आज नियत वयोमानानुसार आदरणीय श्री.निकाडे सर सेवानिवृत्त होत आहेत.आजपासून आयुष्याच्या तिसर्या टप्प्याची सुरूवात.बालपणापासून नोकरीलागेपर्यतचा पहिला टप्पा,नोकरी लागल्यापासून ते सेवानिवृत्तिपर्यतचा दुसरा टप्पा आणि सेवानिवृत्तीपासूनचा पुढील आयुष्याचा तिसरा टप्पा,तिसर्या टप्प्याकडे जायच्या आधीच निकाडे सरांनी दमदारपणे,अत्यंत उत्साहात या इनिंगची सुरूवात केली आहे.First impression is the last impression या उक्तिप्रमाणेसरांनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे.
सरांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना लेखन,वाचनाचे मार्गदर्शन करण्याचा संकल्प केला आहे आणि त्याची सुरूवात सेवानिवृत्तीआधीच केली आहे.तसेच मराठी बालकुमार साहित्य सभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याबरोबर सभेच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे.अध्यक्षपदाचा कोणताही मोठेपणा न मानता कार्यक्रमप्रसंगी अगदी मोमेटों तयार करून घेण्यापासून ते पुरस्कार्थीनां पुरस्कार वितरणावेळी स्वतः शाल,पुस्तक,बुके ट्रेमध्ये भरून देणारे निकाडे सर हे एक अद्वितीय व्यक्तिमत्वच.कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता प्रत्येक परिस्थितीत समतोल साधण्याचा सुंदर प्रयत्न सर करत असतात.लहानथोर कुणीही मार्गदर्शनासाठी सरांच्याकडे जावो आपल्याजवळील ज्ञानाची दौलत नेहमीच सगळ्यांसाठी ते खुली करतात.
आज शिक्षणश्रेत्रात सरांच्यासारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्व मिळणे विरळच.आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहून आपल्या कार्याचा ठसा विद्यार्थ्यांपर्यतच मर्यादित न ठेवता संपूर्ण शिक्षणक्षेत्रावर उमटवला आहे.सरांनी घालून दिलेले पाठ कधीही पुसले जाणार नाहीत उलट त्यांच्याच मार्गाने अनेक आदर्श विद्यार्थी व साहित्यिक निर्माण होतील.सरांच्या अंगभूत कलांनी नवपिढीला दिशा मिळवून दिली आहे.
अशा हरहुन्नरी,सदैव उत्साही असणार्या आदरणीय निकाडे सरांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.
💐💐
सौ.नसीम जमादार.
No comments:
Post a Comment