Saturday, 20 May 2023

काफिया : पाठ, गाठ, वाट, भाट, घाट, ताट, थाट
रदीफ : गेले
वृत्त : प्रसूनांगी.
लगावली: गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा

सारेच सारथीही सोडून पाठ गेले
हातातल्या लगामी, तोडून गाठ गेले

आले कसे कळेना, मार्जार पावलांनी 
जाता स्वतः दुखंडे, खोडून वाट गेले

होते किती करंटे, स्वार्थी, उनाड भोंदू
नाती नव्या जगाशी जोडून भाट गेले

वार्ता सुखावल्याची सांगून काल वेडे
वाटेतले प्रवाशी फोडून घाट गेले

मी राहिलो उपाशी ते तेल तूप सारे
मांडून ठेवलेले झोडून ताट गेले

झाले बरे म्हणा ना आता कशास चिंता
कोणी उजाड रानी मोडून थाट गेले
           
                                चंदन

No comments:

Post a Comment