Tuesday, 16 January 2024

वाह रे नीति!

.         *वाह रे नीति!*

कावळे पोपटांच्या समुदायात घुसतात म्हणून ते अतिरेकी,
 
घुबडे चिमण्यांना मारतात
म्हणून ती आतंकवादी,

कोल्हे कुत्र्यांवर चाल करतात
म्हणून ते नक्षलवादी,

मांजरे बुलबुलवर झडप घालतात
म्हणून ती उग्रवादी;

मग
कावळ्यांच्या कळपात घुसणाऱ्या कावळ्यांना,
घुबडांचे शोषण करणाऱ्या घुबडांना,
कोल्ह्यांवरच चाल करणाऱ्या कोल्ह्यांना,
मांजरावर झडप घालणाऱ्या मांजरांना 
आणि 
आपल्याच देशातल्या, आपल्याच धर्मातल्या, आपल्याच जातीतल्या, आपल्याच पंथाच्या 
लोकांना... ... 
मुंडकं उडवीन, कलम करीन, गेम करीन, खात्मा करीन, नाद करायचा नाय, खेळ खल्लास
असे धमकावून गोचिडासारखे शोषण
करणार्‍या अधम नरांना काय म्हटले पाहिजे?

                     *© रमेश*

No comments:

Post a Comment