चुकतो तो... ... ...
चुकतो त्याचे माणूस नाव
हृदय मसलतो चुकरा घाव
आपले आपेश, आपल्या चुका
पुन्हा वाटाडे होतात राव
शिक्षा आणि चूक यांचा
संबंध किती योग्य असतो
व्यस्त की अव्यस्त असेल
याचा थांगपत्ता नसतो
चुकतात जे ते कधीकधी
आपल्या वाटा हरवून बसतात
आता मुळीच माघार नाही
असंही कुणी ठरवून असतात
चुकल्याशिवाय शिकण्याची
संधी पुन्हा मिळत नाही
असंही कुणी म्हटलं तरी
चुकारास तेही कळत नाही
चुकायलाही मज्जाव नाही
पण एक लक्षात ठेवा
अचूक जर भेटले तर
करू नका त्याचा हेवा
रमेश कुरलीकर
No comments:
Post a Comment