Tuesday, 31 May 2022
श्री.एस.पी.भोसले
मा.श्री निकाडे सर मुख्याध्यापक.. नवनाथ हायस्कूल पोहाळे ता.पन्हाळा आपणास सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शिक्षणक्षेत्राला आपले चौफेर असे योगदान लाभलेले आहे. यापुढे या क्षेत्रात असे उत्तम शिक्षक, उपक्रमशील मुख्याध्यापक ,उत्तम प्रशासक, उत्तम प्रकाशक, उत्तम साहित्यिक, उत्तम लेखक, कवी,उत्तम वक्ते, व्यासंगी समुपदेशक, उत्कृष्ट चित्रकार शैली, उत्तम कारागीर, अनेकांच्या मार्गदर्शनातील दीपस्तंभ असे अष्टपैलू व्यक्तिमत्व *विद्येचे वारकरी* मिळणे महाकठीणच. मी मार्गदर्शन केलेल्या विज्ञान उपकरणास ज्यावेळी प्रथम क्रमांकाचा जहांगीर पुरस्कार मिळाला त्यावेळी सर दै.सकाळचे वार्ताहर होते. त्यावेळी त्यांनी माझ्या घरी येऊन माझी मुलाखत घेतलेली होती. आणि लगेचच ती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दै.सकाळच्या आवृत्ती मधून प्रकाशितही झाली होती. त्यामुळे शेकडो जणांच्या कडून माझ्याकडे अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. त्यासाठी त्यांचे आजही मनःपूर्वक आभार.🙏 माझ्या युट्युब वरील चॅनेल मधील व्हिडिओंचे ब्लॉग असेच असायला पाहिजे यासाठी त्यांनी मला उत्तम मार्गदर्शन केले. ते आमचे उत्तम मार्गदर्शक आहेत .चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक ते त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या शाळेत जाऊन ते नेहमीच करीत आहेत आणि त्यांना प्रोत्साहन दत आहेत. खरोखरच असे शिक्षक दुर्मिळच. त्यांच्याकडे असलेल्या बहुविध कलाविषयी बोलावे तेवढे थोडेच. असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज 31 मे 2022 या दिवशी सेवानिवृत्त होत आहे. परंतु शिक्षण क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे सुरू असलेले योगदान याहीपुढे अखंडपणे सुरूच राहणार आहे यात शंकाच नाही. यासाठी त्यांना यापुढेही उत्तम आरोग्य ,मोठे दिर्घाआयुष्य लाभो हीच सदिच्छा....श्री.भोसले सर जाखले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment