स्मशान सहल
अमावस्थाची काळीकुट रात्र, अंधारलेल्या स्मशानभूमीत धडधडणारी
चिता आणि तिच्या सान्निध्यात भुताची प्रतिक्षा करणारे शालेय विदयार्थी,मध्यरात्री
पर्यंत भुताची वाट पाहिली, परंतु भुत काही आलेच नाही.पेटलेली चिता शांत झाली.त्याचबरोबर
भुताची भीतीही निघुन गेली आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीची स्मशान सहल यशस्वी
झाली.मुलांच्या मनातून अंधश्रदधा अंधार भुत प्रेत याची भीती घालवणे या उददेशाने हा
अनोखा उपक्रम पोहाळे तर्फ आळते येथील स्मशान भूमीत राविण्यात आला.
कोल्हापूर येथील शिवाजी
मराठा हायस्कूल व नवनाथ हायस्कूल पोहाळे येथील विदयार्थी या सहलीत सहभागी झालेत.यामध्ये
मुलीचा सहभाग सहभाग जास्त होता. चिल्लर पार्टीचे निमंत्रक व शिवाजी मराठा
हायस्कूलचे शिक्षक मिलिंद यादव व पन्हाळा तालुका अंनिसचे अध्यक्ष व नवनाथ हायस्कूलचे
मुख्याध्यापक चंद्रकांत निकाडे यांनी या सहलीचे आयोजन केले.जगात कुठेही भुत
नसते.भुताचे भास होतात.काही वेळेला इतरांचे लक्ष्य आपल्याकडे केंद्रित करुन घेण्यासाठी
भूत लागल्याचा देखावा निर्माण केला जातो.तर कधी कधी मानसि आजारामुळेच संतुलन बिघडतेYतेव्हा भुताने झपाटले आहे असे वाटते.
अशा वेळी बुवा- बाबांकडे न जाता उपचार केले जावेत असा संदेश या स्मशान सहलीच्या माध्यातून
देण्यात आला.
अंनिसचे राज्य युवा कार्यवाह कृष्णात कोरे यांनी प्रयोग सादर
करुन चमत्कारा मागील विज्ञान सांगितले. सर्पमित्र दिनकर चौगले यांनी
भूत-प्रेत-आत्मा –सर्पज्ञानातील अनुभव कथन चितेसमोरच केले.मिलिद यादव यांनी आकाश
निरीक्षणाबाबत माहिती व स्मशान सहलीचा हेतू सांगितला. भुताची भीती का वाटते,भूत भेटल्याच्या अफवा कशा पसरतात अशा अनेक शंकाचे निरसन चंद्रकांत
निकाडे यांनी केले. रात्री दिड वाजेपर्यंत ही स्मशान सहल विदयार्थ्यांनी प्रत्यक्ष
अनुभवली व मनातली काल्पनिक भुता विषयीची भीती समूह नष्ट झाल्याचे सांगितले.या वेळी
पन्हाळा तालुका अंनिस उपाध्यक्ष प्रकाश ठाणेकर,भीवाजी काटकर यांच्यासह अंनिस कार्यकते.
उपस्थित होते.


Very good initiative. Keep it up.
ReplyDelete