याला नशीब, परिस्थिती, दैव म्हणतात 
त्या गोष्टींशिवाय 
काही परचलांचाही असतो प्रभाव
आणि ती परचले आपण 
नेहमीच नाही करू शकत नियंत्रित
जेव्हा ती नियंत्रणात येतील 
त्यानंतर आपला विजय निश्चित असतो

आपल्या यशाचे असतात काही भागीदार 
तसे अपयशाचे ही असतात 
कधी कधी ते परके असतात 
तर कधी अस्तनीतले असतात 

परक्यांचं उपद्रवमूल्य
आपण सहज करू शकतो कमी 
पण अस्तनीतल्यांचा शोध घेणंच 
मुळात कठीण असतं 
आणि त्यानंतर बंदोबस्ताच्या गोष्टी

आपल्या जीवनातल्या प्रत्येक अपयशाला आपणच जबाबदार असतो हा गैरसमज मनातून काढून टाकावा.*

*आपल्या जीवनातल्या प्रत्येक अपयशाला आपणच जबाबदार असतो हा गैरसमज मनातून काढून टाकावा.* 

प्रत्येक यशासाठी आपला सहभाग, सहकार्य आणि इतर गोष्टींमध्ये ज्याला नशीब, परिस्थिती, दैव म्हणतात त्या गोष्टी शिवाय काही पर चलांचा प्रभावही असतो. आणि ती परचले आपण नेहमीच नियंत्रित करू शकत नाही. जेव्हा ती नियंत्रणात येतील त्यानंतर आपला विजय निश्चित असतो.
Be positive... ... ... ... 

पण

कसे? कुणी? कोठे? केव्हा? लिहावे श्री., सौ., रा.रा., डॉक्टर, मेजर, कै., ह.भ.प., सर, मॅडम, गुरुजी, साहेब, दा, दादा, बापू, आक्का, ताई, बाई,

मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते आणि या भाषांमध्ये अनेक वेळेला व्यक्ती आपल्या नावासमोर श्री, सौ, कु, रा.रा. आणि नावानंतर सर, गुरुजी, साहेब, दा, दादा, बापू, आक्का, ताई, बाई, ही विशेषणे लिहीत असतात. 
आपण आपल्या नावा अगोदर अर्जित केलेल्या, प्राप्त केलेल्या, कर्म करून, अभ्यासाने प्राप्त केलेल्या, शौर्याने मिळवलेल्या डॉक्टर, मेजर या पदव्या लिहू शकतो; मात्र ज्या पदव्या लोकांनी दिलेल्या असतात त्या कधीही स्वतःच स्वत:च्या नावाअगोदर लिहू अगर सांगू नयेत. (उदा. माझे नाव श्री.चंद्रकांत निकाडे आहे.) 
तसेच एखाद्याला आपण आदराने किंवा सन्मानाने, सौजन्याने, उपनाम जोडतो ते नावाला जोडून लिहावे वेगळे लिहू नये.
"तुम्ही कधी येणार?" बायजा आक्का देशपांडे सरांना म्हणाल्या.
या वाक्यात देशपांडे हे बायजाचे आडनाव आहे असे वाटते, पण इथे बायजाक्का आणि देशपांडेसर ही दोन पात्रे आहेत. आक्का हे बायजाला आदराने दिलेले उपनाम आणि देशपांडे हे सरांचे आडनाव आहे हे स्पष्ट सांगायचे असेल तर बायजा+आक्का (बायजाक्का) व देशपांडेसर असेच लिहावयाचा संकेत आहे. सानेगुरुजी, गाडगेबाबा, पाटीलबाई (पाटीलमॅम) 

Wednesday, 1 June 2022

महापुरे रवींद्र

आदरणीय निकाडे सर आपण सेवानिवृत्त होत आहात,आपण आतापावेतो असंख्य विद्यार्थी घडविले,प्रामाणिक सेवा केली.सर्व मित्रांना विशेष मार्गदर्शन केले,याचा व्यक्तिगत मला अभिमान वाटतो.त्याबद्दल मी आपली स्तुती करतो.धन्यवाद देतो.आपल्या इथून पुढच्या वडीलकीच्या मार्गदर्शनासाठी आम्ही सर्वजण कायम आतुर आहोत.आपणास यापुढेही उत्तमाति उत्तम ज्ञान आणि विवेक यात रममान होणार्‍या विविध संधी 
लाभोत,आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!__श्री आर. डी.महापुरे. सर आणि परिवार, कोल्हापूर

