Tuesday, 4 July 2023

आम्ही शोधतो

आम्ही शोधतो उन्हात 
गार सावलीची झाडे
जातो सोडून घरटी
बांधावया मोठे वाडे

असता भूक भाकरीची 
खातो पाव पेटी-पेटी
पोट फुगले म्हणून
घेतो डॉक्टरांच्या भेटी

असते नेसायचे रोज
वस्त्र राखावया लाज 
तेही फाडून तोडून
चिंध्या पांघरतो आज

नको तितका हव्यास
जेव्हा भरवतो मनी
तेव्हा होतो अनायासे
दु:खी साम्राज्याचे धनी

              *रमेश*

No comments:

Post a Comment