अनुल्लेख
देतील दु:ख अथवा यातना
जे असेल, जसे असेल
तसेच साहीत राहीन
जोवर ते सोसण्याची ताकद
असेल माझ्याकडे
कुणाकडे नाही करणार तक्रार
अथवा मागणार नाही दाद
आक्रंदून आक्रोशही मांडणार नाही
किंवा पुंगळी सोडणार नाही
कुठच्या कंपूत
कुणाशी कानपिचक्या
मुळीच करणार नाही
चौकात बोंब मारणं तर फारच दूर
आणि ते जे करत आहेत
त्यांना कळत नाही
आपण काय करत आहोत
म्हणून क्षमा करणार नाही
किंवा शापही देणार नाही
कारण क्षमेसाठी
फार मोठं काळीज असावं लागतं
जे कुरतडून उंदरांनी बोतर केलं आहे
आणि शापानंतर उ:शापाची विनवणी असते
जेव्हा त्यांना होईल उपरती
आपल्या कठोर कर्माची
ते स्वत:च झुरतील
किंवा म ... ... ...
अनुल्लेखाने
*©रमेश*
No comments:
Post a Comment