*आदर्श मार्गदर्शक व उत्तम कर्णधार....*
*श्री. चंद्रकांत काशिनाथ निकाडे* 🔴
'ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे' या वचनाप्रमाणे ज्ञानावर श्रद्धा ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपडणारे श्री. चंद्रकांत निकाडेसर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. खूप खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन शिक्षक झालेले श्री चंद्रकांत निकाडेसर प्रथम त्र्यंबोली विद्यालय, विक्रमनगर, कोल्हापूर व हरिहर विद्यालय, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याचवेळी त्यांचा ' सहाण' काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता.
ते पन्हाळा तालुक्यातील श्री नवनाथ हायस्कूल, पोहाळे या विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून त्यांनी केलेले कार्य एकमेवाद्वितीय असेच आहे. अध्यापन सेवा करताना नाट्यकला, चित्रकला, शिल्पकला, वक्तृत्व, कथाकथन, लेखन, अभिनय, शैक्षणिक लघुपट निर्मिती, प्रशासन अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या सेवा कालात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून नव्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे.
हिंदी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सरांचे मराठी आणि इंग्रजी विषयांवरही प्रभुत्व आहे. गणित, भूगोल, जल सुरक्षा या विषयांचे ज्ञानही खूप आहे. विद्यार्थ्यांबरोबर सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. मुलांच्या हातांना लिहिते केले. त्यातून 'वाढदिवस' नावाचा काव्यसंग्रह निर्माण झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील नवसाहित्यिकांचे ते प्रेरणास्थान आहेत. त्या नवसाहित्यिकांपैकी मीही एक आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच माझी तीन पुस्तके प्रकाशित झाली. नवसाहित्यिकांना प्रकाशनाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हृदय प्रकाशन ही संस्था स्थापन करून या संस्थेद्वारे १२५ हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन करून आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे.
अनेक शाळांतून, साहित्य संमेलनातून 'कथाकथन' करणे सरांचा हातखंडा आहे. त्यांच्या कथाकथनात मनोरंजनाबरोबर प्रबोधन व संस्कारांना महत्व दिले. बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर या संस्थेतून नवलेखकांसाठी कार्यशाळा घेतल्या.
विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक, शिस्तप्रिय कर्णधार, उत्तम सहकारी, नवलेखकांचे आधारस्तंभ नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त होत असले तरी कार्यातून कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत. विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. ते त्यांचे ध्येय, उदिष्ट पूर्ण होण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य, चांगले आरोग्य लाभावे हीच निर्मिका चरणी प्रार्थना.
*परशराम आंबी*
No comments:
Post a Comment