Thursday, 2 June 2022

कसे? कुणी? कोठे? केव्हा? लिहावे श्री., सौ., रा.रा., डॉक्टर, मेजर, कै., ह.भ.प., सर, मॅडम, गुरुजी, साहेब, दा, दादा, बापू, आक्का, ताई, बाई,

मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते आणि या भाषांमध्ये अनेक वेळेला व्यक्ती आपल्या नावासमोर श्री, सौ, कु, रा.रा. आणि नावानंतर सर, गुरुजी, साहेब, दा, दादा, बापू, आक्का, ताई, बाई, ही विशेषणे लिहीत असतात. 
आपण आपल्या नावा अगोदर अर्जित केलेल्या, प्राप्त केलेल्या, कर्म करून, अभ्यासाने प्राप्त केलेल्या, शौर्याने मिळवलेल्या डॉक्टर, मेजर या पदव्या लिहू शकतो; मात्र ज्या पदव्या लोकांनी दिलेल्या असतात त्या कधीही स्वतःच स्वत:च्या नावाअगोदर लिहू अगर सांगू नयेत. (उदा. माझे नाव श्री.चंद्रकांत निकाडे आहे.) 
तसेच एखाद्याला आपण आदराने किंवा सन्मानाने, सौजन्याने, उपनाम जोडतो ते नावाला जोडून लिहावे वेगळे लिहू नये.
"तुम्ही कधी येणार?" बायजा आक्का देशपांडे सरांना म्हणाल्या.
या वाक्यात देशपांडे हे बायजाचे आडनाव आहे असे वाटते, पण इथे बायजाक्का आणि देशपांडेसर ही दोन पात्रे आहेत. आक्का हे बायजाला आदराने दिलेले उपनाम आणि देशपांडे हे सरांचे आडनाव आहे हे स्पष्ट सांगायचे असेल तर बायजा+आक्का (बायजाक्का) व देशपांडेसर असेच लिहावयाचा संकेत आहे. सानेगुरुजी, गाडगेबाबा, पाटीलबाई (पाटीलमॅम) 

No comments:

Post a Comment