अरविंद किल्लेदार

#शिदोरी_२२
परिवर्तन परिवारात दरवर्षी होणाऱ्या शिदोरीत विद्यार्थ्यांत रमणारे #शिदोरीचे_वारकरी_श्री_चंद्रकांत_निकाडे_सर

   आयुष्यभर विद्येच्या प्रांगणात रममाण झालेल्या, बालपणी ज्ञानार्जनासाठी आणि हयातभर ज्ञानदानासाठी सरस्वतीच्या मंदिराला फेर्‍या मारणार्‍या, विद्येच्या उपासकांना  सविनय नमस्कार....
    भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित श्री.नवनाथ हायस्कूल पोहाळे तर्फ आळते,तालुका पन्हाळा या शाळेचे मुख्याध्यापक श्री.#चंद्रकांत_काशिनाथ_निकाडे_सर  ३१ मे‌, २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने सरांच्या कार्याविषयीचा हा थोडक्यात आढावा.
   सुरुवातीला श्री त्र्यंबोली विद्यालय, विक्रमनगर, कोल्हापूर येथे वर्षभर व नंतर हरिहर  विद्यालय कोल्हापूर येथे अकरा वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा, त्यानंतर नवनाथ हायस्कूल पोहाळे येथे २८ वर्षे मुख्याध्यापक पदावर सेवा, असे जवळपास तीन तपांहून अधिक काळ सरांचे ज्ञानदानाचे कार्य अतिशय निष्ठेने चालू आहे. 
निकाडे सर म्हणजे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व.नियंत्याने अनेक कलेंची उधळण त्यांच्यावर केली. उत्तम शिक्षक,उपक्रमशील मुख्याध्यापक, अभ्यासू प्रशासक, सडेतोड वक्ता, मनस्वी चित्रकार,  व्यासंगी समुपदेशक, जिंदादिल कलाकार,  दिग्दर्शक, कारागीर अशा अनेक कलेच्या भूमिका सरांनी उत्तम प्रकारे पार पाडल्या आहेत.प्राप्त कलेचा उपयोग प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे समाजासाठी करत आहेत.
 साहित्याच्या क्षेत्रातही सरांनी उत्तम असे योगदान दिलेले आहे. सर उत्तम लेखक, उत्तम प्रकाशक, उत्तम मुद्रितशोधक आहेत. सरांनी आता पर्यंत एकूण #३८_पुस्तके लिहिलेली आहेत. ५ ग्रंथांचा मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत #अनुवाद केला आहे. या तीनही भाषेतील व्याकरणाचा सरांना चांगला अभ्यास आहे.आजवर अनेक विद्यार्थी, पालक, सहकारी, शिक्षक, मित्र यांची उत्तमोत्तम १२७ पुस्तके त्यांच्या #हृदय_प्रकाशन मार्फत प्रकाशित केलेली आहेत.#शिक्षणयात्रा या ब्लाॅगवर विविध विषयांवर अनेक पोस्ट लिहिलेल्या आहेत. तसेच #शिक्षणयात्रा या युट्युब चॅनेलवर #३००_शैक्षणिक_व्हिडिओंची निर्मिती केली आहे.
सरांचे अतिशय प्रामाणिकपणे, सेवाभावी वृत्तीने शैक्षणिक कामकाज सुरू आहे.  इतरांच्या मदतीसाठी सरांचा‌ हात नेहमीच पुढे असतो.#करिअर_मार्गदर्शनातून हजारो मुलांना योग्य करिअरच्या वाटा दाखविलेल्या आहेत. शुद्ध व सात्विक जीवन‌ सर जगत आहेत. आध्यात्मिक वारसा सर निष्ठेने जपत आहेत.आपल्या कामातील खरा आनंद सर घेत आहेत.
 शिक्षणातील उत्तम कार्याबद्दल सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
 स्पष्ट बोलणारे, निर्भीड असे व्यक्तिमत्व म्हणजे निकाडे सर होय.
     नेहमी विद्यार्थ्यांच्यात रमणारा हा अवलिया,विद्यार्थी हे आपले दैवत मानून, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सर कष्ट घेत आहेत. आपल्या विद्यार्थ्याला काय हवे आहे, त्याच्या कोणत्या समस्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनाचा, कुवतीचा व अपेक्षांचा सर अगोदर अभ्यास करतात.प्रत्येक विद्यार्थ्यांशी जवळचे नाते ठेवून, त्यांच्या कुंटुंबाची पार्श्वभूमी सर नेहमी जाणून घेत असतात. विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे गेले,तरी त्यांच्याशी अखंडितपणे सर संपर्क ठेवतात. विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण, नोकरी-व्यवसाय, लग्न, कौटुंबिक जीवनातील समस्यांचे निरसन करणे, आदर्श जीवनासाठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या मुलाबाळांना मार्गदर्शन करणे, अशा पद्धतीचे सरांचे आदर्श असे कामकाज चालू आहे. सरांचे आज अनेक विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, व्यापार व प्रशासन अशा विविध क्षेत्रात चमकत आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी अशा प्रकारचे सरांचे जीवन आहे. कोणत्याही प्रसिद्धीचा पुरस्काराचा हव्यास नाही.सेवा निवृत्तीचाही  कुठेही बोलबाला नाही. #आदर्श_शिक्षकाचा_गुणसमुच्चय_असणारे_सर्वांगसुंदर_व्यक्तिमत्व_म्हणजेनिकाडे_सर होय. अशा सरांचा सहवास मला तीस वर्षे लाभला हे माझे भाग्य समजतो. 
  #मराठी_बालकुमार_साहित्य_सभा_कोल्हापूर या संस्थेचे अध्यक्षपद सद्या सांभाळून नवनवीन उपक्रम राबवित आहेत.
पुढील काळात जिल्ह्यातील व  महाराष्ट्रातील शक्य तितक्या प्राथमिक व माध्यमिक शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना काव्य व कथा लेखनाचे धडे देण्याचा सरांचा संकल्प आहे. बुधवारी ३१ मे रोजी सर नियतवयोमानानुसार जरी सेवानिवृत्त होत असले तरी या विद्येच्या वारकऱ्याचे काम अखंडित चालू राहावे भविष्यात सरांना उत्तम आयुरारोग्य लाभो अशी सद्गुरू चरणी प्रार्थना !!

