Sunday, 12 November 2023

ताई-दादांना पाखरांची विनंती

इवलासा जीव आमचा
नका रे फटाके फोडू
दादा-ताई विनंती 
शपथ नका मोडू
    घरट्यात येतो फटाका   
    हिरव्या हिरव्या पानात
    इजाबिजा झाली तर
    नाही डॉक्टर रानात
जंगलास लागतो वणवा
चुकीमुळे तुमच्या छोट्या
अंडीही जातात जळून 
खाक होतील कोठ्या
    चिऊ-काऊ, खारोटी
    मुंग्या, बेडूक, ससे
    सरपटणारे जीवतरी
    सांगा वाचतील कसे?
धुरामुळे कासावीस
आमची पिलं होतात
आवाजाची वाटते भीती
सगळे गांगरून जातात
   कागदांचा कचरा होतो
   तुमच्याच की रे दारात
   सफाईचं जादा काम
   आपल्याच आईला घरात
 थांबेल ना रे झाडांची 
 बागेमधली सळसळ
 पटलं तर बघा बाबा
 येऊन आमची कळकळ

                

No comments:

Post a Comment