. *नाती*
तुम्हाला माहीत
आहे ना राव!
आजोळ म्हणजे
मामाचे गाव
वडिलांचे भाऊ
आपले *काका*
मावशीचा नवरा
तोही *काका*
*मामा* म्हणजे
आईचा *भाऊ*
काकांची बायको
आईची *जाऊ*
आपण तिला
*काकी* म्हणतो
मामाच्या बायकोला
*मामी* म्हणतो
दादाची बायको
आपली *वहिनी*
दादाच्या मेहुण्या
तिच्या *बहिणी*
ताईचा नवरा
आपले *दाजी*
मुली त्यांना
म्हणतात *भाऊजी*
वडिलांच्या वडिलांना
*आजोबा* म्हणतात
वडिलांच्या आईला
*आजी* म्हणतात
आणि आपल्या
आईचे वडील
तेही आपले *आजोबा*
आजोळाकडील
आईची आई
*आजीच* असते
मायेला तिच्या
मर्यादा नसते
वडिलांचे वडील
म्हणजे *पणजोबा*
पांढऱ्या मिशांचे
वाटतात वाघोबा
चुलत्यांचा मुलगा
*चुलत भाऊ*
मामाचा मुलगा
*मामे भाऊ*
चुलत्यांची मुलगी
*चुलत बहीण*
मामाची मुलगी
*मामे बहीण*
आत्याचा मुलगा
*आते भाऊ*
काकांचा मुलगा
*चुलत भाऊ*
आत्याची मुलगी
आतेबहीण
काकांची मुलगी
चुलतबहीण
आईचा भाऊ
बाबांचा *मेहुणा*
आपला *मामा*
सर्वांचा पाहुणा
बाबांचे भाऊ
आईचे *दीर*
गरमागरम खातात खीर
आईची बहीण
बाबांची *मेहुणी*
तीही असते
आजोळी पाहुणी
आपली ती
असते मावशी
तिच्याशी आपली
गट्टी खाशी
आईचे वडील
बाबांचे *सासरे*
बाबांचे वडील
आईचे *सासरे*
आईची आई
बाबांची *सासू*
बाबांची आई
आईची *सासू*
वडिलांची बहीण
म्हणजे *आत्या*
आत्याचा नवरा
असतो *तात्या*
आईचे *दीर* म्हणजे
बाबांचे भाऊ
काकांची बायको
आईची *जाऊ*
बाबांची पत्नी
आपली आई
मोठ्या बहिणीला
म्हणतात ताई
वडील म्हणजे
आईचा पती
आणखी नाती
सांगू किती!
काकांचा मुलगा
बाबांचा पुतण्या
काकांच्या मुलीला
पुतणी म्हणतात
आजोबांना आपण
नातवंडे असतो
मुलगा नातू
अन् मुलगी नात
मुलीचा नवरा
जावई बापू
मुलाची बायको
सूनबाई भली
विहिण-व्याही
सुनेचे आई-बाप
तसेच असतात
जावयाचे मायबाप
हक्काचे नाते
बाबांची बहीण
आईची वन्स
आत्या आपली
तिच्याशी लळा
असतोच असतो
घेऊन येते
खेळण्यांची टोपली
*©अनुतनय*
No comments:
Post a Comment