Tuesday, 2 January 2024

गाडगेबाबांचे कीर्तन

शाळा पडू दया
लेकरं मरू दया पण 
देवळं बांधा बाप हो,,,
सोन्याचा कळस चढवा त्यावर
उद्याचं भविष्य दडलंय ना त्यात,,,
बाजारात विकत मिळणारी मूर्ती जर
माणसाच्या जीवनात सुख समृद्धी आणत असेल तर,,,,
विकणारा काय खुळा आहे का ?
का मूर्ती घडवणारा खुळा आहे ?
तो स्वतःचं भलं करण्याऐवजी बाजारात देव मांडून त्याचा व्यापार कशाला करेल,,,
हे कधी कळणार माझ्या बांधवांनो .
आज हेच होत आहे..राम मंदिराचा गवगवा करून देव लोकशाहीच्या बाजारात विकून अघोरी मार्गाने पुन्हा सत्ता मिळवली जात आहे... सामाजिक विकास ..मानवता .. समानता याला तिलांजली देऊन धार्मिकता वाढवून देशाला पुन्हा विकासापासून वंचित ठेवले जात आहे..ओळखा व‌ लोकशाही वाचवा ..संतगाडगे बाबा 
****

No comments:

Post a Comment