© chandu64
Thursday, 30 June 2022
माजी आणि निवृत्त
विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या संचालक मंडळाच्या प्रमुखास अध्यक्ष, सभापती, चेअरमन, सेक्रेटरी, सचिव, सरपंच, डेप्युटी सरपंच, खजिनदार, कार्याध्यक्ष, व्हाईस चेअरमन, उपसभापती या पदनामांनी संबोधले जाते. हे पदाधिकारी ठराविक काळासाठी संस्थेचा कारभार सांभाळण्यासाठी विश्वस्त म्हणून सभासदांमधून मतदानाने निवडून किंवा बहुमताने, बिनविरोध निवड होऊन आलेले असतात. त्यांचा कार्यकाल संपल्याबरोबर नवीन निवडणूक होते आणि नवे संचालक येतात तेव्हा जुने संचालक पदममुक्त होतात अशा पदभूषविणाऱ्या संचालकांना त्यांच्या नावापूर्वी जुने पद लावताना माजी हे विशेषण वापरतात. जसे माजी अध्यक्ष, माजी सभापती, माजी चेअरमन, माजी सेक्रेटरी, माजी सचिव, माजी सरपंच, माजी डेप्युटी सरपंच, माजी खजिनदार, माजी कार्याध्यक्ष, माजी व्हाईस चेअरमन,माजी उपसभापती हे पदाधिकारी पुन्हा निवड किंवा निवडणुकीने त्या पदावर येऊ शकतात. त्याच प्रमाणे सैनिक देश संरक्षणासाठी काम करत असताना त्यांचा करारनाम्याने ठराविक काळाचा सेवाकाल निश्चित असतो. त्यानंतर तेही सेवेतून मुक्त होतात त्यांची सेवामुक्ती ही नियत वयोमानानुसार असेलच असे नाही, परंतु त्यांनी सेवेच्या सुरुवातीस दिलेल्या कराराप्रमाणे तेवढी मुदत संपताच त्यांना सेवामुक्त केले जाते. त्यांनाही माजी असेच संबोधले जाते. हे सेवक किंवा सैनिक शासनाच्या इतर कोणत्या खात्यामध्ये पुन्हा सेवा करू शकतात, म्हणून त्यांचाही उल्लेख माजी सैनिक या संबोधनाने केला जातो. मात्र शासकीय/निमशासकीय/प्रशासकीय सेवेमध्ये जे लोक काम करतात ते जेव्हा नियत वयोमानानुसार म्हणजे ५८ किंवा ६० वर्षानंतर सेवेतून मुक्त होतात म्हणजे निवृत्त होतात म्हणून अशा अधिकाऱ्यांच्या नावापूर्वी निवृत्ती लिहिण्याचा प्रघात आहे. जसे की निवृत्त मुख्याध्यापक, निवृत्त पर्यवेक्षक, निवृत्त शिक्षक, निवृत्त पोलीस, निवृत्त गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी हे निवृत्त झालेले अधिकारी पुन्हा त्या पदावर सहसा येऊ शकत नाहीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment