तो आहे स्वयंघोषित, अनभिषिक्त सम्राट
या साम्राज्याचा
रेशन नावाचे तुकडे
फेकून आणि
... ... अफुची गोळी देऊन
गुलाम बनविता येतात
तरुण, प्रौढ, म्हातारेही
हे नव्यानं सांगायलाच
आलाय
लोकशाहीची मुस्कटदाबी करता येते त्याला
भल्या भल्यांच्या गळ्याभोवतीचे फास आवळला येतात त्याला
विकासाची गोंडस स्वप्नंही दाखविता येतात त्याला
तंत्रज्ञानाची करामत करून मतपेट्याही आपल्या मनासारख्या वळवता येतात त्याला
मर्जीतल्या मूठभर उद्योगपतींच्या कल्याणातून तो साधत असतो आपल्या मर्यादित समूहाचं
देशविदेशातील लोकप्रियतेचे भास-आभास निर्माण करून भुलवत राहतो जनसामान्यांना स्वतःच्या मर्जीने
या जादूगाराचे रहस्य उलगडेल एक दिवस आपोआप
पण फार वेळ झालेला असेल तेव्हा
सावध!
मित्र हो, सावधान!!
No comments:
Post a Comment