Thursday, 18 December 2025

हरवल्या पाऊलवाटा

हरवल्या पाऊलवाटा शोधतो मी आजही 
बिथरल्या माझ्या कुडीला रोधतो मी आजही 

ठेवली लपवून प्रेते  का कुणी अज्ञात जागी 
त्याचसाठी कैक थडगी खोदतो मी आजही 

एकदा मिसळून किल्मीश पाजले त्यांनी मला 
थेंब पाण्याचे पिताना सोधतो मी आजही 

गारवा वाटेत यावा भरवसा नाही जरी 
का उगी हळव्या मनाला बोधतो मी आजही 

करपले आयुष्य सारे भूतकाळाचा पसारा 
आठवांच्या माय भेटी मोदतो मी आजही

© चंद्रकांत

No comments:

Post a Comment