Saturday, 1 October 2022

*पातिव्रत्य*

ती नव्हती प्रश्नचिन्ह 
उत्तर होती ती
स्त्री दास्य संपविण्याचं 
स्त्री शक्तीचं 
मानवमुक्तीचं 
अस्मितेचं 
सेवेचं
अज्ञानाच्या अंधाराचं

काय माहीत तिला? 
कुण्या चित्रातल्या 
मूर्तीतल्या 
मनातल्या 
कल्पनेतल्या 
आभासी देवतेपेक्षाही 
ती करीत असलेलं कार्य 
महान होतं! 

आणि तरीही 
ती स्वतःच कशाला सांगेल 
माझा फोटो लावा शाळाशाळांमधून म्हणून 
तिला कृतीचा ध्यास होता 
कार्याचा हव्यास होता 
शिक्षणाची आस होती 
स्त्रियाबद्दल कणव होती 
मुलींबद्दल आस्था होती 
शिक्षणाबद्दल प्रेम होतं 
आणि तिला माहीत होतं 
हा समाज बदलण्यासाठी 
केवळ आणि केवळ 
शिक्षणच आहे गरजेचं
जिच्या हाती पाळण्याची दोरी 
ती जगाते उद्धारी हे ब्रीद 
ती नुसतं सांगून नाही राहिली करून दाखवलं
'करके देखो!'
हा संदेश येण्यापूर्वी

पातिव्रत्याचा अर्थ समजलेली
पहिली आणि एकमेव पत्नी

No comments:

Post a Comment