*अग्निपंख*
एक दिवस
नुसती वर्तमानपत्रे टाकून
नाही होता येत
कलाम
आणि त्यांच्यासारखी हेअर स्टाईल
डोक्यावर ठेवूनही
नाही होता येत मिसाईल मॅन
त्यासाठी असावी लागते
डोक्यात नशा नवनिर्मितीची
आतून तळमळ, जिद्द आणि
स्वत:च्या लग्नाची तारीख
विसरण्याइतकं झोकून देणं
हाती घेतलेल्या देशकार्यात.
करावा लागतो अठरा तासांचा दिवस
अभ्यासासाठी
आणि पाहावी लागतात दिवास्वप्नं
झोप उडवणारी
लावून अग्निपंख घ्यावी लागते
गनभरारी नव्या दिशेने
अनंत आकाशाच्या मर्यादा तोडण्यासाठी
तेव्हा होता येतं कलाम
रात्रीची स्वप्नं पाहून तर
सगळेच होतात गुलाम
नादान सवयींचे,
आणि संकल्प करतात रोज नवनवे
'बघू उद्या" मंत्र जपत
*©रमेश*
No comments:
Post a Comment