चला शब्दधन वाटू
करू अर्पण गंगेला
द्वाड आठवणी कटू
दारी तोरण बांधून
व्रत घेऊ औदार्याचे
एकमेकांसाठी मागू
वरदान ऐश्वर्याचे
अन्नदाता बळीराजा
मागू औक्ष त्याच्यासाठी
ज्याच्यामुळे दोन घास
जाती भुकेजल्या पोटी
राहू जन्माचे आभारी
कृतज्ञता त्याच्यासाठी
ज्याची गाई गुरे देती
बाळासाठी दूध वाटी
दारी रांगोळ्या सजून
धुंद पहाटेच्या वेळी
उटण्याची घमघम
उद्या येईल दिवाळी
No comments:
Post a Comment