. *खरं सुख*
बाबा यंदा दिवाळीत
फराळाचं आणा झाड
नको खेळणी, नको कपडे
नको फटाके फाऽड फाऽड
ज्यांच्या घरी नसेल होत
दिवाळीचा सण
थोडा थोडा राखून ठेवीन
त्यांच्यासाठीपण
मी खाईन, त्यातलं थोडं
त्यांना देईन नक्की
तुम्हास आपल्या लेकीची
खातरी आहे ना पक्की
वंचितांना द्यावं थोडं
राखून आपली भूक
वाटून खाणं कपडे लेणं
यात खरंय सुख
*अनुतनय*
No comments:
Post a Comment