नवं गाणं
अ ब क ड म्हणू या
ABCD घोकू या॥
नव्या कविता वाचू या
साहित्याच्या गावाला जाऊ या॥
गाव मोठा ग्रंथांचा
ज्ञानोबा-तुकोबा संतांचा
अभंग, ओवी गाऊ या॥१॥
वाचेल जो जो पुस्तक
घडेल त्याचं मस्तक
मजेत तेथे राहू या ॥२॥
मोठे लेखक आणि कवी
गोष्ट सांगती नवी नवी
आनंदात न्हाऊ या ॥३॥
पुस्तक जत्रा भरलेली
मुलंही भान हरलेली
ग्रंथदिंडी काढू या ॥४॥
चॉकलेट बिस्किट नको म्हणा
एक तरी पुस्तक घरी आणा
वाचून शहाणे होऊ या ॥५॥
अनुतनय
चंद्रकांत निकाडे
पोहाळे तर्फ आळते
ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर
PIN-416229
Phone-9922314564
Mail-nikade64@gmail.com
No comments:
Post a Comment