Thursday, 3 August 2023

ना.धा.महानोर श्रद्धांजली


.      *बाप गेला*

गेले टिप्पूर चांदणे
सुनासुनासा शिवार
बाभळीच्या काट्यांनाही
आली अश्रूंची किनार

शेत-शिवाराचा बाप
गेला झाला मुका मका
एकमेकांस बघती
धान ज्वारी  टकामका

अशा तेजाची आरती
ढग वारा थेंब गाती
मूक सारा आसमंत
मूक झाली नातीगोती

         *© रमेश*

No comments:

Post a Comment