*Health Science*
*Life science क्षेत्रातील संधी*
Health science मध्ये आरोग्य सेवांशी निगडीत सर्वच विभागांचा समावेश होतो.
M.B.B.S
B.H.M.S
B.A.M.S
यासारख्या सर्वांना माहित असलेल्या कोर्सेस शाखा आहेतच शिवाय त्याचबरोबर
B.D.S
नर्सिंग
फार्मसी
पैरामेडिकल
बायोमेडिकल
हेल्थ care
अशा प्रकारच्या करिअरच्या संधी सुद्धा या क्षेत्रात उपलब्ध आहेत, त्याशिवाय
फिजिकल ट्रेनर
न्युरिशनिस्ट
अश्या वेगळ्या वाटेने जाणारी करिअर सुद्धा या क्षेत्रात करता येऊ शकतात.
10वी नंतर हेल्थ केअरमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराकडे जाणारे अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, ITI, डिप्लोमा चे पर्याय सुद्धा आहेत.
मेडिकलला जाण्यासाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन 11वी, 12वी करणं आवश्यक आहे, physics, chemistry, maths, biology, बरोबर गणित हा पूरक विषय घेतल्यास त्याचा अधिक उपयोग होतो.
12वी नंतर मेडिकल ची NEET ही प्रवेश परीक्षा देऊन
MBBS
डेंटिस्ट
नर्सिंग
पैरामेडिकल
फिजोयोथेरपी
ऑक्युपेशनल थेरपी,
स्पीच आणि audio थेरपी, प्रोस्थेटिक्स आणि आर्थोडोन्टिक्स
आणि अल्टरनेट मेडिसिन
होमिओपॅथी
आयुर्वेद
युनानी
आणि व्हेटर्नरी सायन्स अश्या स्वरूपाच्या कोर्सेसला प्रवेश मिळतो
AFMC=NEET
मेडिकलशी संबंधित जेव्हा प्रॉपेशनल कोर्सेस आहेत, त्यांची कालमर्यादा 4वर्षे 6महिने, आणि 1वर्षाचा अनुभव अशा स्वरूपाचा असतो, हे कोर्सेस पूर्ण केल्यावर post graduate कोर्सेस करण्यासाठी NEET सारखीच आणखी एक प्रवेश परीक्षा देऊन करता येतात. पुढील तीन वर्षात post graduateion होऊ शकता याशिवाय अल्टरनेट मेडिसिन, योग, नॅचरोपॅथी
संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत त्यासाठी आयुष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे.
फार्मसीचा पर्याय सर्वांना माहिती आहेच, 12वी नंतर डिप्लोमा फार्मसी, बॅचलर in फार्मसी, डी.फार्मा, केल्यास स्वतःचा व्यवसाय देखील करता येतो, किंवा फार्मसी कंपनीत नोकरी सुद्धा करता येते. वैद्यकिय क्षेत्रातील आवश्यक गोष्टी, आवश्यक क्षमता,
सेवावृत्ती
मानसिक आणि भावनिक स्थेर्य,
सातत्यपूर्ण अभ्यास,
कठोर परीश्रम करण्याची तयारी
इंग्रजी भाषेवर प्रभूत्व
आणि संयम असणं गरजेचं आहे
त्यामुळे आपली आवड, क्षमता आणि त्या क्षेत्रात असलेल्या असंख्य संधी यांचं एकत्रित मिश्रण केल्यास उत्तम करिअर बनवता येत
*वाणिज्य शाखेतील संधी*
वाणिज्य शाखा म्हणजे व्यापार, किंवा व्यापाराशी निगडीत क्षेत्र, व्यापार हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे, आणि त्यांच्याशी संबंधित असंख्य गोष्टी आपल्याला कॉमर्स मध्ये शिकता येतात कॉमर्स म्हंटल की फक्त
C. A, C.S, ICWA, MBA असं जे क्षेत्र आपल्या डोळ्यासमोर येत त्यापेक्षा कितीतरी अधिक वेगळ्या संधी कॉमर्स मध्ये उपलब्ध आहेत. दैनंदिन जीवनात व्यापारात असलेल्या जवळपास प्रत्येक गोष्टीचा काही ना काही तरी संबंध वाणिज्य शाखेत येतो,
निरनिराळे कर
बँकिंग
अकॉउंटीग
परचेस
सेल्स
मार्केटिंग
इन्शुरन्स तसेच
स्टोअर्स
बिझनेस डेव्हलपमेंट
कॉस्टिंग
वित्त
औडीट
यांचा योग्य अर्थ लावून करिअर करणं या सगळ्यांचा संबंध प्रामुख्याने कॉमर्स मध्ये येतो
10वी नंतर निरनिराळे प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत
ट्रॅव्हल्स अँड टूरीझम
हॉस्पिटलिटी
रिटेल मॅनेजमेंट इत्यादी
याशिवाय उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून 12वी करता येते यानंतर रोजगार आणि स्वयं रोजगार यांच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, तसेच अनुभव घेत दुरुस्थ शिक्षणाचे पर्याय उपलब्ध आहेत. 10वी नंतर वाणिज्य शाखेत थेट प्रवेश शक्य आहे, कॉमर्स शिकताना प्रामुख्याने तीन विषय आपल्याला सखोल शिकावे लागतात
इंग्रजी, अकॉउंटनसी, अर्थशास्त्र अर्थात या सर्व विषयांचा गणिताशी जोड आहे परंतु स्वरूप निराळ आहे.