परिवर्तन परिवार..🙏🙏

प्रसन्न जोशी

*आदरणीय मित्रवर्य  ,मुख्याध्यापक मा*. *श्रीयुत चंद्रकांत निकाडे* *सर ..* 
             आपण गेली अनेक वर्षे लेखन ,दिग्दर्शन, वाचन, अध्यापन तसेच मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून  नाट्यछटा, नाट्यवाचन,एकांकिका  तसेच विविध स्पर्धांमध्ये अतिशय झोकून देऊन अव्याहतपणे कार्यरत राहिलात .... कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विविध स्पर्धांचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केलेत... तसेच आपला सर्वात आवडीचा छंद कविता करणे.... यामध्ये अतिशय आनंदाने रममाण झालात...आपले हस्ताक्षर सुद्धा आपल्याप्रमाणेच अतिशय उत्कृष्ट व अद्वितीय आहे.... रमेश पन्हाळकर या टोपण नावाने  आपण अतिशय सुंदर कविता लिहिल्या.... गेली अनेक वर्ष मुख्याध्यापक संघाच्या  नाट्यछटा ,नाट्यवाचन,  एकांकिका स्पर्धा दरम्यान आम्हाला आपला सहवास लाभला व आपल्या मिस्कील स्वभावामुळे व व्यक्तिमत्वामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.....मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना आपण आपल्या शाळेमध्ये अतिशय सुंदर असे नवोपक्रम राबवले ....खरोखर इतक्या वर्षांची  आपली कारकीर्द ही सर्वांना प्रेरणादायी आहे...
 आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी माझ्यातर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा....🌹🌹💐💐🙏🙏 आपण निरंतर असेच उत्साही ,समाधानी, लिहिते रहावे व आपल्या लेखणीचा आणि कौशल्याचा उपयोग समाजासाठी करावा यासाठी आपणांस हार्दिक सदिच्छा .....
     🙏 धन्यवाद🙏
     आपला सन्मित्र .. प्रसन्न जोशी

Yelekar : साहित्य क्षेत्रात नवीन असणाऱ्यांना प्रेरणेचा दीपस्तंभ

🙏💐 *श्री निकाडे सर* 💐🙏
*आदरणीय चंद्रकांत निकाडे सर, आपल्याला माझ्याकडून व माझ्या सर्व कुटुंबाकडूनही वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...*
*तसेच आपले यापुढील आयुष्य आरोग्यदायी, आनंददायी, सुखी व समाधानी जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना...*

*सर आपण लेखक, कवी, प्रकाशक, समीक्षक, कथाकार, नाटककार तर आहातच सोबतच साहित्य क्षेत्रात नवीन असणाऱ्यांना प्रेरणेचा दीपस्तंभ आहात.*
*सर, पुन्हा आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*💐💐💐💐💐
डॉ. शेखराम परसराम येळेकर
चि. भार्गव शेखराम येळेकर व परिवार