Sunday, 25 December 2022

काय सांगू (गझल)


              काय सांगू

बेगडीचे रंग सारे भाव खाऊ लागले
भरवशाचे पंच आता डाव खाऊ लागले

राबले ते मूक झाले भूक त्यांची लाजली
भाकरी होती हवी पण पाव खाऊ लागले

काय सांगू नीति त्यांची पायवाटा सोडुनी
परतताना वीर सारे घाव खाऊ लागले

फोडताना माठ त्यांना लाज नाही वाटली
घुसळल्यावर ताक लोणी राव खाऊ लागले

काळजाचे गीत कोणी सांगताना लाजले
उमलते तारुण्य त्यांचे गाव खाऊ लागले

                ©चाँद परछाई

No comments:

Post a Comment