खरंच शिकायला वय नसतं
भ्रमणध्वनी आला.काळाची गरज होती. संच घेतला.किमान आलेला फोन घेण्याचं धाडस झालं.हळूहळू फोन,मेसेज,एमएमएस ,कॅमेरा,ब्लू टूथ, नेट, फेसबुक (चेहरे पुस्तक), इ मेल, सगळं अंगवळणी पडलं. दळणवळण जलद व्हायला लागलं.पत्रलेखन बंद झालं म्हणून दु:ख वाटून न घेता नव्याला स्वीकारलं.
काल हरिश्चंद्र साळोखे या विद्यार्थ्याचा हैद्राबादहून मेल आला.'सर मी आपल्या सर्व पोस्ट वाचतो.पण ही साधनं तोकडी वाटतात.तुम्ही Blog सुरू करा.
झालं आता हे ब्लाॅग प्रकरण काय असतं ते समजून घेऊन चालू करण्याचं चॅलेंज. आला दुसरा विद्यार्थी मदतीला. संजय कळके , सुसंस्कार हायस्कूल,भोसलेवाडी इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.फार जिज्ञासू आणि धडपडी.
काल दुपारी दोन गोष्टी घेतल्या शिकून. ब्लाॅग बनवणं (Bloger) आणि मुलांसाठी ऑनलाईन टेस्ट(Testmoz.com) बनविणं.
आता पुरतं कळलं. शिकायला वयाचं बंधन नसतं आणि जो ज्ञानी तो गुरु. लहानथोर भेद टाकून, मी शहाणा हा अहंकार सोडून नवीन शिकलं पाहिजे. प्रवाहाबरोबर वाहात गेलं पाहिजे.
याचे आणखी दोन फायदे .ज्याला आपण पाठवलेले आवडत असेल तो पाहील, आवडत नाही किंवा वाचा/पाहायची इच्छा नाही त्यांना पोस्ट काढून टाकायचीही तसदी नाही. शिवाय इमेज किंवा व्हाईस क्लीप डाऊनलोड व्हायची फार वाट बघत बसायची गरज नाही. वेळ तर वाचेलच. पण डाटा आणि फोन रुसणं (Hang होणंही) टळेल.
तर मग आजपासून जे काही सांगायचंयं ते
http://www.chandu64.blogspot.in
या ब्लाॅगवर. धन्यवाद !
व्हाटस्अपला रामराम !
No comments:
Post a Comment