वृत्त - वीरलक्ष्मी
२१२ २१२ २१२
कोणता कायदा पाळला?
सांग का वायदा टाळला?
राहते ती कुठे शेवटी
भाग थोडा जरी गाळला
मांडण्या आपली कुंडली
एकही ग्रंथ ना चाळला
मोल त्याला कुठे माहिती
कागदी मोहरा जाळला
स्वार्थ होता अंतरी
जाणुनी फायदा टाळला
वाट होती अशी काटकी
तो पुन्हा जाणुनी टाळला
पाहता पावसा ये रडू
थांबला आसवे ढाळला
भूतकाळातले चांदणे
मागता आसवे ढाळला
प्रेम वृंदावनी लाविला
वेल सांजावता वाळला
मी पुन्हा मोगर्याचा तुरा
कालही स्वागता माळला
चाँद परछाई
No comments:
Post a Comment