आपलं वाचन झाल्यानंतर
वाचणाऱ्याला पुस्तक द्यावं
अधिक समजून घेण्यासाठी
अभ्यासाला मस्तक द्यावं
वारंवार चुकणार्याला
थोडं सौम्य शासन द्यावं
गरजू आणि ऐकणाऱ्याला
थोडंथोडकं भाषण द्यावं
नको असेल पटकन जर
तर सोडून व्यसन द्यावं
पोट थोडं रितं ठेवून
भुकेल्याला राशन द्यावं
विद्यार्थ्याला ज्ञान द्यावं
याचकाला दान द्यावं
आपल्याकडं फाटक ठेवून
दुसऱ्याला छान द्यावं
*© रमेश*
No comments:
Post a Comment