Tuesday, 27 September 2022

मित्रांनो बोलते किंवा लिहिते व्हा

 
*मित्रांनो बोलते आणि लिहिते व्हा*
 अभिव्यक्ती हा माणसाचा अधिकार आहे, पण त्या अधिकाराचा तो कितपत उपयोग करून घेतो याबद्दल अनेकदा शंका येते. अभिव्यक्ती मग ती मौखिक असो किंवा लिखित असो. अभिव्यक्त होणं अत्यावश्यक आहे. एखाद्या गोष्टीचा, घडलेल्या घटनेचा, विचारांचा किंवा इतरांच्या कृतीचा ताण डोक्यात घेऊन जगणं म्हणजे शरीराची आणि मनाची हानी करणारा एखादा अणुबॉम्ब जवळ घेऊन जगणंच आहे. 
अभिव्यक्ती मौखिक असेल तर सहज संवाद म्हणून असो किंवा हितगुज म्हणून असो, लिखित असेल तर गद्य असो वा पद्य असो. कोणत्याही माध्यमातून व्यक्त होणं हे महत्त्वाचं आहे. हे व्यक्त होणं आपल्या मनातल्या साचलेपणाला मुक्त करत असतं, मोकळं करत असतं.
साचलेपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप घातक आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवरती हे साचले पण विविध व्याधी आणि विकार निर्माण करत असतं. 
जेव्हा अशा प्रकारे काही क्षार शरीरामध्ये साचतात त्यावेळेला शरीरामध्ये ट्यूमर किंवा किडनी स्टोनसारखे विकार होतात. जेव्हा हेच साचणारे पदार्थ घनरूपात ऐवजी मौसल किंवा महसूल रूपात असतात त्यावेळेला शरीरामध्ये गाठी निर्माण होतात आणि द्रवरूपात असतील तर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी तयार करतात. जर या साचलेपणाचे घाव शरीराच्या अंतर्गत झाले तर त्याचेच रूपांतर कॅन्सरमध्ये होतं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जर या ताणतणावामुळं मेंदू मधील छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांना इजा झाली, तर ब्रेन हॅमरेज नावाचं पॅकेज आपल्या शरिराला दिलं जातं. प्रसंगी मृत्यूही ओढवतो म्हणून व्यक्त होणं, मोकळं होणं हे खूप महत्त्वाचं आहे. बोलून किंवा लिहून मोकळं झाल्यामुळे, व्यक्त झाल्यामुळे ताणतणाव नाहीसा होतो. ताणतणावापासून आपण मुक्त होतो आणि त्यायोगे ताणतणावामुळे होणारे विकार ज्याला सायको-सोमॅटिक विकार म्हणतात. त्याच्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. मानसशास्त्रामध्ये ईएफटी नावाचा तंत्रच आहे इमोशनल फ्रीडम थेरेपी असे त्याला म्हणतात आपल्या मनात ज्या ज्या विचारांच्या साचलेल्या कोठ्या असतील त्या कोठ्या वेळोवेळी रिकाम्या करायच्या असतात. मौखिक रूपाने त्या रिकाम्या करू शकतो. आपण आपल्या परिवारासाठी, आपल्या मित्रमंडळी साठी वेळ देऊन किंवा त्यांचा वेळ घेऊन आपण आपलं साचलेपण दूर करू शकतो. 
लिखित रूपाने व्यक्त होण्यासाठी या मर्यादाही नसतात. समोर कुणी असलंच पाहिजे असं नाही. कागद किंवा मोबाईल, लॅपटॉप, संगणक या माध्यमावर केव्हाही, कुठेही, कसेही आपण व्यक्त होऊ शकतो. मोबाईल मध्ये अक्षर अथवा व्हाॅइस दोन्ही लेखनाची साधने उपलब्ध आहेत. व्यक्त होऊ शकतो लिहून डायरी लिहून घेतो शकतो कथा कविता लिहून व्यक्त होऊ शकतो. 
केवळ आनंद झाल्यावरच असं साहित्य लिहिलं पाहिजे असं नाही. तुमचा वैयक्तिक किंवा सामाजिक कोणतीही समस्या, प्रश्न असेल, तो जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला भिडतो तेव्हा तेव्हा तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे, आणि हे व्यक्त होणे तुमच्यासाठी जसं फायद्याचा आहे. तसंच अनेकदा तुमच्यासारख्या समस्या निर्माण झालेल्या व्यक्तीलाही ते महत्त्वाचं असतं. दोघांच्यासाठी ते औषध म्हणून उपयोगी पडतं. जसा आपल्याला लिहिल्यानंतर आपण मोकळे होतो तसं काही वेळा वाचल्यानंतर सुद्धा आपल्या मनामधला हा साचलेपणा दूर होऊन या घातक विकारांपासून आपली सुटका होऊ शकते, म्हणून वाचलेही पाहिजे वाचन, मौखिक अभिव्यक्ती, लिखित अभिव्यक्ती ही तीनही रूपं तशी एका अर्थाने मानसिक विकारावर ती औषधाच काम करत असतात आणि ती शोधण्यासाठी कुठे निसर्गामध्ये किंवा मेडिकल शॉपमध्ये किंवा इतर समाजामध्ये जायची गरज नाही किंवा जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा ज्या त्या पद्धतीने आपण व्यक्त होऊ शकतो आणि आनंदी सुखी जीवनाचा मंत्र किंवा मार्ग आपल्याला सापडलेला असतो. 
लेखनाप्रमाणेच चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन आणि वादन यापैकी एखाद्या कलेचं व्यसन आपणास तणावमुक्त करू शकतं. त्यांचाही आस्वाद घ्यायला हरकत नाही. व्यावसायिक पद्धतीनं या कला जोपासता येतातच, परंतु छंद म्हणूनही या कलांचा आपल्याला आस्वाद घेता येतो. त्या आपल्यासाठी औषधी ठरू शकतात. आणि आपल्या छंदातून निर्माण झालेल्या कलाकृती इतरांसाठीही औषधी ठरू शकतात. नकळतंही असं एखादं सत्कार्य आपल्या हातून होऊन जातं. 
                      
                                  ©chandu64
*OUT LET*

लाखो जीव घेणार्‍या क्रूर  *हिटलरने* आत्महत्या केली शेवटी.!••
सुंदर विचार देणारे *साने गुरुजी* आत्मघात करुन घेतात.
मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे *स्वामी विज्ञानानंद* मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.
आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे *भैय्युजी महाराज* आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही *सुशांत सिंग राजपुतनं* नैराश्यातून आत्महत्या केली.
-आणि आता सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या *शीतल आमटे करजगी* आपलं जीवन संपवतात. 
- आजची नागपूर ची बातमी *उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरू च्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम* यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या करतात.

या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण.? 

पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त. त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात.

*माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही.* मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो.  शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली पायात कबरच आहे, हे विसरुन चालत नाही.

भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्या नंतर ABP माझा चँनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक "अध्यात्मीक" गूरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील "स्ट्रेस"बाहेर काढायला त्याच्या जवळ *"outlet"* नव्हता. डॉ. शितल आमटे,
(बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले)

इतकं महत्वाचं असतं का हे outlet.?
होय !
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी *विशाल धरण* बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फूटेल. इतकं महत्वाचं असते हे *waste weir* ...मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं एक *धरणच* आहे. या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फूटेल की राहील ?

मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.

म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे *outlet*  वापरून आपल्या समस्या, आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं *outlet* म्हणजे आपले डोळे, ते उघडा.फुटून जाऊ द्या अश्रूचा बांध...वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दूःख, उपेक्षा.. पिस्तोलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोप्प नाही का.?

*म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!*
हसा ! बोला ! रडा ! भांडा !
व्यक्त व्हा !!  मुक्त व्हा.. !!

*काळजी घ्या....*

  🙏😊🙏सोडून गेल्यावर *"ᴍɪss ʏᴏᴜ"* म्हणण्यापेक्षा

सोबत आहे तोपर्यंत *"ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ"* म्हणा आपुलकीची माणस मिळायला खुप मोठं भाग्य लागतं. 🙏🙏🙏🙏 
*समस्त मित्राना समर्पित ..*

1 comment: