भ्रृणहत्येचे पाप
आले पाऊस
छत्र्या भिजल्या
वीज कडाडून गेली
गणपत नामे
त्या वाण्याची
इच्छा मरून गेली.
चावून काड्या
गणपा वाणी
घरभर फेकत बसतो
कुणी विचारा
काही त्याला
केवळ नुसता हसतो
गाडी गेली
माडी गेली
तरीही रुबाब दावी
हाकलून देतो
दारामधूनच
सलूनमधला न्हावी
गणी न मिळता
हर वाण्याची
अशीच असते कहाणी
पूर दाटतो
त्याच्या नयनी
वाहून जाते नहाणी
आता कोणी
त्याला पुसतो
उगाच त्याचा पत्ता
पट हरलेला
राजा तोही
रोज गाठतो गुत्ता
अशा कितीशा
भर वाण्यांची
पडली गणती नाही
पुसून अश्रू
आणि डोळे
झाली कळकट बाही
बापजादे
करून गेले
भ्रृणहत्येचे पाप
भाव खाऊनी
गेले समदे
आणि वधूचे बाप
©रमेश
No comments:
Post a Comment