Tuesday, 16 May 2023

जिवनाची जिगिषा

.                  जिवनाची जिगिषा
संकटाच्या दर्‍या
खोरी पार करताना
पाठीवरील तुझा हात
आणि
'कठीण...! कठीण...!!
अजून कठीण...!!!'
हे हुंकार 
जीवनातील उमेद
लढण्याची जिगिशा
जय-पराजयापलीकडील तटस्थता
वैराग्याचे अंतिम सत्य 
पायरीपायरीने 
उत्साह वाढविणारा आत्मविश्वास 
मदनदाह ओसरत असल्याची 
साक्ष तर देत नव्हता ना!

आंतरिक परिपूर्णतेच्या 
वारूवर स्वार होऊन
रितेपणाचा सागर 
पार करण्याचे गूढ मंत्र
देत होते
हे कळूनही
भटकणारे आत्मे
विलग कधीच नव्हते...!
नाहीत...!!
नसावेत...!!!

रमेश 

No comments:

Post a Comment