Thursday, 9 November 2023

ही आठवण माझ्यासह काही जणांची

शिक्षेच्या भीतीपेक्षा 
लाजेचं भय जास्त होतं
प्रार्थना चुकल्यावर
शिक्षा होते हे माहीत असूनही
मुद्दामच रोज उशिरा जायचो
'लेट कमर्स' ओळीत
सर्वांत शेवटी उभा राहायचो
त्यामुळं
चड्डीच्या ठिगळाला 
पडलेल्या भोकातून
कुणालाच 
चिमटा घेता येत नव्हता
           
अंडरपँट म्हणजे काय?
सतराव्या वर्षी कळालं
सातवीपर्यंत गादीपाटाच्या 
पट्ट्यापट्ट्याच्या कापडाचीच
नाडीची चड्डी वापरली
हायस्कूल गेल्यावर
युनिफॉर्म कंपल्सरी
पांढरा सदरा दाजीकडून
तो थोडा ढगळ होता
हातोपे कापून
घड्याळ घालायचो
शिवाची जुनी खाकी पँट
महिन्याभरात बोच्यावर विरघळत गेली
आईनं दुसर्‍या एका पँटच्या
पुढच्या बाजूचे तुकडे जोडून
डागडुजी केली 
हायस्कूलात जाऊ लागलो
प्रार्थना चुकल्यावर
शिक्षा होते हे माहीत असूनही
मुद्दामच रोज उशिरा जायचो
शिक्षेच्या भीतीपेक्षा 
लाजेचं भय जास्त होतं
'लेट कमर्स' ओळीत
सर्वांत शेवटी उभा राहायचो
त्यामुळं
चड्डीच्या ठिगळाला 
पडलेल्या भोकातून
कुणालाच 
चिमटा घेता येत नव्हता

           . *लेट कमर्स*

अंडरपँट म्हणजे काय?
सतराव्या वर्षी कळालं
सातवीपर्यंत गादीपाटाच्या 
पट्ट्यापट्ट्याच्या कापडाचीच
नाडीची चड्डी वापरली

हायस्कूलमध्ये गेल्यावर
युनिफॉर्म कंपल्सरी
पांढरा सदरा मिळवला दाजीकडून 
तो थोडा ढगळ होता
हातोपे कापून
घड्याळ घालायचो

शिवाकडून घेतलेली 
जुनी खाकी पँट
महिन्याभरात बोच्यावर विरघळत गेली
आईनं दुसर्‍या एका पँटच्या
पुढच्या बाजूचे तुकडे जोडून
डागडुजी केली 
हायस्कुलात जाऊ लागलो

प्रार्थना चुकल्यावर
शिक्षा होते हे माहीत असूनही
मुद्दामच रोज उशिरा जायचो
शिक्षेच्या भीतीपेक्षा 
लाजेचं भय जास्त होतं

'लेट कमर्स' ओळीत
सर्वांत शेवटी उभा राहायचो
त्यामुळं
चड्डीच्या ठिगळाला 
पडलेल्या भोकातून
कुणालाच 
चिमटा घेता येत नव्हता

. *लेट कमर्स*

ही आठवण माझ्यासह काहीजणांची... 
अंडरपँट म्हणजे काय?
सतराव्या वर्षी कळालं
सातवीपर्यंत गादीपाटाच्या 
पट्ट्यापट्ट्याच्या कापडाचीच
नाडीची चड्डी वापरली

हायस्कूलमध्ये गेल्यावर
युनिफॉर्म कंपल्सरी
पांढरा सदरा मिळवला दाजीकडून 
तो थोडा ढगळ होता
हातोपे कापून
घड्या घालायचो

शिवाकडून घेतलेली 
जुनी खाकी पँट
महिन्याभरात ढुंगणावर विरघळत गेली
आईनं दुसर्‍या एका पँटच्या
पुढच्या बाजूचे तुकडे जोडून
डागडुजी केली 
हायस्कुलात जाऊ लागलो

प्रार्थना चुकल्यावर
शिक्षा होते हे माहीत असूनही
मुद्दामच रोज उशिरा जायचो
शिक्षेच्या भीतीपेक्षा 
लाजेचं भय जास्त होतं

'लेट कमर्स' ओळीत
सर्वांत शेवटी उभा राहायचो
त्यामुळं
चड्डीच्या ठिगळाला 
पडलेल्या खिडकीतून
कुणालाच 
चिमटा घेता येत नव्हता

           *रमेश कुरलीकर*

No comments:

Post a Comment