B.com होईपर्यंत अर्थशास्त्र, अकॉउंटनसी हे विषय आपण शिकतो. भविष्यात C.A, किंवा C.S साठी 11वी पासून अभ्यास सुरु करता येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश आणि अन्य प्राथमिक परीक्षा, B.com सुरु असताना देता येतात.
वाणिज्य पदवी संपादन करताना अभ्यासाबरोबरच बाहेर प्रत्यक्ष काम करत सराव केला आणि पुढे आवश्यक असणारी सॉफ्टवेअरचे ज्ञान सुद्धा या काळात शिकले तर विद्यार्थ्यांची नोकरी लागण्याची पात्रता अधिक वाढते.
B.com नंतर TAX मध्ये असलेलं D.T. L/ G.D.C.A असे हमखास रोजगार देणारे पर्याय तर उपलब्ध आहेतच तसेच वाणिज्य पदवी नंतर कायद्याची पदवी घेतल्यास, बँकिंग क्षेत्रात मुबलक संधी उपलब्ध आहेत शिवाय इतर अनेक पदवी अभ्यासक्रमात उपलब्ध असलेला MBA चा मार्ग उपलब्ध असतो.
पण त्यासाठी 11वी, 12वी ला गणित असल्यास उपयोग अधिक होतो
*संरक्षण क्षेत्रातील संधी*
*Uniformed services*
*गणवेशधारी सेवा या क्षेत्रातील संधी*
चला तर मग uniformed service चा परिचय करून घेऊया....
आणि जाणून घेऊया......करिअरच्या संधी
आपल्या देशाच्या सीमांवर पहारा देणाऱ्या प्रसंगी आपल्या प्राणपणाने युद्धात लढणाऱ्या सैन्यातल्या जवानांपासून ते अगदी सेक्यूरीटी गार्ड पर्यंत, सर्व सेवांचा या क्षेत्रात समावेश होतो, हे क्षेत्र केवळ एक सामान्य नोकरी नसून यासाठी लागणार
विलक्षण शौर्य
समर्पण भावना
आणि निष्ठेमुळे या सेवेला वलंय प्राप्त झालं आहे, या सर्विसचे चार प्रकारात वर्गीकरण करता येत
पहिला प्रकार -आर्मड फोर्सेस-
1भूदल
2 नौदल
3 हवाईदल
दुसरा प्रकार- पैरामिलिटरी फोर्सेस
1.इंडियन फोस्ट गार्ड्स
2.आसाम रायफल्स
3.स्पेशल फ्रेटियर फोर्स
तिसरा क्रमांक -केंद्रीय व राज्य पोलीस दल
1.केंद्रीय राखीव पोलीस दल C.R.P.F
2.सीमा सुरक्षा बल
इंडो तिबेटीयन सीमा पोलीस
Center Industrial-
सेक्यूरीटि फोर्स -C.I.S.F
सशस्त्र सीमा बल
रेल्वे सुरक्षा दल
N.D.R.F नॅशनल राष्ट्रीय आपत्ती निवारण बल/दल
राज्य राखीव दल
N.S.G
S.P.G
यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो
चौथा प्रकार=सिव्हिल डीफेन्स organisation
1.होमगार्ड
2. अग्नीशमन दल
वयाच्या आणि शिक्षणाच्या विविध टप्प्यावर या चारही गणवेशधारी सेवांमध्ये जाता येते....
10वी, किंवा 12वी उत्तीर्ण झालं की
*17वर्षे, 6महिने, ते 21वर्ष*
Fitnes test
मेडिकल test
लेखी परीक्षा देऊन गणवेशधारी सेवेत जाता येते....
त्यासाठी
शारीरिक तंदुरुस्ती
भरपूर दमसास आवश्यक असतो....
अशी व्यक्ती आर्मड फोर्सेस मध्ये जवान किंवा कॉन्स्टेबल मध्ये भरती होऊ शकते....
यासाठी ठराविक कालावधी मध्ये भरतीच्या जाहिरातींवर लक्ष ठेवणे आवश्यक असते, आणि भरतीसाठी आवश्यक तयारी करणे गरजेचं असत
सैन्यात भरती होण्यासाठी म्हणजेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये भरती होण्यासाठी
12वी नंतर NDA
नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात N.D.A ची परीक्षा असते ही परीक्षा
U.P.S.C द्वारे घेतली जाते....
आर्मी साठी कोणत्याही शाखेतून 12वी होणं गरजेचं असत...
तर नेव्ही/air force साठी 12वी गणित विज्ञान, भौतिकशास्त्र, आवश्यक, अर्थात 12वी science नंतर ही परीक्षा देता येते.....
या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर S.S.B मुलाखत आणि मेडिकल test आवश्यक असते.....
त्याचबरोबर
पदवीनंतर अनेक मार्गानी सैन्यात जाता येत...
त्यासाठी कोणत्याही शाखेच्या पदवीनंतर किंवा इंजिनिअरिंगच्या ही संधी उपलब्ध आहेत....
पदवी करत असताना
N.C.C केल्यास लेखी परीक्षेतुन सूट मिळते...
पदवी नंतर
AFCAT परीक्षा....
CDS परीक्षा.....
I.M.A=इंडियन मिलटरी अकॅडमी
I.N.A=इंडियन नेव्ही अकॅडमी
एअर फोर्स अकॅडमी मध्ये जाता येत...
तसेच ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी
शॉर्ट सर्विस कमिशन सुद्धा करता येत....
आर्मड फोर्सेस मध्ये लागणाऱ्या मेडिकल सर्विसेस मध्ये 12वी नंतर मेडिकल कोर्सेस करून
पैथालॉजी लबोरेटरी
रेडिओलॉजी
हॉटेल मॅनेजमेंट
नर्सिंग
असे विविध technical कोर्स करून JCO- ज्युनिअर कमिशन ऑफिसर म्हणून सहभागी होता येत....
पोलीस बनण्यासाठी सामान्यत पोलीस भरती असते. त्यामधून जावं लागत. मात्र अधिकारी बनन्यासाठी पदवीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, UPSC च्या परीक्षा देऊन पोलीस दलात जाता येत
पोलीस =पोलीस भरती......
अधिकारी=महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग........
UPSC मधून CBI, RO, IB या सेवांमध्ये निवड होऊ शकते, वाहतूक पोलिसांची प्रक्रिया देखील समान असते. अर्थात एकदा पोलीस दलात प्रवेश मिळाला, की पोलीस खात्या अंतर्गत अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत
*खाजगी संरक्षण सेवा*
युनिफॉर्म सर्विस पेक्षा वेगळं क्षेत्र स्थानिक स्तरावरील security एजन्सी......
खाजगी security एजन्सी स्थानिक स्तरावर खाजगी security एजन्सी असतात. त्यातूनही यामध्ये जाता येत. युनिफॉर्म सर्विससाठी लागणाऱ्या बाबी
शारीरिक पात्रता कारण या क्षेत्रात शारीरिक क्षमतांचा कस लागतो. शिवाय
मानसिक सहनशक्ती लागते
आसपासच्या घटनांचा अभ्यास, चौकस बुद्धी,
दैनंदिन घडामोंडीचे आकलन
हे सुद्धा यशस्वी करिअर होण्याच्या दृष्टीने महत्वाच असत त्यामुळे आपली आवड क्षमता आणि त्या क्षेत्रात असलेल्या असंख्य संधी यांची सांगड घालून आपल्याला आपल्या स्वप्नातील करिअर बनविता येत, निवडता येत.....
करिअर म्हणजे नेमक काय? आपल्या स्वप्नातील करिअर जाणून घ्यायच असेल तर महाराष्ट्र शासन आणि SAF म्हणजे श्यामची आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या www.mahacareermitra.in या वेबसाईटला भेट देऊन आपल्या जिल्हातील कॉलेजस, अभ्यासक्रम माहिती करून घ्या. तसेच योग्य करिअरसाठी मॅजिक फ्रेम वर्क व्हिडीओ नक्कीच पहा
No comments:
Post a Comment